हिरवाई..!
पक्षी हिरवे झाडे हिरवी हिरवे सारे झाले
हिरवाईने पाण्यालाहि हिरवे हिरवे केले!
रंगांचिहि अशी नशा की गुंतत गुंतत जावे
मुळचा आपुला रंग टाकुनि त्या रंगाचे व्हावे!
व्यक्तित्वाला उरू नये मग मुळचा कुठला रंग
व्यक्तित्वाने व्हावे त्याचा खराखुरा सत् संग!
आत्म दुजा अन देह वेगळा भलते बेचव कोडे
देहधारणा आत्मचि असता का हे वेडे चाळे?
आत्मरूप मी निसर्गदेहि हिरवा हिरवा झालो
मनी दाटता हिरवाई ती तुमच्या भेटि आलो
साज रोजचे टाकुनि द्या हो तुम्हिही उचला रंग
देवाजीच्या बागेमधला तुमचा एक अभंग
चला गड्यांनो हिरवाईला डोळे भरुनी पाहू
काही क्षण तरि आपुले नाही तिचेच होऊन राहू!

समर्पक आणि सुंदर.
बुवा मस्तंय कविता!
जबरद्स्त कविता.
हरिहरेश्वरला आहे. हे मी
____/\____
आगगाडीत लीवलीत काय? >>>
सुंदर रचना आत्मुस!!
छान
खूपच सुंदर कवीता.
मस्तच हो गुर्जी.
@ चांगलीच त्रुप्ती होत असेल
वा!
अप्रतिम कविता आणि सुरेख फोटोज
जडभरत
छान छान
गुरुजी लैइ भारी
धन्यवाद रे लिल्या.
उत्तम
रचना आवडली
वा! क्या बात है!
व्वाह्व्वा! मस्स्स्स्त!
हे ही सुरेख
हिरवाई
वाह! मस्तच!
वा! वा! हिरवीगार कविता.
हिरवे पाणी सोडून बाकी सगळे
काही क्षण तरि आपुले नाही
सुरेख कविता बुवा