सचिनचे शतक म्हणजे भारताचा पराजय हा निखालस (गैर)समज

सुधीर काळे's picture
सुधीर काळे in क्रिडा जगत
27 Mar 2011 - 2:48 pm

सचिनचे शतक म्हणजे भारताचा पराजय हा निखालस (गैर)समज

परवा विकास-जींच्या लेखातील मॅच पहाताना "करायच्या-न करायच्या" गोष्टींमुळे होणार्‍या शकुन-अपशकुनाबद्दलचे उल्लेख वाचून गंमत वाटली आणि हा लेख लिहायची स्फूर्ती झाली. (अर्थात सचिन खेळत असताना "करायच्या-न करायच्या" गोष्टीची माझीही यादी आहेच!)
एक (गैर)समज असाही आहे (किंवा सचिनच्या हितशत्रूंनी तो रचला आहे) कीं त्याने शतकी खेळी केली कीं भारत तो सामना हरतो. सध्या जोरात सुरू असलेल्या विश्वचषक स्पर्धेतसुद्धा सचिनने दोन शतके ठोकली-एक इंग्लंडविरुद्ध व एक दक्षिण आफ्रिकेविरुद्ध! पहिल्या सामन्यात धावांची बरोबरी झाली तर दुसर्‍यात दक्षिण आफ्रिकेऐवजी आपणच 'गुदमरलो' आणि २९ धावात ९ बळी देऊन विजयाच्या जबड्यातून पराजयाला खेचून आणले! तसे पहिले तर सचिन तर वारंवार शतकी खेळी करतो, मग आपण सगळे सामने धडाधड हरतो कीं काय? आकडे काय बोलतात याबद्दल?
नुकताच "क्रिकबझ्झ" या संस्थळावर नेमक्या याच विषयावर एक मस्त लेख प्रसिद्ध झाला. लेखक आहेत गोकुळ गोपाळ. त्यांनी दिलेली आकडेवारी आणखीच कांहीं सांगून जाते. सध्या विश्वचषक स्पर्धेचा हंगाम असल्याने त्यानी या लेखात फक्त एकदिवशीय सामन्यांचाच विचार केलेला असावा. पण आमचे "आनंदजी डोसां" (माझे सहकारी श्री नाफडे) यांच्याकडे कसोटीची आकडेवारीही आहे. पणे तिकडे हा हंगाम झाल्यानंतर वळू.
सचिनचे हितशत्रू साधारणपणे "सचिनने शतक = भारताची हार" असे वाक्य समीकरणच असल्याच्या आविर्भावात 'सोडून' देतात! पण आकडे कांहीं दुसरीच हकीकत सांगतात! सचिनच्या एकूण ४८ एकदिवशीय सामन्यांतील शतकात फक्त तेरा वेळा भारत हरला आहे. तर चक्क ३३ वेळा त्याला विजय प्राप्त झाला आहे. २००२ मध्ये झालेल्या एका सामन्याचा निकाल लागला नाहीं तर अलीकडचा इंग्लंडबरोबरचा सामना बरोबरीत संपला. म्हणजे विजय-पराजयाचे प्रमाण जवळ जवळ ३:१ किंवा अगदी समीकरणाच्या भाषेत सांगायचे तर भारताचे विजय = ३(भारताची हार)!

(४८व्या 'एकदिवशीय' शतकानंतर प्रेक्षकांना अभिवादन करताना सचिन)
आता जरा खोलात जाऊन पाहू!

सचिनने शतक केले तरी भारत हरला असे सामने
धावा धावगती विरुद्ध मैदान कधी?
१३७ १०० लंका दिल्ली मार्च ९६ *१
१०० ९० पाक सिंगा. एप्रि. ९६ *२
११० ८० लंका कोलंबो ऑग ९६ *३
१४३ १०९ ऑस्ट्रे. शारजा एप्रि ९८ *४
१०१ ७२ लंका शारजा ऑक्ट०० *५
१४६ ९५ झिंबा. जोध. डिसें ०० *६
१०१ ७८ द. आ. जो.बर्ग ऑक्टो०१ *७
१४१ १०४ पाक रा.पिंडी मार्च ०४ *८
१२३ ९५ पाक अहमदा. एप्रि ०५ *९
१०० ८८ पाक पेशावर फेब्रू. ०६ *१०
१४१* ९५ विंडीज क्वाला सप्टे. ०६ *११
१७५ १२४ ऑस्ट्रे. हैद्राबाद नोव्हे०९ *१२
१११ १०१ द.आ. नागपूर मार्च ११ *१३
या १३ पराजयातल्या शतकाखेरीजच्या उर्वरित ३५ शतकात भारताने ३३ सामने जिंकले, एक अनिर्णित राहिला व एकात बरोबरी झाली हे आपण वर पाहिले आहेच.
आता या १३ सामन्यांत इतर फलंदाजांच्या "पराक्रमा"कडे एक नजर टाकू!
*१: या श्रीलंकेविरुद्धच्या ९६च्या विश्वचषक स्पर्धेतील 'लीग' सामन्यात भारताच्या ५० षटकांतल्या २७१ धावांत सचिनने १००च्या धावगतीने १३७ चेंडूंत १३७ धावा काढल्या होत्या. फक्त अझारुद्दीनने अर्धशतक केले. श्रीलंकेने आपल्या धावसंख्येचा पाठलाग करीत ४९व्या षटकात २७२ धावा केल्या. या सामन्यावरील अनुभवावरून अझारुद्दिनने नाणेफेक जिंकूनही क्षेत्ररक्षण निवडल्याचा उल्लेख माझ्या "पूर्वीच्या विश्वचषक स्पर्धेतील कडू-गोड आठवणी-४: ईडन गार्डन्सला झालेले भारताचे पानीपत!" या लेखात आला आहेच.
*२ पाकिस्तानविरुद्ध सिंगापूरला झालेल्या एप्रिल ९६च्या या सामन्यात भारताचे सर्व फलंदाज ४८व्या षटकात २२६ धावात गारद झाले त्यात सचिन बाद झाला त्यावेळी भारताची धावसंख्या होती १८६/४. त्यानंतरच्या पराक्रमींनी मिळून ३८ धावा केल्या यात आश्चर्य ते काय? कारण त्यात ३ खेळाडू 'मॅच-फिक्सिंग'वाले होते.
*३ श्रीलंकेविरुद्धच्या ऑगस्ट ९६च्या या सामन्यात भारताच्या एकूण २२६-५ धावांपैकी सचिनने ८०च्या धावगतीने (त्याच्या नेहमीच्या मानाने अंमळ मंदगतीने) १३८ चेंडूंत ११० धावा केल्या. फक्त अझारुद्दीनने ९९ चेंडूत ५८ धावा काढल्या होत्या (धावगती ५९). शिवाय गोलंदाजीतही सचिनने ६ षटकात २९ धावा देऊन श्रीलंकेचा एकुलता एक बळी घेतला (श्रीलंकेने १ बळीच्या मोबदल्यात २२६ धावा केल्या होत्या.) श्रीनाथच्या गोलंदाजीनंतर 'काटकसरी' गोलंदाजीतही सचिन दुसरा होता.
*४ शारजाला झालेल्या या अविस्मरणीय 'लीग'मधील दिवस-रात्र सामन्यात प्रकाशझोतात खेळत सचिनने १३१ चेंडूत १४३ धावा केल्या. सचिन बाद झाला तेंव्हां भारताची धावसंख्या होती ५ बाद २४२. ४३ षटके झाली होती. उरलेल्या ३ षटकात ३२ धावांचे लक्ष्य पार करताना भारताच्या इतर फलंदाजांनी फक्त ८ धावा केल्या (२५०-५)
*५ शारजाला २००० साली झालेल्या या सामन्यात भारताच्या २२४-८च्या धावांपैकी सचिनने ७२च्या धावगतीने १४० चेंडूंत १०१ धावा केल्या. इतर कुणीही अर्धशतकाचा पल्लाही ओलांडला नाही. श्रीलंकेने ४४व्या षटकात २२५-४ धाव करून सामना जिंकला. सचिनने ५ षटकात २२ धावा देत काटकसरी गोलंदाजीही केली. त्याच्यापेक्षा जास्त काटकसरी गोलंदाजी फक्त श्रीनाथची होती.
*६ डिसेंबर २००० साली झिंबाब्वेविरुद्ध जोधपूरला झालेल्या या सामन्यात भारताच्या २८३-८ या धावसंख्येत सचिनच्या १५५ चंडूंत १४६ धावा होत्या. तो बाद झाला त्यावेळी साडेशेहेचाळीस षटके झाली होती. उरलेल्या साडेतीन षटकात आगरकर व जहीर या जोडीने ४८ धावा फटकारल्या. साडेशेहेचाळीस षटकात सचिनने २३५ पैकी १४६ धावा केल्या होत्या. मग इतरांनी काय पराक्रम केला असेल ते लक्षात येईलच. सचिनच्या पाठोपाठ जास्तीत जास्त धावा केल्या होत्या जहीरने (३२). सचिनने ६ षटकात ३५ धावा देत १ बळी घेतला. झिंबाब्वेने शेवटच्या षटकात २८४ धावा करत सामना जिंकला.
*७ द. आफ्रिकेविरुद्ध ऑक्टो २००१ च्या या सामन्यात भारताच्या २७९-५ च्या धावसंख्येत गांगुलीने १२६ चेंडूंत १२७ धावा केल्या होत्या तो बाद झाला तेंव्हा धावसंख्या होती १९३-१. सचिन २६३च्या धावसंख्येवर ७८च्या धावगतीने १०१ धावा काढून सर्वात शेवटी बाद झाला. द. आफ्रिकेने २८० धावा करत हा सामना जिंकला.
*८ मार्च २००४ मध्ये रावळपिंडीला झालेल्या या सामन्यात भारत पाकिस्तानची ३२९ ची धावसंख्या ओलांडू पहात होता पण ४९व्या षटकात ३१७ धावांवर भारताचा डाव आटोपला. सचिनने १३५ चेंडूंत १४१ धावा केल्या व तो बाद झाला तेंव्हां भारताची धावसंख्या होती ३८.४ षटकात २४५-४. ६८ चेंडूंत ८५ धावा करायचे हे आव्हान ६ फलंदाज हातात असूनही भारताला पेलले नाहीं. इतर कुणीही अर्धशतकही केले नाही!
*९ एप्रिल २००५ मध्ये पाकिस्तानविरुद्ध अहमदाबादला झालेल्या ४८ षटकांच्या या सामन्यात भारताने ३१५-६ अशी धावसंख्या रचली. त्यात सचिनचा वाटा होता १३० चेंडूंत १२३ धावा. त्यानंतरच्या दोन सर्वोच्च धावसंख्या होत्या ६४ चेंडूत ४७ धावा (धोनी) आणि अवांतर धावा ३९! पाकिस्तानने ४८ षटकात ३१९ धावा केल्या. बालाजी, नेहरा आणि जहीर या तीन शीघ्रगती गोलंदाजांनी २६ षटकांत १८८ धावा दिल्या आणि केवळ २ बळी घेतले. सचिनच्या गोलंदाजीचे पृथःकरण होते ६-०-३६-१.
*१० फेब्रूवारी २००६मध्ये पेशावरला झालेल्या या पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारताच्या सर्व बाद ३२८ धावांपैकी सचिनने ११३ चेंडूंत १०० धावा केल्या. पठाण आणि धोनी यांनीही प्रत्येकी ६० धावा केल्या. ४५ षटकांनंतर सचिन ३०५-५ या धावसंख्येवर बाद झाला त्यानंतर इतरांनी ५ षटकात केवळ २३ धावा केल्या. सामना ४७ षटकात संपवावा लागला व ३११-७ या धावसंख्येवर डकवर्थ-लुईस कायदा वापरून या अत्यंत चुरशीच्या सामन्यात पाक विजयी झाला.
*११ सप्टेंबर २००६मध्ये क्वाला लुंपूर येथे विंडीजविरुद्ध झालेल्या या सामन्यात भारताने ५० षटकात ३०९-५ अशी धावसंख्या रचली. सचिन नाबाद राहिला, पण सचिनच्या १४९ चेंडूत १४१च्या डावानंतर फक्त पठाणचेच अर्धशतक होते, विंडीजला फक्त २० षटके मिळाली व त्यात १४१-२ अशा धावा करून डकवर्थ-लुईस कायद्यानुसार या अत्यंत चुरशीच्या सामन्यात वींडिज विजयी झाला.
*१२ नोव्हेंबर २००९मध्ये हैद्राबादला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या सामन्यात भारताला ३५१ धावा करायच्या होत्या. सचिनने केवळ १४१ चेंडूंत १७५ धावा केल्या. भारत तीन धावांनी सामना हरला. सचिनखेरीज ५९ धावा करत फक्त रैना चांगला खेळला. बाकीच्यांनी चैन केली!
*१३ २०११च्या विश्चचषक स्पर्धेतील १२ मार्चला झालेल्या या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात सचिनने १०१ चेंडूंत १११ धावा काढल्या. तो बाद झाला त्यावेळी १ बाद २६७ या धावसंख्येवर सचिन बाद झाला. त्यानंतरच्या फलंदाजांनी फक्त २९ धावा केल्या व भारताची धावसंख्या झाली सर्व बाद २९६! दक्षिण आफ्रिकेने नेहराच्या शेवटच्या षटकात चार चेंडूंत १४ धावा फटकावत आपली धावसंख्या पार करून सामना जिंकला!
सचिनच्या शतकी खेळीने भारताला पराजयापेक्षा विजयच जास्त मिळवून दिले आहेत हेच वरील आकडेवारीवरून स्पष्ट होते. आता सचिनने अर्धशतक साजरे केलेल्या पण शतकापर्यंत न पोचलेल्या खेळींत काय झाले ते पाहू.
आजपर्यंत सचिनने ९३ वेळा सचिनने अर्धशतक साजरे केले आहे त्यापैकी ५६ वेळा भारताला विजय मिळाला असून ३५ वेळा त्याचा पराजय झालेला आहे. दोन सामन्यात निकाल लागू शकला नव्हता. याहून अधीक खोलात जाऊन अभ्यास केल्यास त्याने ७० ते ९९ धावा काढलेल्या खेळींत २८ वेळी भारत जिंकला आहे असे लक्षात येईल.
आता इतर शतकवीरांबरोबर सचिनच्या शतकांची तूलना आणि किती फलंदाजांच्या शतकी खेळींचे विजयात परिवर्तन झाले आहे हे पाहू. इथेही तेंडुलकर आपल्या टीकाकारांची तोंडे बंद करून टाकतो. कारण सगळ्यात जास्त विजय मिळवून देणारा शतकवीरही सचिनच आहे. खाली जी यादी दिलेली आहे ती आहे विजय किती वेळा मिळविला आणि किती शतके केली याची! शिवाय आपला संघाला विजयी करून खेळीत जास्तीत जास्त वेळा नाबाद राहिलेला फलंदाजही सचिनच आहे!

फलंदाज देश शतके नाबाद सर्वोच्च
सचिन भारत 33 13 200*
जयसूर्या लंका 24 5 189
पॉंटिंग ऑस्ट्रे. 25 8 145
सौरव भारत 18 10 183
लारा विंडीज 16 3 169
गिलख्रिस्टऑस्ट्रे. 16 1 172
डे. हेन्स विंडीज 16 10 152*
सईद पाक 16 6 194
मार्क वॉ ऑस्ट्रे. 15 4 173
ह. गिब्ज द. आ. 15 1 175
सचिनची १४ शतके दुसर्‍या डावात प्रतिस्पर्ध्यांची धावसंख्या ओलांडताना केलेली आहेत. आता त्याच्या तुलनेत इतरांची कामगिरी पाहू.

फलंदाज देश शतके
सचिन भारत १४
पॉंटिंग ऑस्ट्रे. ८
लारा विंडीज ७
इंजमाम पाक ३
रिचर्ड्स** विंडीज ३
द्रविड भारत २
(** सर व्हिवियन रिचर्ड्स)

वरील पराक्रमाबरोबरच एकदिवशीय सामन्यांत सचिनने सामनावीराचा आणि स्पर्धावीराचा सन्मान इतर कुणाहीपेक्षा जास्त वेळा मिळविलेला आहे.
या सर्व आकडेवारीवरून भारताच्या विजयात तेंडुलकरचा असामान्य हिस्सा होता हेच सिद्ध होते. भारताच्या विजयाचा तो नेहमीच एक मोठा शिल्पकार ठरलेला आहे.
त्याचे टीकाकार कांहींही म्हणोत, पण भारताच्या आणि एकंदरच क्रिकेटच्या खेळाच्या संदर्भात पहायचे झाल्यास सचिनचे योगदान अतीशय उच्च प्रतीचे आहे यात शंका नाहीं. आपल्या झंझावाती खेळाने सचिनने भारतीयांना क्वचितच मनस्ताप दिला असेल. जास्तीत जास्त वेळा त्याने भारतीय प्रेक्षकांना आनंद मिळवून दिला आहे. परवाच्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यातही हेच पुन्हा दिसून आले. तो बाद झाल्यावर बाकीचे "भले-भले शिपाई ढळाढळा रडले" हेच आपण पाहिले! पण असल्या भल्या-भल्या शिपायांच्या अपयशाचे खापर सचिनच्या डोक्यावर का फोडायचे?
जय सचिन!
ऋणनिर्देश: या लेखासाठी माहिती पुरविल्याबद्दल श्री. नाफडे व श्री. धोंगडे यांचे आभार!

क्रिकेट

प्रतिक्रिया

नन्दादीप's picture

27 Mar 2011 - 2:53 pm | नन्दादीप

ब्बास...हेच हव होत.

परवापासून उगाचच बोंबा ठोकतायत....घ्या म्हणाव आता...!!!!!

बाकी मस्त संकलन...छान

घ्या सचिनद्वेष्ट्यांनो आता मॅच जिंकुन दाखवाच..

पैसा's picture

27 Mar 2011 - 2:55 pm | पैसा

बुधवारी सचिनचं शतक आणि पाकिस्तानवर विजय दोन्ही साजरं होवो.

रमताराम's picture

27 Mar 2011 - 3:32 pm | रमताराम

काळेकाका, कुत्र्याचे शेपूट असतात असे गैरसमज. गैरसमजाचे निराकरण करून घेण्याची इच्छाच नसते. आम्ही म्हणतो म्हणून सत्य आहेच हा माज असतो बाकी काही नाही. अज्ञानाचे निर्लज्ज समर्थन! आकडेवारी एका एक्सेल वर्कशीट मधे ठेवून गेले चार वर्षे अशा मूर्खांना पाठवण्याचे समाजकार्य करीत आलो आहे. केरसुणीने समुद्र हटवण्यासारखे आहे हे. कारण गोर्‍या कातडीचे गुलाम त्यांच्या प्रॉपगंडाला ब्रह्मवाक्य समजून चालतात. त्यात त्यांची लायकी दिसते इतकेच. गाढवापुढे वाचली गीता ही म्हण अगदी पुरेपूर पटते. इथेच चार जणांना प्रतिसाद देऊन ही आकडेवारी दिली होती. दररोज एक नवीन दिवटा तोच प्रतिसाद घेऊन उगवतोच आहे.
.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

27 Mar 2011 - 3:42 pm | निनाद मुक्काम प...

हेच म्हणतो मी''
हरीतात्यांच्या भाषेत '' पुराव्याने शाबीत ''
अवांतर - सध्या प्रतिसाद हे लघु ठेवण्याचे प्रयोजन आहे .त्यामुळे मनातील भावना वेगळ्या शब्दात न मांडता .त्यांच्याशी मिळत्या जुळत्या प्रतिसादाला हेच म्हणतो मी म्हणून
स्वतःचे मत प्रदर्शित करत आहे .

सुका ह्यांच्या लेखात प्रतिसादांचे अवांतर होऊ नये असे मनापासून वाटते .

रमताराम-जी
यंदा उपांत्यफेरीत ४ पैकी ३ संघ आशियाई होते, त्यातला एक (श्रीलंका) आधीच फायनलला पोचला. म्हणजे आता अंत्य सामनाही दोन आशियाई संघातच होणार. त्यामुळे आता क्रिकेटमध्ये "गोर्‍या चमडीची ऐशी-तैशी" झालेली आहे. आपली 'मसल पावर' ऑस्ट्रेलियात झालेल्या "माकड विरुद्ध भज्जी" या सामन्यातही दिसून आली होती. त्यामुळे आर्थिक फळीप्रमाणेच क्रिकेटच्या फळीतही आता आपलेच राज्य आहे!
तेंव्हां आता गोर्‍या लोकांच्या बोलण्याकडे कोण लक्ष देतोय्?

उग्रसेन's picture

27 Mar 2011 - 3:50 pm | उग्रसेन

काका, सच्याचे स्ट्रेट ड्रायव्ह, पुलचे फटके,स्क्वेअर कट,
लेग ग्लांस आन उत्तम फटका अस्सल पर कालजामधी धडकी भरवणारा स्वीप
आन सच्या नुसता ग्राऊंडवर दिसल्यावर होणारा आनंद
याचा काय हिशेब नाय.

पर काका मुझे माफ करो. आकडेवारी लय भारी आस्सन
पर आजकाल सच्याचे शंभर रन झाल्यावर आपून हारुन काहून राह्यलो.
हे काय कलत नाय.
तव्हा उद्याच्या म्याचमधी सच्याचे नव्ह्यान्नो रन व्हावा बाबा.
आन आपून म्याच जितावा.

सच्या, फायनलच्या म्याचमधी कर रे बाबा सेंचुरी.

बाबुराव :)

रमताराम's picture

28 Mar 2011 - 12:17 pm | रमताराम

पर आजकाल सच्याचे शंभर रन झाल्यावर आपून हारुन काहून राह्यलो.
देख बाबुरावभाई, तुम्हाला वेडगळ समजुती जोपासण्याची हौसच असेल तर आमचे म्हणणे नाही. सचिन तेंडुलकर कुठे माझ्यासारखा ग्रॅज्युएट आहे असे बाष्कळ समाधान करून घेत कुठेतरी कारकुनी करत चार-चव्वल मिळवण्यात धन्यता मानणारी वृत्ती जोपासायची असेल तर तुमचे दुर्दैव.

चला हाही तुमचा दावा तपासून पाहू या. तुमची 'आजकाल'ची व्याख्या आम्हाला माहित नाही. आम्ही आपले गेले चार वर्षे काय घडले ते पाहिले. धोनीच्या सो-कॉल्ड यंग ब्रिगेडच्या मूर्ख कैफाने बहुधा सचिन बरेचदा संघात नसतो. त्यामुळे तो नसलेले सामने/मालिका सोडून दिल्या आहेत. जेव्हा खेळला त्याची आकडेवारी अशी:

  • भारत-द.आफ्रिका सेरीज जाने. २०११ - २ सामने - शतक नाही - खेळलेल्या सामन्यात १-१, न खेळलेल्या तीन सामन्यात दोन पराभव नि एक विजय.
  • भारत - द. आफ्रिका - फेब्रुवारी २०१० - तीनपैकी दोन सामने खेळला - दोन्हीमधे विजय - दुसर्‍या सामन्यात द्विशतक. भारताचा १५३ धावांनी विजय. मॅन ऑफ द मॅच
  • भारत - श्रीलंका - डिसें २०१० - १. ६९ (विजयी) २. ४३ (पराभूत) ३. ९६ (विजयी) ४. ८ (विजयी). ५. रद्द
  • भारत - ऑस्ट्रेलिया - ऑक्टो २००९ - १. १४ (पराभूत) २. ४ (भारत) ३. २४ (विजयी) ४. ४० (पराभूत) ५. (दुसरा डाव) १७५ - भारत पराभूत (टार्गेट ३५०) ६. तेंडुलकर १०. (पराभूत) ७. रद्द
  • कॉम्पॅक कप - सप्टेंबर २००९ - १. भारत- न्यूजीलंड - तेंडुलकर ४६ - भारत विजयी - तेंडुलकर सामन्यात सर्वाधिक धावा, २. भारत श्रीलंका - तेंडुलकर २७ - भारत पराभूत, ३. (अंतिम सामना) - भारत श्रीलंका - तेंडुलकर १३५ - भारत विजयी - तेंडुलकर मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ़ द सेरीज.
  • भारत - न्यूजीलंड - मार्च २००९ - १. २० (विजयी) २. रद्द ३. तेंडुलकर १६३ (रिटायर्ड हर्ट) - भारत विजयी, मॅन ऑफ द मॅच ४,५. खेळला नाही.
  • भारत श्रीलंका - जाने २००९ - पहिले तीन सामने. ५, ६ , ७ धावा - भारत विजयी. ४,५ खेळला नाही.
  • कॉमनवेल्थ बॅंक सेरीज - फेब्रु-मार्च २००८ - १. ४४ (विजय) २. ३२ (पराभव) ३. ५ (पराभव) ४. ० (विजय) ५. २. (पराभव) ६. ६३ (विजय) ७. अंतिम सामना १ - ११७ (विजय) - मॅन ऑफ द मॅच ८. अंतिम सामना २ - ९१ (विजय) - मॅन ऑफ द मॅच.
  • नॅटवेस्ट सेरीज - भारत-इंग्लंड ऑगस्ट २००७ - १. १७ (पराभव) २. ९९ (विजय) - मॅन ऑफ द मॅच ३. ८ (पराभव) ४. ५५ (पराभव) ५. ७१ (विजय) ६. ९४ (विजय) ७. ३० (पराभव)
  • भारत - द. आफ्रिका जून २००७ - १. ९९ (पराभव) २. ९३ (विजयी) - मॅन ऑफ द मॅच ३. ८ (विजय) - मॅन ऑफ द सेरीज

धोनीकृपेने हल्ली सचिनला वन-डे मधे फारसे खेळायला मिळत नसल्याने शतकांची संख्या कमी आहे. पण वर मोजले तर एकुण पाच शतके आहेत त्यातील चार सामने आपण जिंकले आहेत. पाचवा सामनाही जवळजवळ एकहाती जिंकून दिलाच होता (केवळ तीन धावांनी पराभव झाला). ३४७ पैकी निम्म्याहुन अधिक धावा त्याने एकट्याने काढल्या होत्या, उरलेल्या 'यंग ब्रिगेड'ला सगळ्यांना मिळून उरलेल्या निम्म्या धावा काढता आल्या नाहीत.

याशिवाय नव्वदीत बाद झाला असे चार सामने आहेत त्यातील तीन आपण जिंकले आहेत.

याच काळात त्याला सहा वेळा 'मॅन ऑफ द मॅच' तर दोन मॅन ऑफ द सेरीज चा मान मिळाला आहे. आणि हा सारा चाळीस सामन्यांचा हिशोब आहे लक्षात घ्यावे.

एवढी सणसणीत कामगिरी असताना आपल्या देशातील लोकांनी निलाजरेपणे त्याच्यावर चिखलफेक करावी हे लाजिरवाणे आहे. अर्थात आधीच्या प्रतिसादा म्हटले तसे शेवटी 'कुत्र्याचे शेपूट' , असो.

नगरीनिरंजन's picture

28 Mar 2011 - 12:33 pm | नगरीनिरंजन

ओ ररा, कशाला एवढे अभ्यासाचे कष्ट घेताय?
सूर्यावर कोणी थुंकतंय असं तुम्हाला सांगितलं तर तुम्ही काय छत्री घेऊन जाणार का? या भुंकणार्‍या लोकांना काडीचीही किंमत द्यायची गरज नाही. सचिन भारतरत्न आहे आणि भारतरत्न राहील. आंधळ्यांनी हिर्‍याला दगड म्हटल्याने त्याचा खराच दगड होत नाही तर आंधळ्यांचंच हसं होतं.

सहमत. इथे एका डु, आयडीच्या विरुद्ध मत देत असताना संपाद्क संपादन का बरे करत असावेत?

क्रिकेट ह्यो बेभरवशाचा खेळ समजला जातो.
एखांदा प्लेर कितीबी ग्रेट असला तर सगळ्याच
म्याचामधी त्यो काय सेंचु-या मारत नाय बसत.

योगायोग म्हणा नाय तर काय म्हना.
सच्या ग्रेट हाय. देव हाय. अजून काय हाय.
पर सेंचुरी झाल्यावर म्याचमधी गडबड होती ही मही खुळी
समजूत आस्सन. म्हून काय शेपूट कुत्रा
बोलाला नाय पाह्यजेन. मलाबी लय प्राण्याचे
नावं येतेत. पर मी लिव्हनार नाय.

क्रिकेट सभ्य लोकायचा खेळ तर
त्याच्याव चर्चा करणारे लोकबी
सभ्य असतेत असं मही समजूत हाय.

मह्या समजूतीला खरडवही येऊन दोन शा द्या.
अंधश्रद्धाळु म्हणा. येडा म्हणा. सलेक्टीव मेमरी
असलेला का काय ते म्हणा. भाषा सभ्य ठेवा
एवढी हात जोडून इनंती.

याशिवाय नव्वदीत बाद झाला असे चार सामने आहेत त्यातील तीन आपण जिंकले आहेत
हाहाहा. माहितीबद्दल आभारी हाये.

बाबुराव :)

म्हून काय शेपूट कुत्रा
बोलाला नाय पाह्यजेन. मलाबी लय प्राण्याचे
नावं येतेत. पर मी लिव्हनार नाय.

ओ दादा एखादी म्हण ('कुत्र्याचे शेपूट वाकडे') सांगणं नि तुम्हाला कुत्रा म्हणणं यातला फरक तुम्हाला समजत असावा असा आमचाबी समज व्हता. दूर केल्याबद्दल धन्यवाद. आमचे शब्द मागे घेतो नि बिनशर्त माफी मागतो. यापुढे आधी खरडीतून तुम्हाला अमुक माहित आहे का तमुक माहित आहे का, याचा अर्थ तुम्ही कसा घ्याल हे विचारेन नि मग लिहीन, कसं?


क्रिकेट सभ्य लोकायचा खेळ तर
त्याच्याव चर्चा करणारे लोकबी
सभ्य असतेत असं मही समजूत हाय.

समजूत तशी अगदीच चुकीची नाय. फक्त मूर्तिभंजकांसाठी आमच्याकडे काठीच असते.

अवांतरः मुद्दे संपले की अपमान झाल्याचा कांगावा करायचा हे आम्हाला नवीन नाही

नन्दादीप's picture

28 Mar 2011 - 3:37 pm | नन्दादीप

जस्ट चिल र रा. जावूण्दे त ना गडे.......

कावळ्याच्या षापाणे काही गाय मरत नाही की तिला जुळाब पण लागत णाहीट. So Just Chill.....

वपाडाव's picture

28 Mar 2011 - 3:56 pm | वपाडाव

दीपा, अरे caps lock प्रेस कर रे...
अजुन काही टंकायच्या आत...

राजेश घासकडवी's picture

27 Mar 2011 - 7:10 pm | राजेश घासकडवी

लोकांची मेमरी कशी सिलेक्टिव्ह असते हे या आकडेवारीवरून दिसून येतं. सचिनने शतक ठोकलं तरीही आपण हरलो अशा वेळा त्यामानाने कमी असल्या तरी मॅन बाइट्स डॉग प्रकारच्या असल्याने लोकांच्या मेंदूत कोरल्या जातात. सचिनने शतक केल्यावर आपण जिंकलो यात विशेष काही नसल्याने त्या कमी लक्षात रहातात.

आकडेवारी लय भारी आस्सन
पर आजकाल सच्याचे शंभर रन झाल्यावर आपून हारुन काहून राह्यलो.

आकडेवारी काही का असेना सत्य वेगळं आहे असा विश्वास असेल तर त्याला काय म्हणावं?

ज्ञानेश...'s picture

27 Mar 2011 - 8:16 pm | ज्ञानेश...

अंधश्रद्धा.

वपाडाव's picture

28 Mar 2011 - 1:24 pm | वपाडाव

- (अंधश्रद्धाळु) वपाडाव

वेताळ's picture

27 Mar 2011 - 8:21 pm | वेताळ

खरतर रिकी ने देखिल शतक केले होते पण त्याची टिम हरली म्हणुन रिकीच्या शतकाची किंमत कमी होत नाही.

शाहरुख's picture

27 Mar 2011 - 8:29 pm | शाहरुख

व्वा !

फक्त एकच गोष्ट...डावाची सुरुवात करणार्‍या दोघा फलंदाजांना पॉवर-प्ले ची किमान १० षटकं (पूर्वी १५) खेळायला मिळत असल्याने त्यांच्याकडून संघाच्या बहुतांश धावा होणे अपेक्षितच आहे...बाद न झाल्यास (यात त्यांचे क्रेडीट आहे) त्यांना जास्त खेळायला मिळते.ओपनरची कामगिरी आणि ४-५ व्या क्रमांकावर येणार्‍याची कामगिरी फक्त आकडेवारी पुढ्यात ठेवून तोलता येणार नाही.

अविनाशकुलकर्णी's picture

27 Mar 2011 - 8:48 pm | अविनाशकुलकर्णी

कुणाचच् शतक् होवु देणार नाहि अशी गर्जना पाकडे करीत आहेत

माझीही शॅम्पेन's picture

27 Mar 2011 - 10:48 pm | माझीही शॅम्पेन

छान !!! :) सुन्दर लेख

चिंतामणी's picture

28 Mar 2011 - 12:01 am | चिंतामणी

हा दुवा कृपया पहा व सचिनने केलेल्या ४८ एकदिवसीय शतकातील किती सामने भारताने जिंकले आहेत हे शेवटचा रकाना पाहून कळेल. सुधीर काळ्यांनीसुद्धा वर सांगीतले आहेच. पण ही लिंक संग्रही ठेवली की उत्तर देणे सोपे जाईल.

http://en.wikipedia.org/wiki/List_of_international_cricket_centuries_by_...

एकदम भारी लेख काळेकाका! आणि अतिशय समयोचित!!!

सचिनला तोड नाहीच आणि त्याच्या शतकांनाही नाही. पण हे अमान्य असणार्‍यांना हा लेख म्हणजे अगदी अभ्यास करावा असाच आहे.

आणि संख्याशास्त्राचा लेखही रोचक कसा बनू शकतो याचा आदर्श वस्तुपाठ घालून दिल्याबद्दल काळेकाका, धन्स! वाचनखूण साठवलेली आहे.

तसेच, शीर्षकातील 'गैरसमज' हा शब्द, मिपावरील शुद्धलेखनाच्या नवीन नियमांनुसार "गैर"समज असा न लिहीता (गैर)समज असा लिहून शुद्धलेखनासंबधी आपली कळकळ जाहीर केल्याबद्दल काळेकाकांचे मन:पूर्वक अभिनंदन! ;-)

--असुर

शीर्षकातील 'गैरसमज' हा शब्द, मिपावरील शुद्धलेखनाच्या नवीन नियमांनुसार "गैर"समज असा न लिहीता (गैर)समज असा लिहून शुद्धलेखनासंबधी आपली कळकळ जाहीर केल्याबद्दल काळेकाकांचे मन:पूर्वक अभिनंदन!

=)) =))
हाण्ण तेज्यायला!!! हा असुर्‍या कधीतरीच प्रतिसाद देतो पण, लेकाचा, देतो भारी.

पिलीयन रायडर's picture

28 Mar 2011 - 11:51 am | पिलीयन रायडर

सचिन बद्दलचे बाकी अनेक गैरसमज आणि त्यान्चे निरसन इथे मिळेल....

http://www.sachinandcritics.com/

रमताराम's picture

28 Mar 2011 - 12:43 pm | रमताराम

पिलीयन रायडरसाहेब, आपले गैरसमज आधी दूर करा. वाकड्या शेपटीच्या प्राण्यांना वाचता येते नि आकडे समजतात हे आपले दोन मोठ्ठे गैरसमज आहेत. असो.

दुव्याबद्दल लै लै आभार.

पिलीयन रायडर's picture

28 Mar 2011 - 1:01 pm | पिलीयन रायडर

कुठ मनावर घेताय इतक? आपल्याला महितिये ना कि सच्या काय आहे... मग झाल तर...

नन्दादीप's picture

28 Mar 2011 - 2:41 pm | नन्दादीप

saaheb naay vo, tyaa madam haayat

रमताराम's picture

28 Mar 2011 - 3:33 pm | रमताराम

म्याडम येक डाव मापी करावी. आमास्नी ठावकी असतं तर तुमास्नी सल्ला द्येण्याचं धाडस आमी क्येलंच नस्तं.

शिल्पा ब's picture

28 Mar 2011 - 12:32 pm | शिल्पा ब

सचिन आवडतो आपल्याला. या वयातही भन्नाट खेळतो. बाकी गोष्टी फाट्यावर.

या वयातही भन्नाट खेळतो.
अहो शिल्पाताई, तो माझ्या मुलाच्या वयाचा तरुण मुलगा आहे! हाहाहा!!

हे (खालील) पत्र या दुव्यावर वाचायला मिळेल. आणी ईतर बरेच काही...

Dear Sachin,
I feel sad. Even after 22 years of playing for the country, you are still expected to win
matches on your own. We forget that apart from you there are 10 more players in the team.
You have been the run machine in World Cups with an average …of 60. Even today while you
yet again proved your class with a 111 the others around took it easy. You chased the ball in
the outfield and ensured that your throws landed on top of the bails. Others preferred to
drop catches or go back to the dressing room for a ‘rest’ while a substitute fielder came in.
Sachin, the current Indian cricket team doesn’t deserve you. They don’t know what it is like
to give one’s blood and sweat for this nation of a billion people. For them fame and money
has come to easy and undeserving – not commensurate to the ’supposed talent’ that they
posses. Do you remember what you had said to Tom Alter in that interview in 1989? “I just
want to play cricket”. Sachin, let me also not hide the truth – you are not my favorite
cricketer – but one plays favorites only with humans – not with Gods for they are revered,
emulated and looked at in awe… [We expect Sachin to win this cup for us. But what about
the other players? Are they supposed to be playing ludo in the dressing room? I hope that
the rest of the team wake up and realize that they are not there to 'play' in the tournament,
they are supposed to 'win' it - not for themselves, not for India but for the greatest Indian to
have lived - Sachin Tendulkar. P.S: In the 1992, Hero Cup semi-final in Eden Gardens Kolkata
(India Vs. SA), SA needed 6 runs to win off the last over. Tendulkar snatched the ball from
Azhar and bowled a magnificent over to win that match for us. (He gave away only 3 runs).
Maybe our team needs to watch that over to know what guts and glory are all about.]
Sachin, I hope we win the final in Wankhede. If we don’t a billion people can only hang their
heads in shame and ask for your forgiveness.

Regards,

One of your undying fans who:
**Still goes crazy when you hit that straight drive and show us the manufacturer’s name on the bat.
**Stayed awake late into the night before my end terms to watch that 100 in Sharjah in the midst of that sandstorm.
**Relished every shot that you played to decimate Warne in 1998 and then Shoaib Akhtar in that 2003 World Cup against Pakistan.
**Will stop watching cricket after you retire.

साबु's picture

28 Mar 2011 - 1:56 pm | साबु

सचिन हा एक महान खेळाडु आहे यात शन्काच नाहि आणि सचिनचे शतक म्हणजे भारताचा पराजय हा निखालस (गैर)समज हे तर आकडेवारीने कळतेच आहे.. ....पण कधी कधी सचिनला खेळापेक्शाहि मोठे केले जाते...कुठलाच खेळाडु कधीच खेळापेक्शा मोठा नसतो....

फक्त एकच गोष्ट...डावाची सुरुवात करणार्‍या दोघा फलंदाजांना पॉवर-प्ले ची किमान १० षटकं (पूर्वी १५) खेळायला मिळत असल्याने त्यांच्याकडून संघाच्या बहुतांश धावा होणे अपेक्षितच आहे...बाद न झाल्यास (यात त्यांचे क्रेडीट आहे) त्यांना जास्त खेळायला मिळते.ओपनरची कामगिरी आणि ४-५ व्या क्रमांकावर येणार्‍याची कामगिरी फक्त आकडेवारी पुढ्यात ठेवून तोलता येणार नाही. - सहमत....

सचिन हा एक महान खेळाडु आहे यात शन्काच नाहि आणि सचिनचे शतक म्हणजे भारताचा पराजय हा निखालस (गैर)समज हे तर आकडेवारीने कळतेच आहे.. ....पण कधी कधी सचिनला खेळापेक्शाहि मोठे केले जाते...कुठलाच खेळाडु कधीच खेळापेक्शा मोठा नसतो....

कोण म्हणलं?

खेळाला महान करण्यात सचिन सारख्या खेळाडुंचाच हात असतो. सचिन सारखे खेळाडु झाले नसते तर क्रिकेटला कोणी कुत्रं नसतं विचारतं. आम्ही फुटबॉलपटु झालो, पेले-मॅरेडोनामुळे. आम्ही टेनिस बघतो सॅम्प्रास, आगासी, फेडरर, नदाल, हिंगीस, स्टेफी वगैरेंमुळे. आम्ही डबल ट्रॅप पहायला लागलो राज्यवर्धन सिंह राठोरमुळे. आम्ही बॅडमिटन पाहु लागलो रास्मुसेन, हिदायत लिन दान अन गोपीचंद मुळे, आम्ही बुद्धीबळ खेळु लागलो फिशर अन विश्वनाथन आनंद मुळे.. यादी पुष्कळ लांब आहे... तेव्हा तुमचे हे पुस्तकी विचार तुमच्याकडेच ठेवा.

रमताराम's picture

28 Mar 2011 - 2:52 pm | रमताराम

याच कारणास्तव अशा आयकॉन ठरलेल्या चित्रपटकलाकार, खेळाडू इ. ना घेऊन जाहिरात करून उत्पादक आपले उत्पादन खपवू पाहतात. त्यातून त्यांना मिळणारे उत्पन्न हा ही आपल्या पोटदुखीचा भाग असतो. अजून 'बास की आता, भरपूर कमावलं की सचिन ने. आता जरा इतरांना चान्स द्यावा की.' हा मध्यमवर्गीय असूयापीडित तर्क कसा आला नाही इथे.

रमताराम's picture

28 Mar 2011 - 2:48 pm | रमताराम

सचिने खेळला तर... हा वादाचा मुद्दा आहे इथे. तेवढ्याच बाबत बोला. आधी तो खेळला की हरतो असे म्हणायचे. हा मुद्दा खोडून काढला गेला की 'हल्ली आपण हरतो' अशी पळवाट काढायची. तो ही मुद्दा खोडून काढला की त्याला कसा अ‍ॅडवान्टेज मिळाला वगैरे मूळ मुद्याशी विसंगत मुद्दे काढायचे हे बरोबर नाही.

आघाडीला खेळणार्‍याला पॉवर प्लेचा फायदा मिळतो हे खरे असले तरी गोलंदाजांची पहिली फायरिंग षटकेही त्यालाच खेळावी लागतात हे विसरू नये. शेवटी थकलेल्या गोलंदाज, क्षेत्ररक्षकांसमोर नि चेंडूचा लोळागोळा झालेला असताना खेळणे तुलनेने सोपे असते असे आम्ही प्रत्युत्तरादाखल म्हणू शकतो. अशा वेळी तडाखेबाज खेळी करणार्‍याची खेळी आम्ही दुय्यम म्हणावी का?

आणखी एक मुद्दा. मुळात आघाडीला खेळायला मिळते ते तेवढी लायकी सिद्ध केल्यावरच. उगाच कोणीही सोम्यागोम्या आघाडीला खेळू शकत नाहीत. अगदी सेहवागसकट मध्यम फळीत खेळणारे सारे भारतीय फलंदाज वेगवान गोलंदाजीसमोर नाचत असताना त्यांपैकी कोणी आघाडीला येऊन सचिनपेक्षा अधिक दिवे लावेल अशी शक्यताच फार कमी आहे.

ओपनरची कामगिरी आणि ४-५ व्या क्रमांकावर येणार्‍याची कामगिरी फक्त आकडेवारी पुढ्यात ठेवून तोलता येणार नाही.

विधान योग्य असले तरी इथे कोणताही 'तुलनात्मक' अभ्यास वा त्यासंबंधी दावे केले गेलेले नाहीत त्यामुळे या तर्काच्या मागे लपण्याचा नि विषयांतर करण्याचा प्रयत्न नकोच.

शाहरुख's picture

28 Mar 2011 - 11:02 pm | शाहरुख

"विषयांतर" यासाठी की,

"सचिनने शतक केल्यास भारत जिंकतो का" याचे उत्तर "४८ सामन्यात ३३ विजय" इतकेच देऊन मॅटर खतम करता येईल..त्यासाठी येव्हढा लेख लिहायची गरजही नाही.....सचिनने १०० चा आकडा ओलांडल्यास मॅच जिंकतो की नाही याची चर्चा करणे ही खरं तर एक प्रकारची अंधश्रद्धा आहे.

मूळ मुद्दा हा आहे की सचिन मॅचविनर आहे की नाही...असो.

सविता's picture

28 Mar 2011 - 2:05 pm | सविता

वेल.... या आकडेवारीत...म्हणजे.... सचिन चे शतक आणि हारणे... किती वेळा आपण पहिल्यांदा बॅटींग केले आणि किती चेस करताना?

अंधश्रद्धा गेली चुलीत मला वाटतं....चेस करताना सचिन ने सेंचुरी मारली की पॅव्हेलियन मध्ये बसून बसून उरलेले खेळाडू पार झोपी आलेले असतात की शेवटचे २०-२५ रन सुद्धा सचिन नेच करावेत असे त्यांना वाटते... आणि ते सचिन ने समजा नाहीच केले....तर हे नंतर चे बॅट्समन धावपट्टीवर आले की त्यांना चेंडू बहुतेक वाटाण्या इतका दिसतो... आणि कसे खेळावे त्यांना कळत च नाही.

नितिन थत्ते's picture

28 Mar 2011 - 2:07 pm | नितिन थत्ते

सिलेक्टिव्ह मेमरी ही मनुष्याची सहज प्रवृत्ती असावी. विशेषतः वाईट गोष्ट लक्षात राहण्याची आणि चांगल्या गोष्टी विसरल्या जाण्याची.

मी पूर्वी एका कंपनीत काम करत होतो तेव्हाची गोष्ट. ती कंपनी पंखे बनवत असे. त्यावेळी एका ठिकाणी पंख्याचे पाते तुटून खाली पडल्याची घटना घडली. (एका मोठ्या धार्मिक स्थळी घटना घडल्यामुळे वर्तमानपत्रात ती बातमी आली होती). म्हटले तर लाखो पंखे कंपनी विकत असे त्यांतल्या एका पंख्याचे पाते तुटले होते.

परंतु त्यावेळी अनेक डीलर / विक्रेते आम्हाला "तुमच्या पंख्याची पाती तुटतात" असे ऐकवत असत. [एका घटनेचे रूपांतर नेहमी घडणार्‍या घटनेत].

आपला मित्र १० प्रसंगात आपल्या मदतीला धावून आलेला असतो. अकराव्या वेळी तसे झाले नाही तर तेच आपल्या लक्षात राहते. आणि हा आपल्याला गरजेच्या वेळी नेहमी धोका देतो असा ग्रह आपण करून घेतो.

रमताराम's picture

28 Mar 2011 - 2:35 pm | रमताराम

मुद्याशी १००% सहमत. पण इथे त्या व्यक्तीची नकारात्मक वृत्ती दिसून येत नाही का? फक्त ही सिलेक्टिव मेमरी चांगल्या बाजूची का असत नाही हा आमचा प्रश्न आहे.

मेघवेडा's picture

28 Mar 2011 - 2:12 pm | मेघवेडा

उत्तम लेखाजोखा! वाचनखूण!!

विसोबा खेचर's picture

28 Mar 2011 - 3:02 pm | विसोबा खेचर

काळेसाहेब,

सुंदर लेख..!

माझ्या मते सचिनचे शतकी चौकार-षटकार, दीदीचा स्वर, आणि आमच्या अण्णांची तान या सार्‍या गोष्टी सारख्याच मोलाच्या आहेत..!

या ना त्या कारणांनी सचिनला नावं ठेवणारी मंडळी ही छुपी महाराष्ट्र द्वेष्टी असतात हा मुद्दा आपण कृपया लक्षात घ्या..

असो..

तात्या.

रमताराम's picture

28 Mar 2011 - 3:28 pm | रमताराम

विषय संपला. :)

नन्दादीप's picture

28 Mar 2011 - 3:39 pm | नन्दादीप

तात्या मस्त प्रतिसाद.

एक्दम कोल्हापूरी पांढर्‍या रस्श्यावानी झन्झनीत ....

Deadline....

सुधीर काळे's picture

28 Mar 2011 - 9:41 pm | सुधीर काळे

बरोबर, तात्यासाहेब! (लई दिसानी दर्सन झालं!)
आता दीदी, (कै.) अण्णा यांच्यानंतर सचिनलाही भारतरत्न मिळावी आणि तीसुद्धा एका मराठी राष्ट्रपतींच्या हस्ते असे मला फार मनापासून वाटते!

चिंतामणी's picture

30 Mar 2011 - 9:14 am | चिंतामणी

क्या बात कही है.

Well said.

धन्यवाद!! मस्तच माहिती दिलीत.

शारजामधे हा सामना चालु असताना तेथे वादळ आहे होते...
आणि भारताला कमी ओव्हर खेळायला मिळाले.. .. मैदानावरिल वादळ गेल्या नंतर सचिन नावाच्या वादळने १४३ धावा कमि चेंडुत काढल्या....

आपण तो सामना हरलो पण...

केवळ सचिनने काढलेल्या या शतकामुळे भारताचि धावगती चांगलि झाली आणि भारताला फायनल खेळायची संधी मिळाली,

सचिनने फायनल मधे पुन्हा शतक(१३४) मारुन शरजा कप ऑस्ट्रेलिया कडुन हिसकावुन घेतला...

यामुळे सचिनचे हेहि शतक भारतासाठी महत्वाचे आहे ...

चिंतामणी's picture

30 Mar 2011 - 9:24 am | चिंतामणी

आ़़ज भारत बंद असणार.
आज सगळीकडे सुट्ट्यांची चर्चा आहे..
सचीन आज सेंचुरींची सेंचुरी करणार का?
सचीनची सेंचुरी झाली तर मॅच जिंकणार का?
ईत्यादी.ईत्यादी.ईत्यादी.
मिडियाने अश्या चर्चा चालू केल्या आहेत.
त्या पार्श्वभुमीवर मला एका तरूण मुलाकडुन आलेला SMS फार वेगळा वाटला. तो त्याच भाषेत येथे ठेवत आहे.

I WATCH CRICKET 2 C SACHIN'S PLAY. NOT BCOZ I LUV HIS PLAY, IT'S BCOZ I WANT 2 KNOW D REASON Y MY COUNTRY'S PRODUCTION GOES DOWN BY 25% WHEN HE IS BATTING.

वपाडाव's picture

30 Mar 2011 - 11:53 am | वपाडाव

I WATCH CRICKET 2 C SACHIN'S PLAY. NOT BCOZ I LUV HIS PLAY, IT'S BCOZ I WANT 2 KNOW D REASON Y MY COUNTRY'S PRODUCTION GOES DOWN BY 25% WHEN HE IS BATTING.

चिंतामणीजी..
हा मेसेज तुम्हाला त्या मुलाने एडिट करुन पाठवला आहे असं दिसतंय...
कारण, हे उद्गार अमेरिकचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचे आहेत...
फक्त एकदा गुगलुन बघा म्हंजे सर्व शंका दुर होतील....