वार्तालाप : मनातील विचार - सकारात्मक आणि नकारात्मक

विवेकपटाईत's picture
विवेकपटाईत in काथ्याकूट
7 Mar 2023 - 10:11 am
गाभा: 

समुद्रात जेवढा लाटा उसळत नाही त्याच्यापेक्षा जास्त विचार तरंगा मानवाच्या मनात सदैव उसळी भरत राहतात. सृष्टी कर्त्याच्या मनात विचार आला आणि या ब्रह्मांडाची रचना झाली. आपले प्राचीन ऋषी म्हणतात 'जे काही ब्रम्हांडात आहे ते पिंडामध्येही' आहे. प्रत्येक सूष्म कोशाचे ही स्वतंत्र अस्तित्व आहे. एका कोशातील विचार ही ब्रम्हांडाची निर्मिती करण्यास समर्थ आहे. विचारांनी स्मृती निर्मित होते आणि कोशांच्या स्मृति ब्रम्हांडाच्या निर्मितीपासून सतत वृद्धिंगत होत राहतात आणि त्यानुसार जीवांची निर्मिती करतात. मानवाची निर्मितीही कोशांतील स्मृति अनुसारच झाली आहे. आपल्या शरीरातील कोश ही सतत निर्मितीत व्यस्त राहतात, शरीरात होणारी क्षती सतत दूर करत राहतात. मनुष्य आपल्या विचारांच्या स्मृती पुढच्या पिढीलाही प्रदान करतो. मानवाचे आचार व्यवहार - धर्म, अर्थ, काम जीवन सर्वच विचारानुसार ठरते आणि भविष्यासाठी स्मृतीत सुरक्षित होते. सकारात्मक विचार सकारात्मक स्मृति निर्माण करतात. मानवाला शारीरिक आणि मानसिक रूपेण निरोगी ठेवतात. नकारात्मक विचार नकारात्मक स्मृति निर्मित करतात. या नकारात्मक विचारांमुळे आपल्या शरीरातील कोशिका भ्रमित होतात, निर्मितीच्या जागी शरीरलाच नष्ट करू लागतात. अधिकान्श आजारांचे हेच मुख्य कारण आहे. मानवाला होणारे आनुवंशिक आजारांचे मुख्य कारण ही नकारात्मक विचार आहे. आत्महत्येचे मुख्य कारण ही हेच आहे.

मानव जातीचे अस्तित्व विचारांवर निर्भर आहे. सकारात्मक विचार ब्रम्हदेवाने निर्मित केलेल्या सृष्टीच्या समस्त जीवांचा जगण्याच्या अधिकाराचे सम्मान करतात. जियो और जीने दो या सिद्धांताचे पालन करतात. पण मानव जातीचे नकारात्मक विचार पृथ्वीवरील मानवाचे अस्तित्व ही संपवू शकतात. तूर्त सकारात्मक विचार करा. आनंदी रहा. आनंदी आणि निर्मितीत व्यस्त राहणाऱ्या कोशिका जीवनाची रक्षा करण्यास समर्थ आहेत. करोना काळात हा अनुभव अनेकांनी घेतला आहे.

प्रतिक्रिया

भागो's picture

7 Mar 2023 - 1:17 pm | भागो

पु ल देशपांडे ह्यांची आठवण करून दिलीत!

राघव's picture

7 Mar 2023 - 3:34 pm | राघव

बहुतेक सर्व आजारांमधे सायकोलॉजिकल भाग असतोच. व्यक्तीच्या मूळ स्वभावानुसार ह्याचा परिणाम होत असतो.
पण सकारात्मक विचार करायला सांगणं आणि ते मुळात करणं यात खूप फरक पडतो. कारण माझ्यासारखा सामान्य माणूस परिस्थितीनुसार आनंदी-दु:खी होत असतो. स्थितप्रज्ञतेकडे जायला अजून खूप अवकाश आहे!

मागे एक लेख लिहिला होता, त्यातील काही भाग येथे उद्धृत करावासा वाटतो -
-----------
आठवणी.. कितीही प्रयत्न केला तरी सामान्य माणूस थोडावेळ का होईना आठवणींत गुरफटतोच अधुन-मधुन! या आठवणी आपल्या आयुष्यात फार फार महत्त्वाची भूमिका बजावत असतात, सुप्त मनोवस्थेत.
जसं, कुणाला आपल्या लहानपणी मिळालेली वाईट वागणूक आठवणीत असते, सुप्त मनांत ती आठवण जागृत असते. त्यातून कुणी जगाप्रती अत्यंत कठोर बनतं तर कुणी अतिशय मृदु!

खरंच, आपण आपल्या छोट्याशा आयुष्यात काय केलं आजतोवर.. असा विचार करून बघीतलं तर..?
त्याही पलिकडे जाऊन, आपल्या आयुष्यातल्या चांगल्या/आनंदी आठवणी किती.. असा विचार केला तर?
सामान्यतः माणसाला आपल्या दु:खद आठवणी जास्त लक्षात राहतात. कारण सुप्त मनात त्या बर्‍यापैकी जागृत असतात. आनंदी आठवणी त्यामानानं कमी लक्षात राहतात. कमी जागृत असतात. पण म्हणजे, सुख-दु:खाचा समतोल हा नेहमी दु:खाच्या बाजूनंच कललेला असतो काय?

मला वाटतं सामान्यतः आनंदी घटनांना, त्या घडत असतांना, आपण पुरेसं recognize [मराठी?] करत नाही. जेवढं दु:ख आपण मनाला लावून घेतो, तेवढं महत्त्व आपण आनंदाला देत नाही. किंबहुना, दु:खच लक्षपूर्वक उपभोगल्या जातं.. सुख/आनंद तेवढ्या प्रमाणात नाही.
आता ज्या घटनांना, त्या घडत असतांनाच आपण तेवढं महत्त्व देणार नाही.. तर त्यांना सुप्त मन तरी कशाला तेवढं महत्त्व देईल? :-)

जर आनंदी/घटना प्रसंग. आपण जाणीवपूर्वक उपभोगले आणि दु:खी घटना/प्रसंग दुर्लक्षीत ठेवले तर...? हा दॄष्टिकोनातला बदल आहे आणि त्याला वेळ लागणारच. चांगलंच बघायचं वळण मनाला लावणं म्हणजे हेच असावं.. अर्थात् याचा अर्थ असा अजिबात नाही की दु:खद गोष्टी सरळ सोडून द्यायच्या.. पण मनाला त्यातूनही, जेवढं जमेल तेवढं, चांगलं काय ते शोधायला लावत राहायचं.
जरी अजूनही पुरेसं जमलेलं नाही तरीही, ही सवय खूप मोलाची ठरते एवढं मात्र मी स्वानुभवावरून सांगू शकतो.

जर असा बदल आपल्या दृष्टीकोनात आपल्याला करता आला तर, आयुष्य बरंच चांगलं होऊ शकेल.. आपलंही आणि आपल्या आजुबाजूच्या इतरांचंही, नाही?
---------
इत्यलम्

रोचक लेख. याविषयी दासबोधात काय सांगितले आहे, ते वाचायला आवडेल.

विवेकपटाईत's picture

9 Mar 2023 - 10:53 am | विवेकपटाईत

विचार मनात उठतात आणि समर्थांनी मनाला नियंत्रित करण्यासाठी मनाच्या श्लौकांची निर्मिती केली. पुढील भागात....

Bhakti's picture

7 Mar 2023 - 5:14 pm | Bhakti

सुरेख! आवडलं!
सकारात्मक वलय निर्माण होतं राहो.

सतिश गावडे's picture

8 Mar 2023 - 10:20 pm | सतिश गावडे

विश्वाची निर्मिती, मानवाची निर्मिती कशी झाली हे रहस्य अचूक उलगडणारा लेख.