आम्रखंड

अनामिक's picture
अनामिक in पाककृती
11 Jul 2008 - 8:11 pm

साहित्य :

Dannon Yogert (दही) - एक डबा (Fat Free घेऊ नका, चव पाणचट लागते मला)
साखर - एक वाटी (कमी किंवा जास्त आवडी प्रमाणे)
आंब्याचा पल्प - १ वाटी (Indian Grocery Store मधे 'रत्ना' ब्रांड मिळाला तर उत्तम)
२-३ वेलच्यांची पूड
बदाम - पिस्त्याचे काप आवडी प्रमाणे

कृती:

दही एका पातळ कापडात ओतून ३ ते ४ तास पाणी निथळेपर्यंत बांधून ठेवावे. त्यानंतर तयार झालेला घट्ट चक्का (विदर्भात तरी चक्काच म्हणतात) कापडातून एका पातेल्यात काढावा. हे करताना कापडाला चिकटलेले आणि थोडे वाळत आलेले दही घेऊ नये - नाहितर गुठळ्या एकजीव करताना नाकी नऊ येतात. आता चक्क्यात साखर घालून ५-१० मिनीट एकजीव होईस्तोवर फेटा. यात आंब्याचा पल्प घालून परत १० मिनीट फेटावे. हाताने फेटत असाल तर हात फार दुखतो, Blender असले तर उत्तमच. सगळं एकजीव झालं कि त्यात वेलची पूड आणि बदाम - पिस्त्याचे काप घालावेत. खाण्यासाठी झकास आम्रखंड तय्यार!

टिपः आवडत असल्यास द्राक्षांचे काप घालून बघा - छान लागते.

प्रतिक्रिया

वरदा's picture

11 Jul 2008 - 8:28 pm | वरदा

पेक्षाही "देसी दही" मिळते ना इंडियन स्टोअर मधे त्याचा जास्त छान होतो चक्का ट्राय करुन पहा रे...
कट्ट्याला करावं का? :?
"The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt

अनामिक's picture

11 Jul 2008 - 8:41 pm | अनामिक

इंडियन स्टोअर मधल्या दह्यात पाणी जास्तं असतं अस वाटायचं त्यामूळे कधी ट्राय नाही केलं... आता नक्की करुन पाहतो. आणि हो, कट्ट्यावर करूया... मी करून आणतो हवं तर.

प्राजु's picture

12 Jul 2008 - 3:08 am | प्राजु

अनामिक, आणच तू करून हे आम्रखंड.... मजा येईल.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

एक's picture

12 Jul 2008 - 2:55 am | एक

ट्रेडर्स जोज मधलं फूल फॅट क्रिम लाईन्ड योगर्ट वापरून बघ्..जबरी चक्का होतो. आणि श्रीखंड तयार करताना त्यात थोडं व्हिपिंग क्रिम टाकावं.

कमकुवत हृदयाच्या खवय्यांनी हे ट्राय करू नये. ;)

एक's picture

12 Jul 2008 - 2:55 am | एक

ट्रेडर्स जोज मधलं फूल फॅट क्रिम लाईन्ड योगर्ट वापरून बघ्..जबरी चक्का होतो. आणि श्रीखंड तयार करताना त्यात थोडं व्हिपिंग क्रिम टाकावं.

कमकुवत हृदयाच्या खवय्यांनी हे ट्राय करू नये. ;)

खादाड_बोका's picture

15 Jul 2008 - 12:33 am | खादाड_बोका

मी तर घरीच व्हिटॅमीन डी वाल्या दुधाचे दही बनवीतो. त्याचा चक्का चान्गला बनतो. "Costco"ला दुधही स्वस्त आणि छान मिळतो.
मी "Swad" केसर " पल्प वापरतो.
मला तर स्वप्नातही भुक लागते.... :P

सर्किट's picture

15 Jul 2008 - 12:45 am | सर्किट (not verified)

डॅननच्या तीन डब्यांच्या प्रमाणात एक सावर क्रीम टाकल्यास श्रीखंड अथवा आम्रखंड अथवा दोहोंनाही चांगले टेक्श्चर येते.

- (पाकनिपुण / पाकिस्तानी (?)) सर्किट

प्रियाली's picture

15 Jul 2008 - 12:59 am | प्रियाली

सावर क्रिमप्रमाणेच कूल व्हीप मिसळलेलेही चांगले लागते आणि टेक्श्चरही बरे होते.

वरदा's picture

15 Jul 2008 - 1:03 am | वरदा

एका मैत्रीणीने बनवलं होतं तिने चक्का एक दिवस ऐवजी दोन दिवस बांधला होता तर मस्त थोड्या गुठळ्या असलेलं आम्रखंड झालं होतं...

"The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt

आज दुपारी फडक्यात घट्ट बांधून टांगून ठेवलंत तर उद्या सकाळी फस्क्लास घाटदार चक्का तयार होतो!
समप्रमाणात साखर, केशर, थोडे होल मिल्क घालून पुरणयंत्रातून फिरवून घ्यावे आणि फ्रिजमधे ठेवून द्यावे.
तासाभरात थंडगार श्रीखंड तयार (आम्रखंड करायचे असेल तर त्याप्रमाणात साखर कमी) ! =P~

चतुरंग