स्वराज्य

चौकस२१२'s picture
चौकस२१२ in राजकारण
24 Mar 2024 - 9:05 am

केवळ हिंदुत्वाचा / कर्मठतेचा / संकुचित पणाचा प्रचार करणार चित्रपट अशी आवई उठवलेला गेलेला "वीर सावरकर" हा हिंदी / मराठी चित्रपट नुकताच पहिला
एका शब्दात यावर परिक्षण लिहायचे तर केवळ एक शब्द विचारत येतो, तो म्हणजे "स्वराज्य .... बस .... बाकी काही नाही
तरी काही ठळक मुद्दे

- चित्रपटात २ विचार प्रवृत्तीतील संबंध दोन्ही बाजूने चांगले दाखवले आहेत ( -हिंसा ( जर जरुरी असेल तर )- अहिंसा / सावरकर - गांधी / जहाल - मवाळ या भारतीय इतिहासातील आणि विशेषतः ब्रिटीशांचच्या पासूनच्या स्वातात्र्य लढ्यातील काळातील याचे पैलू
- गांधींच्या व्यक्तिरेखेतून त्यांची बाजू समर्थ पने दाखवली आहे आणि त्याचाच बरोबर सावरकरांची बाजू पण आणि सावरकरांवर ज्या अनेक बाबीत टिळक होते त्यालाही सडेतोड तर्क पूर्ण उत्तर दिले आहे
- सावरकर यांचे : हिंदुत्व" म्हणजे राष्ट्रोययत्व आणि कोना एका धर्माचे संकुचित / कर्मठ विचार अजिबात नाहीत हे खूपच स्पष्ट पणे दाखवले आहे ( त्यांना सरळ प्रश्न विचारला जातो कि तुमच्या "हिंदू " च्या व्याख्येत कोण कोण बसत हिंदू / शीख, जैन बुद्ध ....आणि मुसलमान ? यावर त्यांचे उत्तर ऐकण्यासारखेच आहे
- गांधींच्या खिलाफत चलवली ला पाठिंबा देण्याचं धोरणावर आंबेडकरांचे विचारकाय होते ते हि ऐकण्यासारखेच आहेत
- १९४७ + काळातील सर्वच जाती कर्मठ असताना एका सावरकर नामक "बामनाने" हिंदू धर्मातील जातिव्यवस्थेवर काय करावे यावरचे विचार आणि कृती आणि गांधींचे विचार हे बघितलेत तर आश्चर्य वाटेल
- काही क्रॉस रेफ: गांधींचे पहिले राजकीय गुरु नामदार गोखले होते हे अँटेनबरो यांचं गांधी चित्रपटात दाखवलेले तुम्हला आठवत असेल .. ते सूत्र येथे हि एक २ दृश्यात दिसते म्हणजे दिग्दर्शकाचा अभ्यास चांगला आहे
दिग्दर्शन , उत्तम,,, थोडा लांबला आहे काही ठिकाणी, आणि लेखन बहुतेक उत्तम १-२ प्रसंग क्लिष्ट ( सावरकर जेवहा चालाखीने स्वतः राजकीय कैदी असल्याचे पटवून देतात आणि कागद मागून प्रथम सरकारला पत्र लिहायला बस्तात तो प्रसंग )
आता तांत्रिक बाबी
चित्रोकरण प्रकाश / सेट अप्रतिम सढळ हाताने खर्च करून वातवरण निर्मिती केली आहे
वेशभूषा - रंगभूषा उत्तम पण कधी कधी विग वैगरे दिस्तात
पात्र : भारतीय आणि ब्रिटिश उत्तम कलाकारांची निवड ( उगाच कोणीतरी भारत एम्बसी किंवा मौल्टीनॅशनल मधील मिळेल तो गोरा आणला आहे असे नाही ( ब्रिटिश / आयरिश जसे व्यक्ती तसे उच्चारण )
अभिनय : रणदीप हुद्दा अप्रतिम , बाकी सर्व ठीक किंवा उत्तम

सर्वात शेवटी असे म्हणावेसे वाटते कि स्वराज मग ते मुघलांपासून असो कि ब्रिटिशांपासून मिळवनयसाठी ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केलं त्यातील काही लोकांचे खच्चीकरण गेली काही दशके झाले ते आता बाहेर येत आहे .. त्याला तुम्ही संघाला प्रोपोगांडा म्हणा हवे तर पण सत्य लपून राहत नाही हे खरे

छत्रपती शिवाजी महाराज ( अजून चांगला चित्रपट यायचाय )
छत्रपती संभाजी महाराज ( अजून चांगला चित्रपट यायचाय )
बाजीराव पेशवे ( बाजीराव आणि पानिपत )
राणी लक्ष्मीबाई ( मनकर्णिका )
मराठा सरदार ( पानिपत आणि तान्हाजी )
टिळक
सावरकर

असो अर्थात हे सगळे कपोकल्पित आहे असे कोणाचे म्हणणे अ सेल तर त्यांनी त्या अफूचं नशेत जरूर राहावे
एक अजून प्रतिक्रिया
https://www.youtube.com/watch?v=wzEsq6R68R8

प्रतिक्रिया

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

24 Mar 2024 - 8:49 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

पत्रकार निरंजन टकले ह्यांनी सावरकरांच्या राजकीय/वैयक्तिक जीवनावर व्हिडियोज बनवले आहेत. अगदी सगळे ऐतिहासिक पुरावे गोळा करुन.
https://www.youtube.com/watch?v=WIZGWkrWvds (जेव्हा शेळीचा सिंह केला जातो)
त्यांनी मांडलेल्या मुद्द्यांचा प्रतिवाद कसा करणार?

चौकस२१२'s picture

25 Mar 2024 - 5:47 am | चौकस२१२

"समतोल" पत्रकार असतील तर नमनालाच एवढी निंदा आणि एकांगी पण दाखवू नये ... त्या विडिओ वरील अनेक प्रतिक्रिया वाचलया तरी पुरे आहेत
टकले इतके टोकाचे एकांगी आहेत कि आपला तरी पास
सावरकर काही देव किंवा महात्मा नवहते कि ज्यांनी काहीच चूक केली नसेल ... असो
बर त्यात बलात्काराच्या आरोपाच उल्लेख झाला आहे, एवढया मोठ्या आरोपाचे / त्याचे काही पुरावे?

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

25 Mar 2024 - 1:18 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

टकले टोकाचे एकांगी आहेत. पण प्रत्येक भाषणात "पुरावे आहेत. तुम्ही खुशाल लोकांना सांगा" असे सांगत असतात.

आग्या१९९०'s picture

25 Mar 2024 - 1:51 pm | आग्या१९९०

निरंजन टकले पुराव्याशिवाय खोटं बोलत असते तर त्यांच्यावर अब्रू नुकसानीचा खटला भरण्यात आला असता.

चौकस२१२'s picture

25 Mar 2024 - 4:00 pm | चौकस२१२

आग्या१९९० , जिवंत नसलेलया ( सावरकर ) माणसाच्या अब्रुनुकसानी बद्दल खटला भरता येतो?

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

25 Mar 2024 - 4:23 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

बदनामी केली म्हणून खटला नाही भरता येणार? कारण टकले सावरकरांबद्दल जे बोलतात/आरोप करतात ते खरोखरच सिरियस असतात.

आग्या१९९०'s picture

25 Mar 2024 - 5:21 pm | आग्या१९९०

त्यांचे रक्ताचे वारस करू शकतात, जर त्यांना त्रास होत असेल तर.

चौकस२१२'s picture

25 Mar 2024 - 5:39 pm | चौकस२१२

तांत्रिक/ वकिली दृष्टया तुमचे कदाचित बरोबर असेल पण म्हणून टाकले जे म्हणतात ते एक तर बरोबर कसे होते? आणि दुसरे ते निपक्षपाती आहेत? असतील तर मग माझी पण उंची ९ फूट आहे असे मी जाहीर करतो

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

25 Mar 2024 - 6:09 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

टकले भाषणातच सांगतात की माझ्याकडे पुरावे आहेत. ते पुरावे त्यानी कसे मिळवले तेही ते सांगतात. गेले ३/४ वर्शे ते हे करत आहेत. टकले लिब्रांडु आहेत, दुर्लक्ष करा.. हे बोलायला ठीक पण हे आरोप एवढे गंभीर वाटतात की विक्रम सावरकर किंवा ईतर कोणी काहीच का करत नाहीत? हा प्रश्न पडतो.

अहिरावण's picture

25 Mar 2024 - 8:13 pm | अहिरावण

कदाचित फारसा भाव देऊन मोठे करण्यात हशील नाही असे वारसांना वाटत असेल. तसेही सावरकर जिवंत असल्यापासून त्यांची मानहानी सरकारी स्तरावर केलीच जात होती, अगदी स्वातंत्र्य मिळाल्यावर सुद्धा ! असो. बाकी गुगलले असता समजते की टकल्यांच्या दी वायर मधील लेखाबद्दल दी वायरवर खटला दाखल झाला होता आणि दी वायरने माफी मागितली होती. जिज्ञासूंनी स्वतः शोध घ्यावा. आरोपाचे पुरावे द्यायचे नाहीत आणि माफीचे पुरावे मागायचे असला लिब्रांडूपणा चालणार नाही. जे करायचे ते करा.

चौकस२१२'s picture

26 Mar 2024 - 4:56 am | चौकस२१२

आरोप एवढे गंभीर ,,,असे असेल तर जसे २०१८ वर्षी सावरकरांच्या गांधी हत्या खटल्याबद्दल परत सुनावणी झाली तसे टकले यांनी न्यायालयात जाऊन दिवंगत सावरकांवरील जुने खटले असतील ते परत आणावेत ( इंग्लंड मध्ये किंवा भारतात )
असो टकले हे काही निपक्षपाती आणि समतोल पत्रकार आहेत असे अजिबात नाही त्यांचे अनेक विडिओ बघा केवळ हिंदू द्वेष / संघ / भाजप द्वेष टूलकिट झिंदाबाद

आग्या१९९०'s picture

25 Mar 2024 - 6:18 pm | आग्या१९९०

कोलू , बेड्यांची सांकेतिक भाषा , असले अतिरंजित दावे व्यवस्थित खोडून काढले आहेत निरंजन टकलेंनी. त्यांच्याकडे तर पुरावे आहेत. आव्हान दिले तर कागदोपत्री पुराव्यांची सत्यता पडताळून बघता येईल.

कर्नलतपस्वी's picture

25 Mar 2024 - 5:30 pm | कर्नलतपस्वी

वेळेचा अपव्यय झाला.
पंचधातूचा खांब बघण्यासाठी त्याला गोल फेरी मारावी लागते असे आकलेचे तारे यांनी तोडलेले आहेत.
म्हणे सी ऐ ऐ कायद्याचा मसुदा शंभर वर्षापूर्वीच लिहीला होता त्याची अंमलबजावणी आज करत आहेत.

या व आशासारख्या माणसांना फाट्यावर मारलेच पाहिजे.

धागा राजकीय विषया कडे जाण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.

आम्ही गांधी सिनेमा शांतपणे बघीतला.......

कर्नलतपस्वी's picture

25 Mar 2024 - 5:32 pm | कर्नलतपस्वी

टकल्या वर टिंब द्यायचे राहीले. शुद्धलेखन जरा खराब आहे.

टकल्यांची चित्रफित असे वाचणे.

अहिरावण's picture

25 Mar 2024 - 7:09 am | अहिरावण

निरंजन टकले, राजु परुळेकर, वागळे.... समान टुलकीट आहे

सामान्य माणूस यांना फाट्यावर मारतो

हे फक्त वोक आणि लिब्रांडूंमधे फेमस आहेत

अमरेंद्र बाहुबली's picture

28 Mar 2024 - 11:39 pm | अमरेंद्र बाहुबली

अर्धा विडीओ ऐकला. सावरकरांबद्दल बर्याच गोष्टी कळाल्या. ईतिहास कसा लपवला जातो ना आपल्यापासून! खुद्द सावरकरांच्या पत्नीनेच लिहून ठेवलंय. विडीओची लिंक शेअर केल्याबद्दल आभार माई.

चित्रपट खुप चांगला आहे.स्टोरी टेलिंग पार्ट उत्कृष्ट जमलाय.काळे पाणी शिक्षणापर्यंत सिनेमा वेगवान आहे.अभिनव भारत विषयी चांगली माहिती मिळते.अंदमान मधली अमानुष शिक्षा असलेले प्रसंग पाहत आपणच शिक्षा भोगतोय असं वाटतं.काळ्यापाण्याचे प्रसंगानंतर सिनेमा धीमा होतो.अनेक सहज न स्वातंत्र्य संग्रामातल्या सांगितलेल्या कड्या दाखवल्या आहेत.रणदीप हुड्डा चित्रपट , भूमिका अक्षरशः जगला आहे १०० %

चित्रपटाची माहिती दिल्या बद्दल धन्यवाद....

दिग्दर्शकाचने डोकं फार भारी चालव लंय
सुरवातीला पडद्यवार एक रेखा उलगडत जाते त्यातून जे चित्र उमटू लागते ते बघा ... गांधी आणि सावरकर कसे बेमालूम पने मिसल्ले गेले आहेत ..
दि गदर्शकाला म्हण्यायचंय कि दोघांचे हि उद्दिष्ट्य तेच होते वाटा वेगळ्या होत्या ..
निरंजन टकळेले ना हे कधी केळेल ले असे वाटत नाही ....

अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे निम्या हुन अधिक चित्रपटात "हिंदुत्व" याचा उल्लेख सुद्धा नाहीये ...
मुख्यत्वे ब्रिटिशांची क्रूरता , फ्रेंचांनी आणि ब्रिटिशांनी न्याय पद्धतीत बसत असताना सुद्धा सावरकरानवर केलेले विविध अन्याय , काळया पाण्याच्या शिक्षेतील अत्याचार / सावरकरांवर कोणाचा प्रभाव, आणि त्यान्च्यामूळे कोण प्रभावित झाले ,कुटुंबाचे हाल हे सगळे आहे,,,,भरभर का होईना "हिंसा" वापरणाऱ्या स्वातंत्र लढयातील ऐकेनाची उजळणी आहे
दुर्दैवाने टूल किट वाले हापटत बसणार भलत्याच गोष्टींवर ...
दुसरया भागात पाहिल्या भाग एवढे नाट्य नाहीये पण इतर महत्वाची पात्रे आणि त्यांनच्या राजकीय खेळी / विचार हे बघायला आवडले ... अर्थात ज्याला भारतीय इतिहास थोडा माहिती आहे त्यांना याचे संदर्भ लागतील नाहीतर जगातील इतर प्रेक्षकांना संदर्भ लागणे कठीण आहे ...

रणदीप हुड्डा ए काम जीव लावून केले आहे यात शंका नाही ( अर्थात टूल किट वाले पैसायसाठी केलं असा ओरडा करीत बसणारच )

एक काळ असा होता कि कोणतयाही राजकीय विषयवार कलाकृती काढणे पाप होते ( किस्सा कुर्सी का/ अगदी आंधी सारखया चित्रपटावर बंदी आणली होती )
आज दोन्ही बाजूचे चित्रपट निघत आहेत हे चांगलेच नाही का मग तो सावरकर असो कि झुंड !

स्वधर्म's picture

25 Mar 2024 - 7:02 pm | स्वधर्म

इथे टकले यांचा संदर्भ अनेकांनी दिला आहे. मी पण त्यांचे व्हिडिओज पाहिलेले आहेत. मला एक लक्षात येते ते असे:
- सावरकर यांच्याबद्दलची आपली माहिती ही सहसा त्यांनी सांगितलेल्या गोष्टींवरच अवलंबून असते. किंवा काही चरित्रकारांवर. जर ते चरित्रलेखक असतील, तर त्यांना ती व्यक्तिरेखा रंगवणे भाग आहे. भारतीय समाजात एकूणच व्यक्तीपूजा सर्रास केली जाते मग ते गांधी असोत की आंबेडकर. पण सिध्दहस्त लेखकांच्या पुस्तकापेक्षा कागदपत्रे तपासून समोर आलेली तथ्ये जास्त महत्वाची असतात, असे मला वाटते.
- सावरकर यांनी अंदमानातून सुटून आल्यावर इंग्रज सरकारविरूध्द नक्की कोणत्या कारवाया केल्या? कोणते लढे उभारले? याची माहिती माझ्या तरी समोर आली नाही. ती मी स्वत: होऊन जमा केली नाही हे मान्य आहे. पण सगळे बोलले जाते ते त्यांच्या काळ्या पाण्याच्या शिक्षेच्या आधीचेच. नंतर इंग्रजी राजवट देशातून गेली पाहिजे, यासाठी त्यांनी काय केले? हे जर काही चित्रपटात आले असेल तर मी कदाचित बघेन.
टकले यांना डिसक्रेडीट करणे सोपे आहे, त्याला काहीच लागत नाही. त्यांचे मुद्दे सप्रमाण खोडून काढणे जास्त महत्वाचे आहे, आणि ते कोणी समोरासमोर केले असेल तर दुवा द्यावा. नक्की पाहीन व त्यानुसार मत बदलेन. सावरकर हे महान लेखक होते, त्यांनी मराठी भाषेची अद्वितीय अशी सेवा केली आहे, त्यामुळे ते एक आदरणीय व्यक्तीमत्व आहेत, पण ते त्यासाठीच.

नंतर इंग्रजी राजवट देशातून गेली पाहिजे, यासाठी त्यांनी काय केले? हे जर काही चित्रपटात आले असेल तर मी कदाचित बघेन.

सुटकेनंतर त्यांच्यावर अनेक प्रकारे राजकीय कार्यांवर बंदी होती.नाहीतर कार्यवाही नावाखाली अटक होणार होती.परंतू हिंदू महासभाद्वारे त्यांनी अस्पृश्यता निवारण करत देशहितासाठी काम केले, त्यामुळेच त्यांना क्रिस्प मिशन १९४२ साठी आमंत्रित केले असा बोध मला पहिल्यांदाच चित्रपटातून मिळाला.
हा लेख नक्की वाचा.
https://divyamarathi.bhaskar.com/news/edt-freedam-fighter-sawarkar-socia...

दुव्याबद्दल धन्यवाद. लेख वाचला. सावरकर यांनी अस्पृश्यता निवारणाचे कार्य केले, त्याचा निश्चितच आदर वाटतो. असे कार्य अनेक देशभक्तांनी त्याकाळात केले आहे. गांधीजींनी आणि त्यांच्या हजारो अनुयायांनी पण.
मी माहिती विचारली होती: ‘सावरकर यांनी अंदमानातून सुटून आल्यावर इंग्रज सरकारविरूध्द नक्की कोणत्या कारवाया केल्या? कोणते लढे उभारले?’ असे काही केले नसेल, तर त्यांनी आपल्या माफीनाम्याप्रमाणे पूर्णपणे इंग्रजांविरूध्दच्या स्वातंत्र्यलढ्यातून अंग काढून घेतले, असेच म्हणावे लागते. १९२४ ला सुटून आल्यानंतर १९४७ ला स्वातंत्र्य मिळेपर्यंतचा २३ वर्षांचा काळही तसा बराच आहे. या कालावधीतही अनेक देशभक्त स्वातंत्र्यवीरांनी इंग्रजांच्या अटी न स्विकारता हालअपेष्टा तुरुंगवास, हौतात्म्य पत्करले आहे. फक्त त्यांचे भाषेवर इतके प्रभुत्व नव्हते आणि त्यांनी भारावून टाकणारी पुस्तके लिहिली नाहीत. त्यामुळे असे वाटते की सावरकर हे एक कोडे आहेत. अंदमानच्या शिक्षेच्या आधीचे जाज्वल्य देशभक्त, सशस्त्र क्रांतीकारक आणि अंदमानच्या सुटकेनंतरचे इंग्रज सरकारची पेन्शन घेत, त्यांना कसलाही उपद्रव होऊ नये याची काळजी घेत जगलेले सावरकर. स्वातंत्र्यानंतर तर त्यांच्यावर गांधी हत्येचा खटला चालला. हे सगळे तर स्वयंस्पष्ट आहे. आपण फक्त सावरकरांनी लिहिलेली पुस्तके किंवा त्यांच्या चरित्रकारांनी लिहिलेली पुस्तके वाचून मत बनवू शकत नाही. वस्तुनिष्ठ माहिती जमा करून टकले यांच्यासारख्यांनी काही तथ्ये प्रकाशात आणली असतील, तर जोपर्यंत त्याचा कोणी प्रतिवाद करू शकत नाही, तोपर्यंत ती विश्वासार्ह मानावी लागतात आणि सावरकर यांचा १९२४ नंतरचा जीवनकाल टकले यांनी मांडलेल्या तथ्यांना पुष्टी देतो असे म्हणावे लागते.

अहिरावण's picture

26 Mar 2024 - 7:25 pm | अहिरावण

१९२१ ला सुटल्यानंतर रत्नागिरीत स्थानबध्द केले होते. राजकीय भाग घेण्यास ३६ पर्यंत बंदी होती.
३७ ते ४७ हिंदू महासभेच्या माध्यमातून राजकारण प्रचंड केले होते. अनेकांना ते माहित नसते यात आश्चर्य नाही.
३९ सालचे लेख वाचले त्यांचे तर कळते की महायुद्ध संपायच्या आसपास भारताला स्वातंत्र्य मिळेल हे त्यांनी ताडले होते.

एकदा सावरकर तुच्छ मानायचे ठरवले तर काहीही असले तरी ते "तसेच" होते असा आविर्भाव घेता येतो आणि अनेक जण घेतात यात आश्चर्य नाही.

स्वधर्म's picture

26 Mar 2024 - 10:39 pm | स्वधर्म

माहितीच तर विचारली आहे:
‘सावरकर यांनी अंदमानातून सुटून आल्यावर इंग्रज सरकारविरूध्द नक्की कोणत्या कारवाया केल्या? कोणते लढे उभारले?’
एवढा साधा प्रश्न आहे, त्यावर न बोलता इतर काहीही बोलत रहाल, तर काय करणार? त्यांनी नंतर देशाला फायदा होईल असं इंग्रजांविरुध्द नेमकं काय केलं हे सांगितले तर माहिती पडताळून पाहून मी तरी मत बदलायला तयार आहे. हे नेमकं न सांगता कांगावा करणं निरूपयोगी आहे.

त्यामुळे
‘अंदमानच्या सुटकेनंतरचे इंग्रज सरकारची पेन्शन घेत, त्यांना कसलाही उपद्रव होऊ नये याची काळजी घेत जगलेले सावरकर’ हेच समोर येते, त्याला कोण काय करणार?

त्यांच्या साहित्यातील, भाषेतील आणि अश्पृश्यता निवारणातील कामाबद्दल कोण नकारत्मक बोलेल? टकलेही बोलत नाहीत.

अगम्य यांनी दिलेले उत्तर वाचा.

अपेक्षेप्रमाणे धाग्याने वळण घेतलेले आहे.

हातात असत्याची "मशाल" घेऊन "तुतारी" फुंकण्यामागे कुणाचा "हात" आहे हे सरळ दिसत आहे.

यापेक्षा अधिक "पुरोगामी" महाराष्ट्रात बोलण्यास बंदी आहे असे ऐकले आहे.

आग्या१९९०'s picture

25 Mar 2024 - 8:15 pm | आग्या१९९०

निदान भावी पिढीला सत्य काय आहे कळावे हाच उद्देश आहे. डोळे मिटून विश्वास ठेवण्याचे दिवस जावे हीच इच्छा. ह्यात राजकीय काय आहे?

हो ना भावी आणि आत्ताच्या पिढीला हे कळले पाहिजे कि भारतीय स्वातंत्र्य ( मुघल आणि ब्रिटिश) लढ्यात फक्त अहिंसावादी गांधी नेहरू यांचेच फक्त योगदान नव्हते ( ते होतेच ते कोण अमान्य करीत नाही ४७ आधी गांधींचे आणि ४७ नंतर देश उभारणी करताना पंतप्रधान म्हणून नेहरूंचे )
इतरांचे हि योगदान भक्कम होते आणि दोन राजकीय प्रवाह होते अगदी काँग्रेस मध्ये सुद्धा जहाल अन मवाळ / .. मवाळ तेवढेच देशभक्त आणि स्तुती योग्यतेचे आणि जहाल मात्र अतिरेकी !
दुसरा मुद्दा "देश कि धर्म" यात मनुवादी समजल्या जाणाऱ्या सावरकरांना " देश आधी" हे अपेक्षित होते हे हि लोकांना कळले पाहिजे ... ( संधर्भ खिलाफत )
( हायला जो माणूस म्हणतो "जरुर पडली तर हिंदूंनी गोमास खाल्ले तरी हरकत नाही" त्याला मनुवादी म्हणतात ! चित्रपटात त्यान्ची आणि गांधींची पहिली भेट होते तो प्रसंग आठवा मौज वाट्लि, डावखुर्यांच्या ढोंगी पनाची कमाल झाली !)
जगातील अनेक क्रांती पहा चे गुरेवा / पॅलस्टीन लिब्रशन / फ्रेंच क्रांती/ अलीकडील ईस्ट तैमूर चा इंडोनेशिया तुन वेगळे होणे इत्यादी सगळी कडे हिंसा वापरली/ मग भारतीयांनी काय घोड मारलाय...? सांम दाम दंड भेद ..

हणमंतअण्णा शंकराप्पा रावळगुंडवाडीकर's picture

25 Mar 2024 - 9:54 pm | हणमंतअण्णा शंकर...

एकमेकांसमोर येऊन दूध का दूध, पाणी का पाणी का करत नाहीत?

टकल्यावर अजिबात विश्वास नाही. थापा लावतो कोणतीही शहानिशा न करता. अनेकदा तोंडघशी पडला आहे.

य दि फडके यांचे लेखन वाचायला पाहिजे.

अहिरावण's picture

26 Mar 2024 - 10:44 am | अहिरावण

दोघे एकमेकांसमोर आले तर दोघांचे धंदे बंद होतील.

हणमंतअण्णा शंकराप्पा रावळगुंडवाडीकर's picture

25 Mar 2024 - 9:57 pm | हणमंतअण्णा शंकर...

ची सुधीर फडक्यांची चाल अप्रतिम आहे. एकदम भावुक करणारी. मंगेशकर कुटुंबियांची चाल बरी वाटते, पण फडके खूप सुंदर चाल लावलेत.

अहिरावण's picture

26 Mar 2024 - 10:50 am | अहिरावण

वरती डाव्यांच्या नेत्या माईसाहेब यांनी जो विडीओ दिला आहे त्याच्या माहितीत सुरवातीला म्हटले आहे

ज्यांनी स्वतःलाच स्वातंत्र्यवीर, वीर अशा पदव्या लावून घेतल्या!

खरी गोष्ट ही आहे की २१ साली रत्नागिरीत स्थानबद्द केल्यानंतर १५ वर्षे राजकारणात भाग घ्यायला तात्यांना बंदी घातली होती.
३६ साली पुण्यात त्यांचा जाहिर सत्कार ठेवला होता. त्याच्या आधी कॉग्रेसने त्यांच्या निषेधाची सभा घेतली होती. मात्र तात्यांच्या सत्कार समारंभाला प्रचंड गर्दी झाली होति आणि त्यासभेत पहिल्यांदा आचार्य अत्रे यांनी स्वातंत्र्यवीर असा गौरवोद्गार काढला आणि सभेने एकमताने टाळ्यांच्या गजरात मान्य केले. याचे भरपुर पुरावे जागोजागी आहेत, लिब्रांडूंनी ते पाहून कंड शमवावा.

बाकी चालू द्या सावरकरविरोध. तेच तुमच्या जगण्याचे साधन आणि मर्यादा.

सुखीमाणूस's picture

26 Mar 2024 - 11:44 am | सुखीमाणूस

म्हणजे मराठी अस्मिता वगैरे आहेच
पण...
गुजराती म्हणून मोदींना विरोध
पण गुजराती गांधी मराठी सावरकरांपेक्षा चांगले कारण ते काँग्रेसवाले
नॉर्थचे नेहरू पण काँग्रेस वाले म्हणून मराठी सावरकरांपेक्षा देशाचे नेतृत्व करायला योग्य.

काँग्रेसचा सावरकर विरोध बघून खात्री होते आहे की सावरकरांच्या नेतृत्व शक्तीची गांधी नेहरूंना इतकी भीती होती की त्यामुळेच इतक्या वर्षानंतर पण काँग्रेसी लोकांचा सावरकर विरोध कमी झालेला नाही.
खरतर सावरकरांचा चित्रपट एक स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासाची दुसरी बाजू म्हणून बघण्यात यावा इतपतच महत्व त्याला द्यावे.
आता काँग्रेस ने स्वातंत्र्य लढ्यात जे केले त्याच्या कुबड्या अजुन का लागतात त्यांना? त्यांनतर इतकी वर्ष राज्य करून देश प्रगतीपथावर नेला असा त्यांचा दावा आहे ना मग सावरकरांचा बागुलबुवा का वाटतो?
की खरंच काँग्रेस कडची गांधी नेहरू ही प्रतीक इतकी तकलादू आहेत की एखादे नवे प्रतीक त्यांना replace करू शकते?
की केवळ योग्य मार्केटिंग मुळे गांधी नेहरू आणि काँग्रेस हेच देशाचे तारणहार असे इतके दिवस यशस्वी पणे वापरता येत होते त्यालाच सुरुंग लागतो आहे?

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

26 Mar 2024 - 2:48 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

"त्यामुळेच इतक्या वर्षानंतर पण काँग्रेसी लोकांचा सावरकर विरोध कमी झालेला नाही."
मला नाही वाटत विरोध आहे. यशवंतराव चव्हाण्/शन्करराव्/शरद पवार्/विलासराव ह्यापैकी कुणी सावरकरांच्या बाबतीत काही वाईट बोलल्याचे माहित नाही. नेहरूंनी किंवा वरील नेत्यानी जाहीररीत्या सावरकरांबद्दल अनुद्गार काढल्याचे स्मरणात आहे का ? बहुतेक नाही. १९९८ नंतर ईतिहास खणुन भारतातील प्रत्येक सम्स्येला नेहरू/महत्मा गांधी जबाबदार आहेत.. असा एक प्रचार चालु केला गेला.तसा तो अपप्रचार अनेक वर्षे चालु होताच पण आता सत्ता असल्याने अधिक जोमाने चालु केला गेला. त्याला प्रत्युत्तर म्हणून २००३ साली मणिशंकर अय्यर ह्यांनी सावरकरांचा वाद उकरून काढला. असो.
चित्रपट मात्र पहायचा आहे.

नेहरूंनी किंवा वरील नेत्यानी जाहीररीत्या सावरकरांबद्दल अनुद्गार काढल्याचे स्मरणात आहे का ? बहुतेक नाही.
नक्की का?
बाकी अनुद्गार काढले की नाही काढले हे सोडून द्या.
४८ च्या गांधीहत्येमधे निर्दोष सुटका होऊनही राजकीय बंदी मरेपर्यंत का घातली होती कॉग्रेस सरकारने?
नंतर संघावरची बंदी उठ्वली पण सावरकरांवरची नाही?
असे का?
सावरकरांच्या देशभक्ती काव्यांना आकाशवाणीवर बंदी का होती?
इतकं साधं सोपं सरळ राजकारण नाही ते.

काँग्रेसचा सावरकर विरोध बघून खात्री होते आहे की सावरकरांच्या नेतृत्व शक्तीची गांधी नेहरूंना इतकी भीती होती की त्यामुळेच इतक्या वर्षानंतर पण काँग्रेसी लोकांचा सावरकर विरोध कमी झालेला नाही.
खरतर सावरकरांचा चित्रपट एक स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासाची दुसरी बाजू म्हणून बघण्यात यावा इतपतच महत्व त्याला द्यावे.

१००%

कर्नलतपस्वी's picture

26 Mar 2024 - 3:16 pm | कर्नलतपस्वी

दोन विचारधारा होत्या. मवाळ आणी जहाल. अर्थातच जहालपंथी नेहमीच कमी असतात. उगाच कोण लष्करच्या भाकर्‍या भाजणार, बोटावर मोजण्याइतकेच. नियंत्रणात ठेवणे मुश्कील.

त्यामानाने मवाळवादी नियंत्रणात ठेवणे सोपे. अल्पसंतुष्ट. अर्ज,विनंत्या फारच झालं तर असहकार.

मवाळ वादाने भारावलेली पिढी संपुष्टात आली. सुशिक्षित, विचार करणारी तरुणाई आल्यामुळेच चांगल्या वाईटचा विचार सुरू झाला. चढावरून गाडी उताराला लागली.

मरता क्या न करता,जहालवाद्यांमुळे स्वातंत्र्य मिळण्यास कसा ऊशीर झाला याचा प्रचार सुरू झाला. नवी पिढी डोळस, भारावून न जाणारी, त्यामुळे बदल दिसून येत आहेत.

दुसर्‍या महायुद्धात सैन्यात भरती व्हा असा प्रचार करण्यापेक्षा आझाद हिंद सेना ज्वाॅईन करा असा प्रचार झाला असता तर परीणाम वेगळा झाला असता.

आमचं झालं,पन्नास गेले पाच राहीले. तरुणाई ला एक निवेदन भूतकाळाचे जोखड झुगारून भविष्याकडे चला.

सर टोबी's picture

26 Mar 2024 - 4:07 pm | सर टोबी

इस देश में फ़ौजी की बहोत इज्जत होती है। इसे दाग ना लगने देना।

सुबोध खरे's picture

1 Apr 2024 - 10:02 am | सुबोध खरे

सर टोबी

उगाच लष्करावर किंवा लष्करी माणसावर कारण नसताना शिंतोडे उडवायचा आपला प्रयत्न अत्यन्त हीन पातळीचा आहे.

आपल्या कडे वादासाठी मुद्दे नसतील तर सोडून देण्याचे धैर्य दाखवायच्या ऐवजी असे वैयक्तिक पातळीवर उतरून आपण आपली लायकी दाखवत आहात असेच दुर्दैवाने म्हणावे लागेल.

अहिरावण's picture

26 Mar 2024 - 4:19 pm | अहिरावण

>>>दुसर्‍या महायुद्धात सैन्यात भरती व्हा असा प्रचार करण्यापेक्षा आझाद हिंद सेना ज्वाॅईन करा असा प्रचार झाला असता तर

आझाद हिंद सेनेत गेलेल्यांना भारताने आपल्या सेनेत नंतर सामील केले होते का?

आझाद हिंद सेनेत गेलेल्यांना भारताने आपल्या सेनेत नंतर सामील केले होते का?

-----

अजिबात नाही....

अहिरावण's picture

26 Mar 2024 - 7:22 pm | अहिरावण

आणि पाकिस्तानने?

मुक्त विहारि's picture

26 Mar 2024 - 7:30 pm | मुक्त विहारि

आझाद हिंद सेनेचे जे सैनिक पाकिस्तान मध्ये गेले, त्यांना पाकिस्तान सैन्य दलात नौकरी मिळाली.

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

26 Mar 2024 - 10:47 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

लाल किल्ल्यात जो खटला चालला तो आझाद हिंद सेनेतर्फे लढण्यासाठी नेहरू/सप्रु हे कॉन्ग्रेसचे नेते होते. हिंदु महासभेचे बॅरिस्टर नव्हते.

अहिरावण's picture

27 Mar 2024 - 10:14 am | अहिरावण

हांग आश्शी ! आता कसे !! तर हिंदू महासभेचे सावरकर यांना बॅरीस्टर पदवी आणि कोर्टात भाग घ्यायची अनुमती होती का? त्यांची बीए पदवी मुंबै विद्यापीठाने काढून घेतली होती (जी स्वातंत्र्यानंतर ब-याच काळाने परत दिली.)

राहता राहिले नेहरुंनी वकीलपत्र घेतले ते मनापासुन घेतले की लोकांचा प्रचंड "दबाव" आल्यावर घेतले याबाबत आपल्याला "नेमकी" माहिती असेलच.

चौकस२१२'s picture

27 Mar 2024 - 4:51 am | चौकस२१२

अहिरावण ...गांधींनी पण ब्रिटिशाना महायुद्धात साथ द्या असे म्हणले होते ना?
ते चालते ? हे म्हणजे पु ल म्हणतात तसे देवाने केली ती रासक्रीडा आणि आम्ही केलं कि लफडं !
आणि सावरकरांचा त्यामागचा हेतू हे "सैन्य शस्त्र / शास्त्र एकदा शिकून घ्या " हा होता नंतर तीच बंदुकीची नळी कोणाकडे फिऱवायची ते आपण नंतर बघू
गनीम कावा जो शिवजयी महाराजांपासून चालू आहे त्याचे हेच एक वागेल रूप
पण काही हि करा आणि सावरकरांना आणि त्यांच्य्या विचारांना मारा हेच ज्यांनी ठरवले आहे त्यांच्याशी काय बोलणार

सुरिया's picture

26 Mar 2024 - 4:36 pm | सुरिया

दुसर्‍या महायुद्धात सैन्यात भरती व्हा असा प्रचार करण्यापेक्षा आझाद हिंद सेना ज्वाॅईन करा असा प्रचार झाला असता तर परीणाम वेगळा झाला असता.

"टीसीएस नको इन्फोसिसलाच जॉइन व्हा" इतका सिंपल प्रचार आणि प्रोसेस होती का?
ब्रिटिशांची भरती ते भारताचे राज्यकर्ते असताना राबवत होते. त्यांचेच सैनिक युध्दकैदी असताना त्यातून उभारली गेलेली आझाद हिंद सेना होती.
.
नशीब आझाद हिंद सेनेतील गांधी किंवा नेहरु ब्रिगेडमध्येच भरती व्हा असा प्रचार नव्हता. -:

मुक्त विहारि's picture

26 Mar 2024 - 5:19 pm | मुक्त विहारि

आवडला...

शेवटचे वाक्य, थोडया वेगळ्या शब्दांत व्यक्त करतो...

"भूतकाळाचे जोखड झुगारून भविष्याकडे चला..."

-----इतिहासाचा अभ्यास करुन , ध्येय आखा आणि त्या ध्येयाच्या अनुषंगाने, वर्तमान काळांत वाटचाल करा.----

जो देश, इतिहास विसरतो, तो देश अस्ताला जातो...

कर्नलतपस्वी's picture

26 Mar 2024 - 5:20 pm | कर्नलतपस्वी

याचा काही एक संबंध येथील चर्चेशी संबंध नाही.
तेव्हां कृपया व्यक्तीगत पातळीवर चर्चा नको.

आणी विनाकारण व्यक्तीगत पातळीवर प्रश्न केल्यामुळे या रडीच्या खेळातून बाहेर पडलो आहे.