एगप्लांट + मोझ्झेरेला चीज (उर्फ वांग्याचे काप फ्राय)

गणपा's picture
गणपा in पाककृती
20 Dec 2011 - 9:57 am

आज जवळ जवळ शाकाहारी पदार्थ बनवण्याचा प्रयत्न केलाय. पण आता नावातच एग असल्याने अंड्याचा वापर अपरिहार्य आहे. ;) पण तुम्ही अंड खात नसाल तर त्यावरही उपाय आहे.

नेहमीसारखे वांग्याचे काप करण्या ऐवजी आज पाकृमें थोडा टिव्स्ट्.

साहित्यः

एक मोठं वांगं.
एक मोठा कांदा (जीतका शक्य असेल तितका बारीक चिरलेला.)
२ मध्यम टोमॅटो (.........................-॥-.........................)
२-३ चमचे टोमॅटोची पेस्ट.
चिमुटभर साखर (ऑप्शनल.)

१ चमचा लाल तिखटं / मसाला.
१/४ चमचा हळद.
मीठ चवीनुसार.
२-३ चमचे तेल.

१/४ वाटी ब्रेड क्रम्स्
१/४ वाटी मैदा + चवीनुसार मीठ.
१ अंडे.(फेटलेले.)
अंड्याला पर्याय हवा असल्यास २ चमचे मैदा + १ चमचा बेसन एकत्रं करुन थोडं पाणी टाकुन भजीच्या पीठा पेक्षा किंचीत पातळ भिजवावं.

कृती:

या पाककृतीसाठी आपल्याला थोडा सॉस / रस्सा लागणार आहे. तर सर्व प्रथम आपण तो बनवून घेऊ.

सॉस

एका कढईत ३-४ चमचे तेल कडकडीत तापवून घ्यावं. मग त्यात बारीक चिरलेला कांदा परतुन घ्यावा. चिमुट्भर मीठ टाकावं म्हणजे कांद्याला पाणी सुटुन तो लवकर शिजेल.
मग त्यात लाल तिखट / मसाला टाकून चांगलं परतुन घ्यावं.

मसाल्याचा कच्चा वास निघुन गेल्यावर त्यात बारीक चिरलेला टोमॅटो टाकावा. मध्यम ते मंद आचेवर सतत परतत रहावं. चवी नुसार मीठ टाकावं. २-३ चमचे टोमॅटोची पेस्ट टाकून चांगल ढवळुन घ्यावं. चीमुटभर साखर टाकावी.

वरून झाकण ठेउन पेस्टचा कच्चट वास जाई पर्यंत आणि कांद्या टोमॅटोचा पार लगदा होई पर्यंत शिजवावे. हा सॉस बनवताना शक्यतो पाण्याचा वापर टाळावा. (झाकण ठेवल्यावर आतल्या बाष्पाचं जितकं पाणी पडेल तितक पुरेसे आहे.)

वांग्याचे काप

एका बशीत ब्रेड क्रम्स, दुसर्‍यात मैदा + मीठ आणि तिसर्‍यात फेटललं अंडे ठेवुन हाताशी ठेवावं.
(ज्यांना अंडे चालत नाही त्यांनी २ चमचे मैदा + १ चमचा बेसन + पाणी एकत्र करुन भजी पेक्षा थोडं पातळ पीठ भिजवून घ्यावं.)

वांग्याचे साधारण १ ते दिड सेंमी जाड काप करुन घ्यावे.
लाल तिखट / मसाला + तेल + मीठ एकत्र करुन ते वांग्याच्या कापाना लावून किमान २० मिनीटे मुरत ठेवावं.

मुरवलेल कापांना पाणी सुटलेल असल्याने ते सर्वप्रथम मैद्यात घोळवून घ्यावे. मग ते फेटलेल्या अंड्यात घोळवून शेवटी ब्रेड क्रम्समध्ये घोळवून घ्यावे.

तव्यावर २ चमचे तेल सोडून ते कडकडीत तापल्यावर त्यात हे वांग्याचे काप खरपूस तळून घ्यावे.
हे तळलेल काप एखाद्या जाळी वर ठेवावे म्हणजे खालून वाफ धरुन ते मऊ पडणार नाहीत.

(इथले २-३ फोटो माझ्या धांदरट पणामुळे डिलीट झाले. :( )

एका बेकिंग पेल्ट मध्ये खाली थोसा सॉस पसरवून घ्यावा त्यावर एक वांग्याचा काप ठेवावा. वरून परत थोडा सॉस लावून त्यावर अजुन एक काप असा थर रचावा. वर परत थोडा सॉस लावुन बचका भर तुमच्या आवडीचं चीज ठेवावं. (मी मोझ्झेरेला चीज वापरलय.)

नंतर ही बशी ओव्हनमध्ये ग्रील मोड वर चीज वितळे पर्यंत ठेवावी (अंदाजे १ ते दीड मिनीट.)
ओव्हन नसल्यास मायक्रॉवेव्हमध्येही चालेल.

*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*

स्टार्टर म्हणुन वाढायला हरकत नाही.

पण हा पदार्थ गरम असतानाच खाण्यात मजा आहे. तेव्हा ताबडतोब लुत्फ घ्यावा.

*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*

वाटल्यास थोडासा पुलाव/ जीरा राईस सोबत साईड डिश म्हणुनही वाढू शकता.

प्रतिक्रिया

स्पा's picture

20 Dec 2011 - 10:02 am | स्पा

__/\__

अरे काय सकाळीच त्रास आहे हा.. :( धागा उडवा पाहू..

सुहास झेले's picture

20 Dec 2011 - 10:04 am | सुहास झेले

ह्येच म्हणतो......... ;)

पियुशा's picture

20 Dec 2011 - 11:53 am | पियुशा

जबरदस्त :)

प्रचेतस's picture

20 Dec 2011 - 10:26 am | प्रचेतस

अतिशय जबराट, तोंडाला पाणी सुटावयास लावणारी पाककृती.
इनोच्या बाटल्यांचा साठा करून ठेवत आहे आता.

प्रशांत's picture

20 Dec 2011 - 11:37 am | प्रशांत

:)

जबरा, भन्नाट.. आणखी काय बोलू? फक्त आणि फक्त लाजवाब..

- पिंगू

प्रास's picture

20 Dec 2011 - 11:12 am | प्रास

तुम्ही महान आहात याबद्दल आम्हाला कधीच शंका नव्हती पण म्हणून असं पुन्हा पुन्हा या गोष्टीचं आमच्याकडून अधोरेखन का करून घेताय आणि ते ही सकाळी सकाळी?

घ्या आमच्याकडून

स्वीकार करा.

आता आम्ही आमच्या बल्लवगिरीसाठी तुम्हाला एकलव्याच्या भावनेने आमचे गुरूवर्य मानलं आहे याची याच प्रतिसादामधून द्वाही फिरवत आहोत याचीही नोंद घ्यावी.

:-)

सानिकास्वप्निल's picture

20 Dec 2011 - 12:45 pm | सानिकास्वप्निल

+१ :)

विशाखा राऊत's picture

20 Dec 2011 - 3:41 pm | विशाखा राऊत

+१

मृत्युन्जय's picture

20 Dec 2011 - 11:17 am | मृत्युन्जय

देवा या माणसापासून वाचव रे. खुप त्रास होतो जीवाला असल्या पाकृ बघितल्या की.

मेल्या माझे वजन वाढण्याचे पाप लागणार आहे तुला. असे काही बघितले की भूक लागते रे.

परिकथेतील राजकुमार's picture

20 Dec 2011 - 11:19 am | परिकथेतील राजकुमार

लेका लै लै लै भारी बघ.

आज दृष्टच काढली पाहीजे तुझी.

मेघवेडा's picture

20 Dec 2011 - 3:14 pm | मेघवेडा

झकास गणपाकृ!

दिपक's picture

20 Dec 2011 - 11:27 am | दिपक

मृत्युन्जय's picture

20 Dec 2011 - 12:15 pm | मृत्युन्जय

:)

+१

प्रतिसाद आवडेश. :)

अत्रुप्त आत्मा's picture

20 Dec 2011 - 3:42 pm | अत्रुप्त आत्मा

बरोब्बर प्रतिसाद दिपकशेठ...अगदी हिच भावना आहे मनात. :-)

पाषाणभेद's picture

21 Dec 2011 - 7:56 am | पाषाणभेद

+१
पाकृतीचा लुत्फ नव्हे तर लुफ्त घेतला आहे.

मी_ओंकार's picture

20 Dec 2011 - 11:28 am | मी_ओंकार

तोंपासू.

sneharani's picture

20 Dec 2011 - 11:47 am | sneharani

मस्त पाककृती!
करुन पाहीन!
:)

वैशाली माने's picture

20 Dec 2011 - 12:08 pm | वैशाली माने

वांग्याची अलर्जी आहे, फरक म्हनुन काय चालेल?????????

गवि's picture

20 Dec 2011 - 12:10 pm | गवि

हे राम.

मृत्युन्जय's picture

20 Dec 2011 - 12:14 pm | मृत्युन्जय

हे राम नको. त्यांना सगळ्याचीच अ‍ॅलर्जी होइल. कमल हसन ने नको नको ते खाल्ले आहे हे राम मध्ये.

गनपाभौ,

चीझ आणि टोमॅटो सॉस हे कॉम्बीनेशन रेड वाइनबरोबर मस्त जाते.
तसा फोटो असता तर ह्या रेसिपीला चार चांद लागले असते.

अवांतर: पाकृ भारीच :)

- ('पुणे वाइन फेस्टिव्हल'चे वेध लागलेला) सोकाजी

अन्या दातार's picture

20 Dec 2011 - 12:55 pm | अन्या दातार

हे सांगितलेत ते चांगले केलेत. :) आभारी आहे.

(मागे गणनाट्यचे प्रयोग व्हायचे. सध्या बंद पडलेत. नवीन संचात गण तोच ठेवून गणसोत्राचे प्रयोग करता येतील का?)

मराठी_माणूस's picture

20 Dec 2011 - 2:52 pm | मराठी_माणूस

चीझ आणि टोमॅटो सॉस हे कॉम्बीनेशन रेड वाइनबरोबर मस्त जाते.

शब्दशः अनुवाद :)

इंटरनेटस्नेही's picture

20 Dec 2011 - 12:24 pm | इंटरनेटस्नेही

मस्त पाकृ. सन्माननीय बल्लवाचार्य गणपा यांनी त्यांच्या पाकृंचे एक पुस्तक प्रकाशित करावे ही नम्र विनंती, म्हणजे आमच्या प्रिंटरला थोडी विश्रांती मिळेल! ;)
-
(एस्पायरिंग शेफ) इंट्या.

llपुण्याचे पेशवेll's picture

20 Dec 2011 - 12:45 pm | llपुण्याचे पेशवेll

गणपा,
अप्रतिम पाकृ. पूर्वी अशा प्रकारचा पदार्थ अमेरीकेत खाल्ला होता. पण हे काप सांबारात इडली ठेवल्या प्रमाणे सॉसमधे ठेऊन खाण्यास दिले होते. चीज पास्तावर जसे वरून टाकतात तसे वरून टाकलेले होते.
बाकी अंड्यासाठी पर्यायी व्यवस्था केल्यामुळे भटाची चांगली सोय झाली. :)

स्वातीविशु's picture

20 Dec 2011 - 1:05 pm | स्वातीविशु

चीज वितळळेला वान्ग्याचा फोटो जबर्दस्त आहे.धन्य झाले पाहुन. तोंपासू.
मी साधे वान्ग्याचे काप केले होते. छान लागतात. आता वरीप्रमाणे करुन पाहिन.

झकासराव's picture

20 Dec 2011 - 1:38 pm | झकासराव

__/\__
दंडवत. :)

प्रभाकर पेठकर's picture

20 Dec 2011 - 1:49 pm | प्रभाकर पेठकर

व्वा! चविष्ट पाककृती. अभिनंदन.
लवकरच करून पाहतो.
अप्रतिम छायाचित्र.

स्मिता.'s picture

20 Dec 2011 - 3:50 pm | स्मिता.

व्वा, सहिच, अप्रतिम, तोंपासु हे लिहून लिहून कंटाळा आलाय. या जबरा पाकृकरता काहीतरी नवीन शब्द सुचवा आता.
पाकृ अतिशय आवडली असल्याने शनिवारी नक्कीच केली जाईल.

स्वाती दिनेश's picture

20 Dec 2011 - 5:00 pm | स्वाती दिनेश

मस्तच रे..
काप सॉलिड्ड दिसत आहेत.
स्वाती

मोहनराव's picture

20 Dec 2011 - 6:44 pm | मोहनराव

लई भारी!

पैसा's picture

20 Dec 2011 - 7:22 pm | पैसा

माझी पोरं वांगं अजिबात आवडीने खात नाहीत. चीज घालून करून बघते आता.

प्रभो's picture

20 Dec 2011 - 8:15 pm | प्रभो

ह्म्म्म...पास...वांगं आवडत नाही...

क्रान्ति's picture

20 Dec 2011 - 10:21 pm | क्रान्ति

काय झक्कास आहे पाकृ! :)

आता भोपळ्यातली म्हातारी म्हणेल,
गणपाकडे जाईन, वांग्याचे काप खाईन, लट्ठमुट्ठ होईन, मग मला खा! ;)

कौशी's picture

20 Dec 2011 - 11:35 pm | कौशी

आवड्ली आणि करून पण बघणार..

ईथे "ऑलीव्ह गार्डन" ह्या ईटालियन रेस्टॉरेन्ट मध्ये मिळणार्या एगप्लान्ट पार्मझान सारखे दिसतेय. मला फार आवडतो हा पदार्थ.

प्राजु's picture

21 Dec 2011 - 2:07 am | प्राजु

मलाही फार आवडतो.

गणपा... अरे तू बरा आहेस ना!!! हे काय चाल्लंय!!
तुझ्यातल्या कलेला कितीवेळा दंडवत घालू?

गणपा's picture

21 Dec 2011 - 2:40 am | गणपा

येस बरोबर.
पण आमच्या गरिबांच्या आफ्रिकेत ऐन वेळी पर्मझान चीज न मिळाल्याने मोझ्झेरेला चीज वर निभावून नेलं. ;)

jaypal's picture

21 Dec 2011 - 2:45 pm | jaypal

हमारे पीछे पडा है /
brin

सुहास..'s picture

21 Dec 2011 - 2:47 pm | सुहास..

.

(नजर लागु नये म्हणुन तीट लावले आहे ;) )

स्वाती२'s picture

22 Dec 2011 - 6:34 am | स्वाती२

छान फोटो!
शॉर्टकटः विकतचे टोमॅटो बेसिल सॉस. :)

प्रचेतस's picture

1 Dec 2019 - 9:56 pm | प्रचेतस

अरे काय कहर आहे ही पाकृ.