आमचाही पाउस.....

ज्ञानोबाचे पैजार's picture
ज्ञानोबाचे पैजार in जे न देखे रवी...
26 Jul 2015 - 12:10 pm

मित्रहो, मिपावर सुंदर कवितांचा एवढा पाउस पडतो आहे की सारे वातावरणच बदलले. त्यातच संमं ने पण छायाचित्रकलास्पर्धेचा विषयपण पाउस निवडला आणि मग हे कवी लोक जास्तच पेटले. आमची प्रकृती थोडी नाजुकच. या बदललेल्या वातावरणाचा नाही म्हटले तरी परिणाम होतोच.
काल रात्री शेवटी विडंबनारीष्ट घेउन झोपावे लागले. तेव्हा कुठे सकाळी मोकळे मोकळे वाटले.

फ्रेश झाल्यावर ठरवले की चला पावसाळ्यात थोडी रंगपंचमी खेळूया...

आम्ही पाडलेल्या चकल्या चावायच्या आधी त्या चकल्यांमधले खरे पीठ कोणाचे आहे ते बघावे आणि मग आमच्या चकलीचा आस्वाद घ्यावा...

सर्व मान्यवर कवीश्वर बालके पैजारबुवाची ही बाळलीला खुल्या दिलाने, आणि मन मोठे करुन माफ करतील अशी खात्री बाळगत माझे वेडेवाकडे शब्द सादर करतो....

पेरणा क्र. १ रातराणी यांची पुन्हा पाऊस
कविता क्र १.:- नको गाउस

नको गाउस

दात आणि ओठ आवळून, पिळवटून सारी काया,
तंबोर्‍यास खाजवण्या, होई अनावर ती बया,

घाबरला आसमंत सारा, सुर पडताची कानी,
स्तब्ध होऊनी ऐकतो, तुझी ठुमरी अन विराणी,

का ग गातेस भेसूर? तोंडातून उडे थुंकी,
जाते थिजून कोकीळा, श्वान लांबूनच भुंकी,

किती काळ साहू बाई, तुझे गाणे हे अघोरी,
माझ्या लेकरांना का ग? रोज हॉटेलची वारी,

तुझा गळा गोड आहे, ज्याने तुला सांगीतले ,
त्या हलकटाचे मी ग, काय घोडे मारलेले?

अहा तुझे गुरुजीही, तुझ्या परी रेकतात,
दूरुन ते दिसताच , सारे पळत सुटतात,

तुझ्या डोक्यातले खुळ, सखे का ग नाही जात?
नाही जे मुळी जे अडात, यावे कसे ते पोहर्‍यात?

रातकिडा
===============================================================================

पेरणा क्र. २शब्दबम्बाळ यांची पाउस
कविता क्र २. :- चाउस...

चाउस...

चाउस म्हणजे मराठी शब्द आणि त्याचे इंग्रजी प्रतिशब्द
कधी माहीत नसलेले इंग्रजी शब्द अन नव्या अर्थाचे जुनेच शब्द

चाउस म्ह्णजे पेपरमधे रोज जाहिरात, उजव्या खालच्या कोपर्‍यावरची
कधी डिक्षनरीची, तर कधी संभाषण कलेच्या पुस्तकाची

कधी चाउस म्हणजे १५० रु रु चे पुस्तक फक्त १०० रु मधे
तर कधी दोन दोन पुस्तके, एकाच पुस्तकाच्या किमती मधे,

चाउस म्हणजे दुकानात गेल्यावर ऑक्सफर्डची किम्मत पाहून मग हळूच घेतलेले नाव,
चाउसला वेबस्टरचे कव्हर घालून, कॉलेजमधल्या पोरींसमोर खाल्लेला भाव,

प्रत्येका साठी हा चाउस वेगळा, आणि प्रत्येकाचे वेग वेगळे अर्थ ,
ईंग्रजी थोडे समजावे आणि बोलता यावे हा ज्याचा त्याचा स्वार्थ,

शब्दसांभाळ,

=============================================================================

पेरणा क्र. ३ चुकलामाकला, यांची.....ही मनाची अंतरे...
कविता क्र ३. :- .... मन तनातच गुंतले....

मन तनातच गुंतले

फ्रॉक अथवा स्कर्टही तू घालीसी का तोकडे
सांग कसा मित्रांशी बोलू? असे नजर ही दुसरी कडे ,

होतसे संवाद अपुला, मोकळे केस मी बघत बसे,
वळतच नसे ग कदापी, असे नजर ही दुसरी कडे

स्लीवलेस आणि खोल गळ्याचा टीशर्ट तुला का आवडतो?
चेहरा तव मज दिसतच नाही, असे नजर ही दुसरी कडे,

लांब टाकितो खोल उसासे, मनात निग्रह करीत असे,
उमजू लागता अंत कथेचा, असे नजर ही दुसरी कडे,

लागलाखोकला,
===========================================================================

रंगपंचमी खेळताना गुरुजींना सोडून कसे चालेल? त्यांनी उधळलेले रंग सगळ्यांना आवडले, मग म्हटले आपणही थोडे रंग उधळावे... ही कविता खास त्यांच्या साठी...

पेरणा क्र. ४ हिरवट गुरुजींची, हिरवाई
कविता क्र ४. :- भगवाई,

भगवाई,

झेंडे भगवे, फेटे भगवे, भगवे स्कार्फही आले,
भगवानाने भारावूनी मग, भगवे चश्मे लुटले,

भगव्याची अशी नशा की, गुंतत गुंतत जावे,
मुळचा आपुला रंग टाकुनि, त्या रंगाचे व्हावे!

व्यक्तित्वाला उरू नये मग, मुळचा कुठला रंग,
आदेशाने पावन व्हावे, हाच खरा सत् संग!

स्वार्थ पहूनी पक्ष वेगळा, भलते बेचव कोडे,
सत्तेचेहे गाजर दिसता, का हे वेडे चाळे?

स्वार्थरुप तो मनुष्यदेहि, भगवा भगवा होतो,
मनी दडवूनी लोभ मायेचा, तुमच्या भेटि येतो,

भिणे रोजचे टाकुनि द्या हो, तुम्हि दाखवा रंग,
अद्दल त्यांना घडवण्याचा, बांधा मनात चंग,

चला गड्यांनो मनामनातुन, दडलेली भीती काढू,
काही क्षण तरि भेसुर चेहरे, यांचे उघडे पाडू

दु दु दु

पैजारबुवा,

dive aagarmango curryअनर्थशास्त्रआरोग्यदायी पाककृतीकाणकोणकाहीच्या काही कविताकोडाईकनालगरम पाण्याचे कुंडनागद्वारफ्री स्टाइलबालसाहित्यभूछत्रीमार्गदर्शनसांत्वनाहास्यरौद्ररसधोरणनृत्यपाकक्रियाइतिहासबालकथाबालगीतविडंबनउखाणेप्रतिशब्दऔषधोपचारविज्ञानफलज्योतिषकृष्णमुर्तीराजकारणमौजमजा

प्रतिक्रिया

एक एकटा एकटाच's picture

26 Jul 2015 - 1:16 pm | एक एकटा एकटाच

जबरदस्त

फ़क्त टाळ्या आणी टाळ्याच

प्रचेतस's picture

26 Jul 2015 - 1:25 pm | प्रचेतस

अगगागागागा....._/\_

काय ही महान काव्यप्रतिभा.
आम्ही तर कर्जदार झालो तुमचे पैजारबुवा.

आम्हाला तुमच्या चाहत्यांच्या जगात एक स्थाण दया प्लीज.

ल्ल्ल्ल्लूऊऊऊऊऊउ.

सदस्यनाम's picture

26 Jul 2015 - 1:27 pm | सदस्यनाम

..............आणि पैजारबुवांनी ठोकलेला हा जबरदस्त चौकार.
चाऊस च्या बाँड्रीवर तर आपण दिलोजांसे फिदा.

चुकलामाकला's picture

26 Jul 2015 - 1:35 pm | चुकलामाकला

वा! चान चान!

बुवा नमस्कार!!! सूचक शीर्षक आणि प्रेषक तुम्ही म्हटल्यावर आत काय असणार याची कल्पना आली होतीच. अपेक्षा पूर्ण केलीत. बेक्कार हसतोय राव!!! कशाकशाचा उल्लेख करू. सगळेच धम्माल विनोदी. लिखते रहो.

कवितानागेश's picture

26 Jul 2015 - 7:10 pm | कवितानागेश

पैजारबुवा पेटलेत! :-ड

टवाळ कार्टा's picture

26 Jul 2015 - 10:34 pm | टवाळ कार्टा

.

प्यारे१'s picture

26 Jul 2015 - 11:58 pm | प्यारे१

खतरनाक घाऊक विडंबने ;)

नाखु's picture

27 Jul 2015 - 10:24 am | नाखु

गोफण लै म्हणजे लै भारी !!

तुझ्या डोक्यातले खुळ, सखे का ग नाही जात?
नाही जे मुळी जे अडात, यावे कसे ते पोहर्‍यात?

नवकविता आभ्यासक्रमात घालायचे वाक्य प्रसवल्याबदाल जाहीर आभार !!!!!

पैजारांचा शेजार नाखु

रातराणी's picture

27 Jul 2015 - 12:28 pm | रातराणी

माझा लम्बर पैला. हटा सावन की घटा!
धत्तड तत्तड धत्तड तत्तड!

शब्दबम्बाळ's picture

27 Jul 2015 - 1:40 pm | शब्दबम्बाळ

खळबळजनक! मिपावर प्रथमच, घाऊक विडम्बने!!
सवलतीचा लाभ घ्या! ;)

ज्ञानोबाचे पैजार's picture

27 Jul 2015 - 2:32 pm | ज्ञानोबाचे पैजार

आता तुम्ही चान्स दिला आहेच तर माझ्याच एका जुन्या धाग्याची जाहिरात करुन घेतो.
हे बघा. या आधी पण हा उद्योग मी केला होता.

पैजारबुवा,

अत्रुप्त आत्मा's picture

27 Jul 2015 - 4:38 pm | अत्रुप्त आत्मा

हिरवट गुरुजींची >>> दू दू दू http://www.sherv.net/cm/emoticons/playful/angry-tongue-sticking-out-smiley-emoticon.gif

पैसा's picture

27 Jul 2015 - 4:42 pm | पैसा

दू दू दू पैजार बुवा!