एगलेस होलव्हीट पॅनकेक

खादाड अमिता's picture
खादाड अमिता in अन्न हे पूर्णब्रह्म
23 Jan 2013 - 10:59 am

eggless wholewheat pancakes

नवीन वर्षातला नवीन प्रयत्न आहे, अंड युक्त पदार्थांचे अंड रहित पर्याय/ पाक्रु शोधून काढायच्या. ही पॅनकेक ची कृती मला, सई खांडेकर - माझी ब्लॉगर मैत्रीण, हिच्या ब्लोग वर सापडली.

सामग्री:
१ कप गव्हाचे पीठ
१ कप रवा
३/४ कप साखर
१ चमचा खायचा सोडा
१ चिमुट मीठ
२ कप दूध
१ मोठा चमचा तूप

कृती:

- सर्व सामग्री एकत्र करा. गुठळ्या राहता कामा नाही.
- एक नॉन - स्टिक तवा थोडा गरम करून त्यावर एक डावभर मिश्रण ओतून थोडं गोलाकार पसरवा. आच मंद ठेवावी.
- पॅनकेक ला सायीड ने एक दोन थेंब तूप सोडावे. झाकण ठेवून, वर थोडी जाळी पडली कि उलटवून खरपूस भाजून घ्यावे.
- हे पॅनकेक गरम गरम लोण्याच्या (छोट्या) गोळ्या बरोबर किंवा मध, मेपल सिरप बरोबर फस्त करावे.

Warning: No one can eat just one :)

प्रतिक्रिया

दिपक.कुवेत's picture

23 Jan 2013 - 12:39 pm | दिपक.कुवेत

पाकॄ आणि फोटो. पॅनकेक हा सकाळच्या न्याहरिचा उत्तम पर्याय आहे. गव्हाचे पीठाचे कधि ट्राय केले नव्हते, आता केले पाहिजेत. साखर असल्यावर परत मध घालुन अति गोड नाहि होणार?

खादाड अमिता's picture

24 Jan 2013 - 11:32 am | खादाड अमिता

साखर असल्यावर परत मध घालुन जास्त गोड लागते, पण अती वाटत नाही (आवडीने गोड खाणाऱ्यांना). तुम्ही चवीनुसार साखर कमी जास्त घालू शकता.

सानिकास्वप्निल's picture

23 Jan 2013 - 12:55 pm | सानिकास्वप्निल

एकदम हेल्दी पर्याय :)
मेपल सिरपसोबत बेरीज असतील तर अहाहा....

खादाड अमिता's picture

24 Jan 2013 - 11:33 am | खादाड अमिता

मेपल सिरपसोबत बेरीज असतील तर अहाहा....

पैसा's picture

23 Jan 2013 - 2:17 pm | पैसा

आज संध्याकाळीच करणार!

वा! नवीनच प्रकार आहे. नक्की करून बघेन

खूपच चांगला पर्याय. नाहीतर मुलांना सकाळी मैद्याच्या गोष्टी द्यायचे टाळले जाते, शिवाय मुले अंडे खातात पण आपण खात नसलो तर दोन दोन ब्याटरे बनवावी लागतात ती टळतील. फोटू एकदम भारी आलाय.

पैसा's picture

23 Jan 2013 - 7:57 pm | पैसा

याच प्रमाणात केले आणि माझ्या मुलाने एकट्याने संपवले. मी कसाबसा एक मिळवू शकले. मस्त झाले होते हे.वे.सां.न.!

बरे झाले पावती मिळाली. मीही करते लगेच.

खादाड अमिता's picture

24 Jan 2013 - 11:35 am | खादाड अमिता

पदार्थ लगेच करून बघितला आणि आवडला, दोन्ही कळवल्या बद्दल खूप आभार.. ऐकून आनंद झाला.

कवितानागेश's picture

23 Jan 2013 - 8:10 pm | कवितानागेश

मस्त. माझी बहिण या मिश्रणात पिकलेले केळे पण घालते. छान लागतात तसे. :)

स्पंदना's picture

24 Jan 2013 - 9:40 am | स्पंदना

अगं केळ त्यात मिसळण्याऐवजी त्याच तव्यावर बाजुला उभे चिरुन भाजुन घे. जेंव्हा पॅनकेक भाजत असतो ना त्याच वेळी एक केळ उभ कापुन ते दोन्ही बाजुला ठेवायच. छान कॅरॅमल होत ते त्याच बटरमध्ये अन काय लागत म्हणुन सांगु? भन्नाट!

अग्निकोल्हा's picture

24 Jan 2013 - 12:22 am | अग्निकोल्हा

फोटो बघितला अन पट्टाकन वाटलं बिन कांद्याचा उत्तपा होता की काय ;)

स्पंदना's picture

24 Jan 2013 - 9:41 am | स्पंदना

पॅनकेक गव्हाच्या पिठाचा अन बिन अंड्याचा होतो हे प्रथमच ऐकल अन फार बर वाटल. पैसाताई अजुन जीवंत आहे तर मी ही करुन पाहेन म्हणतेय.

अत्रुप्त आत्मा's picture

24 Jan 2013 - 12:13 pm | अत्रुप्त आत्मा

http://www.sherv.net/cm/emoticons/hungry/smiley-face-is-hungry.png
================================================================================
http://www.sherv.net/cm/emoticons/cook/hungry-kids.gif

एकदम सोपा पॅनकेक.. करायलाच हवा हा..

- पिंगू

खादाड अमिता's picture

26 Jan 2013 - 9:50 am | खादाड अमिता

बघित्ला का करुन?

तिमा's picture

24 Jan 2013 - 8:48 pm | तिमा

'आँट जेमिमा' मिळतं त्याचे घटक असेच असतील का ?

फोटो फारच छान दिसतोय!

रेवती's picture

24 Jan 2013 - 8:53 pm | रेवती

जेमायमा काकूंपेक्षा अमिताकाकूंची रेशिपी जास्त चांगली आहे.
जेमायमा बाइ त्यात मैदा घालतात (तसे सगळेच जण घालतात म्हणा!), यात कणिक आहे शिवाय रवा.
अमिता, मीही काल करून पाहिले छान लागले पण कणिक आणी रव्यामुळे गपकन् पोट भरते. :) बेताचे गोड होते त्यामुळे त्यावर मेपल सिरप घेण्यास वाव राहिला. मुलाने अर्थातच मेपल सिरप, बटर यांचा चिखल करून त्यात लोळवून खाल्ले. ;)

तीच तर गम्मत आहे! ;)

शुचि's picture

24 Jan 2013 - 9:06 pm | शुचि

सोपी वाटते तरी आहे. करायला पाहीजे.

खादाड अमिता's picture

26 Jan 2013 - 9:51 am | खादाड अमिता

:)

Mrunalini's picture

25 Jan 2013 - 3:03 pm | Mrunalini

मस्त पाकॄ..

करुन पाहते. सोपी पाकृ, पट्कन होतील असे वाटते. धन्यवाद.

II श्रीमंत पेशवे II's picture

3 Feb 2013 - 8:56 pm | II श्रीमंत पेशवे II

याला माल्पोंव असे म्हणावे का ?