सध्या काय पाहतेय? ---२०२६

Bhakti's picture
Bhakti in काथ्याकूट
2 Jan 2026 - 12:51 pm
गाभा: 

1
या रे या
stranger things च्या फ्यान लोकांनो
इकडे या
भावनांचे पाट वाहू द्या
stranger things ला भरलेल्या मनाने
गुड बाय करू या
शेवटचा भाग right side up अक्षरश: दोन तास मनःपटलावर अधिराज्य करतो.वेकना मरणार हे माहितीच होत . पण एल पण गायब होणार होत हे अनपेक्षित होत . सुपरनॅचरल मालिका असं गृहीत चालताना यात सायन्सचा वर्म होल हा कन्सेप्ट हि सिरीज सगळ्यांसाठी बघणीय होते.कारण ते भूत खेत जाम बोर करतात.
2
कोणाचं कौतुक करावं ???
सायकोकायनेटिक क्षमता असलेली इलेव्हन ,मैत्रीने घट्ट विणलेले माइक,लुकास, डस्टिन आणि विल,मॅक्स, धडाकेबाज नॅन्सीचा,स्टीव्ह ,हूपर,जोनाथन,रॉबिन जॉयसी,गोड गोडुली हॉली,डफर, बडबडी एरिका की हेन्री उर्फ वन उर्फ वेकना उर्फ खेकडा भजी(भारतीयांनी दिलेले नाव ) :) की पिसाळलेल्या कुत्र्यासारखे मागे लागणारे डेमोगोर्गनच यांचं करायचं.

२०१६ पासून १० वर्षात ५ सीझन आणि ४२ भागांत ही सगळी पात्र आपल्या बरोबरच वाढत होती.हृदयस्पर्शी मैत्रीचा अर्थ पुन्हा पुन्हा पटवून देत होती. ८० च्या दशकातील जुन्या आठवणी पॉप गाण्याने जाग्या होत होत्या https://en.wikipedia.org/wiki/Stranger_Things:_Music_from_the_Netflix_Or... ."Running Up That Hill (A Deal with God)" by Kate Bush हे गाणं आता माझी मोबाइल रिंगटोन आहे .

यावर इन्स्टावर थेअरी ,कॉमेडी,अशा रीलचा महापूर आला आहे .त्यात मॅक्स समोर गेट आलं तरी वेड्या सारख्या का बडबडत आहे हा प्रश्न असो :),वेकना भाऊने केलेला वेट लॉस,एल सारखी पॉवर आल्याचा विश्वास असो :)
3
4
अहो शेवट ,तुम्ही सस्पेंस ,थ्रिलरवर गोष्ट संपवता तेव्हा हे क्षणिक ठरत .मानवी भावनांना जेव्हा स्पर्श करता तेव्हा ती गोष्ट अमर होते. माईक सगळ्यांना समजून सांगतोय आपलं बालपण आता दूर चाललं आहे ,संपलं आहे .हा खेळ संपला आयुष्याचे नवीन अध्याय आता खेळणार आहोत.... हायला खूप दिवसांनी एखाद्या सीरिजने आनंद दिला ,हसवलं,उत्सुकता वाढवली ,रडवले.
हॅट्स ऑफ डफर ब्रदर !!!!!

प्रतिक्रिया

सध्या या सिजनचे २ भाग पाहुन झाले आहेत. तुमच्या मागच्या भागात कोणीतरी White Tiger सुचवला होता तो देखील पाहिला.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Zat Pat Pata Pat : Danny Pandit

व्हाईट टायगर.. नेटफ्लिक्सवर वेगळाच White Tiger सिनेमा पाहिला स्लमडॉग मिलेनियर ची आठवण झाली, झोपडपट्टी ते बिग बॉस पण यात गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे.

तुमच्या मागच्या धाग्यात असंका या आयडीने रशियन "टी - ३४" वि. जर्मन "टायगर" असा सामना असे लिहल्याने माझ्या लक्षात राहीले.
याचे दुसरे कारण म्हणजे काही काळा पूर्वी M1 Abrams Tank चे फायरिंग माझ्या पाहण्यात आले होते. त्या टँकची एकच फायरिंग पाहुन मी चाट पडलो होतो. केवळ ५ सेकंदाचा शॉट खतरनाक आहे!
त्यामुळे तो टॅंकपट पाहण्याची इच्छा मला रोखता आली नाही! :)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- शीशा हो या दिल हो आख़िर टूट जाता है... : आशा [ 1980 ]

अमरेंद्र बाहुबली's picture

3 Jan 2026 - 1:30 pm | अमरेंद्र बाहुबली

ही मालिका पाहायला सुरुवात करणार, अगदी कोऱ्या मनाने, ब्रेकिंग बैड, बॅटर कॉल सॉल संपली, सध्या फ्रिडम एट मिडनाईट पाहतोय, त्या नंतर स्ट्रेंजर थिंग्स!

कांदा लिंबू's picture

3 Jan 2026 - 10:18 pm | कांदा लिंबू

stranger things पहिला खंड एकाच रात्री सलग पाहून घेतला. ‌ खूपच आवडला. दुसऱ्या खंडात फार काही विशेष वाटलं नाही, दोन-तीन भाग बघून नंतर सोडून दिला. ‌ आमची अपत्ये मन लावून सगळे खंड सगळे भाग बघत असतात. सध्या त्यांचा पाचवा खंड सुरू आहे. ‌ ते पाहत असतात तेव्हा मीही अधून मधून पाहत असतो. ‌

---

एवढ्या प्रचंड मोठमोठ्या मालिका पाहत बसण्यात मला फार काही रस नाही. ‌ दीड दोन तासांपेक्षा अधिक मोठाले सिनेमेही फारसे पहा वाटत नाहीत. (पण जमताड़ाचे सगळे खंड सगळे भाग दिवसरात्र सलग पाहिले होते. ‌ कालापाणी मालिका संपूर्ण सलग पहिली होती. ‌ क्रिमिनल जस्टिस चे एक एक खंड सलग पाहिले होते. ‌ धुरंदर दोन वेळा थेटरात पाहून झाला.)

कांदा लिंबू's picture

3 Jan 2026 - 10:24 pm | कांदा लिंबू

@Bhakti, एक अनाहूत सल्ला - कालापानी आधी पाहिली नसेल तर नक्की पहा आणि त्यातला "अन्नसाखळीत आपण शक्य तेवढ्या वर राहायला हवं" हा विचार, आपल्या लेकीला -- तिला कळेल तेव्हा --समजावून सांगा.

https://www.netflix.com/title/81314368?preventIntent=true

जुइ's picture

4 Jan 2026 - 3:13 am | जुइ

Stranger things मालिक अजून तरी पाहिली नाहीय.

मध्यंतरी classic गट्टात मोडणारा Sound of music पाहिला. हा सिनेमा सत्यकथेवर आधारीत आहे. अतिशय नयनरम्य सिनेमा आणि कथानकही ओघवते आहे. बर्‍याच काळापासून पाहायचा होता, पण राहून जात होता. गेल्यावर्षी या सिनेमाला ६० वर्ष पूर्ण झाली म्हणून पुन्हा प्रकाशित करण्यात आला होता.

हणमंतअण्णा शंकराप्पा रावळगुंडवाडीकर's picture

4 Jan 2026 - 5:57 am | हणमंतअण्णा शंकर...

पहिला भाग आला होता तेव्हा मी तो एका रात्रीत पूर्ण केला होता.
दुसरा, तिसरा सगळ्या भागांचे असेच.

शेवटच्या भागाचेही तसेच.

हा शेवटचा एपिसोड, ख्रिसमस नंतरचे एपिसोड, रात्री बारा ते सकाळी सहा याच वेळात पाहिले.

या सिरीजने खूप आनंद दिला. शेवटचा एपिसोड देखिल बेहद्द आवडला.

सगळे वाचले हे आवडले.

डफर बंधूंना स्क्रीनची भाषा परफेक्ट कळते. शेवटी ज्या पूर्वसुरींवर ते पोसलेले आहेत त्यांना ते कोळून प्यायले आहेत हे जाणवत राहते.

ब्राव्हो ब्राव्हो!

शेवटचा एपिसोड देखिल बेहद्द आवडला.
शेवटच्या एपिसोडचा शेवट रडवून गेला!काळ किती पळत राहतो,आपणही त्याच्याबरोबर पळले पाहिजे.

Bhakti's picture

4 Jan 2026 - 8:02 pm | Bhakti

१
१९९०-९१ ला प्रथम सादर झालेले प्रशांत दळवी लिखित चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित "चारचौघी" नाटक २०२२ lरोहिणी हट्टंगडी, कादंबरी कदम, पर्ण पेठे, निनाद लिमये, श्रेयस राजे, पार्थ केतकर आणि मुक्ता बर्वे या कलाकारांच्या साथीने २०२२ ला नाटक ३१ वर्षांनी पुनरुज्जीवित केले होते .मागील वर्षी या नाटकाचे अखेरचे प्रयोग पार पडले.प्रत्यक्ष नाटक पाहायचा योग्य आला नाही आज झी फाईव्ह OTT वर हे नाटक पाहिले.रोहिणी हट्टंगडी याचे संवाद नाही गर्जनाचं.. पितृसत्ताक संस्कृतीला, बंडखोर तरीही पुरुष द्वेष नाही, निर्णय घेतलास तर तो निभावणारी बाई हो ... पूर्ण नाटकभर या गर्जना ठसा पडतात, कानात गुंजत राहतात .रंगमंचावर नाटक पाहू शकले नाही याचे जरा वाईट वाटले.

स्त्रीने पितृसत्ताक पद्धतीने आखलेल्या कुंपणातच वागले पाहिजे. ती जरा जरी याहून वेगळी वागली तर ते अनैतिक वा चुकीचे समजले जाते. त्यांनी "चारचौघी" सारखेच वागले पाहिजे .अशावेळी नाटकातील चौघीचे निर्णय या समाजाला कसे पचतील? नाटकातील संवादानुसार ५० वर्षांनंतर कदाचित लागू होतील असे निर्णय आज घेतलं तर उठणाऱ्या वादळाला सामोरं आज जावं लागणारच.

आई सावित्रीबाई विवाहित पुरुषाशी लग्न न करता तीन मुलींना जन्म देत एकटी सांभाळते...(आजही अशी उदाहरणे फारच दुर्मिळ आहे)

तिच्या तिन्ही मुलींच्या आयुष्यात पितृसत्ताक चाकोरीमुळे वादळ आले आहे.

नाटकात अनेक प्रश्नाना वाचा फोडली आहे ...​पुरुषांच्या अनैतिक संबंध समाज सहज पचवतो ?? मठ्ठ पुरुषाला समाज प्रश्न न विचारता त्याच्या बायकोला लढायला लावतो ??(लग्न टिकवायला द्रौपदी प्रमाणे किंवा मातृसत्ताक पद्धतीनुसार बहुपतित्व आज शक्य आहे ??

हे प्रश्न विद्या वैजयंती विंनी आआपापल्या आयुष्यातील घटनांद्वारे सादर करतात आपल्याला विचार करायला भाग पाडतात.

अशी काळाच्या पुढची नाटके आली तर यामुळे कुटुंबव्यवस्था धोक्यात येईल अशीही नकारात्मक घंटा समाजात वाजू लागतात.पण नाटकातील वैजयंती कुटुंब वाचवते पण स्वतःचे सत्व हरवते केवळ तडजोडीने ती आता जगणार हे एक आजच्या अनेक स्त्रियांचे प्रातिनैधिक उदाहरणही नाटकात आहे हे विसरता काम नये .

विद्या जेव्हा घटस्फोटाची केस लढताना ६- ६ महिने आई वडील दोघांनीही मुल का सांभाळू नये ? एकट्या बाईचीच जबाबदारी आहे का ? हा प्रश्न मांडते तेव्हा तिला एक उलट्या काळजाची आई ठरवलं जाते वडील मात्र इथे नाम निराळेच राहतात .खरंच बाईला तिचे आईपण निभवावे लागते पुरूषाला बापपणाची सक्ती का नाही...किती हास्ययास्पद आहे हे ..

विनीचा मी एकाचवेळी दोन्ही पुरुष का निवडू शकत नाही ? हा प्रश्न तर कुठूनच मेंदूत शिरत नाही यावरचे उत्तर तर लांबच !!

मग अशा प्रश्नासह बाईने करायचे काय ???

तर तिचे निर्णय तिला योग्य वाटतील ते ठामपणे घ्यायचे काळाच्या परिणामाच्या भीतीशिवाय ..हे नाटकाचे मर्म वाटते .

-भक्ती

कॉमी's picture

4 Jan 2026 - 11:18 pm | कॉमी

छान नाटक आहे हे.
भरत जाधव आणि प्रशांत दामले ह्यांची अत्यंत टुकार नाटके पाहून आधीच क्वचित नाटक पाहणारा मी, मराठी नाटकांवर चुकीचे मत डोक्यात घेऊन बसलेलो. हे नाटक पाहून मत बदलले.

ह्यात विनीचा मुद्दा मला जरा "अतिच" वाटला पण तुम्ही म्हणता तसं आपापला निर्णय घेऊन ठामपणे वाटचाल करणे हा संदेश त्यातून मिळतो.

Bhakti's picture

6 Jan 2026 - 10:35 am | Bhakti

Stranger Things मधला स्टीव्हदादा हॅरिंग्टन Joe Keery चं End of Beginning हे गाणं Spotity US च्या लोकप्रिय गाण्यांच्या यादीत सुप्रसिद्ध गायिका टेलरताई स्विफ्ट ह्यांच्या गाण्याला मागे सारून पहिल्या क्रमांकावर जाऊन बसलं आहे.
दादा सॉलीड गायकही आहे:)

https://youtu.be/Ec08db2hP10?si=pm1zy1fecE3TnR-6

कालपासून स्ट्रेंजर थिंगचा अजून एक एपिसोड येणार या फ्यॅन थेअरीला उधाण आल होत.हो अजून एक भाग येणार तो बिहाइंड द सीन डॉक्युमेंटरी येणार आहे.
one last time. watch the never-before-seen behind-the-scenes documentary on the making of Stranger Things 5. january 12th.

गाणं आवडलं! इथे शेअर केल्या बद्धल धन्यवाद!

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Peddi Reddy... : Bullet Bandi Laxman | Madeen Sk | Naga Durga | Leading Boys

सिनेमाचा परिचय खुप मोठा झाल्याने स्वतन्त्र धागा खाली दिला आहे.
http://misalpav.com/node/53421

अमरेंद्र बाहुबली's picture

8 Jan 2026 - 6:36 pm | अमरेंद्र बाहुबली

मध्यरात्रीचे स्वातंत्र्य (फ्रीडम ऐट मिडनाईट) ही जाळमालिका पाहून संपवली , खरं तर पाश्चात्यांच्या दृष्टीने पाहिलेला आपला इतिहास आवडला! शेवटी जिन्ना आणी गांधी ह्यांच्यात कशी कटुता निर्माण होते वगैरे छान दाखवलं आहे. मस्ट वॉच आहे.
त्यानंतर, जॅकलचा दिवस (the day of jackal) हा सारख्याच नावाच्या पुस्तकावर आधारित थरारपट पाहतोय, अतिशय गुंतवून ठेवणारे कथानक, तीन भाग पाहून झालेत.

जुइ's picture

8 Jan 2026 - 9:18 pm | जुइ

The Day of the Jackal ही Frederick Forsyth यांची अतिशय गाजलेली कादंबरी आहे, आता नाव निघालेच आहे तर वाचावी म्हणते!

अमरेंद्र बाहुबली's picture

11 Jan 2026 - 5:13 am | अमरेंद्र बाहुबली

अरे वा, पुस्तक नी १९७३ ला आलेला नि गाजलेला सिनेमा देखिल आहे.

अमरेंद्र बाहुबली's picture

11 Jan 2026 - 5:12 am | अमरेंद्र बाहुबली

जॅकलचा दिवस अर्थात द डे ऑफ द जॅकल हे जाळमालिका आज अखेर संपली, अतिशय थरारक म्हणावे असे कथानक होते. खूप आवडली. मी स्वतः एक उत्कृष्ट स्नायपर (पब जी मधला :) ) असल्याने फार आवडली! काय ती प्लॅनिंग, काय ते स्नायपर चे शॉट, मुख्य कथानायकाने अतिशय उत्कृष्ट काम केले आहे.

कॉमी's picture

11 Jan 2026 - 2:01 pm | कॉमी

पाताल लोक पर्व पहिले.

ऍमेझॉन प्राईम.

आवडले. बऱ्यापैकी रिॲलिस्टिक कथा वाटली. सर्व कलाकारांनी उत्तम काम केले आहे.

Bhakti's picture

11 Jan 2026 - 7:00 pm | Bhakti

१
शेरलॉक होम्सचे तर करोडो चाहते आहेत.पण काय होईल जर त्याला एक बहिणही असेल तीही त्याच्यासारखीच तरबेज आणि धाडसी!
एनोला होम्स ही एक काल्पनिक कॅरेक्टर आहे, जी अमेरिकन लेखिका नॅन्सी स्प्रिंगर यांनी २००६ मध्ये सुरू केलेल्या "The Enola Holmes Mysteries" या पुस्तक मालिकेत निर्माण केली. या मालिकेत एनोला ही शेरलॉक आणि मायक्रॉफ्टची खूप लहान बहिण (२० वर्षांनी धाकटी) दाखवली आहे.
नेटफ्लिक्सवर खूप लोकप्रिय झालेल्या Enola Holmes १ आणि २ या चित्रपटांमध्ये (मिली बॉबी ब्राउन मुख्य भूमिकेत आहे.
एनोला हुशार, निर्भय आणि लढवय्या आहे! अ‍ॅक्शन आणि हृदयस्पर्शी असे हे चित्रपट आहेत.
स्ट्रेंजर थिंगमुळे मिली ब्राऊन आवडायला लागली आहे.तिचा डॅमसेल हाही फॅन्टसी चित्रपट पाहिला.

अमरेंद्र बाहुबली's picture

11 Jan 2026 - 7:11 pm | अमरेंद्र बाहुबली

श्रीगुरूजी सध्या लपून मिपा पाहत आहेत . :)

कांदा लिंबू's picture

11 Jan 2026 - 8:46 pm | कांदा लिंबू

कुणाला कशाचं, बोडकीला केसाचं!

Bhakti's picture

17 Jan 2026 - 4:05 pm | Bhakti

यंग शेल्डन -Young Sheldon ,माझी कन्याच हा मालिकेची माझ्यासाठी शोधकर्ती आहे .टी ही मालिका पाहत असताना ,तिच्यासोबत याचे अर्ध्या तासाचे दोनच भाग पाहिले आणि या शेल्डन प्रेमातच पडले.आता आम्ही दोघी याचे रोज एकत्र भाग पाहतो.... तेव्हा हास्यांचा एक कल्लोळच उठतो.
Young Sheldon अमेरिकन कॉमेडी टीव्ही सिरीज -९ वर्षांचा शेल्डन कूपरचे एक जीनियस, पण सामाजिकदृष्ट्या वेगळाच मुलगा आहे.त्याचे टेक्ससमधले जीवन,रोजशी अभ्यासू पण अनेकदा बालसुलभ गोष्टींनी भरलेली धमाल यात आहे. तो हायस्कूलमध्ये लवकर जाते कारण त्याचा बुध्यांक उच्चं आहे त्याच्या कुटुंबाशी आई-बाबा, भावंडे,आजी आणि आजूबाजूच्या पात्रांसोबत त्याच्या गमती जमाती पाहायला मजा येते .साधे जीवन यांच्यात त्याची बुद्धिमत्ता कशी बसते हे मजेदार आणि भावनिक आहे.याविषयी शोधताना कळाले की,Young Sheldon ही The Big Bang Theory प्रीक्वेल आहे, ज्यात शेल्डन कूपर या मुख्य पात्राचे बालपण दाखवले आहे.मी The Big Bang Theory चे नाव केवळ ऐकले आणि त्याचे काही रील्स पाहिले नाही. साधारण जे पूर्वीपासून आंतरराष्ट्रीय मालिका पाहायचे त्यांची खूप आवडती मालिका होती हे समजले.
1

फिरोदिया महाकरंडक अहिल्यानगर पाच दिवस चालला ,३० -४० नाटके सादर झाली .मी मैत्रिणीला भेटायला म्हणून खास तिथे गेले .तर फक्त हे शेवटचे एकुलते एक नाटक पाहायला मिळालं "स्वातंत्र्य सौभाग्य "!!हे नाटक खूपच आवडलं होत ,विचारही करता येणार नाही असे ट्विस्ट यात होते .
इतर दर्जेदार नाटके पाहायचे मिसल...याची खंत वाटत होती
विशेष योगायोग असा की या नाटकालाच प्रथम पारितोषिक मिळाले हे नंतर समजलं .त्यामुळे मुख्य विजेता नाटक तर आपण पाहिलं याचा योगयोगी आनंद झाला.
ही एक स्वातंत्र्य पूर्व काळातील गोष्ट एका जोडप्याची गोष्ट आहे. सौभाग्य ह्या संकल्पनेने आणि संस्कारात वाढलेली मुलगी तिच्या समोर स्वातंत्र्याने झपाटलेला तिचा नवरा त्याच्याशी तिचं लग्न होतं. त्याचे जे नातं स्वातंत्र्य आणि सौभाग्य ह्या दोन्ही गोष्टीने पुढे जातं आणि नंतर तिच्या मधे होणारा परिणाम एकंदरीत ह्या सगळ्याची गोष्ट आहे. एका ओळीत सांगायचं झालं तर, त्या काळात बऱ्याच स्त्रिया ह्या स्वातंत्र्य लढ्याशी जोडल्या गेल्या आहेत पण प्रत्येकीचं कारण हे देश न्हवतं तर आधी तिचं सौभाग्य होतं.
सादरकर्ते : मुलुंड वाणिज्य महाविद्यालय, मुंबई.

तूर्तास तरी हे केवळ ४७ मिनिटांचे नाटक यु ट्यूबवर आहे .(नंतर ते गैरवापर होऊ नये म्हणून यु ट्युबहून काढून टाकले जाते असे समजले)
नक्की पाहून घ्या !!!
https://www.youtube.com/live/OrkRsl2I0JY?si=2jlhxMYx37WWKRl1