झटपट कप केक्स

नागनिका's picture
नागनिका in पाककृती
16 Aug 2023 - 8:09 pm

साहित्य - २ पाकिटे bourbon biscuits, चिमूटभर खाण्याचा सोडा, २ कप दुध, कॅडबरी चोकलेट किंवा डार्क चोकलेट .

कृती - सर्व बिस्किटे मिक्सरमधून ग्राईंड करून घ्या. बिस्किटांचा भुगा एका बाऊल मध्ये घेऊन त्यात अंदाजे दुध मिसळत राहा. आप्प्यांप्रमाणे सरबरीत मिश्रण करा. मिश्रण २ मिनिटे चांगले फेटून घ्या. खाण्याचा सोडा घालून हलक्या हाताने पुन्हा एकदा मिश्रण हलवा. आप्पे पात्राला तुपाने ग्रीस करुन मिश्रण अर्ध्यापर्यंत भरा. कॅडबरी चोकलेटचा किंवा डार्क चोकलेटचा एक चौकोनी तुकडा ठेऊन पुन्हा थोडे मिश्रण ओतून आप्पे पात्र व्यवस्थित भरून घ्या.मंद आचेवर ३ ते ४ मिनिटे बेक करा. झटपट कप केक्स तयार

मिनी कप केक्स

केक उकलल्यावर आत melted चोकोलेट असल्याने याला मिनी चोको लावा केक सुद्धा म्हणू शकता.

 चोको लावा केक

प्रतिक्रिया

अथांग आकाश's picture

16 Aug 2023 - 10:23 pm | अथांग आकाश

यमी कप केक्स!!!
0

रंगीला रतन's picture

18 Aug 2023 - 5:18 am | रंगीला रतन

झकास!

कर्नलतपस्वी's picture

18 Aug 2023 - 8:14 pm | कर्नलतपस्वी

खाण्याकरता.....

टर्मीनेटर's picture

19 Aug 2023 - 9:46 pm | टर्मीनेटर

झक्कास!
एक प्रामाणिक शंका…

कॅडबरी चोकलेटचा किंवा डार्क चोकलेटचा एक चौकोनी तुकडा ठेऊन पुन्हा थोडे मिश्रण ओतून आप्पे पात्र व्यवस्थित भरून घ्या.

इथे कॅडबरी चॅाकलेट किंवा डार्क चॅाकलेट ऐवजी लिकर चॅाकलेटचा वापर केला तर चालेल का?

नागनिका's picture

20 Aug 2023 - 1:10 am | नागनिका

चवीत थोडा गोडसरपणा आणावा लागेल.

सौंदाळा's picture

21 Aug 2023 - 1:16 pm | सौंदाळा

भारीच
खूप दिवसांनी नविन पाककृती आली आणि ती पण आवडणारी आणि सोप्पी वाटतेय.

Bhakti's picture

23 Aug 2023 - 11:11 am | Bhakti

अभिनंदन छान केक्स बनवलेत.
हा पदार्थ मी दोनदा केलाय, चांगला फसला.मग मी अप्पेपात्र निकृष्ट आहे हे ठरवून याच्या नादी लागले नाही :)

नागनिका's picture

26 Aug 2023 - 7:58 pm | नागनिका

धन्यवाद :)
नॉनस्टिक पात्रात होईल.. तुमचे अप्पे पात्र बिडाचे आहे का?

जुइ's picture

23 Aug 2023 - 10:31 pm | जुइ

सोपा प्रकार दिसत आहे. एकदा करायला हवा!

नागनिका's picture

26 Aug 2023 - 8:02 pm | नागनिका

७ ते १० मिनिटात होतात.
नक्की करा :)

स्नेहा.K.'s picture

26 Aug 2023 - 4:10 pm | स्नेहा.K.

लॉकडाऊन मध्ये ओरिओ आणि बर्बनचे केक बऱ्याचदा व्हायचे. एकदा इडली पात्रामध्ये तयार करून चॉको इडल्या बनवल्या होत्या. 😀

पण चॉको चिप्स टाकून चॉको लावा केक तयार करायची आयडिया मस्त आहे.

स्नेहा.K.'s picture

26 Aug 2023 - 4:15 pm | स्नेहा.K.

फोटो

प्रत्येक कप्प्यात बॅटरमध्ये डेअरी मिल्कचा एक एक पीस टाकला होता.

इडली पात्राची कल्पना चांगली आहे.

ओरिओचे केक काळपट होत असतील ना?
हाईड अँड सीक चे पण छान होतात.

बिना ओव्हन चे केक हि कल्पना चांगली आहे
पण एक प्रश्न
बिस्किटे आधीच भाजलेली असतात मग असे परत भाजले गेल्याने हा "केक" कडवट नाही का होत?

बिस्किटे आधीच भाजलेली असतात मग असे परत भाजले गेल्याने हा "केक" कडवट नाही का होत?
नाही होत.
आपण ती भिजवतो ना.

हणमंतअण्णा शंकराप्पा रावळगुंडवाडीकर's picture

15 Sep 2023 - 8:00 pm | हणमंतअण्णा शंकर...

झटपट टायटल पाहून धागा उघडला आणि आपण टायटल चुकीचे वाचले असल्याची जाणीव होऊन तोंड कडू झाले. परंतु धागा मात्र गोड आहे हे वे. सां न. ल.