नमस्कार
मी योगेश आलेकरी
दुचाकी वरून आशिया युरोप आफ्रिका वारी करतोय. १ मे ला महाराष्ट्र दिना दिवशी मुंबई मधून प्रवासास सुरुवात करून नेपाळ मार्गे चीन मध्ये प्रवेश केला. पुढे कझाखस्थान किरगीस्थान उझबेकिस्थान रशिया करत इष्टोनिया मध्ये पोहोचलो लाटविया केले. पुढे बाल्टिक समुद्र पार करून फिनलंड नॉर्वे स्वीडन डेन्मार्क करत खाली जर्मनीत आलो. मग netherlands करून बेल्जियम पुढे पॅरिस करत इंग्लिश खाडी पार करून १४ ऑगस्ट रोजी १७ देश पार करून लंडन गाठले आणि चोरटयांनी बाईक सर्व सामानासहित चोरून नेली .
पुन्हा सर्व उभे करून प्रवासास सज्ज झालो
लंडन मधून सुरु करून नेठेरलँड्स मध्ये पोहचलो आहे. ४ दिवसात पॅरिस मुक्कामी असेल पुढे स्पेन आणि मोरोको करून पश्चिम आफ्रिका भागातील साधारणतः सर्व देश पालथे घालत केप टाउन ला जाणार आहे.
असा हा सोलो प्रवास सुरु आहे वाटेत कोणी मिपाकर असतील तर भेटूया गप्पा मारूया वगैरे.
सर्व प्रवास इंस्टाग्राम वर roaming wheeels नावाने पाहता येईलच
तज्ज्ञांची मते हवी आहेत मांडावी हि विनन्ती
धन्यवाद
योगेश
प्रतिक्रिया
24 Dec 2025 - 10:46 am | राजेंद्र मेहेंदळे
वा योगेश!!
अशी सफर करण्याचे बर्याच लोकांच्या मनात येत असेल पण खरोखर करणारे फारच थोडे. त्यामुळे प्रथम तुम्हाला शुभेच्छा!!
तूनळीवर तुमचे व्हिडिओ बघितलेच आहेत त्यामुळे याविषयी माहीत होते.
बाकी सल्ला मी काय देणार? तब्येत सांभाळा (स्वतःची आणि गाडीची), भरपूर पाणी पीत रहा ईतकेच सांगेन.
जमेल तशी माहीती शेअर करत रहा किवा परतल्यावर लेखमाला टाका ही विनंती.
24 Dec 2025 - 10:59 am | कंजूस
जगप्रवास? बापरे!
चोरी गेलेली गाडी परत मिळाली का दुसरीच घेतली?
विसा कसा मिळवता?
24 Dec 2025 - 11:19 am | Bhakti
भारीच जगताय तुम्ही!! मी अलरेडी तुम्हाला इन्स्टावर फॉलो करतेय.तुमची बाईक चोरी गेली हे प्रकरण खुपचं गाजलं, अर्थात तुमच्यासाठी खुप दुःखदायक होतं.शेवटी नवी बाईक गिफ्ट मिळाली ते पाहून माणुसकीवरचा विश्वास वाढला :) :)
व्हिजापण बाईक बरोबर चोरला गेला ना?
परत काय केलं मग?
तुम्ही मिपाकर आहात पाहून छान वाटलं.
24 Dec 2025 - 7:49 pm | अमरेंद्र बाहुबली
मागे तुमच्या पॉडकास्टच्या रिल्स
यूट्यूबवर येत होत्या, छान माहिती मिळत होती. सध्या इंस्टा फेसबूक नी युट्यूब अनइन्स्टॉल केलय, प्रवासासाठी शुभेच्छा नी स्माइक केल्याबद्दल धन्यवाद.
25 Dec 2025 - 4:17 pm | किल्लेदार
हॅट्स ऑफ...पुढील प्रवासासाठी शुभेच्छा. वृत्तांत ऐकायला, वाचायला मजा येईल.
26 Dec 2025 - 5:15 am | जुइ
तुम्हाला चेपूवर फॉलो करते आहे, त्यामुळे प्रवासातील बारकावे समजत राहतात. मिपावरही लेखमालिका अवश्य लिहा.
30 Dec 2025 - 5:34 am | चामुंडराय
भ न्ना ट ...
दुसरे शब्दच नाहीत.
सामान्यतः भारतात मोटर सायकल वरून ट्रीपस् करणारे बरेच असतात परंतु जगप्रवास ही कल्पनाच खूप धाडसी आणि आगळीवेगळी आहे. त्यातही सोलो प्रवास असेल तर विशेष कौतुक.
ह्या जगप्रवासाच्या लॉजीस्टिक्स् बद्दल विशेष उत्सुकता आहे. इतक्या साऱ्या देशांचे व्हीजा, रायडिंग परवाना, रजिस्ट्रेशन आणि इन्शुरन्स, मुक्कामाची ठिकाणे, वेगवेगळ्या देशांची चलने इत्यादी कसे केले?
ह्या जगप्रवासाची यू-ट्यूब लिंक कृपया कोणीतरी येथे शेअर करा.
30 Dec 2025 - 8:05 am | रात्रीचे चांदणे
https://youtube.com/@roamingwheeels?si=WUqh_p7DdDIcVAJC