या कलियुगाच्या काळात माणसाने कसे वागावे ?

लीना सचिन चौधरी's picture
लीना सचिन चौधरी in काथ्याकूट
14 Sep 2010 - 2:53 pm
गाभा: 

या कलियुगाच्या काळात माणसाने कसे वागावे.
कलियुगाच्या काळात कलीयुगा सारखेच वागावे कि कलियुगात सत्ययुगा प्रमाणे वागावे.
आपले अभिप्राय कळवा

प्रतिक्रिया

चिरोटा's picture

14 Sep 2010 - 2:55 pm | चिरोटा

कुठचेही युग असो, माणसाने माणसाशी माणसासारखे वागावे. !!

चाणक्य नीती अवलंबावी. बेस्ट.

आधी कौलं फोडुन झाली आता बसा काथ्याकुटत.
छान चाललय.

गांधीवादी's picture

14 Sep 2010 - 3:31 pm | गांधीवादी

सत्ययुग, द्वापरयुग, त्रेतायुग, कलियुग हे सगळे काल्पनिक असून, कोणत्याही कालावधीत आणि कुठे असताना माणसाने कसे वागावे ते मी नमूद करू शकतो.
१) नेहमी खरे बोलण्याचा प्रयत्न करावा, (चांगल्या कामासाठी थोडेफार खोटे ठीक आहे)
२) मोठ्यांचा आदर करावा, लहानांना भरपूर प्रेम द्यावे.
३) केवळ देशाभिमानापेक्षा ह्या धरतीचा आदर करावा.
४) दुसर्याला दुखावेल असे कधीही बोलू नये. प्रत्येकाचं हृदयात देव असतो. हे लक्षात असू द्यात.
५) व्यसनांपासून कायम दूर राहावे.
६) आपले काम प्रामाणिक पाने करावे. आळस करू नये.
७) अन्न वाया घालवू नये.
८) दुर्बलांवर तसेच सर्व प्राणीमात्रांवर प्रेम करावे.
९) प्रत्येकातून काहीतरी चांगले शोधावे, आणि ते अंगी बाळगण्याचा प्रयत्न करावा.
१०) जगाला नेहमी आनंद देण्याचा प्रयत्न करावा.

बाई, शाळेला सुटी काय आज?

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

14 Sep 2010 - 3:37 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

या आंतरजालीय व्यवहारात

  • एका आयडीने दुसर्‍या आयडीशी कसे वागावे?
  • एका आयडीने दुसर्‍याच्या डुप्लिकेट आयडीशी कसे वागावे?
  • एका आयडीने आपल्याच डुप्लिकेट आयडीशी कसे वागावे?
  • एका डुप्लिकेट आयडीने दुसर्‍याच्या आयडीशी कसे वागावे?
  • एका डुप्लिकेट आयडीने दुसर्‍याच्या डुप्लिकेट आयडीशी कसे वागावे?

आणि

  • माणसाने प्राण्यांशी कसे वागावे?
  • माणसाने आंजा आयडींशी कसे वागावे?
  • माणसाने बोसॉन्सशी कसे वागावे? (गुर्जी, वाचताय ना?)
  • माणसाने आंजा डुप्लिकेट आयडींशी कसे वागावे?
राजेश घासकडवी's picture

14 Sep 2010 - 9:22 pm | राजेश घासकडवी

•माणसाने बोसॉन्सशी कसे वागावे? (गुर्जी, वाचताय ना?)

वाचतोय. पण प्रश्न निरर्थक वाटतो. आत्तापर्यंत आंतर्जालावर मला माणूस किंवा दुसरा बोसॉन सापडलेले नाहीत. सगळे आयडी किंवा फर्मियॉन. पण कौल किंवा काथ्याकूट टाकून बघ.

कवितानागेश's picture

15 Sep 2010 - 9:29 am | कवितानागेश

बोसॉन्स हली शाळेतून किन्वा काही सैन्यातूनच आढळतात.
काही विशिष्ट परिस्थितीत फर्मियोन्सच बोसॉन्स सारखे 'गुण' दाखवतात (सभा, मोर्चा इ.).
हा प्रश्न एखाद्या राजकीय नेत्याला विचारावा / त्याचे सुरक्षित अन्तरावरून निरिक्षण करावे.
म्हण्जे बोसॉन्सचा 'लेझर' कसा तयार करून वापरायचा त्याचे टेक्निक कळेल!

परिकथेतील राजकुमार's picture

14 Sep 2010 - 4:13 pm | परिकथेतील राजकुमार

आमचे एक हलकट जालशत्रु श्री. पुण्याचे पेशवे ह्यांनी ते स्वतः कली असल्याचा दावा केला आहे. तरी ह्या संबंधात त्यांच्याकडुन काय ते जाणुन घ्यावे.

नवे युग चालु करावे म्हणतो..

परिकथेतील राजकुमार's picture

14 Sep 2010 - 4:18 pm | परिकथेतील राजकुमार

कुठले ? अवलिया युग का ?
मग तुमच्या युगात संपादकांना प्रवेश नसेलच ;)

llपुण्याचे पेशवेll's picture

14 Sep 2010 - 4:25 pm | llपुण्याचे पेशवेll

अव्लीयुग. :)
पुढे मागे चवलीयुग पावलीयुग पण सुरु करायला हरकत नाही.

असला हिणकसपणा पाहुन तमोयुग नक्की येईल !

विनायक प्रभू's picture

14 Sep 2010 - 5:15 pm | विनायक प्रभू

ते काय असतय?
कुठे सापडते?

मृत्युन्जय's picture

14 Sep 2010 - 5:18 pm | मृत्युन्जय

त्रेतायुगासारखे का वागु नये? किंवा द्वापारासारखे या बद्दल लीनातै काही खुलासा करतील काय? आणि द्वापारासारखे वागायचे असेल तर नक्की कोणासारखे वागायचे? कृष्णासारखे, शकुनीसारखे, दुर्योधनासारखे, दुशासनासारखे, अर्जुनासारखे, परशुरामांसारखे, कर्णासारखे, भीष्मासारखे, धृतराष्ट्रासारखे, गांधारीसारखे, युधिष्ठीरासारधि, भीमासारखे, द्रौपदीसारखे की अजुन कोणासारखे?

कलियुगात कलियुगासारखे वागायचे असेल तर नक्की कोणासारखे वागावे? परीक्षितासारखे, नंदासारखे, चंद्रगुप्तासारखे, चाणक्यासारखे, अशोकासारखे, बुद्धासारखे, शिवाजी महाराजांसारखे, औरंगजेबासारखे, अकबरासारखे, गोविंद्सिंगांसारखे, लालु सारखे, भिंद्रनवाल्यांसारखे, मल्लु सारखे, ललिता सारखी, सोनिया सारखे, अडवाणींसारखे, अबु सारखे, दाउद सारखे, ओसामा सारखे, बुश सारखे, चिदु सारखे, पेशव्यांसारखे, संभाजी महाराजांसारखे, ब्रिगेडींसारखे की अजुन कोणासारखे?

वेताळ's picture

14 Sep 2010 - 5:21 pm | वेताळ

आम्ही हे सगळे २०१२ नंतर ठरवणार. आता मजा करुन घेवुया.

लीना सचिन चौधरी's picture

26 Sep 2010 - 5:08 pm | लीना सचिन चौधरी

मला तर वाटते कि कलियुगाच्या काळात कलीयुगा सारखेच वागावे . चांगल्याशी चांगले आणि वाईट शी वाईट.एखादा माणूस आपल्याशी चांगला वागला म्हणजे तो चांगला असेलच असे नाही. त्याचा काहीतरी मतलब असणार, त्याला / तिला आपल्याकडून काही साधायचे असणार आणि म्हणून चांगला वागला असावा असो.

भले तुमचा स्वभाव मितभाषी, अंतर्मुख, शांत असेना का, तुम्हाला जर सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह’ वा रिसेप्शनिस्ट वा एअर होस्टेस वा पब्लिकशी संबंधित असणारी नोकरी किंवा व्यवसाय करायचा असेल तर तुमच्या वागण्यात मोकळेपणा, चेहऱ्यावर प्रसन्नता आणि मदतशीलता यायलाच हवी. जर तशी वागणूक तुम्ही कर्मचाऱ्यांमध्ये (सेल्स, मार्केटिंग आणि अडव्हर्टायझिंग खात्यांमध्ये विशेषत:) रुजविली नाही तर तुमचा व्यवसाय विकसित होणार नाही, माल विकला जाणार नाही, कंपनीचे नाव होणार नाही, ब्रॅण्डला प्रतिष्ठा मिळणार नाही. जर स्पर्धेत टिकून राहायचे असेल तर या गोष्टी व्हायलाच हव्यात.

म्हणजेच तुमचा स्वभाव कसाही असो, तुम्हाला कसे वागावे’ याबद्दलचे प्रशिक्षण घ्यायलाच हवे.

संदर्भ: http://kumarketkar.blogspot.com/2009/04/blog-post_4865.html
leena_chaudhari20@yahoo.co.in

लीना सचिन चौधरी's picture

26 Sep 2010 - 5:10 pm | लीना सचिन चौधरी
कवितानागेश's picture

15 Sep 2010 - 9:12 am | कवितानागेश

नाही पुण्याची मोजणी,
नाही पापाची बोचणी,
जिणे गंगोघाचे पाणी.....
याचा सरळ अर्थ, कुणीही कसेहीका असेना, आपण स्वच्छ वागावे......

अवांतरः याचा अर्थ असाही निघतो...
पार पर्वतापासून समुद्रपर्यन्त कुठेही कसेही मस्त हिन्डावे,
कुणी इंटर्फीअर केल्यास त्याला सरळ बुडवावे, वाटले तर त्यासाठी चावर्‍या मगरी पाळाव्यात!
आपले काम होता होता, जाता जाता, सहज जमले तरच कुणाला मदत वगरै करावी!

विदेश's picture

15 Sep 2010 - 4:05 pm | विदेश

कोणतेही युग असू द्या. चांगल्याशी चांगले वागावे, पण वाईटाशीही चांगले वागणारे आहेत. त्यामुळे माणुसकी टिकून आहे.

गांधीवादी's picture

15 Sep 2010 - 5:05 pm | गांधीवादी

काही जन फक्त वाईटाशीच चांगले वागतात,
उदा. माननीय कसाब, अफजल यांना भारत सरकारकडून मिळणारी पंचतारांकित वागणूक.

विजुभाऊ's picture

15 Sep 2010 - 4:53 pm | विजुभाऊ

नाना आनि पुपे यांच्या वागण्यातला मध्य काढून तसे वागावे