माझ्या मुलीला इकडे आल्यापासुन ह्या कुकीज खुप आवडतात्,म्हणुन मीच करायला शिकले . तिच्यासाठी वेगवेगळ्या आकारात ह्या बनवल्या आहेत.
समस्त खवयांना आणि विशेष करुन लहान मुलांच्या आयांना (आईचे अनेक वचन) आवडतात का बघा..:)
माझ्या मुलीला आणि मैत्रिणींना खुप आवडल्या. मी ही एका मैत्रिणी कडुनच शिकले आहे.

साहीत्यः
ब्रेड फ्लोअर्(मैदा) २ १/४ कप
ब्राऊन साखर १ कप
पिठी साखर (पांढरी) ३/४
मिठ चविनुसार
बेकींग सोडा १ चमचा
दुध ५-६ चमचे (अंदाजे)
बटर (लोणी) २२५ ग्रॅम
चॉकलेट चिप्स आवडीनुसार हवे तेवढे.
कृती:
ब्रेड फ्लोअर्, मिठ, बेकींग सोडा एकत्र चाळुन घेणे (चाळण नसेल तर मिक्सर मधुन फिरवणे)
त्यात लोणी, ब्राऊन साखर, पांढरी साखर आणी लोणी घालुन खुप फेटणे.
तयार मिश्रण श्रीखंडा एवढे घट्ट होइल इतपत दुध घालुन सरबरीत (फेटणे) करुन घेणे.
त्यात चॉकलेट चिप्स हव्या तेवढ्या घालुन पुन्हा निट एकत्र करणे.
ओव्हन ट्रे मध्ये हव्या त्या आकारात तयार मिश्रण घालणे .
ओव्हन ३७५ वर प्रीहीट करुन १०-१२ मिनिटे बेक करणे.
बेक करताना ओव्हन मध्ये वरुन दुसर्या रॅक मध्ये ठेउन बेक करावे.
जर बिस्कीटे खुप कुरकुरीत हवी असतील तर आणखी २-४ मिनिटे ठेवावीत.
ही बिस्कीटे ट्रे मधे खुप अंतर ठेउन घालावीत ती खुप पसरतात.(ते फोटोत दिसत असेलच ;))
बेक झाल्यावर साधारण तासाभरानी ही बिस्कीटे छान खुसखुशीत होतात.
प्रतिक्रिया
12 Jun 2009 - 3:36 pm | अश्विनि३३७९
मी नक्कि करुन बघीन ...
अश्विनि ....
12 Jun 2009 - 6:51 pm | वेताळ
आमच्या कडे गोल साधा ओव्हन आहे. #:S
त्याला कप्पे नाहीत. काय करावे करताना? काय काळजी घ्यावी?
खविस,हडळ,मुंजा,गोस्ट,डेव्हिल,वेताळ
12 Jun 2009 - 8:01 pm | समिधा
गोल ओव्हन मध्ये करताना बिस्कीटांचा रंग बदलला की बाहेर काढावीत. त्याला कदाचीत १० मिनीटे बास होतील.
समिधा
(चांगल्या मैत्री सारखे सुंदर दुसरे काही नाही.)
12 Jun 2009 - 11:06 pm | चकली
अशाप्रकारे ओटच्या पण छान होतात. अंडे चालत असेल तर या अजून चांगल्या लागतात..अगदी दुकानातल्या असतात तशा.
चकली
http://chakali.blogspot.com
12 Jun 2009 - 11:28 pm | प्राजु
छान आहे रेसिपी. :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
13 Jun 2009 - 12:41 am | दिपाली पाटिल
कुकीज छान दिसताहेत. मला हवीच होती पाकृ.
दिपाली :)
15 Jun 2009 - 9:02 am | विसोबा खेचर
समिधावैनी, जियो..! :)
15 Jun 2009 - 9:05 am | मिसळभोक्ता
कुकीज अंमळ गोल आणि भोकविरहीत झाल्या असत्या तर अधिक चांगल्या दिसल्या असत्या.
-- मिसळभोक्ता
(अधिक माहितीसाठी प्रभूमास्तरांना भेटा.)
15 Jun 2009 - 11:05 am | समिधा
पण मी वरती लिहिल्या प्रमाणे माझ्या मुली साठी वेगवेगळ्या आकारात करुन बघितल्या आहेत. :)
समिधा
(चांगल्या मैत्री सारखे सुंदर दुसरे काही नाही.)