पायेला (स्पॅनिश राइस)

Mrunalini's picture
Mrunalini in अन्न हे पूर्णब्रह्म
22 Aug 2012 - 1:20 am

साहित्यः

अर्बोरीयो राइस - १ कप
चिकन - २५० ग्रॅम
प्रॉन्स - १०-१२
शिंपले - १०-१२
टोमॅटो प्युरी - ४ चमचे
कांदा - १ बारीक चिरुन
लसुण - ३-४ पाकळ्या बारीक चिरुन
चिकन स्टॉक - ३ कप
लिंबु - १
लाल मिरची पावडर - १ चमचा
स्मो़क्ड पाप्रिका - २ चमचे
केशर - १ चमचा
मिठ चवीनुसार
ऑलिव्ह ऑइल - ३-४ चमचे

भात शिजवण्यासाठी पसरट पॅन

कॄती :

१. पॅन मधे १ चमचा ऑलिव्ह ऑइल गरम करावे. त्यात चिकन ५-८ मिनिटे परतुन घ्यावे. ते बाजुला काढुन ठेवावे.
२. त्याच पॅन मधे १ चमचा तेल टाकुन, त्यात प्रॉन्स, शिंपले हे परतुन घ्यावे व बाजुला काढुन ठेवावे.
३. पॅन मधे उरलेले तेल गरम करावे. त्यात चिरलेला लसुण व कांदा परतुन घ्यावा. हे २-३ मिनिटे परतल्यावर त्यात टोमॅटो प्युरी, लाल मिरची पावडर, Smoked paprika, केशर व चवीनुसार मिठ टाकुन निट मिक्स करावे. तेल सुटे पर्यंत परतुन घ्यावे.
४. त्यात तांदुळ टाकुन परतावे. त्या मधे ३ कप चिकन स्टॉक टाकावा. भात झाकुन १०-१५ मिनिटे मध्यम आचेवर शिजु द्यावा. स्टॉकचे प्रमाण कमी-जास्त करु शकतो. ह्या भाताला शिजवण्यासाठी साध्या भातापेक्षा जास्त पाणी लागते.
५. भात ८०% शिजल्यावर त्यात चिकन, प्रॉन्स, शिंपले, लिंबुचा रस व कोथिंबीरने सजवावे.
६. भात शिजल्यावर, पॅन टेबल वर ठेवुन गरम-गरम serve करावे.

टिपः

१. तुम्हाला आवडत असल्यास, भात शिजवताना त्यात थोडी white wine सुद्धा वापरु शकतात.
२. तुम्ही आवडीनुसार त्या मधे squid, crab meat वापरु शकता.

p1

p2

प्रतिक्रिया

सुनील's picture

22 Aug 2012 - 2:06 am | सुनील

चिकन बरोबर कोळंबी आणि शिंपले कसे लागेल याची कल्पना नाही. करूनच बघायला हवे!

तुम्हाला आवडत असल्यास, भात शिजवताना त्यात थोडी white wine सुद्धा वापरु शकतात.

हॅ हॅ. White wine काय आम्ही white rum सुद्धा घालू ;)

सानिकास्वप्निल's picture

22 Aug 2012 - 3:44 am | सानिकास्वप्निल

मस्तचं
एकदम टेम्प्टिंग दिसत आहे पाएला :)

भाताचा रंग मस्तच आहे.
मिक्स व्हेज राईस/ पुलाव असतो पण मांसाहारी प्रकारही एकत्र करून भाताचा प्रकार नवीनच पहायला मिळाला.

शिल्पा ब's picture

22 Aug 2012 - 8:13 am | शिल्पा ब

याचा उच्चार पायय्या असा आहे बहुतेक.

पैसा's picture

22 Aug 2012 - 8:17 am | पैसा

रंग एकदम सॉलिड आलाय. आमच्या घरातून फर्माईश होणार.

इरसाल's picture

22 Aug 2012 - 9:15 am | इरसाल

पाकधुरीणींनी जामच छळ मांडला आहे.

या दोघींना तात्काळ प्रभावाने मिपापाककृती विभागात बंदी घालावी.

प्रभाकर पेठकर's picture

22 Aug 2012 - 9:44 am | प्रभाकर पेठकर

मस्तंच...! क्षुधावर्धक आणि चित्ताकर्षक पाककृती. अभिनंदन.

भूक चाळवली गेली आहे. :)

(फ्राईड राइस प्रेमी) ;)

जाई.'s picture

22 Aug 2012 - 11:11 am | जाई.

वाह !!
झकास

सुहास झेले's picture

22 Aug 2012 - 12:49 pm | सुहास झेले

तोंड पाणावले ;-)

जबरदस्त पाककृती आणि कातील फोटो.... :) :)

शिल्पा ब's picture

22 Aug 2012 - 12:53 pm | शिल्पा ब

भातात ते डोळे असलेलं छोटं छोटं काय आहे?

Mrunalini's picture

22 Aug 2012 - 6:32 pm | Mrunalini

हा हा हा.... ते आख्खे prawns आहेत. मला मोठे prawns मिळाले नाही. त्यामुळे छोटे वापरले.

परिकथेतील राजकुमार's picture

22 Aug 2012 - 12:56 pm | परिकथेतील राजकुमार

गवताळ असल्याने फकस्त फटू पाहून समाधान करून घेतले.

त्यातल्या त्यात समाधन म्हणजे, केवळ दोनच फोटो आहेत.
(पण ते ही जळवण्यास पुरेसे आहेत म्हणा.)

तो शब्द 'पाएया' असाच आहे - pie-ay-ah.
मेक्सिकन स्पॅनिशमधे डबल एल आला की त्याचा उच्चार य/अ होतो, उदा. टॉर्टीया :-)

Mrunalini's picture

22 Aug 2012 - 6:33 pm | Mrunalini

हो... माझे पण त्यातच confussion झाले होते. कोणी पायेया म्हणत होते, कोणी पायेला... मग मी पायेलाच लिहले. ;)

बॅटमॅन's picture

22 Aug 2012 - 6:36 pm | बॅटमॅन

आयला या पाएलाच्या...खौन पाहिलेच पाहिजे!

सहज's picture

24 Aug 2012 - 11:00 am | सहज

पायेया अस्सल ओरीजीनल खायला गेलात तर बहुदा ९९% भारतीयांच्या चवीला आवडणार नाही. त्यात आपले रग्गड मसाले, मिर्च्या आल्या पाहीजेत. हे माझे प्रामाणीक मत :-)

मोहनराव's picture

24 Aug 2012 - 5:41 pm | मोहनराव

अगदी बरोबर आहे. मी माझ्या स्पॅनिश मैत्रिणीला वरचा फोटो दाखवला, खूश झाली आहे बघुन :)
आता नक्कीच पायेया खायला मिळणार!! ;)

निवेदिता-ताई's picture

25 Aug 2012 - 8:08 pm | निवेदिता-ताई

मस्तच

जाई अस्सल कोल्हापुरी's picture

3 Sep 2012 - 7:29 pm | जाई अस्सल कोल्हापुरी

मस्त रेसिपी!