धिक्कार ते अधिकार : माझा प्रवास व्हाया संलोसेआ...

चिगो's picture
चिगो in जनातलं, मनातलं
6 May 2011 - 6:21 pm

"ह्यॅ ह्यॅ.. बरंच झालं. तसाही इथं मातीत हात घालायला कोणी ना कोणी तर पाहीजेच होता."..

मी बारावीत नापास झाल्यावर आमच्या एका आजोबांनी आमच्यासाठी करीअर ठरवून टाकली. मी काय बोलणार? खा जोडे! घरात भरपुर टेंशन होतं. माझं एकट्याचच असं नाही, पण दादा UPSC च प्रिपरेशन करतोय, भैया (मधला भाऊ) इंजिनीअरींचा अभ्यास करतोय नी मी घरात नापास होऊन बसलेला असं ते टोटल मानसिक आणि आर्थिक टेंशन होतं.

मजल-दरमजल करीत मी बारावी ओलांडली. त्या काळात नातेवाईक,ओळखीचे लोक ह्यांनी भरपुर वाभाडे काढून घेतले. (सख्ख्या नातेवाईकांचा वाटा जास्त). घरच्यांनी मात्र उगाच लपवाछपवी केली नाही. आई स्पष्ट सांगायची, "अभ्यास केला नाही, म्हणुन नापास झाला." उगाच "आजारी होता, प्रश्नच कठीण होते, प्रश्नक्रमांक लिहीण्यात चुकला असेल, ट्युशन नव्हती, बोर्डाचीच चुक" असले फंडे मारले नाही. (ह्हो, मी ही कारणे ऐकलेली आहेत.)

साल २००२ : बी. एस्सी. करायला नागपुरला अॅडमिशन घेतली. त्याचवर्षी दादाचं IA&AS मधे सिलेक्शन झालं. नंतरच्या तीन वर्षात कॉलेजात धमाल केली. ते स्टेज, गॅदरींग गाजवणं वगैरे सगळं.. आणि आमच्या नातेवाईकांच्या अपेक्षेच्या विपरीत वगैरे चक्क तीनच वर्षात ग्रॅज्युएटही झालो..
कॉलेजमधे भरपूर आयटमपणा केला. त्यातला एक किस्सा आठवणींमधे एकदम "शॉल्लेट" बसलेला आहे...

कॉलेजमधे आमचा एक ग्रुप होता फर्स्ट इयरला.. मी तसा कुंपणावरचा खेळाडू.. परीक्षेचे दिवस जवळ आले होते म्हणून आम्ही कधी कधी लायब्ररीला दर्शन द्यायचो. एकदा मी बरेच दिवसांनी मी दिसलो नाही म्हणून एका मैत्रिणीने (नाव मंजिरी) माझ्या मित्राला विचारलं, की चिन्मय कुठे आहे, बरेच दिवसांत दिसला नाही इ.इ.... ह्या येड्याला काय सुचलं ठाऊक नाही, टाकली साल्याने काडी..

"अरे यार, क्या बतावू? आजकल वो तेरेही बारेमें बोलते रहता है, पढता-वढता नहीं । पता नहीं, एक्झाममें क्या होगा?"

नंतर येवून त्याने मला हे सांगितल्यावर मस्त शिव्या हाणल्या भाडखावला...
झालं.. पुढचे चार-पाच दिवस ती काही माझ्याशी बोलत नव्हती. म्हटलं, "लेना ना देना, बींच में शिवसेना" पायी वाट लावली साल्याने आपल्या मैत्रीची. (माझ्या मनात काहीच नव्हतं वो)..
शेवटी मी तिला सगळं सांगून गैरसमज दूर करायचं ठरवलं. मला आठवतं, तिच्या फिजिक्स प्रॅक्टीकल्ची परीक्षा होती. वॅलेंटाईन्स डे च्या आसपासची वेळ... मी माझ्या मित्रासोबत लॅबच्या कॉरीडॉरमधे तिची वाट पहात थांबलो. थोड्या वेळात ती तिच्या दोन मैत्रिणींसोबत आली.

मी : "मंजिरी, एक मिनिट"
ती: "हां, बोल"
मी: "वो उसदिन जो तेरेको संजोग ने बोला, वो..."
ती: "अरे, नहीं यार ! मैं जानती हू़, वो मजाक कर रहा था।"

..... इथं माझ्या मेंदूत काय किडा आला, माहीत नाही...

मी : "अॅजक्च्युअली, वो तो मजाक कर रहा था, लेकीन उसने तुम्हें बता देने के बाद मै सोच रहा था..."
ती : "ह्हं"
मी: "देख तू बुरा मत मान, पर उसके बाद मै सचमुच तुम्हारे बारे में सोच रहा था.."

आता तिच्या चेहर्‍यावरचे भाव हळूहळू बदलत होते....

मी: "मै अब सचमुच तुम्हारे बारे में सोचने लगा हुं। जब भी तुम्हारे बारे में सोचता हुं, कुछ अजीब-सा होता है।"

तिच्या मैत्रिणी आता कान टवकारुन ऐकताहेत..

मी : "प्लिज, तुम गलत मत सोचना । मै जानता हू, की तूम मुझे सिर्फ अपना एक दोस्त समझती हो । लेकीन..... मुझे लगता है, की मै कुछ ज्यादा सोचने लगा हूं। मै बता नही पा रहा हूं, मंजिरी... मै... मै..."

आता मी तिचा हात हळूच हातात घेतला. (ती स्टन्ड होती, म्हणून बरं नाहीतर कानफटीतच खायला लागली असती ;-)) तो हात हळू हळू गोंजारत,त्याच्याकडे बघत तिला म्हणालो ," ओके, आय नो, धिस इस नॉट एक्पेक्टेड. प्लिज तुम इसे मजाक मत समझना । मै बहोत सिरीयस हू । प्लिज, प्लिज अंडरस्टँड...."

मी वर बघितलं. ती स्तब्ध, तिच्या मैत्रिणींचा अक्षरशः "आ" वासलेला, माझा मित्र शैल्या पुरता बावचाळलेला.... वातावरण पुर्ण टेंसावलेलं...

मी तिच्या नजरेत नजर मिसळून बोललो..
"अॅंचड नाउ आय अॅूम गोईंग टू से दोज थ्री वर्डस, विच आर मोस्ट इंपॉर्टंट इन माय लाईफ. मैं नहीं जानता, की तुम्हारे लिए इन शब्दों के क्या मायने है, लेकीन मेरे लिए ये सबकूछ है.... सबकूछ !"
.
.
" हिअर आर दोज मोस्ट इंपॉर्टंट थ्री वर्डस ऑफ माय लाईफ"
.
.
.
.
.
त्यांचं ते डोळ्यात प्राण-बिण आणून वाट पाहणं, आणि मी पॉज-बिज घेत भाव खातोय..
.
.
.
.
...."बेस्ट ऑफ लक"!!
.
.
जवळ-जवळ अर्धा मिनिटं कुणालाच काही कळलं नाही.. नंतर सगळ्यांनी एकत्रित सुस्कारे सोडले. ती पण रोखलेला श्वास सोडून म्हणाली, "हम्म्फ..! बास ?"

मी : "हाँ । तुझे क्या लगा था?"
ती म्हणाली," हम्म, कुछ नही । पागल है तू।"
मी तिचा हात सोडत बोललो, "वो तो मै हुं। जा, प्रॅक्टीकल कर। टाईमपास क्या कर रही है? ऑल द बेस्ट"

....नंतर हॉस्टेल वर परत आल्यावर माझ्या मित्रांनी मला "प्रपोज" न केल्याबद्दल पिड-पिड पिडला. पण आपल्याकडे आरसा होता ना भौ ;-)

ह्या तीन वर्षांत दोन अतिशय चांगल्या गोष्टी झाल्या. एक म्हणजे २००४ मध्ये दादाचं IAS मधे सिलेक्शन आणि २००५ मध्ये त्याचं लग्न...

ह्या काळातल्या दोन घटना सांगतो, म्हणजे लोकांनी मला काय कचरा समजला आणि बनवला होता हे कळेल.

बी. एस्सी. फर्स्ट इयरला असेल कधीतरी.. मी आमच्या त्या "मातीत हात" वाल्या आजोबांकडे गेलो होतो. आजींनी विचारलं, "पुढं काय करायचा विचार आहे?" (आजोबांनी "करीअर" सांगितलं नसेल.) मी म्हणालो, "ग्रॅज्यएशन नंतर लॉ करणार आणि UPSC चा अभ्यास". आजी म्हणाल्या, " जाऊ दे. तुला कदाचित जमणार नाही. आता फक्त आत्ताचा विचार कर. ग्रॅज्युएट हो, आणि नोकरी बघ कुठंतरी. तसाही आता तु २४ वर्षांचा वगैरे असशील." मी उडालोच. अहो, १९ वर्षांचा होतो मी, आणि ही बाई माझं आयुष्य का पाच वर्ष कमी करतीय उगाच !?

एकदा आमच्या एका मामाने पण, मी कॉलेजमधे असतांना एका लग्नात "अरे, हा बारावीत नापास झाला होता. ह्याचं काही खरं नाही . ह्याच्यासाठी काही काम-धंदा पहा रे" म्हणून माझ्या जिवावर लोकांसमोर करमणूक करुन घेतली होती..

दुसरी घटना तर ह्याहुन अस्सल आहे. मी बी. एस्सी. फायनल ची मार्कशीट घेवून घरी आलो. आईनी मार्कशीट बघितली, आणि देवापुढे ठेवली. मला आश्चर्यच वाटलं. म्हटलं, "च्यायला, जेमतेम ५६-५७ % मार्क्स आहेत, आणि आई कशाला खुष होतेय?" आईला विचारलं तर आईने सांगितलं ते असं........... मी बारावीत नापास झाल्यावर आईला माझ्या भविष्याची चिंता वाटून ती एका ज्योतिष्याकडे गेली. बावाजींनी माझी कुंडली, योग वगैरे पाहून असं सांगितलं म्हणे की हा मुलगा वयाच्या ४० व्या वर्षी ग्रॅज्युएट होणार !!

असे स्वत:च्या अकलेचे वाभाडे काढून घेत मी पदवीधर झालो. आता बेरोजगार राहू नये म्हणून काही ना काही करणे गरजेचे होते. म्हणुन मग JNU , IIMC आणि DU च्या परीक्षा देत, शेवटी DUला Law मधे अॅठडमिशन घेऊन ऑगस्ट २००५ मध्ये मी दिल्लीत डेरेदाखल झालो...

क्रमशः

नाट्यइतिहासजीवनमानशिक्षणप्रकटनअनुभव

प्रतिक्रिया

रेवती's picture

6 May 2011 - 6:30 pm | रेवती

हम्म....
वाचतिये.

श्रावण मोडक's picture

6 May 2011 - 6:38 pm | श्रावण मोडक

प्रतिसादातील पुढचा मनातील मजकूर इथं लिहिवत नाहीये. ;) शीर्षक अगदी जालीम दिलं आहे. :)

टारझन's picture

8 May 2011 - 10:50 am | टारझन

शीर्षक अगदी जालीम दिलं आहे.
पुलेशु

- फिगो

छोटा डॉन's picture

6 May 2011 - 6:54 pm | छोटा डॉन

वाचतो आहे रे, लिही फटाफट.

- छोटा डॉन

प्रास's picture

6 May 2011 - 6:59 pm | प्रास

जाणतो मी सार्‍या अशा या भावना..... एक अनुभव आपलाही आहेच तसा.

तेव्हा आन्देव फुडला भाग पण!!!

लगे रहो चिगोभाय......!

च्यायला सख्खे नातेवाईक म्हणजे कहरच असतात. माझा किस्सा तर भलताच आहे. एकाने सांगितले होते की काम नाही मिळाले तर चिंता नको.. मार्केट यार्डात हमाल म्हणून लावून देईन आणि तेही फुकटात. आईने त्यावरुन त्या व्यक्तीला इतके झापले होते ना..

- पिंगू

प्रभो's picture

6 May 2011 - 7:13 pm | प्रभो

भारी रे!!!! लिही पटापट.

असुर's picture

6 May 2011 - 7:13 pm | असुर

चिगो,
सही जारेला है भिडू!!! पण आत्मचरित्राच्या लेव्हलच्या गोष्टी तू अशा कानगोष्टी सांगितल्यासारख्या सांगतोयेस? अरे मगनभाई, ये मराठी माणशाला धंदा जमते नाय कंप्लिटमदी.. :-)

बाकी श्रामोंशी अगदीच सहमत. मनातला प्रतिसाद इथे लिहीला तर लगेच पंख लागतील. त्यामुळे दवणीय करुन सांगायचं झालं तर "मनाच्या वाढीसाठी अपयशाच्या मातीतूनच खंबीरपणाची खतं मिळायला हवीत" वगैरे काहीतरी! (च्यायचं दवणीय..) :D
--असुर

चिगो's picture

6 May 2011 - 7:41 pm | चिगो

येवढ्या "दवणीया"तच माझी अवस्था दयनीय केलीस रे बाबा... ;-)
("पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटी" पुसतकांचा कट्टर विरोधक) चिगो

पण आत्मचरित्राच्या लेव्हलच्या गोष्टी तू अशा कानगोष्टी सांगितल्यासारख्या सांगतोयेस?<<

मित्रा, आत्मचरीत्र चावतात (काय ते विचारु नकोस :p) मात्र कानगोष्टी भावतात, असं मला तरी वाटतं...

चिंतामणी's picture

6 May 2011 - 7:15 pm | चिंतामणी

क्रमा क्रमने लिहा. पण फार अंतर पडु देउ नका.

लौकर येउ द्या पुढचा भाग.

पु.ले.शु.

५० फक्त's picture

6 May 2011 - 8:01 pm | ५० फक्त

मस्त ओ चिगो, लिहा लिहा मग आम्हाला पण एक दिवस अभिमानानं सांगता येईल की बारावीत नापास होउन यशस्वि झालेला माझा एक मित्र आहे.

सूर्य's picture

6 May 2011 - 8:40 pm | सूर्य

वाचतोय रे भौ .. पुढचा भाग लवकर टाक.

- सूर्य.

इंटरनेटस्नेही's picture

7 May 2011 - 1:39 am | इंटरनेटस्नेही

वाचतोय रे भौ .. पुढचा भाग लवकर टाक.

माझीही शॅम्पेन's picture

7 May 2011 - 2:17 am | माझीही शॅम्पेन

इथे ऑफीस मधले लोक ह्याला वेड लागल असाव असा लुक देता आहेत , इतका वाईट हसलो :) , पुढचे भाग लवकर टाका

प्रीत-मोहर's picture

7 May 2011 - 8:22 am | प्रीत-मोहर

मस्त चिगोभाउ ... पुढले भाग लवकर टाका

सहज's picture

7 May 2011 - 8:54 am | सहज

वाचत आहे.

(व्हाया टार्‍या) ही फिल्ल्म पहा

चिगो's picture

7 May 2011 - 3:47 pm | चिगो

थँक्स सहज...
मला वाटतं, २००० च्या ऑलिम्पिक्स मधे एक प्रमोशनल व्हिडीओ होता.. त्याची टॅगलाईन होती, "Speed can be measured in time. Time can be measured in seconds. Courage… You can’t measure Courage !”
मला खुप आवडायचा तो..

कुणाला सापडल्यास द्यावा, प्लिज करुन :-)

मिलिंद's picture

8 May 2011 - 2:16 pm | मिलिंद

हा घ्या तो व्ही़डीओ
http://www.youtube.com/watch?v=dbG4cGsfB6o

चिगो's picture

8 May 2011 - 9:23 pm | चिगो

थँक्स अ लॉट, मिलिंद.. आणि तुम्ही तर आणखीही खजिना खुला केलात... :-)

मिलिंद's picture

8 May 2011 - 11:33 pm | मिलिंद

>>थँक्स अ लॉट, मिलिंद.. आणि तुम्ही तर आणखीही खजिना खुला केलात...
माझे कसले आभार मानताय!!! आभार द्यायचे असले त्या गुगलबाबाला आणी mapiochi चे आभार माना. खरंतर इतका प्रेरणादायी आहे सर्व ते, मी पहिल्यांदा तो व्हीडीओ उतरवून त्याचे पहिल्या ०.२३ ते १.०० पर्यंतचे एम.पी.३ करुन माझ्या मोबाईलची रिंगटोन लाबून ठेवली आहे. प्रत्येक वेळी वाजताना फक्त आपल्यालाच कळतं काय वाजतं ते. तुमचेच धन्यवाद अशा प्रेरणादायी व्हीडीओची ओळख करन दिल्याबद्दल.

ह्म्म, काही स्वानुभव आठवले.

छान लिहीलंय. पु. भा. प्र.

परिकथेतील राजकुमार's picture

7 May 2011 - 6:18 pm | परिकथेतील राजकुमार

मस्त रे !

वाचतोय उत्कंठेने...

सहजमामांचा व्हिडो अप्रतिमच.

निनाद's picture

8 May 2011 - 4:34 am | निनाद

अगदी हेच रे परालाल!

सहजमामांचा व्हिडो खरोखर भारी आहे. आवल्डा भो आपल्याला. आपून सग्ल्यन्ला दाखवला.

प्राजु's picture

8 May 2011 - 7:38 am | प्राजु

शिर्षक भन्नाट आहे.
मस्त लिहिलंय!! :)

ओये चीगो...
लिव रे पटपट

भारी लिहीतोयेस....

मृत्युन्जय's picture

8 May 2011 - 10:36 pm | मृत्युन्जय

मस्त लिहिलय रे चिगो. अपयशातुन भरारी मारल्याचे अनुभव वाचायला नेहेमीच छान वाटते. पुढच्या भागांची वाट बघतोय