तिरंगा मलई बोटी कबाब, मंडळी नावातच सार काही आल. एक एक बोटी जीभेवर वितळते. मला बर्यापैकी जमणार्या पाककृतीं पैकी एक.
आणि याची पावती मला तेव्हा मिळाली जेव्हा आईने मला याची कॄती एकदा फोन वर विचारली. मागे एकदा भारतभेटी वर असताना आई बाबांना करुन खिलवल होतं.
बाबांना भयंकर आवडल होतं आणि त्यांच्यासाठीच आईने फोन केला होता. स्वतःची कॉलर टैट केली, ज्या माऊलीने मला इतक काही शिकवल ती आज मला काही विचारत होती, उर अभिमानाने भरुन आला.
पण खर सांगु... तेव्हा वाटल तस्सच सगळ टाकुन घरी धाव घ्यावी नी आई बाबांची इतकीशी इच्छा पुर्ण करावी :(
तर मंडळी अशीही मलई बोटी कबाब आपल्या सेवेसी , उत्कृष्ट चवीसाठी या मलई कबाबची पुर्वतयारी आदल्या दिवशीच करुन ठेवावी.
पुढील (मार्ग)दर्शन सचित्र ......
लागणार साहित्य:
१/२ किलो बोनलेस चिकन.
ताज दही १.५ वाटी.
२ मोठे चमचे आल-लसणाची पेस्ट.
हिरवी चटणी (पुदिना + मिरची +कोथिंबीर )
२ मोठे चमचे डाळयाच पीठ.
(आयत्या वेळी डाळे मिळाले नाही तरी वरी नॉट L) . तव्यावर २ चमचे बेसन चांगल भाजुन घ्या. मी तेच केल B) )
चीज (मी २ स्लाइस वापरल्या).
२ लहान चमचे शहाजीर/शाहीजीर.
२ लहान चमचे लाल तिखट.
१ चमचा मसाला.
बारीक चिरलेली कोथिंबीर
चिमूटभर भगवा रंग (ऑपशनल)
मीठ.
१ चमचा बटर.
१) चिकन धुवुन त्याचे मध्यम आकाराचे तुकडे करा. टिप कागदावर थोडावेळ ठेवुन सार पाणी शोशुन घ्या.
मग त्याला आल लसणाची पेस्ट आणि मीठ लावुन १०-१५ मिनिट फ्रिज मध्ये ठेवा.
२) एका भांड्यात दही, शहाजीर, चीज, मीठ, डाळ्याच पिठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकुन फेटुन घ्या.
३) तिन बाउलमध्ये वरील मिश्रण विभागुन घ्या. एकात लाल तिखट + मसाला + रंग, दुसर्यात हिरवी चटणी टाकुन परत फेटुन घ्या. तिसर तसच ठेवा.
४) चिकनचे ३ भाग करुन वरील ३ बाउलमध्ये टाका. चांगल मिक्स करुन झाकुन फ्रिजमध्ये रात्र भर ठेवुन द्या. (फ्रिजर मध्ये नाही.)
५) दुसर्या दिवशी, बांबुच्या सळया घेउन प्रत्येक सळी मध्ये ५-६ तुकडे खोचा.
६) तव्यावर मंद आचे वर बटर टाकुन ह्या शीगा तळुन घ्या.
(जर ओव्हन मध्ये करणार आसाल तर बांबु ऐवजी स्टीलच्या सळया वापरा. वेळ आणि तापमान या बाबत जाणकार भगीनी मंडळाने मार्गदर्शन कारावे.)
७) तंदुर इफेक्टसाठी, प्रत्येक शीग मोठ्या आचेवर ३० से़कंद भाजुन काढावी.
विसु : लोकांच्या चेतना चाळवायचा मुळीच हेतु नाही.
(आज मार खातय बहुतेक)
प्रतिक्रिया
2 Oct 2009 - 9:24 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आवरा रे कोणीतरी या गणपाला !
आज गांधीजयंतीची सुटी गणपाच्या पाकृत्या पाहण्यात, वाचण्यात गेली.
-दिलीप बिरुटे
2 Oct 2009 - 9:31 pm | दिपाली पाटिल
अरे व्वा...एकदम सुपर फास्ट आहात की तुम्ही...धन्यवाद पाकृ लगेच टाकल्याबद्दल...मी या रविवारीच करते...
(अवांतरः ऑफीसमध्यल्या रिकाम्यावेळात टंकुन ठेवता की काय...घरी वेळ मिळत नसेल नाही...:) )
दिपाली :)
2 Oct 2009 - 9:31 pm | शाहरुख
भावा जरा दमानं !!
स्वयंपाकघराचा ताबा घेण्यासाठी तर नाही वहिनींना गावाला पाठवले ?? ;-)
2 Oct 2009 - 9:41 pm | टुकुल
ब्बास.....
आता सहन होत नाही...
गणपाचे हात बांधा रे कोणीतरी.. :-)
2 Oct 2009 - 9:42 pm | संदीप चित्रे
अरे खरंच आवरा रे !
एक रेसिपी वाचून / बघून तोंडाला सुटलेलं पाणी थांबता ना थांबतं तेवढ्यात हा बाबा नवीन त्रास पेश करतो !!!
2 Oct 2009 - 9:48 pm | धनंजय
तुमच्या घरी जेवायला यायला ऑफिसातून सुटी मिळत नाही :-)
2 Oct 2009 - 10:15 pm | वेताळ
आरे बाबा गणपा शेठ उद्या शनिवार माझा उपवास असतो रे....जरा दम तरी खाऊ दे आम्हाला.
वेताळ
2 Oct 2009 - 10:40 pm | गणपा
वेताळपण उपास करायला लागेले :?
2 Oct 2009 - 10:44 pm | प्राजु
=)) =)) =))
तुमच्या रेशिप्या बघून त्यानाही मनुक्षा सारखं वागायची हुक्की आली.. ;)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
2 Oct 2009 - 10:35 pm | प्राजु
याला कोणीतरी एका खोली मध्ये कोंडून ठेवा रे! स्वयंपाक घरात पाऊल टाकू देऊ नये याला..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
2 Oct 2009 - 10:52 pm | वेताळ
पुर्ण आठवडा नॉन्व्हेज खाऊन कस चालेल. पचायला नको का? =)) =))
वेताळ
2 Oct 2009 - 10:54 pm | चकली
छान रेसिपी. मस्त फोटो.
चकली
http://chakali.blogspot.com
2 Oct 2009 - 10:57 pm | टारझन
वा गणपा .. .लेका येऊन दे एक से बढकर एक !! फक्त एक अशोकचक्र मिसिंग आहे भावा !!
-(तिरंगा बोटीकबाब प्रेमी ) टार्या
2 Oct 2009 - 11:39 pm | विसोबा खेचर
खल्लास!
3 Oct 2009 - 2:59 am | टिउ
गणपा भाउ...काय चालवलंय काय तुम्ही? गणपा यांना आठवड्यात फक्त एक पाककृती टाकण्याची परवानगी शिक्षा देण्यात यावी अशी मागणी आदरणीय संपादक मंडळाला करण्यात येत आहे!
3 Oct 2009 - 2:48 am | मुक्ता
तुम्हाला साष्टांग नमस्कार असो...!!
उद्या खुप पाहुणे येणार आहेत ..काय मस्त कराव हा प्रश्न तुम्ही सोडवलात
तोही अग्दि सुग्रासपणे..
../मुक्ता
3 Oct 2009 - 4:51 am | सहज
कृपया आई-वडलांचा पत्ता कळवा, भारतभेटीत त्यांना एक दंडवत घालून येईन. कोणास ठावूक त्यांच्या आशीर्वादाने कदाचित दोन चार डीश अश्याच बनवता यायला लागतील.
3 Oct 2009 - 8:26 am | दशानन
असेच म्हणतो.
व मला तर द्याच दिवाळीला तिकडेच आहे मी मुंबई..पुणा.. कोल्हापुर एरियामध्ये पडिक.
*
गणपा .. मला एक सांग तुझा कधी स्वयंपाक घरात पोपट झाला आहे :? नाही माझा प्रत्येकवेळीच होतो म्हणून विचारत आहे =))
***
"हज़ारों ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले,
बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले । "
राज दरबार.....
3 Oct 2009 - 8:40 am | टारझन
चला चला ... पळा पळा ... राजे येतो ... मी बहुदा पुण्यात नसेल .. मी व्हाया इचल केरंजी .. लाडू पेढे खात खात ... शिमल्याला पळेल बहुदा :)
-( उचापती ) टारझन
3 Oct 2009 - 9:17 am | श्रीयुत संतोष जोशी
वाह !!!!! क्या बात है.
ज्या माऊलीने मला इतक काही शिकवल ती आज मला काही विचारत होती, उर अभिमानाने भरुन आला.
हे तर अजुन भारी.
हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.
3 Oct 2009 - 11:22 am | निखिलराव
गणपा शेट,
लईचं भारी..............
येव्हडे बोलुन मी माझे दोन शब्द संपवतो,
जय हिंद.........
जय महारास्ट्र........
3 Oct 2009 - 12:02 pm | नंदन
फोटो क्लासच आलेत, अगदी मन लावून केलेली पाककृती दिसते आहे.
-- घ्या, हे आणखीन वर :)
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
3 Oct 2009 - 12:56 pm | प्रभाकर पेठकर
सहज आणि सोपी तरीही जिव्हाकर्षक पाककृती.
सुचना: हिरव्या रंगासाठी थोडी पालक पेस्ट वापरावी.
आमची भांडणं समजुतीने मिटतात. मी माझी चूक कबूल करतो आणि बायको मला समजून घेते..... हे महत्त्वाचे.
3 Oct 2009 - 6:25 pm | jaypal
"तेव्हा वाटल तस्सच सगळ टाकुन घरी धाव घ्यावी नी आई बाबांची इतकीशी इच्छा पुर्ण करावी "
ने मजसि ने परत ...........सागरा प्राण तळमळ्ला.
मला वाटतं म्यारीनेशन करताना दह्या मधे कसुरी मेथि + धने पावडर + जिरे पावडर अजुन लज्जत वाढवतील.
वाढताना वरुन चाट मसाला टाकावा.
3 Oct 2009 - 10:13 pm | चित्रादेव
आता काहितरी गोड येवु द्या! :)
तुमच्या पाककलेला मोकळे मैदान मिळालेय बायकु माहेरी गेल्यापासून.. ;)
3 Oct 2009 - 10:15 pm | चित्रादेव
अहो चीज कुठले वापरायचे लिहिले नाहीत ते?
आई बाबांना खिलवून घालण्यात आंनद खुप असतो.. खरेय.
4 Oct 2009 - 1:14 am | बन्ड्या
लई भारी... काटा कीर्र ..... जाग्यावर पल्टीच कीओ...
बन्ड्या (कोल्हापुरी)
4 Oct 2009 - 2:13 am | गणपा
सर्व मायबाप रसिकांचे आभार.
4 Oct 2009 - 6:58 am | सुनील
निव्वळ अप्रतिम!!
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
4 Oct 2009 - 7:53 am | निमीत्त मात्र
वा! मानलं गणपा तुम्हाला!!
5 Oct 2009 - 12:58 pm | मसक्कली
झ्याक दिसतया बगा....कबाब.... :D
तोनडाला पानी सुटल ..... =P~
गणुशेठ तुमी तर ग्रेट आहात बुआ.... =D>
5 Oct 2009 - 6:01 pm | भडकमकर मास्तर
भन्नाट फोटो..
भारी पाकृ/..
ते तव्यावर इतक्या कमी तेलात कसे तळता बुवा ?...
_____________________________
हल्ली प्रातःसमयी ओ सजना बरखा बहार आयी ऐकतो... जय बालाजी
5 Oct 2009 - 6:04 pm | फ्रॅक्चर बंड्या
एक नंबर