कर्नाटक मंदिर भ्रमंती(हळेबीड-बेलूर-शृंगेरी इ.)

लई भारी's picture
लई भारी in भटकंती
22 Jan 2013 - 4:57 pm

मंदिर भ्रमंतीच म्हटली पाहिजे कारण आमच्या वास्तुविशारद परम मित्रांनी आखलेल्या ह्या ट्रीपमध्ये बहुसंख्य देवळांचा समावेश होता; तरी मी नाराजी दर्शवल्यामुळे शेवटी आटोपते घ्यावे लागले. :)

२७ डिसेंबरला सकाळी आम्ही निघालो NH4 ने दावणगिरीच्या दिशेने. थेट रानीबेन्नुरला थांबलो जेवणासाठी, तोपर्यंत ३ वाजून गेले होते. मेन रोडवरच स्टॅंडच्या पुढे डाव्या बाजूला छोटीशी खानावळ आहे - 'बसवेश्वर खानावळी'. ज्वारीची भाकरी आता इथून पुढे ४-५ दिवस मिळणार नाही याची कल्पना असल्याने २ घास जास्तच गेले! :)

इथून पुढे आमच्याकडे होता तो मित्राच्या वडिलांनी आखून दिलेला मार्ग आणि कर्नाटकचा नकाशा(कागदावरील, online नव्हे)! बहुसंख्य प्रवास याच्या आधारानेच केला.

पुढे हरिहरला जाण्याचा प्लॅन होता पण उशीर झाल्यामुळे कॅन्सल करावा लागला. थोड्या वेळाने दावणगिरी नंतर हायवे सोडून संतेबेन्नूर साठी उजवीकडे वळलो, पण चुकीचा रस्ता घेतला आम्ही; हा शॉर्टकट होता पण रस्ता पूर्णपणे खराब. याच्या थोडे पुढे एक state highway दिसत होता नकाशात, पण परत जाणे सुद्धा शक्य नव्हते. संतेबेन्नूर ला कसेबसे पोचलो तेव्हा साडेपाच होऊन गेले होते. आता इथून पुढे चन्नगिरी(Channagiri) ला जायचा रस्ता शोधत असताना डावीकडे काहीतरी पुरातन वास्तू दिसली आणि सगळे खुश झालो. तिथे गेल्यावर त्या रम्य संध्याकाळी पुष्करणीचा सुंदर देखावा बघून एकदम प्रसन्न झालो :)

1

2
काही स्थानिक लोक सोडले तर विशेष कोणी नव्हते त्यामुळे एकदम निवांतपणे फिरता आले. जवळची वास्तू म्हणजे मुसाफिरखाना आहे अस कळल. त्याच्या गच्चीवर जाऊन छान view मिळाला.
3
4
खूप वेळ रेंगाळत होतो पण बरंच अंतर जायचं असल्याने लगेच निघालो. इथून पुढे एक खूप चांगले लक्ष्मी-रंगनाथ मंदिर आहे असे कळले म्हणून गेलो पण निराशा झाली. तोपर्यंत अंधार पडलाच होता तरी सुद्धा शहाजी महाराजांच्या समाधीला भेट देण्यासाठी होदिगेरे(Hodigere) गावाचा शोध घेतला. अपेक्षेप्रमाणे हे स्मारक देखील तसे दुर्लक्षित होते.

तिथून निघालो Channagiri मार्गे भद्रावतीला पहिल्या मुक्कामासाठी.

पोचेपर्यंत ९ वाजत आले होते, थोड्या चौकशी नंतर 'पवन लॉज' मध्ये राहायचे ठरले. Descent आहे शहराच्या मानाने :) त्याच्या बाहेरच मेन रोड वर पद्म-निलय नावाचे हॉटेल आहे जिथे रात्री जेवलो आणि सकाळी नाश्ता पण केला. इथला प्लेन केक मस्तच होता! नंतर सुद्धा आठवण निघत होती सारखी!

दुसऱ्या दिवशी सकाळी Tarikere च्या अलीकडे बेंगलोर हायवेला 'Bhadra Wildlife Sanctuary and Dam' चा बोर्ड दिसला म्हणून आत शिरलो. तिथल्या ऑफिस मधून कळले की सकाळी ६ आणि संध्याकाळी ४ वाजता जंगल सफारी असते आणि नशीब जोरावर असेल तर वाघोबाचे दर्शन पण होते :) गवे पण असावेत जंगलात.
5
आता आलोच आहे इकडे तर जरा चक्कर मारावी म्हणून dam च्या दिशेने गेलो तर कळले की इकडे एक resort आहे. जाऊन बघितले तर अगदी धरणाच्या काठाला लागून ते resort आहे. इथला ambiance, view एक नंबर आहे!
6
इथल्या जवळपास सगळ्या कॉटेज रूम मधून जलाशयाचा सुंदर view आहे! :)
7
ह्यांच्याकडे १-२ दिवसाचे जंगल सफारीसह पॅकेज उपलब्ध आहे आणि resort एकदम छान आहे.. एकदम निवांत कोलाहला पासून दूर असे ठिकाण असल्यामुळे २ दिवस मस्त राहायला यावे असे वाटते! पण थोडे महाग वाटले.
अधिक माहितीसाठी ही लिंक बघा www.riverternlodge.com

इथून निघालो अमृतपुरा(Amruthapura) येथील अमृतेश्वर मंदिर पाहायला. होयसाळ शैलीतील हे मंदिर आहे बहुधा. विकी वर माहिती आहे. खूप छान मंदिर आहे. इकडे आवर्जून जाणवलेली गोष्ट म्हणजे या सर्व ठिकाणांना पुरातत्व विभागाने संरक्षित स्मारक घोषित केल्यामुळे त्यांची एकदम नीट काळजी घेतली जाते.
इथून पुढे एक से एक मंदिरांच्या कारागिरीचे नमुने बघायला मिळत होते! इतके नाजूक आणि सुबक काम तेही इतक्या तपशीलासह एका सलग दगडात पाहून विश्वासच बसत नव्हता! इथल्या कारागिरीचे वर्णन शब्दात करणे अशक्यच आहे!
8
बारीक सारीक तपशील आणि symmetry बघून नुसते अवाक झालो!
9

छतावर एके ठिकाणी नटराजाची मूर्ती आहे. खूप अंधार असल्यामुळे नीट फोटो घेता आला नाही. (SLR ची गरज सारखी वाटत होती :) )
10

त्यानंतर आम्ही निघालो हळेबीड-बेलूरच्या दिशेने. हळेबीडच्या आधी Belavadi साठी एक फाटा लागला, थोडेसे आत जावे लागते पण नृसिंह मंदिर खूप छान आहे.
11
12
मला वाटते कृष्णाची इतकी सुंदर मूर्ती मी अजून पाहिली नाही आहे :)
13

कोरीव काम तर सुंदर होतेच :)

14
15

ह्या मंदिरात आमच्याशिवाय कोणीच भाविक/पर्यटक नव्हते त्यामुळे शांतपणे बघता आले आणि पुजाऱ्याने सर्व माहिती पण नीट सांगितली.
सगळ्यात जास्त आवडलेले मंदिर!!! :)

त्यानंतर निघालो आम्ही हळेबिडू(अलीकडे बऱ्याच गावाना 'ऊ' प्रत्यय लागलाय कर्नाटकात) कडे. इथल्या जगप्रसिद्ध मंदिरात प्रचंड गर्दी होती, मोठ्ठ्या संख्येने शाळांच्या सहली पण होत्या.
16
17
अतिशय सुंदर मंदिर आणि खूप कोरीव काम असल्यामुळे गाईड घेणे अगदी आवश्यक आहे. २०० रु. घेतले आणि हिंदी मध्ये मंदिर तसेच महत्वाच्या शिल्पांविषयी माहिती दिली. पुढील माहिती गाईड ने दिल्या नुसार:
ह्या गावाचे मूळ नाव काहीतरी वेगळे होते, पण हे मंदिर बांधताना आणि नंतर खूप हल्ले झालेत त्यामुळे ह्याचे नाव हळेबिडू पडले, ज्याचा अर्थ 'भग्न गाव/जागा' असा आहे. अनेक हल्ल्यांमुळे बऱ्याचशा मूर्ती/शिल्पे विद्रूप केली आहेत :( आणि त्यामुळेच हे मंदिर पूर्ण होऊ शकले नाही. १०० हून अधिक वर्षे लागलीत आता जे मंदिर आहे ते बनायला.
18
होयसाळ घराण्याने हे शिवाचे मंदिर बांधले आहे त्यामुळे २ मोठ्ठ्या नंदीच्या मूर्त्या पण आहेत.

ह्या मंदिराची विशेषता की इथले बाहेरचे कोरीव काम खूप सुंदर आहे आणि रामायण-महाभारत इ. मधील प्रसंग इथे उतरवले आहेत. इथल्या शिल्पांमधील तपशील बघून थक्क व्हायला होत! हा दगड 'soap stone' आहे,जो सुरुवातीला मऊ असतो आणि नंतर उन-पावसामुळे कठीण होतो.
19
वरती जे डमरू दिसतंय त्याच्या वाद्या(strings) पण अगदी त्याच्या ताणासाहित दिसतात!

ह्या खालच्या शिल्पात कृष्णाने गोवर्धन पर्वत उचलला आहे तो प्रसंग इतक्या तपशीलात आहे की त्या पर्वतावरील एक झाडावरच्या माकडाच्या हातात पाहीतरी फळ आहे ते पण दिसते! हे आणि असे अनेक चमत्कार बघून फक्त निःशब्द व्हायचं!
20
21

ह्या नर्तकीचे तळपाय सुद्धा इतक्या तपशीलात आहेत की तिच्या नृत्यमुद्रेप्रमाणे पायाची ठेवण दाखवली आहे.
22
इथे राहण्याची सोय चांगली नाही अस कळल्यामुळे १५ किमीवर असलेल्या बेलुरला मुक्कामासाठी जायचं ठरवलं. संध्याकाळी पोचलो आहेच तर एक चक्कर टाकू आणि शक्यतो आज रात्रीच इथून निघू असा बेत होता. हे विष्णूचे मंदिर आहे आणि बहुधा होयसाळ घराण्याचे कुलदैवत आहे. हळेबीडच्या मंदिराशी शैलीत खूप साधर्म्य आणि साधारण एकाच कालखंडात बांधलय. हे मंदिर पूर्ण असल्यामुळे इथे पूजा-अर्चा चालू असते. आम्ही पोचलो तेव्हा मंदिरात सॅक्सॉफोन आणि Thavil वादन चालू होते! त्या धीरगंभीर वातावरणात इतकं भारी वाटत होत की सगळेजण एकदम trans मध्ये गेलो! त्यानंतर २ लहान मुलींचे भरतनाट्यम म्हणजे तर पर्वणीच होती. :) अविस्मरणीय संध्याकाळ होती!
23
राहण्यासाठी बऱ्याच लोकांनी सुचवलेले ठिकाण म्हणून Vishnu Regency शोधत गेलो पण इतके काही आवडले नाही. त्यामुळे Maurya(KSTDC approved) हॉटेल शोधले. सुविधा चांगल्या आहेत, पार्किंगचा प्रश्न नाही, पण इथल्या स्टाफला service हा शब्द माहीत नसावा! :) जेवण काही खास नव्हते.
सकाळी उठून मंदिरात जाण्याआधी एका छोट्या हॉटेल मध्ये भरपेट नाश्ता करून घेतला! काय काय ऑर्डर केलं होत काय माहीत! पण इकडे सगळीकडे डोसा, इडली-वडे खूप भारी होते. अशी कॉफी तर आपल्याकडे मिळणे अशक्य आहे(ह्या हॉटेल मधल्या कॉफीची झक्कास किक बसली होती). जेवण इतकं नाही आवडत पण. इकडच्या सोनकेळ्याना एकदम भारी चव होती, आम्ही तर त्यांना पेरू-केळीच म्हणायचो! :P

बेलूरच्या मंदिरासाठी गाईड घेतला आणि त्याने बरेच तपशील सांगितले जे आपल्या एरवी लक्षात येणे अवघड आहे. ह्या मंदिरात आतील कलाकुसर खूप छान आहे. एका नर्तकीच्या हातातील बांगडी गोल फिरवता येते म्हणे!
24
काल जिथे गायन/नृत्य चालू होते त्या जागी एक सर्चलाईट लावला होता छतावरची कलाकुसर दाखवण्यासाठी!(त्याचे २० रु. वेगळे बर का :) ). इतकं बारीक नक्षीकाम बघून किती अवाक व्हायचं अस वाटत होत!
25
खूप वेळ पाय निघत नव्हता खर तर इथून!
26
नंतर आम्ही Mudigere मार्गे Kalasa(उच्चार 'कळसा' बहुधा) ला निघालो. अण्णांनी सांगितल्याप्रमाणे इथून पुढचा प्रवासच बघण्यासारखा आहे! :) आणि थोड्याच वेळात ह्याचा अनुभव येऊ लागला. अचानक रुक्ष वातावरण बदललं आणि सगळीकडे झाडी दिसू लागली. वळणावळणाच्या रस्त्यातून जाताना थोड्या वेळाने कळल की कॉफीचे मळे आहेत दोन्ही बाजूस. मध्ये गाडी थांबवून एकदा बघून याव कसं दिसत कॉफीचं झाड म्हणून एक चक्कर मारून आलो! दुपारची वेळ होती आणि नुसती कॉफीची फळं बघून तहान-भूक भागत नव्हती, अशात आम्हाला 'कॉफी कॉर्नर' असा एक बोर्ड दिसला आणि ५-६ किमी नंतर एक छोटेसे टपरीवजा हॉटेल लागले. बहुधा हॉटेल-मॅनेजमेंट केलेला कोणीतरी उत्साही मुलगा असावा, त्याने कॉफी मळ्याच्या शेजारीच स्नॅक्स, कॉफी इ. साठी ते चालू केलय. छान view आहे आणि कोल्ड कॉफी तर लाजवाब होती(दुर्गा प्रेमींनी म्हणावं - याला म्हणतात कोल्ड कॉफी :D) कांदाभजी पण मिळाल्या!
इथूनच थोडे पुढे 'Kelagur Coffee and Tea Estate' मध्ये स्थानिक मळ्यातील चहा-कॉफी इ. गोष्टी मिळतात. (घरी आणलीय कॉफी, चांगली वाटतेय :) )
आम्हाला Kalasa इथे पोचायला दुपार उलटून गेली होती. इथले मंदिर लाकडी आहे.
27
आजूबाजूचा परिसर पण एकदम नयनरम्य आहे! सगळ्यांना विशेष वाटत होत की ह्या भागातली घरे एवढी maintained कशी काय आहेत! एकदम छान आणि टुमदार:)

४:३० च्या दरम्यान त्या छोट्या गावात एक खानावळ वजा हॉटेल शोधले. जागा बघून इथे काहीच खायला नको अस वाटलं होत सुरुवातीला पण जेवण एकदम आवडल. चपात्या तर घरच्यासारख्या होत्या!

साधारण १० किमी वर होर्नाडू(Hornadu) इथे 'अन्नपूर्णेश्वरी मंदिर' आहे. रस्ता अतिशय खराब आहे. पण इकडे जायचेच असल्याने काही सुटका नव्हती :P

अगदी आडमार्गी असले तरी राहण्यासाठी बऱ्याच सोयी दिसल्या. खूप लांबून भाविक येतात असे दिसत होते, पण आम्हाला काही खूप इंटरेस्ट नव्हता. :)
28
इथला मंदिराचा फोटो मात्र काढायचा राहिला.
इथून जायचे होते शृंगेरीला मुक्कामासाठी. अंतर तसे बरेच होते आणि घाटांचा रस्ता असल्यामुळे चौकशी केली आणि कळले की Balehonnur वरुन रस्ता बरा आहे. शृंगेरीला पोचेपर्यंत रात्र झाली होती. गावाबाहेरच एक मोठ्ठे हॉटेल आहे पण ते फुल्ल असल्यामुळे गावात चौकशी करत समजले की मठ/मंदिराच्या अगदी समोर भक्त निवास मध्ये चांगली सोय आहे, अगदी माफक दरात.
इथे पुरातनकालीन सरस्वती मंदिर आहे आणि अजून पण बरीच मंदिरे आहेत. त्याबरोबरच सर्वात महत्वाचे म्हणजे शंकराचार्य मठ आहे.
29
30
इथे खूप सारे पालक आपल्या लहान मुलांना 'श्रीगणेशा' करण्यासाठी पाटी-पेन्सिल घेऊन आले होते.
हे मंदिर नदीच्या काठावरच आहे आणि पलीकडे मठ आहे. चालत जाण्यासाठी पूल आहे, त्याच्या शेजारी लोक माशांना खायला घालत असतात त्यामुळे इथले मासे एकदम मोठे झाले आहेत! :)
31
पलीकडे एकदम निसर्गरम्य वातावरणात गुरु-निवास आणि बरेच काही आहे.
32
मग निघालो आम्ही अगुंबे(Agumbe) घाटाकडे, इथून हवा स्वच्छ असेल तर कोकणचा देखावा दिसतो म्हणे! थोडा वेळ टाईमपास करून आम्हाला जायचे होते Thirthahalli मार्गे हुमचा(Humcha) येथील पुरातनकालीन जैन मंदिर बघायला. मुख्य मंदिर बहुधा नवीन आहे, पण थोड्या अंतरावर संरक्षित स्मारक असलेले जुने मंदिर आहे.
बरीच पडझड झाली होती पण परत restore करायचा प्रयत्न केलाय.
33
34
इथून निघालो 'सागर' जवळ 'Ikkeri' इथे. हे पण मंदिर पुरातनकालीन आहे.
35
36
खरे तर इथपर्यंत माझा मंदिर बघण्याचा स्टॅमिना संपला होता त्यामुळे बनवासी(कदंब घराण्याची राजधानी) वगैरे ठिकाणांना जाण्याचा बेत रहित केला आणि जोग फॉल्सच्या जवळूनच हाय-वे ने कोकणात उतरलो, होनावरला. तिथून ३०किमी दक्षिणेला किनारपट्टीवरच मुर्डेश्वर आहे. तिथे मुक्कामासाठी गेलो.

घाट उतरल्या नंतर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली म्हणजे बेलूर-शृंगेरी साईडला खूप छान वाटत होते, आणि वेगळाच भाग वाटत होता. पण खाली किनारपट्टीला आल्यावर नेहमीची बजबजपुरी वाटू लागली!
मुर्डेश्वर मध्ये ३० डिसेंबरला राहायला मिळणे अवघड वाटत होते, पण सुदैवाने RNS residency(जे मंदिराला अगदी लागून, sea view असणारं भारी हॉटेल आहे) मध्ये सहाव्या मजल्यावर मस्त रूम मिळाली!
37
खूप प्रसिद्ध जागा आहे! इथे सगळ भव्य दिव्य आहे :) प्रचंड मोठ्ठी शंकराची मूर्ती, खूप उंच गोपुरम इ.
गोपुरम मध्ये लिफ्ट ने जायचं असल्यास दुपारी ३ नंतर सोडतात अस ऐकल.
28
38

मुर्डेश्वर मध्ये अजून एक गोष्ट जाणवली म्हणजे इथे सबकुछ RNS आहे. कोणीतरी RN Shetty नावाचा बडा माणूस दिसतोय!

इथून निघालो आम्ही परत होनावर मार्गे गोकर्णच्या दिशेने. ४ पर्यंत पोचलो होतो, मग ओम बीच कडे जाण्याचा विचार आला(तिकडची काही रिसॉर्टस् चांगली आहेत अस ऐकल्यामुळे).
३१ डिसेंबर असल्यामुळे सगळी रिसॉर्टस् फुल्ल होती. मग असंच अगदी आतल्या बाजूला असलेले रिसॉर्टस् शोधताना अंजनेय जन्मस्थाना जवळ एक भारी स्पॉट सापडला! सूर्यास्ताची वेळ असल्यामुळे एकदम मस्त देखावा होता.
39
खूप छान हवा असल्यामुळे इथून पाय निघत नव्हता खर तर!

आम्हाला दमदार साथ दिलेल्या चौगुलेंच्या गाडीचा फोटो तर निघायलाच पाहिजे होता :)
40
इथे मागे काही गाड्या वगैरे दिसत आहेत तिथे एक कॅफे आहे. बराच वेळा क्षुधाशांती झाली नसल्यामुळे किमान कॉफी तरी मिळतेय का बघण्यासाठी गेल्यावर कळलं की तो कॅफे जर्मन लोकांनी चालवलाय आणि भारतीयांना अप्रत्यक्षरीत्या प्रवेश निषिद्ध आहे. आम्ही चौकशी केल्यावर अतिशय सभ्य शब्दात काहीतरी बहाणे बनवून indirectly सांगितलं की Indians are not welcome! ह्या भागात खूप युरोपियन/रशियन लोक दिसत होते आणि साहजिकच त्यांच्यासाठीची रिसॉर्टस्, कॅफे इ.
भारतातल्याच एका भागात भारतीयांना प्रवेश नाकारला जातोय हे बघून अतिशय सुन्न झालो. गोकर्ण/ओम बीच चं मोर्जी(Morjim-Goa) होतंय, किंबहुना झालेच आहे अस वाटत होत.

मग रात्री ८ च्या दरम्यान परत गोकर्ण गावात आलो. ३१ डिसेंबर मुळे धास्ती होती, पण थोड्याच प्रयत्नात रूम मिळाली. दुसऱ्या दिवशी सकाळी गोकर्ण बीच वर गेलो पण एकदम निराशा झाली. लोकांनी वाट लावून टाकली आहे बीचवर. अतिशय अस्वच्छ आहे.
नंतर इथल्या मंदिरात बाहेरूनच दर्शन घेतले! अंगारकी असल्यामुळे प्रचंड गर्दी होती.
मग दुपारी परतीच्या प्रवासाला लागलो. रात्रीपर्यंत कोल्हापूरला पोचायचे होते. जेवणासाठी अंकोल्याच्या अलीकडे हायवे वर इंडियन ऑईलच्या पंपावर कामत रेस्टॉरंट आहे, तिथे थांबलो. जेवण छान आहे. इतके दिवस दाक्षिणात्य खाल्ल्यावर पंजाबी थाळी चा मोह आवरला नाही आणि खरंच चांगली मिळाली थाळी.
नंतर मग यल्लापूर मार्गे थेट हुबळी जवळ NH4 वर आलो. मधून काही शॉर्टकट आहेत पण हा रस्ता एकदम चांगला आहे.

बेळगावच्या आसपास सूर्यास्त होताना ढगाआड सूर्य लपला होता.
41
कलत्या सूर्यासोबत आम्ही पण परत निघालो होतो घरी, पुन्हा कधी अशीच भारी ट्रीप करायची या विचारात! :)

आम्ही घेतलेला मार्गाची google map link देण्याचा प्रयत्न केला पण खूप मोठ्ठी झाल्यामुळे इथे टाकता आली नाही, माझ्या ब्लॉग वर आहे.

(ऐतिहासिक, भौगोलिक, पौराणिक तपशिलांमध्ये काही चूक आढळल्यास सूचनांचे स्वागत आहे. जिथे उच्चाराबाबत शंका होती तिथे इंग्रजी वापरलंय :) )

ता.क. हे फोटू डकवणे म्हणजे लई डोक्याला ताप हाय राव! किंवा मला नीट माहिती नसेल :)

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

22 Jan 2013 - 5:17 pm | प्रचेतस

खूप सुंदर.

मूकवाचक's picture

23 Jan 2013 - 9:59 am | मूकवाचक

+१

अप्रतिम सुंदर. खरंतर अजून २-३ धागे झाले असते, पन एनीवेज. फटू मस्त सुंदर आहेत.

चिंतामणी's picture

27 Jan 2013 - 7:24 pm | चिंतामणी

असेच म्हणायचे आहे मला.

चौकटराजा's picture

22 Jan 2013 - 5:45 pm | चौकटराजा

भारतात मी बर्‍यापैकी भटकलो आहे. कर्नाटक हे माझे पर्यटनाचे दृष्टीने सर्वात आवडते राज्य आहे. पूर्वेस मुस्लीम वास्तूविद्या, मध्य व दक्खनात हिंदु देवळे व पश्चिमेस सागर किनारा व जंगले.यातील काही ठिकाणे मी पाहिली आहेत. काही माहीतही नव्हती. त्याबदद्द्ल धन्यवाद ! अज्ञान दूर झाले. आपला वृतांत व फटू मस्त ! एक सूचना -
देवळातील कोरीव कामाचे फोटो फोटोशोप मधे टाका तिथे ईमेज मेनू मधे एक्स्पोजर् मिडटोन कॉन्ट्रास्ट वगैरे सुधारण्याचे मार्ग आहेत ते वापरा. मग पहा आपल्या अंधारलेल्या फोटोतील नक्षी ठळक होते की नाही !

पैसा's picture

22 Jan 2013 - 6:13 pm | पैसा

फोटो छान आहेत, पण केवळ देवळे बघायला कंटाळा येतो म्हणून तुम्ही बनवासी बघण्याची एक छान संधी घालवलीत असंच म्हणेन!

मालोजीराव's picture

22 Jan 2013 - 6:46 pm | मालोजीराव

चीनी इमारती लय भारी !

प्रचेतस's picture

22 Jan 2013 - 6:48 pm | प्रचेतस

=))
काय रे हे?

बालगंधर्व's picture

26 Apr 2014 - 1:19 pm | बालगंधर्व

लै भारि, लय भारि.

अजपसुन तुमे मझे जवलचए मितर.

मी मुर्डेश्वरला जाऊन आलो आहे. छान ठिकाणे आहेत..

- पिंगू

दक्षिणेकडची देवळे पाहण्याचा कधीच कंटाळा करु नका, फार सुरेख मंदिरे आहेत.

अत्रुप्त आत्मा's picture

22 Jan 2013 - 10:29 pm | अत्रुप्त आत्मा

हाय...हाय...हाय....काय ती अप्रतिम कलाकुसर,निसर्ग....सगळच जबराट :-)

डॉ सुहास म्हात्रे's picture

22 Jan 2013 - 10:32 pm | डॉ सुहास म्हात्रे

विशेषतः Belavadi चे नृसिंह मंदिर व हळेबिडू चे मंदीर याच्यातील शिल्पांमधली कलाकुसर थक्क करणारी आहे. शरीरे व मुद्रा तर उत्तम कोरलेली आहेतच पण दागीन्यांचे केरीवकाम म्हणजे कमालच आहे.

अश्या देवळांची सचित्र ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद.

शाळेतील सहलीबरोबर हळेबिड, बेल्लूर झाले आहे. अविस्मरणीय शिल्पकला आहे.

चित्रगुप्त's picture

22 Jan 2013 - 11:37 pm | चित्रगुप्त

छान. आवडले.

हळेबेडु पाहिल आहे. त्यामधले १९४७ ला भारत सोडताना एका रात्रीत येउन चोरुन नेलेले (चोरुन नाही म्हणायच रिमुव्ह्ड अस म्हनाय्च) गाभार्‍याच्या वरचे चार शिल्प नाही पाहिलात तुम्ही? ती शिल्प तुम्हाला इंग्लंड मध्ये दिसतील.
गोवर्धन शिल्पाच्या खाली गजासुर वधाच शिल्प आहे, त्यात हत्ती पुरा मधुन पोट फाडुन दाखवला आहे.
फार गडबड केलीत तुम्ही हे सार पहाताना. जातोयच तर आस्वाद घेत पुरेपूर रममाण होत पहा. हे खरच नुसत भोज्ज्याला शिवुन आल्यासारख. आम्ही जाउन आलो इतकच.

लई भारी's picture

23 Jan 2013 - 3:00 pm | लई भारी

धन्यवाद. आपण नमूद केलेली सर्व शिल्पे पाहिली(म्हणजे गाईडने दाखवल्यावरच :) )
गजासुर वधाचा फोटू टाकला आहे, गोवर्धन शिल्पाच्या खालीच आहे. सगळे तपशील टाकण्याचा थोडा आळस केलाय :)
थोडी गडबड झाली म्हणा, पण गाईडने दाखवल्यानंतर १-२ फेऱ्या मारून थोड निवांत बघितलं परत.

मस्त.. हळेबिडु आणि मुरुडेश्वर बघून आमच्या जुन्या राईडच्या आठ्वणी रिफ्रेश झाल्या. आम्ही मुरुडेश्वरला राहिलो नव्ह्तो. आता तुमचे हाटेलातून काढलेले फोटु बघून वाटतंय रहायला हवं होतं....

मुक्त विहारि's picture

23 Jan 2013 - 10:18 am | मुक्त विहारि

जायलाच पाहिजे..

मस्त सफर :)भारीयेत मंदीरे अन फोटु पण :)
त्या क्याफेत भारतीयांना प्रवेश नाही ? म्हणजे आपल्याच देशात आपल्यावरच मुजोरी झाली की आग लागो त्यांच्या क्याफेला !

खूपच छान झाली आहे तुमची सफर. खरेच, दक्षिण भारताला समृद्ध मंदिर परंपरा लाभली आहे. दगडात घडविलेली मनोवेधक शिल्पं आणि दगडावरील अतिशय नाजुक कोरीव काम, अदभुत वाटते.

अमोल केळकर's picture

23 Jan 2013 - 11:26 am | अमोल केळकर

लई भारी सफर :)

अमोल केळकर
मला इथे भेटा

श्रीवेद's picture

23 Jan 2013 - 11:27 am | श्रीवेद

फोटो दिसत नाहित. मदत करा.

सस्नेह's picture

23 Jan 2013 - 4:47 pm | सस्नेह

फोटो क्र. ९ च्या पुढचे फोटो दिसत नाहीत.
कृपया संपादकांनी लक्ष घालावे..

मनराव's picture

23 Jan 2013 - 3:42 pm | मनराव

खरच मंदिर भ्रमंती झाली तुमची..... पण आडबाजुची आणि वेगळी मंदिरं पहायला जाम मजा आलि असेल.....

तो कॅफे मधे खरच भारतीयांना जायला परवानगी नसेल तर स्थानिक लोकांनी मिळून हाकलवुन लावलं पहिजे साल्यांना....

लई भारी's picture

23 Jan 2013 - 4:20 pm | लई भारी

सर्व प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद.
@चौकटराजा: फोटोशॉप चा कधी अनुभव नाही घेतला. प्रयत्न करेन.
@पैसा: हो, बनवासी बघण्याची इच्छा होती तशी पण सुट्टी सुद्धा संपत आली होती त्यामुळे जरा गडबड केली :)
@पियुशा, @मनराव: हो, भारतातीलच अशी ठिकाणे बघून सुन्न होत. आतापर्यंत गोव्यात अस दिसलं होत, तेच इकडे पण होतंय म्हणून वाईट वाटलं. हाकलुन लावल पाहिजे असच वाटलं आम्हाला पण. काय करता येईल यासाठी याचा विचार करत होतो आम्ही.
गोकर्ण गावात सुद्धा मंदिराजवळ एक छोटेसे हॉटेल आहे, तिथे फिरंगी लोकांसाठी वेगळी बैठक व्यवस्था आहे. आम्ही ऑर्डर देऊन बराच वेळ झाला तरी काही दिले नाही आणि त्यांना मात्र फटाफट सर्विस. मेनू पण एकदम जबरी होता.
42

मनराव's picture

23 Jan 2013 - 5:20 pm | मनराव

त्या गाढवीच्यांना लाथा घातल्या पहिजेत....... मनसे सारखं कोणी नाही का तिथे...

अत्रुप्त आत्मा's picture

24 Jan 2013 - 12:06 am | अत्रुप्त आत्मा

+++++++++++++१११११११११११११११११११११११ टू मनराव.

लई भारी's picture

25 Jan 2013 - 10:56 am | लई भारी

आमच्या पण मनात अगदी असेच विचार आले की इथे कोणी स्थानिक का विरोध करत नाहीत वगैरे! कदाचित इथल्या स्थानिकांचे आर्थिक हितसंबंध आड येत असतील. पण निश्चित आवाज उठवला पाहिजे.
आणि कहर म्हणजे आतमध्ये फोटो मात्र सर्व भारतीय संतांचे, जेणेकरून आपल्या पाहुण्यांना(!) योग्य वातावरण निर्मिती व्हावी...

स्पंदना's picture

25 Jan 2013 - 12:02 pm | स्पंदना

वेटर कोण होते? ते पण जर्मनच होते का?

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

27 Jan 2013 - 1:44 am | निनाद मुक्काम प...

चला बगळ्यांच्या मध्ये कावळ्याची खास सोय झाली.
आमच्या भारत भटकंती मध्ये ह्या स्थळाची दखल घेण्यात आली आहे. आता जमेल तेव्हा येथे नक्की जाऊन येऊ.

सामान्य वाचक's picture

23 Jan 2013 - 8:05 pm | सामान्य वाचक

सुंदर फोटो

nishant's picture

24 Jan 2013 - 12:40 am | nishant

फॉटॉ आणी माहिति दोन्हि :)

दीपा माने's picture

24 Jan 2013 - 1:26 am | दीपा माने

फार सुंदर फोटो आलेत. ह्या भागातली ट्रिप करण्यासाठी तुमच्या लेखाचा छान उपयोग होईल. धन्यवाद.

५० फक्त's picture

24 Jan 2013 - 10:29 am | ५० फक्त

गुगल मॅप द्याल का या प्रवासाचा.? बाकी लई म्हणजे लईच भारी आहे हे सगळं

लई भारी's picture

25 Jan 2013 - 10:56 am | लई भारी

गुगल मॅप ची लिंक इथे नीट दिसत नाही म्हणून छोटी करून घेतली आहे, दिसते का पहा. माझ्या ब्लॉग वर पण आहे.
http://tinyurl.com/a3kjr7l

आदूबाळ's picture

25 Jan 2013 - 12:01 pm | आदूबाळ

लई भारी, लईच भारी!

पण तुम्ही फार गडबड करून लिहिलं आहे राव. शांतपणे, घुटक्या-घुटक्याने लिहा! ३-४ भाग झाले तरी हरकत नाही.

आणि तिकडे खास कानडी "मुरुक्कू" नावाची तांदळाची चकली खाल्लीत का?

अशोक सळ्वी's picture

25 Jan 2013 - 4:18 pm | अशोक सळ्वी

खुप छान झाली ट्रीप! हे वाचून जावस वाटू लागलय!

मी-सौरभ's picture

25 Jan 2013 - 7:17 pm | मी-सौरभ

सहमत

फारच छान फोटू आणि वर्णन! खूप लिहायचे होते प्रतिसादात पण ही फिरंग्यांची बातमी वाचल्यानंतर काही सुचत नाहीये. असो.

चिंतामणी's picture

27 Jan 2013 - 7:45 pm | चिंतामणी

इथे मागे काही गाड्या वगैरे दिसत आहेत तिथे एक कॅफे आहे. बराच वेळा क्षुधाशांती झाली नसल्यामुळे किमान कॉफी तरी मिळतेय का बघण्यासाठी गेल्यावर कळलं की तो कॅफे जर्मन लोकांनी चालवलाय आणि भारतीयांना अप्रत्यक्षरीत्या प्रवेश निषिद्ध आहे. आम्ही चौकशी केल्यावर अतिशय सभ्य शब्दात काहीतरी बहाणे बनवून indirectly सांगितलं की Indians are not welcome! ह्या भागात खूप युरोपियन/रशियन लोक दिसत होते आणि साहजिकच त्यांच्यासाठीची रिसॉर्टस्, कॅफे इ.
भारतातल्याच एका भागात भारतीयांना प्रवेश नाकारला जातोय हे बघून अतिशय सुन्न झालो.

वरतीसुद्धा लिहीले आहेच.

हे वाचल्यावर Dog & Indians are not allowed याची आठवण झाली.

देशाच्या राजधानीत असाच प्रकार आहे हे वाचुन धक्का बसेल.

(ही बातमी दोन- तीन वर्षापुर्विची आहे. परिस्थीती बदलली आहे की नाही हे माहित नाही.)

प्रीत-मोहर's picture

26 Apr 2014 - 8:50 am | प्रीत-मोहर

सगळी माझ्या ओळखीची ठिकाण्स... मस्त वाटल. अंकोला गोकर्ण तर तासाभरात गाठुन परत येतो घरी.

मुर्डेश्वर आता घाणेरडं झालय. स्पेशली जेव्हा त्या शंकराच्या मुर्तीवर वीज पडली होती तेव्हापासुन

लेख आवडला हे वेसांनल.

प्रभाकर पेठकर's picture

26 Apr 2014 - 12:37 pm | प्रभाकर पेठकर

खरंच 'लई भारी'.

शुचि's picture

27 Apr 2014 - 3:53 pm | शुचि

फार सुंदर!

रम्य ही स्वर्गाहुनी जन्मभूमी!
व्वा, एकसे एक सुंदर मंदिरे पाहून दिल खुश हो गया|
दिलवाडा मंदिरानंतर असे सुरेख काम पहिल्यांदाच पहिले.
लई भारीजी, धन्यवाद इतके सुंदर मंदिर सुंदर फोटो दाखविल्याबद्दल.
सोप स्टोनची माहिती प्रथमच ऐकली.
Bike tour Plan करायला हरकत नाही!

कवितानागेश's picture

1 May 2014 - 11:56 am | कवितानागेश

मस्त फोटो. खरोखरच ३-४ भागाम्चा ऐवज आहे.
गोकर्ण बीच खराब झालाय हे वाचून फार वाईट वाटलं. ९ वर्षापूर्वी गेलेय. तेंव्हासारखं आता असणं शक्य नाही हे कळतय. तिथल्या हॉटेल प्रेमामध्ये आम्हाला ३-४ दिवस रोज नारळाचे दूध मिळालं होतं... अप्रतिम होतं! :)

सस्नेह's picture

1 May 2014 - 2:54 pm | सस्नेह

हळेबिड आणि बेल्लूर शिल्पे अप्रतिम देखणी आहेत. पाहिली तेव्हा पाय निघत नव्हता तिथून.