भालदार फेस (माहुली )

अप्पा जोगळेकर's picture
अप्पा जोगळेकर in कलादालन
12 Jan 2012 - 10:39 pm

पहिल्याने भालदार फेसचे फोटो बघितले तेंव्हा हा समिट होणार नाही याचा अंदाज होताच. क्लायंबिंग ग्रेड-३ पिनॅकल आणि त्यातून अंगावर येणारे ओव्हरहँग म्हटल्यावर आणखीन काय होणार ? पण तरीसुद्धा अटेम्प्ट करायचा हे पक्कं ठरवलं होतं. नुकत्याच केलेल्या तेल्बैल्याच्या समिट्मुळे बर्‍यापैकी कॉन्फिडन्स गाठीशी होताच. मी, यतिन नामजोशी, मनोज धारप आणि राजेश पाटील चौघांनी रात्री ३ च्या सुमारासच माहुली माथा गाठला. तीनेक तासांची झोप घेतली आणि उजाडल्यावर नाश्ता करुन डायरेक्ट रॉक फेसच्या खाली धडकलो. यतिन पहिल्या लेज पर्यंत जाणार याची सगळ्यांना खात्री होतीच. त्यामुळे आधी राजेशने आणि मी अटेम्प्ट करावा असे ठरले.

मी स्वतः डाव्या बाजूला बिले देण्याच्या तयारीत आणि राजेश चढाईसाठी तयार.

मी स्वतः चढाईच्या प्रय्त्नात, खाली यतिन बिले देताना आणि त्याच्या बाजूला मनोज धारप(याचेच बिचार्‍याचे पुरेसे फोटो का आले नाहीत कोणास ठाउक ).

आमच्यातला एक्स्पर्ट क्लाईंम्बर (अर्थात वासरांमधली लंगडी गाय) यतिन नामजोशी. ही मूव्ह करताना आमचा खांद्यातला स्नायू मोडला.

प्रवास

प्रतिक्रिया

अप्पा जोगळेकर's picture

12 Jan 2012 - 10:44 pm | अप्पा जोगळेकर

छायाचित्रण ऋणनिर्देश =>
यतिन नामजोशी, राजेश पाटील, प्रदीप पलक्कड.
वरील सर्व छायाचित्रे या तिघांनी काढलेली आहेत.

अन्या दातार's picture

12 Jan 2012 - 10:58 pm | अन्या दातार

बिनाबुटाचे पाय बघून धडकी भरली रे!

अप्पा जोगळेकर's picture

13 Jan 2012 - 9:09 am | अप्पा जोगळेकर

क्लायंबिंग शूज वापरणे किंवा अनवाणी क्लायंबिंग करणे हे दोनच पर्याय असतात. आमच्याकडे क्लायंबिंग शूजची एकमेव पेअर आहे आणि ते माझ्या मापाचे नाहीत. सध्या तरी इतर साहित्य विकत घेतल्याने खंग्री झालोय. पाहू जमतय का नविन पेअर विकत घ्यायला.
@ वल्ली - कधीही फोन करा मालक. आम्ही काही तज्ञ नाही. पण जी काही बाराखडी गिरवल्येय ती मात्र पक्की आहे.

प्रचेतस's picture

12 Jan 2012 - 11:18 pm | प्रचेतस

जबरी फोटो रे अप्पा. भालदार फेस जबरी आहे एकदम. बाकी अन्यासारखेच म्हणतो बिनबुटाचे पाय...

क्लायंबिंगची तांत्रिक माहिती देता आली तर अजून उत्तम होईल.

अत्रुप्त आत्मा's picture

12 Jan 2012 - 11:55 pm | अत्रुप्त आत्मा

----^----^----^----

मराठमोळा's picture

13 Jan 2012 - 9:24 am | मराठमोळा

प्रचंड स्टॅमिना, पेशंस, प्रेझेंस ऑफ माईंड आणि ईच्छाशक्ती लागत असणार अशा प्रकारच्या ट्रेकसाठी.

_/\_

(माणसाला घडवण्यातत खेळांचा आणि अशा स्पोर्टींग अ‍ॅक्टीविटीज चा मोठा वाटा असतो यात विश्वास असणारा)

कवितानागेश's picture

13 Jan 2012 - 11:20 am | कवितानागेश

मस्त!

फोटो दिसत नसल्याने, सुंदर ट्रेकचे फोटो पाहता आले नसल्याने निराशा झाली..

प्रचेतस's picture

13 Jan 2012 - 1:39 pm | प्रचेतस

गणेशाला फोटो कधीच दिसत नसल्याने आता त्याला हापिस बदलण्याशिवाय काही गत्यंतर नाही.

सोत्रि's picture

13 Jan 2012 - 1:48 pm | सोत्रि

त्यातच तो सध्या (अजूनही) 'बाकीचे काहीही' न दिसणार्‍या जादूई दिवसांमध्ये सध्याच्या गुलाबी थंडीत गुरफटून गेला आहेच ;)

- (गुलाबी थंडी आवडणारा) सोकाजी

अन्या दातार's picture

13 Jan 2012 - 1:54 pm | अन्या दातार

नुकतेच कुठल्याश्या धाग्यावर काहीतरी बोलल्याचा आवाज ऐकला होता हे आठवतंय ;)

चिंतामणी's picture

16 Jan 2012 - 1:15 am | चिंतामणी

:p :-p :tongue:

:bigsmile:

सुहास झेले's picture

13 Jan 2012 - 2:02 pm | सुहास झेले

सहीच...

अप्पा, वल्ली म्हणतोय त्याला अनुमोदन. त्याबद्दल अजुन माहिती येऊ द्यात. कारण आजकाल क्लायंबिंग, ट्रेकिंग फ्याशन/बिजनेस झालाय. अनेक ट्रेकिंग ग्रुप्स अननुभवी ट्रेकर्सना अलंग-मलंग येथे घेऊन जात आहेत (ते पण एकदम ४०-४५ जण एकावेळेस) आणि ते तिकडे क्लायंबिंगसाठी रोपच्या शिड्या वापरतात. त्यामुळे सुरक्षितता, कसब वगैरे मुद्दे बाजूलाच राहतात.

अप्पा जोगळेकर's picture

13 Jan 2012 - 10:47 pm | अप्पा जोगळेकर

ज्याला स्व्तःला क्लायंबिंग करायचे आहे त्याने स्वतःच धडे गिरवावेत. मी देखील असे एक-दोन क्लाईंब केले आहेत पण ते चमचा घेउन घास भरवण्यागत वाटते. शिवाय अशाच एका ग्रुपने जुनाट, कमजोर झालेले रोप वापरुन केलेले प्रस्तरारोहण स्वतः डोळ्यांनी पाहिले आहे.

साष्टांग दंडवत तुम्हाला, ह्या असल्या डोंगरांच्या बाजुला लिफ्ट लावुन दिल्या तरी तिथं जावु किंवा कसं याबद्दल शंका आहे,

एक अवांतर विनंती - तुम्ही इथं आंतरजालावरुन त्या त्या ठिकाणचे फोटो उचलुन टाकत जा, पण असे धाडसी ट्रेक करताना फोटो नका काढत जाउ.

ड्ब्बल झाल्यानं प्रकाटाआ.

सुधांशुनूलकर's picture

13 Jan 2012 - 4:27 pm | सुधांशुनूलकर

श्वास रोखूनच पाहिली सगळी छायाचित्र.

ह्या असल्या डोंगरांच्या बाजुला लिफ्ट लावुन दिल्या तरी तिथं जावु किंवा कसं याबद्दल शंका आहे, ५०फक्त शी सहमत.

मन१'s picture

13 Jan 2012 - 5:15 pm | मन१

भारिच.
एकही फोटो दिसत नाहिये पण प्रतिसादांवरून अंदज आला. काय्तारी भारिच काम केलेलं दिसतय.

बिपिन कार्यकर्ते's picture

13 Jan 2012 - 6:23 pm | बिपिन कार्यकर्ते

मस्त!

अप्पा जोगळेकर's picture

13 Jan 2012 - 10:44 pm | अप्पा जोगळेकर

सर्व प्रतिसादकांचे छायाचित्रकारांच्या वतीने आभार.
जरी नवशिका असलो तरी तांत्रिक माहिती हवी असणार्‍यांना भरपूर माहिती देता येईल. रोप मॅनेजमेंट, बोल्डरिंग टेक्निक्स, असंख्य प्रकारच्या नॉट्स, इक्विपमेंट मेंटेनन्स, त्यांची ब्रेकिंग स्ट्रेन्थ आणि युटिलीटी हा न संपणारा विषय आहे. पण प्रॅक्टिकल शिवाय ही थिअरी अत्यंत कंटाळवाणी वाटते असा स्वानुभव आहे. तरी वेळ मिळाल्यास या विषयावर एखादा लेख डायग्राम्सह डकवला जाईल.

पाषाणभेद's picture

13 Jan 2012 - 11:58 pm | पाषाणभेद

फारच थरारक अनुभव आला असेल

नरेंद्र गोळे's picture

14 Jan 2012 - 12:02 pm | नरेंद्र गोळे

अप्पा जोगळेकर,

तुम्ही केलेली चढाई दैदिप्यमानच असणार याचा अंदाज फोटोंवरून येतो आहे.
फोटो आवडले.

ह्या वृत्तांताचा उद्देश केवळ जाणकारांना, त्रोटक माहितीने मोहिमेत काय साधले ते कळवणे असेल तर, तो साधला की नाही ते जाणकारच सांगू शकतील.

मात्र असे वाटते की वृत्तांत व फोटो इथे अजाण वाचकांना सुरस माहिती देण्याचा असावा. जर आमच्यासारख्या अजाणत्यांना त्या चढाईची माहिती देऊन, जे विशेष साध्य झालेले आहे ते अवगत करून देणासाठी वृत्तांत आणि फोटो इथे दिलेले असतील, तर ते पुरेसे साधलेले नाही.

कारण
ह्या प्रस्तरारोहणाचे मूळ उद्दिष्ट काय होते? अंतिमतः ते साध्य झाले काय? दरम्यान सुरक्षितता सांभाळण्याकरता आपण कुठली विशेष तंत्रे वापरलीत? चित्रांत दिसणार्‍या डोंगराच्या माथ्यावर जाणे अपेक्षित होते का? तुम्ही तिथे पोहोचला होता का? असे प्रश्न मनात सहजच उद्भवतात!

अप्पा जोगळेकर's picture

15 Jan 2012 - 1:47 pm | अप्पा जोगळेकर

तुम्ही केलेली चढाई दैदिप्यमानच असणार याचा अंदाज फोटोंवरून येतो आहे.
ही दैदिप्यमान चढाई नाही.फारतर प्रस्तरारोहणाचे एक फुटकळ सेशन म्हणता येईल.
एकतर आम्ही समिट (म्हणजे माथ्यावर पोचणे) केला नाही. आमच्याकडे बोल्ट्स नव्हते आणि ओव्हर हँग साठी (जो फोटोत शेवटून दुसर्‍या फोटोत दिसतो आहे तो.) अ‍ॅट्रियर (म्हणजे रोप लॅडर) नव्हती हे खरे आहे. पण ते कारण सांगणे योग्य वाटत नाही.


या वृत्तांताचा उद्देश केवळ जाणकारांना, त्रोटक माहितीने मोहिमेत काय साधले ते कळवणे असेल तर, तो साधला की नाही ते जाणकारच सांगू शकतील.

मित्रांनी काढलेली छायाचित्रे येथे डकवणे हा उद्देश होता. तो उद्देश साधला आहे असे वाटते.

मात्र असे वाटते की वृत्तांत व फोटो इथे अजाण वाचकांना सुरस माहिती देण्याचा असावा.
फोटो सुरस आहेतच. वॄत्तांत दिलेलाच नाही त्यामुळे तो सुरस असणे संभवतच नाही. जे काही लिहिले आहे ते इतके तुटपुंजे आहे की त्याला वॄत्तांत म्हणणे धाडसाचे वाटते. मागच्या खेपेला एकदा नुसतेच फोटो डकवले होते तेंव्हा फोटोखाली काहीच का लिहिलेले नाही अशी विचारणा झाली होती.


ह्या प्रस्तरारोहणाचे मूळ उद्दिष्ट काय होते? अंतिमतः ते साध्य झाले काय? दरम्यान सुरक्षितता सांभाळण्याकरता आपण कुठली विशेष तंत्रे वापरलीत? चित्रांत दिसणार्‍या डोंगराच्या माथ्यावर जाणे अपेक्षित होते का? तुम्ही तिथे पोहोचला होता का? असे प्रश्न मनात सहजच उद्भवतात!

नेट प्रॅक्टिस करणे आणि प्रत्यक्ष सामना खेळणे यात फरक असतो.
प्रत्यक्ष फिल्ड वर प्रस्तरारोहण करुन पाहणे हे उद्दिष्ट होते. भालदार फेसची यशस्वी चढाई करण्याइतकी क्षमता आलेली नाही याची जाणीव आधीपासून होतीच. एक ना एक दिवस हे जमेलच हा विश्वास मात्र आधीपासून होताच. आता तो अधिक वाढला आहे.
माथ्यावर पोचलो नाही. पोचलो असतो तर अर्थातच फोटो टाकला असतात. माथ्यावर पोचणे यालाच समिट करणे असा इंग्रजी प्रतिशब्द आहे.
काही तांत्रिक शब्द किंवा संज्ञा अपरिहार्यपणे वापराव्या लागत आहेत.

मोदक's picture

14 Jan 2012 - 12:58 pm | मोदक

थरारक फोटो..

अजून येवूद्यात. :-)

मोदक

झकासराव's picture

14 Jan 2012 - 3:35 pm | झकासराव

अगा बाबो!!!!!
थ्रिल्लिंग अनुभव...
ते बिले देणे म्हणजे काय? सुरवातीला चढणारा कसा चढतो अशी जरा माहिती द्या की दादा. :)

पैसा's picture

14 Jan 2012 - 4:00 pm | पैसा

पण गोळेसाहेब म्हणतात तसे तुम्ही शिखरापर्यंत गेलात का? सगळी माहिती द्या की!

बज्जु's picture

15 Jan 2012 - 11:32 pm | बज्जु

फोटो भारी.

आप्पा, माहुली एकदा कल्याण दरवाज्यातुन ऊतरलो होतो, असाच थरार आहे नुसता, जमल्यास अवश्य जाणे.