जैसलमेरी चने आणी खोबा रोटी

सानिकास्वप्निल's picture
सानिकास्वप्निल in अन्न हे पूर्णब्रह्म
29 May 2013 - 3:40 am

द गोल्डन सिटी जैसलमेरची ही पाककृती आपण अन्न हे पूर्णब्रह्मच्या राजस्थानी पाककृती विशेषमध्ये पाहणार आहोत :)

चला तर मग राजस्थानच्या खाद्य भ्रमंतीला सुरुवात करुया.

साहित्य जैसलमेरी चने:

१ वाटी काळे चणे स्वच्छ धुवून रात्रभर भिजत घालणे. सकाळी पाणी उपसून कुकरला बोटचेपे शिजवून घेणे.
१ वाटी दही
३ टेस्पून बेसन
२ हिरव्या मिरच्या चिरलेल्या
१/२ टीस्पून जीरे
१/४ टीस्पून हिंग
१ टीस्पून हळद
१-१/२ टेस्पून लाल तिखट
१ टेस्पून धणेपूड
१ टेस्पून जीरेपूड
१/२ टेस्पून आमचूर पावडर
१ टीस्पून गरम मसाला
मीठ चवीनुसार
१ टेस्पून साजूक तूप

.
पाकृ:

एका बाऊलमध्ये फेटलेले दही+ हळद+ लाल तिखट+ धणेपूड व थोडे पाणी घालून एकत्र करा.
कढईत तूप गरम करून जीरे, हींग व हिरव्या मिरच्यांची फोडणी तयार करा.
त्यात आता दह्याचे मिश्रण घालून सतत ढवळत रहा. गॅस मंदचं असू द्या नाहीतर दही फाटू शकतं.
दह्याच्या मिश्रणाला उकळी येऊ लागली की त्यात शिजवून घेतलेले काळे चणे घाला व ४-५ मिनिटे शिजवा.
वेगळ्या बाऊअलमध्ये बेसन+ आमचूर पावडर+ जीरेपूड + हळद व थोडे पाणी घालून एकत्र करा.
हे बेसनाचे मिश्रण आता उकळत्या ग्रेव्हीमध्ये घाला व सतत ढवळत रहा.
ग्रेव्ही थोडी दाट होत आली व बेसन शिजले की त्यात चवीप्रमाणे मीठ घाला.
सगळ्यात शेवटी वरून गरम मसाला भुरभुरा.

.

गरमा-गरम जैसलमेरी चने तयार आहे, तुम्ही चपाती, पुर्‍यांबरोबर सर्व्ह करु शकता. आपण हे खोबा रोटी बरोबर सर्व्ह करणार आहोत.

.

साहित्य व पाकृ खोबा रोटी:

नेहमी चपात्या/ पोळ्यांकरीता कणीक भिजवतो तशी मीठ व तेलाऐवजी तुप घालून घट्ट भिजवून घ्यावी.
कणकेचा लिंबापेक्षा जरा मोठा गोळा घेऊन जाडसर पोळी लाटावी.
तवा मध्यम आचेवर तापत ठेवावा.
जाडसर लाटलेली पोळी तव्यावर दोन्ही बाजूने जेमतेम शेकून घ्यावी.
जेमतेम शेकलेल्या पोळी तव्यावरुन काढून घ्यावी व त्यावर एका बाजूने हलके चिमटे काढावे.
पुन्हा पोळी तव्यावर घालून दोन्ही बाजूने चांगली शेकून घ्यावी.
शेवटी गॅसच्या विस्तवावर खुसखुशीत शेकावी व वरून तूप पसरवून घ्यावे.

.

जैसलमेरी चने खोबा रोटी व कांद्याबरोबर सर्व्ह करा :)

.

प्रतिक्रिया

अर्धवटराव's picture

29 May 2013 - 3:53 am | अर्धवटराव

अन्न खरच पूर्णब्रह्म आहे.

अर्धवटराव

रेवती's picture

29 May 2013 - 5:00 am | रेवती

सुरेख पाकृ आणि फोटू. अशाप्रकारची रोटी असू शकते हे पाहून हसू आले.

स्पंदना's picture

29 May 2013 - 6:35 am | स्पंदना

एका बाजूने हलके चिमटे काढावे

.
अगदी आनंदाने काढले जातील.

चन्याची रेसीपी आवडली. रोटी सुद्धा आवडलीच पण हसवुन गेली.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

29 May 2013 - 7:29 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

रोटी लैच आवडेश.

बाकी, पाककृती ते प्रेझेंटेशन आता कौतुक तरी किती वेळा करायचं.
पण, कौतुक केलंही पाहिजे म्हणून ही केवळ पोच. :)

-दिलीप बिरुटे

चिंतामणी's picture

29 May 2013 - 8:23 am | चिंतामणी

नेहमीप्रमाणे.

उदय के'सागर's picture

29 May 2013 - 9:44 am | उदय के'सागर

व्वा ... सुंदरच... काय रंग आहे त्या भाजीचा :)... अप्रतिम... पोळीचा हा प्रकार नवीनच कळाला आणि आवडला :)

बाकी अन्नपूर्णे तुला साष्टांग नमस्कार!!!

प्रभाकर पेठकर's picture

29 May 2013 - 9:48 am | प्रभाकर पेठकर

व्व्वा,,! काळ्या चण्याचीही एवढी मस्तं पाककृती असू शकते ह्यावर विश्वासच नव्हता. चव झकास असणार ह्यात शंकाच नाही. 'चिमटापोळी' हा प्रकारही माझ्यासाठी नवीन आहे. करून पाहिला पाहिजे.

अक्षया's picture

29 May 2013 - 11:07 am | अक्षया

+ १

झकासराव's picture

29 May 2013 - 9:53 am | झकासराव

खपलो वारलो
लै भारी
खन्ग्री जबरी

काय काय बोलु झालय.
सगळ्याच पाककृती एकदम बैजवार असतात तुमच्या.

सानिकातै, त्या खोबारोटीत (आपण थालिपीठाला पाडतो तशी) भोकं पाडतात ना मध्ये?

सानिकास्वप्निल's picture

29 May 2013 - 3:23 pm | सानिकास्वप्निल

थालीपिठाप्रमाणे भोकं नाही पाडत , फक्त चिमट्यांनी (पापड तळतो/ भाजतो तो चिमटा) किंवा बोटांनी हलके चिमटे काढायचे :)
धन्यवाद.

अत्रुप्त आत्मा's picture

29 May 2013 - 11:40 am | अत्रुप्त आत्मा

आं.............. काय कू देखा ये धागा मैने??? http://www.mimarathi.net/smile/dash1.gif

हम्कू अभि के अभि ये डिश ऐसे इच खाने कू मंग्ता है!!! http://www.mimarathi.net/modules/smileys/packs/Example/20.gif

सुहास झेले's picture

29 May 2013 - 11:09 pm | सुहास झेले

कौतुकाला शब्द नाहीत..... !!!

मोदक's picture

29 May 2013 - 12:19 pm | मोदक

भारी!!!!!

नेहमीप्रमाणेच.

सही.... काय मस्त दिसतीये ती रोटी... थोडेसे फोकासिया ब्रेड ला मधे खड्डे करतात, तसेच वाटले. आणि चणे पण मस्त.

सानिकास्वप्निल's picture

29 May 2013 - 3:26 pm | सानिकास्वप्निल

फोकाचियाला बोटांनी खड्डे (डेंट्स) केले जातात ह्या पोळीला फक्त चिमटे काढायचे ;)
धन्यवाद गं.

खोबा रोटी ला चिमटे काढण्याचा शोध एखाद्या 'प्रेमळ विरहवीरा'कडून लागलेला दिसतोय.
कणकेमध्ये प्रेमिकेला शोधत असावा बिचारा. ;)
बाकी सानिकाची पाकृ आवडली म्हणून वेगळं सांगणं म्हणजे ..... अरे कुणाला उपमा सुचतेय का?

धनुअमिता's picture

29 May 2013 - 2:18 pm | धनुअमिता

नेहमीप्रमाणे.

पिलीयन रायडर's picture

29 May 2013 - 3:23 pm | पिलीयन रायडर

ही बाई वेडी आहे का...
आता हा फोटो आठवडाभर बघत बसावा लागणार ना...

वा एकदम मस्त.. हे दोन्ही प्रकार माहिती नह्वाते. पुढल्या वेळेस चणे असे करून पाहणार.

त्रिवेणी's picture

29 May 2013 - 6:17 pm | त्रिवेणी

सानिका तुम्ही अश्या चागल्या चागल्या पाक्रू टाकता त्या मुळे खुपच जळजळ होते हो.

मुक्त विहारि's picture

29 May 2013 - 9:31 pm | मुक्त विहारि

धन्य...

डॉ सुहास म्हात्रे's picture

29 May 2013 - 9:52 pm | डॉ सुहास म्हात्रे

काय हे ? पहिल्यांदा रोटीला अर्धवट भाजायचे, मग चिमटे काढायचे, मग परत भाजायचे आणि शेवटी चावे घेऊन खायचे ... छेछेछे किती हा क्रूरपणा !

पण फोटो बघितल्यावर फोटोलाच चावे घेऊन गट्ट्म करावेसेच वाटतेय ;) +D

jaypal's picture

29 May 2013 - 10:08 pm | jaypal

उत्त्मा फॉटोज. ते चपातीला चिमटे का काढायचे ? त्याने नेमके काय होते? चवित काही फरक पडतो का?

प्रभाकर पेठकर's picture

30 May 2013 - 2:05 am | प्रभाकर पेठकर

तिला चिमटे काढण्यात मजा येते.

विसोबा खेचर's picture

15 Jun 2013 - 12:34 pm | विसोबा खेचर

सुरेख..!

पैसा's picture

15 Jun 2013 - 12:41 pm | पैसा

नेहमीप्रमाणेच!

वेल्लाभट's picture

15 Jun 2013 - 7:16 pm | वेल्लाभट

तों. ला पा. !!!!!!
खत्तरनाक