उकडलेल्या अंड्याचि भुर्जि

शिप्रा's picture
शिप्रा in पाककृती
21 Jul 2008 - 5:57 pm

उकडलेलि अंडी, कांदा खुप बारिक चिरलेला, टॉमेटो, आले, लसुण पेस्ट, हि मिरचि, तिखट, गरम मसाला, बटर,मिट

उकडलेलि अंडी किसुन घ्यावि. मग पॅन मध्ये खुप बटर टाकुन कांदा गुलाबि परतुन घ्यावा. आणी मग त्यात आले लसुण पेस्ट व बाकि सर्व साहित्य टाकावे. थोडे परतल्यावर त्यात किसलेलि अंडि टाकावि...परत परतावे..
हावितर कोथिंबिर टाकावि आणि ब्रेड बरोबर हापसावि..ह्यात उकडलेलि अंडि किसुन घातल्यामुळे वेगळि चव येते..नक्कि करुन पहा...

प्रतिक्रिया

आनंदयात्री's picture

21 Jul 2008 - 6:01 pm | आनंदयात्री

अरे वा डिफ्रंट आहे की .. नक्की करुन पहानार !

>> ब्रेड बरोबर हापसावि

हा हा हा .. हापसणार !! :)

मनस्वी's picture

21 Jul 2008 - 6:16 pm | मनस्वी

मस्त पाकृ..
नक्की करून बघणार!

मनस्वी
* केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *

शिप्रा's picture

21 Jul 2008 - 6:17 pm | शिप्रा

धन्यवाद :)

जिथे कमी तिथे आम्ही ..:)

सुचेल तसं's picture

21 Jul 2008 - 6:54 pm | सुचेल तसं

वा!!!!!!

मागच्या आठवड्यात अंडाकरी आणि आज भुर्जी........ एकदम भारी....

धन्यवाद चिंटी :-)

[आता हाफ फ्राय आणि खिमा राहिले आहेत..... सवडीने टाक..... :-))

http://sucheltas.blogspot.com

टारझन's picture

21 Jul 2008 - 7:00 pm | टारझन

चेपलीच म्हणून समज ग चिंटी ताई ... जबराट ... आज हॉटेल वर जातानाच विसेक आंडी घेउन जातो ...
लै भारी ... एवढे सोप्पे प्रकार ... अजून येवू दे .....

संडे हो या मंडे, मै रोज खाता अंडे
कुबड्या खवीस
(आमच्या येथे अस्थी व दंत विमा आणि सायकल पंक्चर काढून मिळेल तसेच सर्व प्रकारचे मोबाईल-संगणक रिपेर* करून मिळेल. )
नोट : लग्न पार्ट्यांच्या ऑर्डरी स्विकारतो.


तू भारी ...तर जा घरी...

अग छान पाककृती दिली आहेस.
मैत्रीणीना सागते करायला
आमच्या घरी कोणी खात नाहीत ग अंडी :(
म्हणजे नवरा मांसाहारी आहे पण अंड्याची ऎलर्जी आहे त्यामुळे अंडी आणत नाही घरी.
पण मैत्रीणीना नक्की सांगते.

श्रीमंत दामोदर पंत's picture

22 Jul 2008 - 12:29 pm | श्रीमंत दामोदर पंत

लै भारी आहे........
नक्की करुन बघणार...........
अश्या सोप्या सोप्या पाककृती आजुन असतील तर सांग.....

विसोबा खेचर's picture

22 Jul 2008 - 1:44 pm | विसोबा खेचर

सुंदर पाकृ!

फोटू दिला असता तर अधिक बरं झालं असतं!

आपला,
(बैदाप्रेमी) तात्या.

अनिल हटेला's picture

22 Jul 2008 - 4:07 pm | अनिल हटेला

धन्यवाद टीन्गी !!

असल्या सोप्या पाक कॄती अजुन सान्गा !!!

इकडे चायनीज खाउन वैतागलोये....

आता मिपा वरील सगळ्या पाककॄती करतोये.....

अजुन येउ देत ................

-- ऍनयू उर्फ बैल
~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~

विसोबा खेचर's picture

22 Jul 2008 - 4:11 pm | विसोबा खेचर

आम्ही उकडलेल्या अंड्यांपेक्षा कच्च्या अंड्यांची भुर्जीच अधिक पसंद करतो. ती अधिक चवदार लागते अस आम्हाला वाटतं!

तात्या.

श्रीयुत संतोष जोशी's picture

22 Jul 2008 - 7:04 pm | श्रीयुत संतोष जोशी

नमस्कार,
झक्कास आणि सोपी . आत्ताच बनवून पाहिली . मजा आली खायला.

हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.

शिप्रा's picture

22 Jul 2008 - 7:20 pm | शिप्रा

सर्वांना धन्यवाद...:)

जिथे कमी तिथे आम्ही ..:)

शिप्रा's picture

22 Jul 2008 - 7:26 pm | शिप्रा

तात्या पुधच्या वेळीस नक्कि फोटो टाकिन नाहितर सगळयांना खायला तरि बोलविन...:)

जिथे कमी तिथे आम्ही ..:)

किट्टु's picture

30 Jul 2008 - 8:55 pm | किट्टु

मला ही रेसीपी खुप आवडली!!

आणि ही मिपा साइट पण!!!