मेघना माझी बहीण..

विसोबा खेचर's picture
विसोबा खेचर in जनातलं, मनातलं
4 Aug 2009 - 7:22 pm

परवा बर्‍याच दिवसांनी मेघना भेटली. खूप बरं वाटलं.

मेघना एरंडे. माझी एक मैत्रिण, माझी एक बहीण! नात्यातलीच.

मी मेघनाला तिच्या अगदी लहानपणापासून पाहतो आहे, ओळखतो आहे. अतिशय गुणी मुलगी. अभिनयाचा गुण अगदी उत्तम. उपजतच!

मेघनाला सत्यदेव दुबे आणि विद्या पटवर्धन यांच्याकडून अभिनयाचं बाळकडू मिळालं, त्यांच्याकडे शिकायला मिळालं. नाटकांसोबतच एकीकडे शाळा, महाविद्यालयीन शिक्षणही सुरू होतं. लहानपणापासून अनेक नाटकांतून तिनं कामं केली. पण मेघना खरी रमली ती डबींगच्या क्षेत्रात, संचलन-निवेदनाच्या क्षेत्रात..

परवा सहज म्हणून मेघनाशी गप्पा मारत बसलो होतो, तिच्या आजपर्यंतच्या कारकिर्दीविषयी जाणून घेत होतो आणि हळूहळू थक्कही होत होतो! आमची ही लहानशी मेघना आज इतकी कर्तृत्ववान असेल असं मला खरंच वाटलं नव्हतं!

"तुला पोगो, डिस्ने, कार्टून नेटवर्क इत्यादी वाहिन्यांवरची नॉडी, निन्जा हातोडी, डिझ्झी, डेक्स्टर्स लॅब मधली डिडी ही पात्रं माहित्येत का? त्या सर्वांकरता माझा आवाज वापरला आहे!"

"बे वॉच" कार्यक्रमात मी पॅमेला अ‍ॅन्डरसनला आवाज दिला आहे!"

"एका लीन नावाच्या चिनी अभिनेत्रीकरता माझा आवाज डब केला गेला आहे. बाल हनुमानमधील 'बाल हनुमानही मीच आहे."

"आणि तुला गंमत महित्ये का? पुणे आणि 'मुंबै-सेन्ट्रल' रेल्वे स्थानकात ध्वनिमुद्रीत उद्घोषणेतून (रेकॉर्डेड अनाउंन्समेन्ट) जी बया बोलते ना, तीही मीच!" :)

मेघना सांगत होती. आपण तर साला फक्त कौतुकाने तिच्याकडे पाहात होतो!

त्यानंतर मला मेघनाने तिथल्या तिथे निरनिराळ्या आवाजात बोलण्याचा एक छोटेखानी पर्फॉर्मन्सच करून दाखवला..

वाक्य होतं - "खूप दिवसांनी भेटलास, अगदी बरं वाटलं!"

हे वाक्य एक अगदी चिमुरडी, एक तिसरी-चौथीत असलेली, एक कॉलेजकुमारी, एक मध्यमवयीन स्त्री आणि एक आज्जीबाई या स्त्रिया कसं बोलतील तसं अगदी एकापाठोपाठ एक बोलून दाखवलं! प्रत्येक पात्राच्या वेळेस क्षणात केलेला आवाजातील बदल, हेल, शब्दोच्चार, प्रत्येक वयाचा लेहेजा तिनं इतका सुंदर सांभाळला की क्या केहेने! अगदी सह्ही पर्फॉर्मन्स होता तो..

मेघनासमोर प्रामुख्याने दोन क्षेत्रं होती -एक म्हणजे अभिनय किंवा दुसरं म्हणजे डबींग- निवेदन-संचलन (रंगमंचीय किंवा दूरचित्रवाणी सादरीकरण इत्यादी.) आणि मेघनाने निवडलं ते डबींगचं क्षेत्र आणि आजमितीला मेघना एक अतिशय व्यस्त डबीग आर्टीस्ट म्हणून कार्यरत आहे. विदेशी चित्रपटाच्या ज्या हिंदी डीव्हीडीज आणि सीडीज इथे बनवल्या जातात त्यातही मेघनाला डबिंग कलाकार म्हणून काम करण्याच्या खूप संधी आहेत/येत असतात.

मेघनाचा स्वभाव सगळ्यांशी मिळून मिसळून वागण्याचा आहे. आजमितीस मराठीतील जवळ जवळ सगळ्या कलाकारांशी सह-अभिनयातून म्हणा, एखाद्या रंगमंचीय कार्यक्रमातून म्हणा, मुलाखतीतून म्हणा, मेघनाचा उत्तम परिचय आहे, मैत्री आहे. अभिनय क्षेत्र तिनं सोडलं आहे असं नाही, परंतु त्या क्षेत्रात राहण्यासाठी जे काही कॉन्टॅक्ट्स ठेवावे लागतात, काही एक रॅपो ठेवावा लागतो ते ठेवणं मेघनाला तितकसं जमत नाही किंवा तिचा तो स्वभाव नाही असं आपण म्हणू.. तरीही आभाळमाया, चार दिवस सासूचे, माझं सोनूलं सोनूलं, किंवा सनईचौघडे, मी शिवाजीराजे भोसले.. यासारख्या मोजक्याच चित्रपटांतून तिनं भूमिका केल्या आहेत..परंतु वर म्हटल्याप्रमाणे मेघना खरी रमते ती डबिंगमध्ये किंवा रंगमंचीय/दूरचित्रवाणीवरील कार्यक्रमातच.

लोभ असावा, गाणे तुमचे आमचे, मी आणि आई - सॉलिड टीम!, 'मी मराठी' वाहिनीवरील मोगरा फुलला, पाकसिद्धी, पिकनिक रंगे तार्‍यासंगे, स्टार माझा वाहिनीवरील खमंग हा पाकसिद्धी कार्यक्रम, ई टीव्ही वरील टॅक्स फ्री हा चित्रपटांविषयी कार्यक्रम, 'साम' टीव्ही वरील आयुर्वेदाचार्य बालाजी तांब्यांसोबत 'आयुर्वेद' हा कार्यक्रम... यादी मोठीच आहे!

मेघनाने काही सरकारी कार्यक्रमांचंही सूत्रसंचालन केलं आहे/करते. ते करत असताना तिला राजकीय क्षेत्रातली मंडळी, त्यांची पदं-मानमरातब, प्रोटोकॉल, इत्यादी अनेक गोष्टींचं भान ठेवायला लागतं. अनेक देशी-विदेशी वित्तीय संस्थांच्या रंगमंचीय कार्यक्रमांचं (कॉर्पोरेट शोज) सूत्रसंचालन, त्यांचे विक्री मेळे, त्यात येणार्‍या संभावित ग्राहकांना योग्य त्या ठिकाणी मार्गदर्शीत करणे ही सर्व कामं मेघना लीलया करते. पण हे सगळं सहज साध्य होत नाही, नसतं! त्याकरता करावी लागते ती अविरत मेहनत आणि अभ्यास!

श्रीराम ट्रान्सपोर्ट कंपनी सारख्या नावाजलेल्या कंपनीकरता मेघनाने भारतातल्या १२ ते १३ राज्यांमधून एका वेळी अडीच ते तीन हजार लोकांकरता माहितीप्रद असे कॉर्पोरेट शोज केले आहेत!

सचिन ट्रॅव्हल्स या नावाजलेल्या यात्राकंपनी सोबतही मेघना निगडीत आहे. त्यांचा 'हॅलो प्रवासी' हा कार्यक्रम ती करते. एकदा त्या कंपनीच्या यात्रेकरूंसोबत मेघना दक्षिण अफ्रिकेच्या दौर्‍यावरही गेली होती. तिथं तिनं त्या लोकांकरता विनय आपटेंच्या दिग्दर्शनाखाली आयपीएलचा सामनाही कव्हर केला होता.

"दक्षिण अफ्रिकेतील मसाईमाराच्या जंगलात चार दिवस राहण्याचा अनुभव केवळ रोमांचकारी होता!"

मेघना सांगते!

किती हरहुन्नरी! किती क्षेत्रात तिचा वावर आहे! किती नानाविध विषयात तिला गती आहे, तिचा अभ्यास आहे, कष्ट आहेत, परिश्रम आहेत! खरंच अभिमान वाटतो..!

रुपारेल महाविद्यालयातून बी ए ही पदवी घेणार्‍या मेघनाचा लोकसाहित्याचा विशेष अभ्यास असून एम ए ला लोकसाहित्य हा विषय घेऊन मुंबै विद्यापिठातून ती एम ए ला पहिली आली आहे!

काय नी किती लिहू मेघनाबद्दल?

येत्या १४ ऑगस्टला सचिन ट्रॅव्हल्स तर्फे १३ ते १९ वयोगटाच्या २०० मुलांना घेऊन मेघना दौर्‍यावर जाणार आहे. ओझर आणि लेण्याद्रीचं दर्शन, त्यानंतर १४ ची रात्र लेण्याद्रीच्या पायथ्याशी मुक्काम. रात्री त्या मुलांकरता मेघना एक आवाजाशी निगडीत (व्हॉईसिंग) कार्यक्रम करणार आहे, काही जुने स्मृतिआड गेलेले खेळ खेळणार आहे! सगळं आयोजन मेघनाचं!

आणि..

१५ ऑगस्ट रोजी साक्षात थोरल्या आबासाहेबांच्या जन्मस्थानी, शिवनेरीवर २०० बालगोपाळांसहीत झेंडावंदन आणि 'भारत माता की जय..' चा जयघोष!

जियो मेघना, जियो...!

-- तात्या अभ्यंकर.

कलासंस्कृतीनाट्यसद्भावनाशुभेच्छामाहिती

प्रतिक्रिया

बिपिन कार्यकर्ते's picture

4 Aug 2009 - 7:43 pm | बिपिन कार्यकर्ते

तात्या, मेघना एरंडे आवडत्या कलाकारांपैकी आहे. खरंच गुणी आणि हरहुन्नरी आहे. चांगली ओळख करून दिलीस.

बिपिन कार्यकर्ते

ऋषिकेश's picture

4 Aug 2009 - 8:03 pm | ऋषिकेश

मेघना एरंडे आवडत्या कलाकारांपैकी आहे. खरंच गुणी आणि हरहुन्नरी आहे.

सहमत आहे..
तिच्या ओळखीबद्द्ल आभार

ऋषिकेश
------------------
संध्याकाळचे ८ वाजून ०३ मिनीटे झालेली आहेत. चला आता ऐकूया एक गीत "जय हनुमान...."

विशाल कुलकर्णी's picture

5 Aug 2009 - 11:02 am | विशाल कुलकर्णी

माझीपण आवडती कलाकार आहे मेघना. विशेषतः एक डबिंग आर्टिस्ट म्हणुन. वेगवेगळे आवाज काढण्याची तिची खुबी खरेच जबरदस्त आहे. विशेषतः लहान मुलांचे आणि कार्टुन्सचे आवाज ही तिची खासियतच आहे. आज रक्षाबंधनाच्या दिवशी या हरहुन्नरी कलावंताची ओळख करुन दिल्याबद्दल धन्यवाद. :-)

सस्नेह
विशाल
*************************************************************
मज पिसे लागलेले सुखांचे
गे हलकेच धुके ओसरते आहे...

अहो तात्या माहिती नव्हती इतकी मोठी कलाकार तुमची बहिण आहे.अहो ती विनोदी भुमिका अगदी लिलया करते.माझी आजच्या काळातली सर्वात आवडती मराठी कलाकार आहे ती. मस्तच...तुमच्या मुळे निदान तिला कधीतरी भेटता येईल. तिला माझ्याकडुन हार्दिक शुभेच्छा,

वेताळ

आनंदयात्री's picture

4 Aug 2009 - 7:54 pm | आनंदयात्री

>>१५ ऑगस्ट रोजी साक्षात थोरल्या आबासाहेबांच्या जन्मस्थानी, शिवनेरीवर २०० बालगोपाळांसहीत झेंडावंदन आणि 'भारत माता की जय..' चा जयघोष!

भारत माता की जय !!!

मेघना एरंडेंशी गुजगोष्टी करणारा एक कार्यक्रम (त्यांची मुलाखत) पाहिली होती, त्यांचा आवाज खुप सार्‍या कार्टुन्सला असतो हेही माहिती होते.

राखीपोर्णिमेच्या पुर्वसंध्येला छान लेख लिहिलात तात्या :)

अजय भागवत's picture

4 Aug 2009 - 7:56 pm | अजय भागवत

मेघनाची ओळख मागील वर्षी "हास्यसम्राट" मधुन झाली. त्यांनी गाठलेली उंची खूप आहे तसेच कलेतील एक वेगळा प्रकार "डबींग"- त्या हाताळतात हे कळले. त्यांना पुढील वाटचालीला शुभेच्छा.

छोटा डॉन's picture

4 Aug 2009 - 7:57 pm | छोटा डॉन

मेघना एरंडेला आत्तापर्यंत नुसतेच पडद्यावर पाहिले होते, आता तिच्याबद्दल वाचुन आनंद वाटला.
ती आपल्या नात्यातली आहे हे अजिबात माहित नव्हते, बरे वाटले आता हे कळुन ...

बाकी मेघनाबद्दल ऐकुन होतोच तिच्या डबिंग, विनोदी भुमिका वगैरेबद्दल.
तिला भविष्यातील कारकिर्दीसाठी शुभेच्छा ..!!!
लेख आवडला हे वे.सां. न.ल.

------
छोटा डॉन

मन's picture

4 Aug 2009 - 8:00 pm | मन

बहुदा त्या मला एकदा ई टी व्ही मराठीवर मुलाखतीत दिसलेल्या.
(तेव्हा नाव लक्षात नव्हतं राहिलं. पण त्यांचा परफॉर्मन्स पाहिला/ऐकला होता. )
बहुदा माझ्या आवडत्या "स्मॉल वंडर" ह्या बाल मालिकेतील व्रात्य "हॅरियेट" ह्या पात्राचा आवाज ह्यांचाच आहे, हे पाहुन कौतुक वाटलं होतं.
अप्रतिम हुकुमत आहे ह्यांची आवाजाच्या वापरावर.

बाकी, नेहमीप्रमाणेच ओघवतं व्यक्तीचित्रण आलय तात्या कडुन.

आपलाच,
मनोबा

निखिल देशपांडे's picture

4 Aug 2009 - 8:09 pm | निखिल देशपांडे

मेघना एरंडेंची एक मुलाखत पाहिली होती, त्यात त्यांचा अवाज बर्याच कार्टुन्स ला असतो हे कळालेच होते. तात्या पण तुम्ही त्यांची खुप छान ओळख करुन दिलीत

निखिल
================================

नंदन's picture

5 Aug 2009 - 1:48 am | नंदन

सहमत आहे. हरहुन्नरी कलाकाराची उत्तम ओळख.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

चकली's picture

4 Aug 2009 - 8:31 pm | चकली

मेघना ला शाळेच्या नाटकातून, टीव्हीवर , शिवाजी पार्क मध्ये अनेक वेळा पहिले. पण तिचे एवढे सगळे गुण महित नव्हते. खरच गुणी आहे. तिला खूप खूप शुभेच्छा !!
चकली
http://chakali.blogspot.com

आशिष सुर्वे's picture

4 Aug 2009 - 8:31 pm | आशिष सुर्वे

तात्या, रक्षाबंधनाच्या आदल्या दिवशी अगदी समर्पक लेख लिहीलात..
तुम्हाला, मेघना ताईंना आणि समस्त 'मिपा'करांना रक्षाबंधनाच्या मनपूर्वक शुभेच्छा!

--
रक्षाबंधनाला हापिसाला दांडी मारणारा.. :) .. कोकणी फणस

''आयुष्य ही देवाच्या हातची मिसळच जणू.. सुख-दु:खाची!''

mahalkshmi's picture

4 Aug 2009 - 8:33 pm | mahalkshmi

खुपच सुन्दर ओळख करुन दिलीत तुम्ही मेघनाची.अतीशय उत्तम कलाकार आहे ती.दिसते पण सुन्दर ,काम पण चान्गले करते,आणी डबीन्ग तर उत्तमच.
डबीन्गचे अतिशय अवघड काम ती इतक्या लहान वयात इतके सुरेख करते ,तिचे कवतुक करावे तितके कमीच .

प्रमोद देव's picture

4 Aug 2009 - 8:42 pm | प्रमोद देव

मेघनाला मी तिच्या बालपणापासूनच ओळखतोय..एक हरहुन्नरी कलाकार आणि खळाळत्या उत्साहाचं प्रतिक म्हणून. माझ्या आवडत्या कलाकारांपैकी एक ती ही आहे.
व्यक्तिमत्व ओळख छान करून दिलेय.

अवांतरः आकाशवाणीवर पूर्वी जयंत एरंडे होते...त्यांचे तिचे काही नाते आहे काय?

हाती नाही येणे,हाती नाही जाणे,हसत जगावे,हसत मरावे, हे तर माझे गाणे!

संदीप चित्रे's picture

4 Aug 2009 - 8:51 pm | संदीप चित्रे

पहिल्यांदा मेघनाने लक्ष वेधलं. त्या सिनेमातल्या हिरॉइनपेक्षा तिच्या मैत्रिणीला लीड रोल द्यायला हवं होतं असं तेव्हा अगदी मनापासून वाटलं होतं. जरा चौकशी केल्यावर समजलं होतं की ती मैत्रीणीचा रोल करणारी म्हणजे 'मेघना एरंडे'.

तिला भेटायला नक्की आवडेल तात्या कारण आवाज, अभिनय वगैरेबद्दल भरपूर गप्पा करता येतील. तिला आवर्जून कळव.

तिचा इथे दिलेला निळ्या साडीतला फोटो तर अप्रतिम :)

स्वाती२'s picture

4 Aug 2009 - 9:11 pm | स्वाती२

छान ओळख करून दिलीत तात्या. डबिंग सारख्या वेगळ्या कलाप्रांतात त्यांनी मिळवलेले यश खरच कौतुकास्पद आहे. मेघना एरंडेना अनेक शुभेच्छा.

विकास's picture

4 Aug 2009 - 9:29 pm | विकास

वा तात्या!

छानच ओळख करून दिलीत आणि ती पण योग्य वेळेस (रक्षाबंधन पूर्वसंध्या)! अशा विविध क्षेत्रातील व्यक्तींची माहीती येथे सर्वांनीच दिली तर मिपातर्फे विद्यार्थी दशेतील नव्या पिढीस नवीन दिशा देणारा एक आगळावेगळा मार्गदर्शक लाभेल.

प्राजु's picture

4 Aug 2009 - 9:43 pm | प्राजु

ऐकलं होतं या गुणी अभिनेत्रीबद्दल. बरीच चांगली माहिती या लेखातून मिळाली. तिच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

बेसनलाडू's picture

4 Aug 2009 - 10:46 pm | बेसनलाडू

या ताईंसोबत नाटुकल्यात काम करण्याची संधी मिळाली होती (मी) अकरावीला असताना; पुढे बारावीला गेल्यावर अभ्यासाने माझी वाट लावली ;) I was born intelligent but education ruined me या म्हणीचा प्रत्यय आला. सायन्सच्या विद्यार्थ्यांचे असेच हाल होतात म्हणा! ;)
(विज्ञानी)बेसनलाडू

टारझन's picture

4 Aug 2009 - 10:58 pm | टारझन

जबरदस्त !! मेघनाचा मी ही फॅन आहे .. बालकाचा आवाज तर केवल अप्रतिम काढते ती !@!

छान ओळख करून दिलीत तात्या !! :)

-(तात्याश्रीचा फॅन) टार्‍या भयंकर

ज्ञानेश...'s picture

4 Aug 2009 - 11:55 pm | ज्ञानेश...

आजपर्यंत मेघना एक अभिनेत्री म्हणूनच ठाऊक होती.
तिचे व्यक्तिमत्व इतके हरहुन्नरी आहे, हे आजच कळले.

धन्यवाद तात्या!

"Great Power Comes With Great Responsibilities"

लवंगी's picture

5 Aug 2009 - 12:20 am | लवंगी

गुणी बहिण लाभली आहे तात्या तुम्हाला.

एकलव्य's picture

5 Aug 2009 - 3:58 am | एकलव्य

मेघनाताईंचे अफलातून करिअर वाचून आनंद झाला... अगदी सर्व अंगांनी अतिशय सुंदर प्रगती आहे. अभिनंदन!

माझा करंटेपणा म्हणा हवे तर पण मला मेघना एरंडे या व्यक्तिविषयी काहीही माहिती नव्हती. तात्याचे माहितीबद्दल आभार.

छायाचित्र जोडल्याबद्दलही तात्याचे आभार. नेहमी पडद्यामागून गोड आवाज पुरविणार्‍या मेघनाताईंचे हसतमुख दर्शनही लक्षात राहण्यासारखे आहे.

- एकलव्य

सहज's picture

5 Aug 2009 - 6:07 am | सहज

>मेघनाताईंचे अफलातून करिअर वाचून आनंद झाला... अगदी सर्व अंगांनी अतिशय सुंदर प्रगती आहे. अभिनंदन!

माझा करंटेपणा म्हणा हवे तर पण मला मेघना एरंडे या व्यक्तिविषयी काहीही माहिती नव्हती. तात्याचे माहितीबद्दल आभार.

छायाचित्र जोडल्याबद्दलही तात्याचे आभार. नेहमी पडद्यामागून गोड आवाज पुरविणार्‍या मेघनाताईंचे हसतमुख दर्शनही लक्षात राहण्यासारखे आहे.

अगदी हेच म्हणतो.

पाषाणभेद's picture

5 Aug 2009 - 9:14 am | पाषाणभेद

छान ओळख करून दिलीत बरका तात्या.

- पाषाणभेद उर्फ दगडफोड्या

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

5 Aug 2009 - 11:10 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

फक्त चेहेरा आणि नावच माहित होतं या गुणवतीचं, आता अधिक माहितीही कळली. मेघनाचं अभिनंदन आणि पुढच्या यशासाठी शुभेच्छा.

अदिती

स्वाती दिनेश's picture

5 Aug 2009 - 11:53 am | स्वाती दिनेश

छान ओळख !
स्वाती

परिकथेतील राजकुमार's picture

5 Aug 2009 - 1:33 pm | परिकथेतील राजकुमार

थक्क झालो !

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
'अनीवे' शिवाजी विद्यापिठातुन मिपा आणि मिपाकर 'यांछ्यावर' पी एच डी करण्याच्या विचारात असलेला.
आमचे राज्य

तात्या,

सगळेच सुंदर, हरहुन्नरी, कर्तृत्ववान लोक तुमचे सक्खे मित्र, मैत्रीण, भाऊ, बहीण कसे काय असतात हो?

याबाबतीत मला तुमचा फार हेवा वाटतो.

या सद्गुणसुंदरीचा तुम्ही परिचयही अतिशय सुरेख करून दिलेला आहेत.

कायमच आम्ही तिला सचिनच्या 'हॅलो प्रवासी' मधे पाहत आलेलो आहोत. तिचे इतर अनेक गुणही तुम्ही खुबीने समोर आणलेत.

मन:पूर्वक धन्यवाद!

दत्ता काळे's picture

5 Aug 2009 - 6:43 pm | दत्ता काळे

आजपर्यंत मेघना एक अभिनेत्री म्हणूनच ठाऊक होती.
तिचे व्यक्तिमत्व इतके हरहुन्नरी आहे, हे आजच कळले.

ज्ञानेश म्हणतात त्याचप्रमाणेच.

मीनल's picture

5 Aug 2009 - 11:34 pm | मीनल

त्या मला दादरला अनेका दिसतात. त्यांची साधी रहाणी, सामान्यांसारखा बस मधून प्रवास,रस्त्यावरच्या वस्तूंची खरेदी पाहून आश्चर्य वाटते.पण मनात त्यांची असामान्यता ठाऊक असते.
त्यांच्या विवाहानंतर त्या बहुदा अमेरिकेत आल्या होत्या. त्यांच्या वरचा एक लेख लोकसत्तेत वाचल्याच आठवतय.
त्यांच्या आई ही अभिनय क्षेत्रातल्या आहेत. टीव्हीवर पाहिले आहे. पण फारशी माहिती नाही.
मीनल.

मस्त कलंदर's picture

5 Aug 2009 - 11:42 pm | मस्त कलंदर

आजपर्यंत मेघना एक अभिनेत्री म्हणूनच ठाऊक होती.
तिचे व्यक्तिमत्व इतके हरहुन्नरी आहे, हे आजच कळले.

ती कार्टून्चं डबिंग करते हे माहित नव्हतं पण एका विनोदी मराठी कार्यक्रमात तिला पोपायच्या ऑलिव्ह्ची भूमिका करताना पाह्यलं होतं.. वेशभूषा नि आवाज.. यांमुळे ऑलिव्ह जर मराठीत आली तर याहून वेगळी असूच शकणार नाही असं वाटलं होतं....

मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

वर्षा's picture

6 Aug 2009 - 1:54 am | वर्षा

मेघना एक छान हसरी अभिनेत्री म्हणून लक्षात आहे. पण इतके गुण आहेत तिच्यात हे आजच कळले.

विसोबा खेचर's picture

6 Aug 2009 - 11:17 am | विसोबा खेचर

सर्व प्रतिसादींचे अनेक आभार...

स्वत: मेघनानेही हा लेख वाचला. तिनेही प्रतिसाद देणार्‍या सर्व वाचकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे. सर्वांनी केलेल्या कौतुकामुळे 'आयुष्यात अजूनही काही चांगलं काम करण्याचा हुरूप वाढला आहे, असाच लोभ असू द्यावा' अशी तिची सर्व वाचकांना विनंती आहे..

मुंबै-पुण्याच्या एखाद्या मिपा कट्ट्यावर तिलाही यायला अगदी नक्की आवडेल असं तिनं कळवलं आहे..

हा लेख चांगला झाला आहे असं तिचं म्हणणं असून मराठीतील इतरही काही कलाकरांवर मी असेच लेख लिहावे असं तिचं म्हणणं आहे आणि त्या करता ती मला सर्वतोपरी मदत करणार आहे...

सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद...

आपले,
(बहीण-भाऊ)
मेघना एरंडे
तात्या अभ्यंकर.

विसुनाना's picture

6 Aug 2009 - 12:37 pm | विसुनाना

मेघना एरंडे या गुणी अभिनेत्रीशी जवळची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद, तात्या!

धनंजय's picture

7 Aug 2009 - 3:53 am | धनंजय

ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद.

आशिष सुर्वे's picture

6 Aug 2009 - 12:55 pm | आशिष सुर्वे

तात्या, आपले आणि मेघना ताईंचे आभार..

मराठीतील इतर कलाकरांवर लिहीणे होणार असेल तर माझी एक नम्र विनंती आहे.. 'लक्ष्मिकांत बेर्डँ'वर लेख लिहीलात तर आपला आजन्म ॠणी राहीन!

-
(लक्ष्याच्या 'अ‍ॅडिशन्स'चा चाहता)
कोकणी फणस

''आयुष्य ही देवाच्या हातची मिसळच जणू.. सुख-दु:खाची!''

विदेश's picture

6 Aug 2009 - 2:30 pm | विदेश

हा लेख चांगला झाला आहे असं तिचं म्हणणं असून मराठीतील इतरही काही कलाकरांवर मी असेच लेख लिहावे असं तिचं म्हणणं आहे
पूर्णपणे स ह म त .

मॅन्ड्रेक's picture

6 Aug 2009 - 3:36 pm | मॅन्ड्रेक

आजपर्यंत मेघना एक अभिनेत्री म्हणूनच ठाऊक होती.
तिचे व्यक्तिमत्व इतके हरहुन्नरी आहे, हे आजच कळले.

सहमत.
at and post : janadu.

आला नव्हता. बरं झालं मागची पानं चाळली ते!
मेघना एरंडे हे नाव ऐकून होतो पण बा़की सर्वच माहिती नवीन आहे.
अतिशय गुणी कलाकाराचा इतका उत्कट परिचय करुन दिल्याबद्दल अनेक धन्यवाद! आता ड्ब केलेले आवाज अत्यंत काळजीपूर्वक ऐकले जातील! :)
(निळ्या साडीतला फोटो तर अतिशय सुरेख आलाय!)

चतुरंग

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

26 Aug 2009 - 11:16 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>अतिशय गुणी कलाकाराचा इतका उत्कट परिचय करुन दिल्याबद्दल अनेक धन्यवाद!

असेच म्हणतो !

>>(निळ्या साडीतला फोटो तर अतिशय सुरेख आलाय!)
सहमत आहे, खूप सुंदर दिसत आहे. पुढल्या वेळी भेटाल तेव्हा चतुरंगच्या आणि माझ्या भावना नक्की पोहचवा...! (पुढे ज्याचं त्याचं नशिब) :)

-दिलीप बिरुटे

विजुभाऊ's picture

1 Sep 2009 - 5:15 pm | विजुभाऊ

तात्या गेल्या रैवारी मेघना ताईंचा कार्यक्रम पार्ल्यात पाहिला.
त्या सूत्रसंचलन करीत होत्या. पन त्याना थोडा आग्रह केल्यावर त्यानी डबिंग्ची झलक दाखवली.
\कार्टून्स्चे आवाज त्यानी दाखवलेच पण त्याशिवाय अनेक हिन्दी मराठी अभीनेत्र्यांचे आवाजेसही त्याने हुबेहूब काढून दाखवले
पास हा शब्द जर इंग्रजी असेल तर नापास हा शब्द कोणत्या भाषेतला आहे

क्रान्ति's picture

1 Sep 2009 - 9:45 pm | क्रान्ति

मेघनाला नेहमीच पाहिलं होतं मराठी वाहिन्यांच्या कार्यक्रमात. तिचे कार्यक्रम नेहमीच आवडतात. आवाजावरची तिची हुकुमत कमालीची आहे. तिचा इतका छान परिचय करून दिल्याबद्दल धन्यवाद.
तोरण करतानाचा फोटो खूपच सुरेख आलाय. :)

क्रान्ति
दिव्यत्वाची जेथ प्रचीती | तेथे कर माझे जुळती
अग्निसखा
रूह की शायरी