दिवाळी अंक २०२२ - करण डिटेक्टिव्ह एजन्सी

सरिता बांदेकर's picture
सरिता बांदेकर in दिवाळी अंक
5 Nov 2022 - 10:46 pm

/* Global */
body {background-image:url(https://i.postimg.cc/Y06R0KZp/main-bg.png);color:#000;}
hr{border:0;border-top:1px solid #ddd;margin:20px 0}
/* Typography */
h1, h2, h3, h4, h5, h6 {font-family: 'Tiro Devanagari Marathi', serif;font-weight:500;text-shadow: 1px 1px rgb(0,0,0,0.2);} h1 {font-size:30px;} h2 {font-size:24px;}h5{font-size:16px;}
.col-sm-9 p, .field-item even p, .col-sm-9 li {font-family: 'Poppins', sans-serif; font-size:15px ! important;}
.col-sm-9 p {text-align:justify;} .samas {text-align: justify; text-indent: 16px;}
.first-letter { font-size: 200%; font-weight:700; color: rgba(2,90,93,2); text-shadow: 1px 2px rgb(0,0,0,0.3);}
/* System */
.navbar-fixed-top {background: radial-gradient(ellipse farthest-corner at left top, #FEDB37 0%, #FDB931 8%, #9f7928 30%, #8A6E2F 40%, transparent 80%), radial-gradient(ellipse farthest-corner at right bottom, #FFFFFF 0%, #FFFFAC 8%, #D1B464 25%, #5d4a1f 62.5%, #5d4a1f 100%);margin-bottom:36px;
border-bottom:1px solid #333;border-style: groove;box-shadow:0 2px 4px 0 rgba(0,0,0,.2) , 0 2px 5px 0 rgba(0,0,0,.19)}
.row {margin-top: 16px;}.col-sm-9{padding:16px;background-color: #FEFEFA;box-shadow:0 2px 4px 0 rgba(0,0,0,.2) , 0 2px 5px 0 rgba(0,0,0,.19)}
.node header {border-bottom: 1px solid #ff8000;}
.node-info, .node footer{padding:8px;border-left:4px solid #FF5F15;box-shadow:0 2px 4px 0 rgba(0,0,0,.16) , 0 2px 4px 0 rgba(0,0,0,.12);}
.node footer ul.links li{border:1px solid rgba(0, 128, 128, .2);background-color:#fff}
.panel-default>.panel-heading{color:#111;background-color:#FEFEFA;border-color:#333;border-bottom-color:#008080;}.panel{background-color:#fff} .region-sidebar-second .block-menu ul.menu > li {
border-bottom: 1px solid rgba(0, 128, 128, .2);}
.jumbotron{display:none} .input-group{display:none!important}
.page-header{
padding-top:16px!important;
text-align:center;border:
background-color: #50C878;
color: #ffffff;
animation-name: mipa;
animation-duration: 8s;
animation-delay: 0s;
animation-timing-function:ease-in-out;
animation-iteration-count: infinite;}
@keyframes mipa {
from {background-color: #0F52BA;}
to {background-color: #FF5F15;}
}
.field-items img{background-color:#fff;border:1px solid #eee;padding:6px;box-shadow:0 2px 5px 0 rgba(0,0,0,.16) , 0 2px 10px 0 rgba(0,0,0,.12);max-width:100%;height:auto!important}.author-type-posted,.field-items a:link{color:#600}
.nav > li > a {font-size:16px;} .col-sm-3 a, .panel-body p, .panel-body li {font-size:16px;font-family: 'Noto Sans',sans-serif;}
.navbar-header .logo > img { border-radius: 50%;}
/* bottom borders */
.node header, .nav-tabs, .nav-tabs > li.active > a, .nav-tabs > li.active > a:focus, .nav-tabs > li.active > a:hover {border-bottom: 1px solid #008080;}
.nav-tabs > li.active > a, .nav-tabs > li.active > a:focus, .nav-tabs > li.active > a:hover {color: #000;cursor: default;background-color: #fff;border: 1px solid #008080;border-bottom-color: transparent;}
.col-sm-9 a, .col-sm-3 a, .nav > li > a {color: #004d4d;} .nav-tabs {margin-top:48px;)}

स्टेफीला आज ऑफिसला पोहोचायला जरा उशीरच झाला. मुंबईतला पाऊस आणि लोकल ट्रेन हे नातं म्हणजे एक अजब रसायन होतं. लोकल ट्रेनला पाऊस अजिबात आवडत नाही. जरा जास्त पाऊस पडला की लगेच रुसून बसते. मग ट्रेनने जाणाऱ्या लोकांची मात्र पंचाईत होते. आज पाऊस तसा कमीच होता पण ट्रेन बाईंचा मूड पावसानं बिघडवला होता. त्यामुळे स्टेफीचा मूड खराब होता.
आणि केबिनमध्ये पाऊल टाकलं, तर केबिनमध्ये एक अनोळखी व्यक्ती बॉसच्या खुर्चीवर बसली होती.
स्टेफीची सेक्रेटरी मॅगी खुशीत होती. तिने कॉफीचा कप आणि ग्लूकोज बिस्किटबरोबर लाल गुलाबाचं एक फूल ट्रेमध्ये ठेवून केबिनमध्ये आणलं. तो ट्रे बघून स्टेफीने तिला विचारलं, “हे काय आहे मॅगी? हा माणूस कोण आहे? आणि तो बॅासच्या खुर्चीत का बसलाय? तू आधी हा ट्रे बाजूला ठेव आणि या माणसाला बाहेर काढ.”
“चिल मॅम, असं काय करता? हे आपले बॉस करण. करण डिटेक्टिव्ह एजन्सीचे सर्वेसर्वा. परत आलेत वर्ल्ड टूरवरून. ” मॅगीच्या आवाजात उत्साह सळसळत होता.
“व्हॉट? व्हॉट आर यू टॉकिंग? तुला माहीत आहे तू काय बोलतेयस? हा माणूस करण नाहीय.” स्टेफी जवळजवळ किंचाळली.
“अहो मॅम, असं कसं म्हणता तुम्ही हे करण नाहीत?” मॅगी स्टेफीला विचारत होती.
त्या दोघींचं हे बोलणं चालू असताना तो माणूस खूर्चीवरून उठला आणि स्टेफीजवळ आला.
“शांत हो डार्लिंग, मी जवळजवळ दोन वर्षं तुझ्यावर जबाबदारी टाकून फिरत होतो, म्हणून तुला राग येणं साहजिक आहे. पण आता तू काळजी करू नको. मी आहे, आपण ही एजन्सी एकदम फेमस करू. आणि मॅगी, ही अशीच आहे, एकदा रागावली की लवकर शांत होत नाही. तू जा, तुझं काम कर.” तो माणूस - जो स्वत:ला करण म्हणवत होता, तो मॅगीला म्हणाला.
त्याने शांतपणे केबिनचा दरवाजा उघडला. मॅगीला बाहेर घेऊन गेला आणि तिला नवीन कुठच्या केसेस आहेत, त्याच्या फाइल्स द्यायला सांगतल्या. मॅगी फाइल देईपर्यंत तिकडेच उभा राहिला.
इकडे स्टेफी विचार करत होती, आपण एक स्त्री असून ही एजन्सी काढली, तेव्हा आपल्याला केसेस मिळत नव्हत्या. मग डॅडनी सुचवलं, “तू एखादं पुरुषी नाव ठेव एजन्सीला. आणि तोच तुझा बॅास आहे, असं सगळ्यांना भासव आणि त्या खुर्चीचा वापर तू बसायला करू नकोस.”
म्हणून आपण हे काल्पनिक नाव ठेवलं एजन्सीला – ‘करण’
आणि तो काल्पनिक करण जग फिरायला गेला आहे आणि त्याची भटकंती झाली की तो परत येईल असं सगळ्यांना सांगत होतो. त्याच्या नावाने नियमितपणे ईमेल आपणच करत होतो.
मग आता हा करण कोण आणि कुठून आला? याला कुणी पाठवलं?
या तोतया करणला स्वस्थ बसणं मान्य नव्हतं. त्याने मॅगीने दिलेली फाइल घेतली आणि केबीनमध्ये येत स्टेफीला विचारलं, “स्टेफी, या गोडाऊनच्या मालकाची काय समस्या आहे?”
“हे बघ भल्या माणसा, हे माझं ऑफिस आहे. आणि ही माझी केस आहे, त्या केसचं काय करायचं, ती केस कशी सोडवायची ते मी बघून घेईन. तू आता इकडून गेला नाहीस तर मी पोलिसांना बोलवीन आणि तुझी कम्प्लेंट करीन तू तोतया आहेस म्हणून.” स्टेफी त्या माणसाला रागात म्हणाली.
“हे बघ स्टेफी, मी तोतया नाही. माझ्याकडे सर्व कागदपत्रं आहेत. मीच करण आहे, हे मी सिद्ध करू शकतो. त्यामुळे तुला पोलिसांना बोलवायचं असेल तर बोलव. पण एक लक्षात ठेव तू एक यशस्वी डिटेक्टिव्ह होऊ इच्छितेस ना, मग स्वत:ला पडलेले हे करणचं कोडं तू पोलिसांच्या मदतीने सोडवणार? तसा प्रयत्न केलास तर तुझ्याबद्दल, मॅगी आणि तुझे क्लायंट काय विचार करतील, याचा विचार कर.”
तो माणूस शांतपणे म्हणाला.
त्या माणसाचं बोलणं ऐकल्यावर स्टेफीला गप्प बसावंच लागलं. मॅगीने तिला आठवण करून दिली त्या गोडाउनच्या मालकाच्या अपॉइंटमेंटची.
मेहतांना संशय होता, त्यांच्या गोडाउनमध्ये रात्रीच्या वेळी काही तरी संशयास्पद घडतंय. पण कुणालाच काही कळत नव्हतं. पोलिसांनीसुद्धा हार मानली होती आणि पोलिसांचं म्हणणं होतं मेहतांच्या गोडाउनमध्ये काहीही संशयास्पद होत नाहीये.
मेहतांबरोबरची मिटिंग करणच्या केबिनमध्येच घ्यायची सूचना करणने मॅगीला केली होती.
मेहता आले. त्यांना घेऊन मॅगी करणच्या केबिनमध्ये आली.
“सर, हे मि. मेहता. आणि मि. मेहता हे करण सर. आजच वर्ल्ड टूरवरून आले आहेत. हे आता सर्व मिशन लीड करणार आहेत. मि. मेहता, तुम्ही चहा घेणार का कॉफी?” मॅगीने ओळख करून दिली आणि ती चहा-कॉफी आणायला निघून गेली.
“मि. मेहता, मी तुमची फाइल बघितली आहे. तुमचं गोडाउन तसं गजबजलेल्या वस्तीत आहे, म्हणजे तिकडे तसं काही बेकायदेशीर होत नसेल. तरी पण मी स्वत: आज रात्री तिकडे येऊन इन्स्पेक्शन करेन. बघू या काय हालचाली होतायत.”
करणशी सविस्तर बोलणं झाल्यामुळे मि. मेहता खूश झाले आणि आभार मानून निघून गेले.
स्टेफी त्या तोतयाला म्हणाली, “तू कोण आहेस मला माहीत नाही. पण एक गोष्ट सांगते, करणला कॉफी अजिबात आवडत नाही. पण तू तर सकाळपासून तीन कप कॉफी घेतलीस तरी तू म्हणतोस की तू करण आहेस?”
“हे बघ स्टेफी, मी तुझ्यासारखा नाहीये. कुणी प्रेमाने मला काही दिलं तर मला त्यांचं मन मोडवत नाही. आता तूच मॅगीला सांग की मी फक्त चहा पितो. मला तरी तिचं मन मोडवणार नाही. मी नाक बंद करून कॉफी पितोय. चहा मिळाला तर बरंच होईल.” तो तोतया म्हणाला.
यावर स्टेफीने बाहेर जात केबिनचा दरवाजा धाडकन बंद केला. मॅगीने तिच्याकडे प्रश्नार्थक नजरेने बघितलं. पण मॅगीला काही सांगून फायदा नव्हता, तिला त्या तोतया करणने चांगलंच इम्प्रेस केलं होतं. स्टेफीचा एक प्रयत्न फुकट गेला होता.
मेहतांच्या गोडाउनची व्हिजिट दोघांनी मिळून केली. सर्व गोडाउन नीट चेक केलं, पण काहीच संशयास्पद वाटलं नाही. गोडाउनमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कागद होते. कागदाचं वजन करायला एक वजन काटा होता. बाकी काहीही नव्हतं. शेवटी कुणाच्याही नकळत एक छुपा कॅमेरा लावला. त्यात काही हालचाल दिसत होती. पण काय ते कळत नव्हतं.
त्या तोतया करणने मेहतांना सांगितलं, “आज रात्री मी स्वत: गोडाउनमध्ये लपून बसणार.”
स्टेफीने सांगितलं, ”नाही तू एकटा नाही बसायचं, मीसुद्धा थांबणार तुझ्याबरोबर.”
संध्याकाळी गोडाउन बंद करताना मेहतांनी दोघांना आत बंद करून सर्व लाइट्स बंद केले. अंधारात इकडे-तिकडे करताना तोतया करणचा हात एका कागदाच्या गठ्ठ्यावर पडला. आणि त्याने स्टेफीला हाक मारली.
“स्टेफी, हे बघ मला काय सापडलंय. या कागदाला हात लाव, काही जाणवतंय का तुला?”
“नाही, मला काहीच जाणवत नाहीय. तू उगाच स्टंट करू नकोस.” स्टेफी वैतागून म्हणाली.
“अगं नीट स्पर्श कर. कागदाला स्पर्श करून झाला की याला स्पर्श कर” असं म्हणून त्याने १०० रुपयाची एक नोट स्टेफीच्या हातात दिली. दोन्ही कागदांचा स्पर्श सारखाच होता.
आता करणची खातरी झाली होती, आपल्याला कळलंय काय भानगड आहे. म्हणून त्याने खिशातून मोठा टॅार्च काढला आणि बघायला सुरुवात केली. दोन-तीन गठ्ठ्यांवर एक दिसेल न दिसेल अशी खूण होती. मग सगळं गोडाउन चेक केल्यावर एका कोपऱ्यात एक छोटंसं प्रिंटिग मशीन दिसलं. आता सगळं क्लिअर झालं होतं.
रात्रीच्या अंधारात इकडे बनावट नोटा छापल्या जात होत्या. स्टेफी आणि करणला कळलं होतं गोडाउनमध्ये काय चाललं होतं. पण कोण करत होतं ते शोधून काढायचं मोठं काम राहिलं होतं. दोन-तीन दिवस पाळत ठेवल्यावर मुख्य आरोपीसुद्धा सापडला.
तोतया करणने पहिलीच केस यशस्वीपणे सोडवली होती. मेहता खूश होते. पण स्टेफीचं टेन्शन वाढलं होतं.
आता स्टेफीने ठरवलं, तोतया करणने दुसरी केस सोडवून जम बसवायच्या आत आपण या करणचं कोडं सोडवायलाच पाहिजे.
स्टेफीने स्वत: एक क्लायंट करणकडे पाठवला. त्या माणसाला आपल्या बायकोबद्दल संशय होता. तो माणूस करणला भेटून स्वत:ची केस सांगायला लागला. तो माणूस तमिळमध्ये इतक्या भरभर बोलत होता की स्टेफीही चकीत झाली. स्टेफी आता त्या तोतयाकडे पहात होती. तिला वाटलं होतं तो त्या क्लायंटला हाताने थांबवेल आणि इंग्लिशमध्ये बोलायला सांगेल.
पण . . . पण. . .
त्या तोतयाने त्या क्लायंटला न थांबवता त्याच्याशी तमिळमध्ये बोलायला सुरुवात केली. तो बोलताना कुठेही अडखळत नव्हता. त्याने त्या क्लायंटच्या बायकोचे फोटो आणि फोन नंबर घेतला आणि सांगितलं, “लवकरच डिटेल रिपोर्ट देतो.”
क्लायंट गेल्यावर तो तोतया करण शांतपणे स्टेफीच्या केबिनमध्ये आला आणि त्याने मॅगीला दोन कॉफी आणायला सांगितली.
“हे बघ स्टेफी, तू माझ्या केबिनमध्ये कॅमेरा आणि माइक बसवला आहेस ते मला कळलंय. आणि असे खोटे क्लायंट पाठवून तू काहीही सिद्ध करू शकत नाहीस. मीच करण आहे, हे मी सिद्ध करू शकतो. त्यामुळे तू कामावर लक्ष केंद्रित कर, नाहीतर तुझंच नुकसान होईल.” एवढं बोलून त्याने शांतपणे कॉफी संपवली. जाता जाता मॅगीला एक फ्लाइंग किस दिला आणि कॉफीसाठी आभार मानले.
स्टेफीचा हाही प्रयत्न फुकट गेला. संध्याकाळी ऑफिस बंद करायच्या वेळेला इन्स्पेक्टर सावंत आले. स्टेफीने मॅगीला सांगितलं, “मॅगी, इ. सावंतना आत पाठव आणि दोन चहा पाठव.”
“पण मॅडम, इ. सावंतांची तर करण सरांबरोबर मिटिंग ठरलीय. ते कमिशनरसाहेबांचा काहीतरी मेसेज घेऊन येणार होते.” मॅगीने स्टेफीला सांगितलं. हे ऐकून स्टेफी जरा रागातच तोतया करणच्या केबिनमध्ये शिरली.
स्टेफीला बघताच दोघे बोलायचे थांबले. तोतया करण खुर्चीवरून उठला आणि त्याने स्टेफीचा हात धरून केबिनबाहेर नेलं.
“डार्लिंग, मला माहीत आहे आपल्याला मूव्हीला जायला वेळ होतोय. पण आमची मीटिंग लवकरच संपेल, मग आपण जाऊ या.”
करण शांतपणे स्टेफीशी बोलत होता.
पण केबिनबाहेर आल्यावर मात्र जरा जरबी आवाजात म्हणाला, “आणि तो माइक ऑन करायचं डेअरिंग करू नकोस. पस्तावशील.”
स्टेफीचा राग अनावर झाला होता, पण इ. सावंतांच्या समोर तमाशा नको, म्हणून ती गप्प बसली.
इ. सावंत गेल्यावर स्टेफीने करणला काही विचारायचा प्रयत्न केला, पण तो मॅगीला गुडनाइट म्हणून निघून गेला.
स्टेफीला कळतच नव्हतं, इ. सावंतना करणबद्दल कसं माहीत. स्टेफीने मॅगीला विचारलं, “तू कुणाकुणाला करण परत आल्याचं सांगितलयंस?”
“नाही मॅम, मी कुणालाच नाही सांगितलंय. पण इ. सावंतांनी मला फोन करून सांगितलं. त्यांना करण सरांना कमिशनर साहेबांचा निरोप द्यायचा आहे, म्हणून मी त्यांना सरांच्या केबीनमध्ये घेऊन गेले.” मॅगीने सांगितल्यावर स्टेफीने फक्त "ओ शिट्!" म्हटलं.
स्टेफीला कळतच नव्हतं आपण हा करण नाहीये, हे सिद्ध करण्यासाठी दोन प्रयत्न केले. ते फुकट गेले. पण मग इ. सावंतना कसं माहीत हा करण आहे? पोलिसांनी तर याला इकडे पाठवलं नाहीय?
विचार करून करून स्टेफीचं डोकं भणभणायला लागलं.
या चक्रव्यूहातून आपण कसं बाहेर पडणार आहोत? करण नावाचं कुणी नाही हे फक्त आपल्या फॅमिलीशिवाय कुणाला माहीत नाहीये. मॅगीलासुद्धा वाटतंय बॅासच्या ईमेल येतात, ते निरनिराळ्या ठिकाणी फिरल्यावर तिकडचे वर्णन करतात, फोटो पाठवतात.
हा सगळा विचार करत असताना स्टेफीच्या डोक्यात एक आयडिया आली.
नेहमीप्रमाणे आपण करणच्या ईमेलवरून ईमेल केला पाहिजे.
स्टेफीने लगेच लॅपटॉप काढला आणि ईमेल लॅागिन करायला घेतलं. पण स्टेफीला ईमेल लॉगिन करताच येत नव्हतं. 'चुकीचा पासवर्ड? हे कसं शक्य आहे? चुकीचा पासवर्ड कसा येईल?' मग स्टेफीने 'फरगॅाट पासवर्ड' केलं, पण रिकव्हरी मेल आलाच नाही. शेवटी स्टेफीने तो नाद सोडून दिला.
दुसऱ्या दिवशी स्टेफी ऑफिसमध्ये पोहोचली, तेव्हा तोतया करण स्टेफीची वाट बघत होता.
“यावं यावं मॅडम, काय प्रूव्ह करायचा प्रयत्न करत आहात? स्टेफी डार्लिंग, मी तुला सांगितलं ना, की तू काहीच प्रूव्ह करू शकणार नाहीस. मला माहीत होतं, तू माझा ईमेल वापरून मॅगीला काहीतरी सांगायचा प्रयत्न करशील, म्हणून मी माझ्या ईमेलचा पासवर्ड बदलला आहे. आणि पासवर्ड रिकव्हरी डिटेल आणि प्रश्नसुद्धा बदलले आहेत. तुला काहीच करता येणार नाही. मीच करण आहे हे सत्य तू स्वीकार. त्यातच तुझं भलं आहे.”
एवढं बोलून तोतया करण स्टेफीच्या केबिनमधून बाहेर पडला.
स्टेफीने आता ठरवलं थोडे दिवस गप्प बसायचं. त्याला असं वाटलं पाहिजे, करण म्हणून आपण त्याचा स्वीकार केला आहे. मग तो बेसावध असताना त्याचं बिंग उघडं पाडायचं. असंही मेहतांच्या केसची यशस्वीपणे उकल झाल्यामुळे, चांगली पब्लिसिटी झाली होती. खूप लोक विचारणा करत होते. आता हीच वेळ होती कामावर लक्ष द्यायची.
स्टेफीने मॅगीला विचारलं, “आज किती लोकांची इन्क्वायरी आहे?”
“मॅडम, खूप लोकांना अपॉइंटमेंट हवी आहे, पण मला करण सरांनी सांगितलं आहे, तुम्ही त्याच्या अचानक येण्याने जरा अस्वस्थ आहात. त्यामुळे तुम्ही जरा शांत झालात की नवीन केसेस घेऊ या.” मॅगी जरा उत्तेजित होऊन म्हणाली.
“ठीक आहे मी, मॅगी. थॅंक यू. आता जरा कामाकडे लक्ष देऊ या. खूप वेळ गेला आहे. ज्यांनी चौकशीचा फोन केला होता, त्यांना फोन करून अपॉइंटमेंट दे. आणि माझ्यासाठी एक स्ट्राँग कॉफी पाठव.” स्टेफी असं बोलत असतानाच तोतया करण स्टेफीच्या केबिनमध्ये शिरला. त्याच्या हातात ट्रेमध्ये कॉफी आणि सॅंडविचेस होते.
“कॉफी आणि सॅडविच तुझ्यासाठी. आता सलग मिटिंग आहेत. तुला लंचसाठी वेळ नाही मिळणार, म्हणून मी कॉफीबरोबर सॅंडविचसुद्धा आणलंय.” तोतया करण म्हणाला.
“मीटिंग लाइनआउट म्हणजे? कुणी मीटिंग ठरवल्यात? मॅगीला तर मी आत्ता सांगितलं. ”स्टेफी जरा चकित झाली होती.
“येस मॅडम, मी तुमचं काम बघते म्हणून करण सरांनी स्वत:साठी एक असिस्टंट ठेवलाय. मी विसरलेच तुम्हाला सांगायला, सॅारी. त्याने आजपासून काम चालू केलंय.” मॅगीने स्टेफीला सांगितलं.
“काय? आता त्याचा पगार कोण देणार?” स्टेफी जवळजवळ किंचाळलीच.
“कंपनीच देणार पगार. करण सरांचा असिस्टंट आहे म्हणजे कंपनीचा एम्प्लॉयी ना?” मॅगी म्हणाली.
स्टेफी करणच्या केबिनमध्ये शिरली, करण त्या वेळी आपल्या असिस्टंटला काही तरी सूचना देत होता. तिला काही न बोलता मागे फिरावं लागलं. दिवसभर मीटिंग्जमुळे स्टेफीला काही बोलता आलं नाही, पण संध्याकाळी ऑफिसमधून निघायच्या आधी स्टेफीने तोतया करणला सांगितलं, ”हे बघ, तू फारच गैरफायदा घ्यायला लागला आहेस. पण मी सिद्ध करीनच, तू करण नाहीस. आणि ज्या वेळेला मी सिद्ध करीन, त्या वेळी तू जेलमध्ये असशील सेक्शन ४२० खाली.”
“ठीक आहे. चॅलेंज स्वीकारलंय मी. मी करण आहे, हे सिद्ध करायला माझ्याकडे सर्व कागदपत्रं आहेत. त्यामुळे मी सेक्शन ४२० खाली जेलमध्ये जातो की तुला दंड होतो, मला बदनाम केल्याबद्दल, ते बघू या.” करण शांतपणे म्हणाला.
स्टेफी विचार करत होती आता आपण काय करावं म्हणजे हा करण तोतया आहे हे सिद्ध करता येईल? इतक्या अवघड केसेस सोडवल्या, पण आपलीच बाजू खरी आहे हे आपल्याला सिद्ध करता येत नाहीये. स्टेफीला एवढं हताश वाटत होतं. तिचे मॅाम, डॅड मात्र तिला शांत राहायला सांगत होते. डॅड तिला सांगत होते, “तोतया किंवा खरा, करणच्या येण्याने तुला फायदाच झाला आहे. थोडे दिवस जाऊ देत, तुला त्याची सवय होऊन जाईल.”
स्टेफी बॅंकेत गेली, तेव्हा तिला आणखी एक धक्का बसला. त्या तोतया करणने कंपनी अकाउंटमध्ये स्वत:चं नांव ॲड करून घेतलं होतं. आता चेकवर त्याची सही चालणार होती.
“तुम्ही माझ्या संमतीशिवाय करणची सही कशी ॲड केलीत?” स्टेफीने मॅनेजरना विचारलं.
“स्टेफी मॅडम, तुमच्या कंपनी पेपरवर मालक म्हणून त्यांचंसुद्धा नांव आहे. त्यांनी सगळी कायदेशीर कागदपत्रं दिली आणि साक्षीदार म्हणून कमिशनरसाहेबांनी सही केली. मग आम्ही काय करणार? आम्हाला त्यांचे नांव ॲड करावंच लागल.” मॅनेजरने स्वत:ची बाजू मांडली.
“अहो, पण मी मेन अकाउंट होल्डर असल्यामुळे तुम्ही मला इन्फॅार्म करायला पाहिजे होतं.” स्टेफी म्हणाली.
“होय, बरोबर आहे तुम्ही म्हणताय ते. पण जेव्हा पोलीस कमिशनर जबाबदारी घेतात, तेव्हा आम्हाला विश्वास ठेवावाच लागतो.” मॅनेजर म्हणाले.
“पण बॅंक अकाउंटचा पोलीस कमिशनरशी काय संबंध? तुम्हाला संशय नाही आला?” स्टेफीने जरा रागातच विचारलं.
“अहो, प्रायव्हेट डिटेक्टिव्हचं अकाउंट म्हणून कमिशनरसाहेबांनी दखल घेतली असेल, असं मला वाटलं. तुमच्या व्यवसायामुळे एकमेकांची मदत होत असेल, असं वाटलं. म्हणून तुम्हाला नाही सांगितलं.” मॅनेजरनी स्वत:ची सफाई दिली.
स्टेफीच्या लक्षात आलं, या मॅनेजरशी बोलून काहीच फायदा नाहीय. ती बॅंकेतून निघाली. तसं त्या तोतया करणने बॅंकेतून पैसे काढले नव्हते. पण परत प्रश्न तोच होता. हा कोण होता? याला काय पाहिजे आणि हा स्वत:ला करण का म्हणवतोय?
पोलीस कमिशनरसाहेब तरी असे सहजासहजी फसणार नाहीत. एजन्सी चालावी, म्हणून मालक करण आहे, असा एजन्सी बनाव केलाय तो आपल्या अंगलट तर येणार नाही? स्टेफी बॅंकेतून निघाल्यावर ऑफिसला गेलीच नाही. ती एका बागेत बसून विचार करत राहिली.
दुसऱ्या दिवशी जी स्टेफी ऑफिसला पोहोचली, ती वेगळीच होती. तिने निश्चय केला होता. ती आता त्या तोतया करणशी व्यवस्थित वागणार होती. ती करणशी व्यवस्थित वागून त्याला बेसावध ठेवणार होती. त्याच्या नकळत त्याची माहिती काढून घ्यायचा निश्चय तिने केला होता. तिचा आविर्भाव बघून मॅगीसुद्धा खूश झाली. आता दोन्ही बॅासचं आपसात तूतू-मैमै होणार नव्हतं.
तो तोतया आल्यापासून केसेसचा पाऊस पडत होता. स्टेफीने स्वत:ला कामामध्ये झोकून दिलं. तिलाही नवीन नवीन अनुभव मिळत होता. एकदा तिची आणि कमिशनरसाहेबांची कामानिमित्त मिटिंग झाली.
त्यांनी जाता जाता स्टेफीला विचारलं, ”स्टेफी मॅडम, आता तुमच्या दोघांमध्ये जे गैरसमज होते, ते दूर झाले का?”
“गैरसमज? आमच्या दोघांमध्ये कुठे गैरसमज होते?” स्टेफीने जरा सावधपणे विचारलं.
“तुम्ही त्यांच्यावर रागावला होतात ना, ते एकटेच फिरायला निघून गेले म्हणून. मग तुम्ही करण सरांचे सगळे ओरिजिनल आयडी प्रूफ लपवून ठेवले होते, म्हणून त्यांना दुसरे करून पाहिजे होते. आणि त्यांना सर्व आयडी प्रूफ ओरिजिनल पाहिजे होते. मग मी त्यांना सर्व आयडी नवीन बनवून दिल्या.” कमिशनर म्हणाले.
“अच्छा! ते होय! मी दिले त्यांचे ओरिजिनल आय.डी. पेपर त्यांना. काळजी करू नका. ” स्टेफीने शांतपणे सांगितलं.
पण कमिशनरसाहेब गेल्यावर स्टेफी विचार करत होती, या तोतयाला कसं कळलं, आपण एक काल्पनिक नाव घेऊन एजन्सी चालू केलीय. ही गोष्ट आपल्या डॅडनी सुचवली होती आणि समोर मॅाम होती. मॅगीलासुद्धा माहीत नाहीय, करण काल्पनिक आहे. आपल्याला आता डॅड आणि मॅामच्या हालचालींवर लक्ष केंद्रित करायला पाहिजे.
स्टेफीने मॅामला फोन केला, “मॅाम, आज माझं काम जरा लवकर संपणार आहे. मी टेबल बुक केलंय. तुम्ही दोघं रात्री आठ वाजता होरायझनला पोहोचा. मी डायरेक्टली तिकडे येईन.”
डिनरच्या वेळी स्टेफी खूप खूश होती. मेरीने विचारलं, “काय स्टेफी, खूश दिसतेयस? बिझनेस एकदम जोरात चालू आहे ना? म्हणून हे डिनर प्लॅन केलंस का?”
“नो मॅाम, हे डिनर असंच. खूप दिवसांत आपण तिघं शांतपणे गप्पा मारल्या नव्हत्या. म्हटलं, तुला जरा सुट्टी आणि डॅडला भरपूर बिअर पिता येईल, नॅानव्हेज प्लॅटरबरोबर.”
“होय. बिअर आणि अनलिमिटेड प्लॅटर, तुझे डॅड खूश असणारच.” मेरी म्हणाली.
थोडं पेयपान झाल्यावर लुईंनी विचारलं, “काय स्टेफी, बॅास कसा आहे?”
“किती दिवसांनी आपण एकत्र बसलोय. सो नो बिझनेस टॅाक्स.” मेरीने लुईला मध्येच अडवलं. पण लुई खूश होता.
“मेरी, तुझे रूल्स इकडे नको. आज मस्त जेवण आहे, बरोबर स्टेफी आहे. खरं तर आपण आज शॅंम्पेनची बॅाटल ओपन करायला पाहिजे होती.” लुईनी मेरीला बजावलं.
पण मेरी सारखं लुईला अडवत होती. जास्त बोलायला देत नव्हती. मेरीला माहीत होतं, दोन बीअर पोटात गेल्यावर लुईला आपण काय बोलतोय याचं भान राहत नाही. याचाच फायदा खरं तर स्टेफीला घ्यायचा होता. पण मेरी एकदम लक्ष ठेवून होती. तिने लुईला जास्त बोलूच दिलं नाही. त्यामुळे डिनर संपेपर्यंत स्टेफीला काहीच क्लू मिळाला नाही. पण स्टेफीच्या एक गोष्ट लक्षात आली होती, मॅाम टेन्शनमध्ये होती. ती डॅडला जास्त बोलण्यापासून रोखत होती. नक्कीच कुठेतरी पाणी मुरतंय.
दुसऱ्या दिवशी ऑफिसला गेल्यावर स्टेफीने सहज विचारल्यासारखं करत मॅगीला विचारलं, ”करण सर आले नाहीत का?”
“नाही ना अजून. आज त्यांना शाळेत जायचं आहे. त्यांच्या मुलीचा इंटरव्ह्यू आहे आज शाळेत ॲडमिशनसाठी. ”मॅगी म्हणाली.
“ओह! असं का!” स्टेफीने विषय जास्त वाढवला नाही.
अच्छा, म्हणजे हा तोतया विवाहित आहे तर. पण नक्की इकडे असं तोतया म्हणून येण्याचा याचा उद्देश काय असेल? त्याची सही बॅंकेत दिल्याला आता सहा महिने होऊन गेले आहेत. पण तशी काही गडबड झाली नव्हती.
स्टेफीच्या एक लक्षात आलं होतं लुई आणि मेरी यांचे फोन चेक करून काही मिळणार नाही. त्या दोघांचे सोशल मीडिया अकाउंट हॅक केलं, तर नक्कीच काही तरी मिळेल. आता तेच करायला पाहिजे हे स्टेफीच्या पक्कं लक्षात आलं. स्टेफीने लुईचं सोशल मीडिया अकाउंट हॅक केलं पण काहीच मिळालं नाही. मेरीचं तर सोशल मीडियावर अकांउंटच नव्हतं. मग स्टेफीने लॅपटॅापच हॅक केला. आता त्या लॅपटॅापवर काहीही हालचाल म्हणजे ॲक्टिव्हिटी झाल्या की लगेच कळणार होतं.
दोन दिवस शांततेत गेले. आणि एक मेल आला. तो तोतया करणने पाठवला होता लुईला. पण लुईचं इमेल अकाउंट वेगळंच होतं. त्या तोतया करणने कळवलं होतं, मुलीची ॲडमिशन झाली आणि फ्लॅटचं पझेशन मिळालंय.
स्टेफीला हे जरा विचित्र वाटलं. डॅड माझ्यापासून काय लपवतायत? त्यांना का म्हणून तो तोतया करण जवळचा वाटू लागला? त्याच्याशी संपर्क करायला डॅडनी वेगळा मेल आयडी बनवलाय.
स्टेफीने तो मेल आयडी हॅक केला, तेव्हा तिच्या लक्षात आलं की आपली फसवणूक आपल्याच मॅाम, डॅडनी केलीय. गेले दोन वर्ष डॅड आणि तो तोतया यांचं मेलवरून काँटॅक्ट आहे. पण डॅडना वेगळं मेल आयडी का काढावं वाटलं? स्टेफीचा राग अनावर झाला होता. पण रागात असताना कुणालाही काही विचारून उपयोग नव्हता.
ती राग शांत होईपर्यंत एकटीच ऑफिसमध्ये बसून राहिली.
दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये पोहोचल्यावर तिने त्या तोतया करणला सांगितलं, “आज एक महत्त्वाची मीटिंग आहे. लंच टाइममध्ये.” मग मॅगीला अर्ध्या दिवसाची सुट्टी दिली आणि लुईला फोन करून मॅामला घेऊन ऑफिसमध्ये बोलावलं. सगळं सेट झालं होतं. आता वेळ आली होती सगळं खरं-खोटं करण्याची.
मॅगी हाफ डे मिळाल्यामुळे ती खूश होती. त्यामुळे तिने जास्त काही विचारलं नाही आणि सॅंडविचेसची ऑर्डर देऊन ती घरी निघून गेली.
मॅाम,डॅड आल्यावर स्टेफी त्यांना घेऊन कॉन्फरन्स रूममध्ये गेली आणि तोतया करणला बोलवून घेतलं.
“डॅड, तुम्ही या माणसाला आधीपासून ओळखता का?” करण आत आल्यावर स्टेफीने सरळ विषयाला हात घातला.
“हे बघ स्टेफी, ...” करणने बोलायचा प्रयत्न केला. पण त्याला हातानी थांबवत स्टेफी म्हणाली, “हे बघ, मी तुझ्याशी बोलणार आहेच. पण त्याआधी मला माझ्या मॅाम, डॅडकडून काही उत्तरं पाहिजे आहेत. आणि मी जे काही विचारणार, ते तुम्हा तिघांना समोरासमोर विचारणार.” स्टेफी म्हणाली.
“हे बघ स्टेफी, तुला काय म्हणायचय मला माहीत नाही.” लुईने बचावात्मक पवित्रा घेतला.
“डॅड, तुमचं दुसरं ईमेल अकाउंट मी हॅक केलंय आणि सर्व ईमेल वाचलीयत.” स्टेफीने स्पष्ट सांगितलं.
“होय अंकल, सांगायला पाहिजे तिला खरं काय आहे.” तोतया करणने लुईला सांगितलं.
“ओके, ओके. ऐक - हा भूषण, भूषण सदानंद मोहिते. हा मिलिटरी इंटेलिजन्समध्ये होता. शॅार्ट सर्व्हिस कमिशनमधून रिटायर झालाय. हा रिटायर व्हायच्याआधी एकदा असाच याचा बाप मला भेटला होता. मग मुलं काय करतात यावर चर्चा झाली. तू मुलगी असून प्रायव्हेट डिटेक्टिव्ह एजन्सी चालवतेस हे कळल्यावर खूप खूश झाला. तुला भेटायला येणार होता. पण ते जमलंच नाही. नंतर तुला मुलगी म्हणून जास्त क्लायंट मिळत नाहीत, म्हणून आपण पुरुषी नाव घेतलं.
सदानंद मला नेहमी तुझ्याबद्दल विचारायचा. मी त्याला या करण नाव घेतल्याची आयडिया सांगितली. त्याला ती आवडली. भूषण रिटायर झाल्यावर त्यालाही डिटेक्टिव्ह एजन्सी काढायची होती. मग मला सदानंदने विचारलं, तुला तुझ्या फर्ममध्ये पार्टनर चालणार आहे का? पण मला तुझी मतं माहीत होती. तुला कुणी पार्टनर नको होता. आणि पुरुष तर अजिबात नको होता. तुला सिद्ध करायचं होतं, की मुलीसुद्धा हे काम चांगल्या तऱ्हेने करू शकतात. पण मग मी आणि सदानंदने विचार केला, यालाच करण म्हणून आणू या. मग दोघांच्या फायद्यासाठी हा निर्णय झाला. भूषणला करण म्हणून आणायचं. नंतर बघू काय होतं. लकीली भूषण करण बनून आला आणि बिझनेस खूप वाढला. पण नंतर तुला हे सगळं सांगण्याची हिम्मत झालीच नाही.”
लुई बोलत असताना स्टेफी रागाने लाल झाली होती.
“अंकल, मला वाटतं आपण स्टेफीला एकटं सोडू या थोडा वेळ.” करण.. नाही, भूषण लुईला म्हणाला आणि दोघांना घेऊन आपल्या केबिनमध्ये गेला.
स्टेफी थोड्या वेळाने कुणालाही न सांगतां ऑफिसमधून निघून गेली. ती रात्री खूप उशिरा घरी आली आणि कुणाशीही काहीही न बोलता रूममध्ये गेली.
दुसऱ्या दिवशी स्टेफी ऑफिसला आली, तेव्हा भूषण तिची वाट बघत तिच्या केबिनमध्येच थांबला होता. स्टेफी आल्यावर त्याने मॅगीला कॉफी आणायला सांगितलं.
“मॅगी, आम्हाला दोघांना कुणाचेही फोन देऊ नकोस आणि आम्ही सांगेपर्यंत कुणाला आत पाठवू नकोस.” स्टेफीने मॅगीला सांगितलं.
“हे बघ, करण.. का भूषण म्हणू तुला? तू माझ्या डॅडबरोबर मिळून जे काही केलंस, ते माझ्या भल्यासाठी केलंय म्हणून मी तुम्हाला दोघांनीही माफ करते. तू एजन्सीमध्ये आल्यापासून एजन्सीला फायदाच झालाय. त्या सर्वांचा विचार केला, तर आपण ही ॲरेंजमेंट चालू ठेवू या. आपल्याला कायदेशीर पार्टनरशिप डीड करावं लागेल. पण या सहा-सात महिन्यात तू तोतया आहेस हे कसं सिद्ध करायचं, याचा मला जो मानसिक त्रास झाला, त्यासाठी मी तुम्हा दोघांना कधीच माफ करणार नाही.” स्टेफीने स्पष्ट शब्दांत आपली भूमिका मांडली.
“स्टेफी, मानलं मी तुला. इतक्या महिन्यांनी का होईना, पण तू सिद्ध केलंस मी तोतया करण आहे. मी तुला माझी गुरू मानतो. आणि खरंच तुला या मस्क्युलाइन म्हणजे पुरुषी नावाची काही गरज नव्हती. थोडा वेळ लागला असता, पण तुझी ही एजन्सी नक्कीच नावारूपाला आली असती. मी आणि अंकलनी तुझ्या क्षमतेवर अविश्वास दाखवला आणि आम्ही हा निर्णय घेतला. याला आमचा पुरुषी अहंकार समज आणि जमलं तर आम्हाला माफ कर. माझी मुलगीसुद्धा तुझ्यासारखीच स्ट्राँग करिअर वूमन व्हावी यासाठी मी प्रयत्न करीन.” भूषण म्हणाला.
“आता तरी मी कुणालाच माफ करण्याच्या मन:स्थितीत नाहीये. बघू या, थोडा काळ जाऊ देत. मग बघू या, सध्या तरी आपण पार्टनरशिप डीडवर लक्ष केंद्रित करू या. एक नक्की सांगते, तू आल्यानंतर खरंच एजन्सीला खूप फायदा झाला. मला कधी अडचण आली तर सोडवायला कुणीतरी होतं.” स्टेफी म्हणाली आणि उठून तिने भूषणबरोबर हँडशेक केला. दोघांच्या नवीन पार्टनरशिपवर शिक्कामोर्तब केलं.
दोघांनी मिळून ठरवलं, करण डिटेक्टिव्ह एजन्सीला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवायचं आणि ती उंची एका पुरुषामुळे गाठली की एका स्त्रीमुळे, हा विचार गौण असेल.
करण डिटेक्टिव्ह एजन्सीचं यश हे जितकं करणचं.. सॉरी, भूषणचं असेल तेवढंच स्टेफीचंही असेल.

प्रतिक्रिया

कंजूस's picture

6 Nov 2022 - 5:08 am | कंजूस

कथा चांगली जमली आहे.

ॲबसेंट माइंडेड प्रोफेसर's picture

6 Nov 2022 - 10:29 am | ॲबसेंट माइंडेड ...

छान आहे कथा. आवडली.

सरिता बांदेकर's picture

7 Nov 2022 - 9:21 pm | सरिता बांदेकर

धन्यवाद,
कंजूसजी,ॲबसेंट माईंडेड

मुक्त विहारि's picture

7 Nov 2022 - 10:35 pm | मुक्त विहारि

अपेक्षित शेवट

सरिता बांदेकर's picture

8 Nov 2022 - 6:48 pm | सरिता बांदेकर

धन्यवाद मुविजी

सस्नेह's picture

9 Nov 2022 - 3:22 pm | सस्नेह

जमलीय कथा.

एखाद्या घटनेमागचे गूढ/रहस्य उकलणे हाच जिचा पेशा आहे अशा व्यक्तीच्या आयुष्यातच अनपेक्षितपणे रहस्यमय घटना घडणे हे ह्या कथेचे वैशिष्ट्य मला आवडले!
कथा चांगली जमली आहे 👍 पुढील लेखनास शुभेच्छा!

सरिता बांदेकर's picture

10 Nov 2022 - 2:52 pm | सरिता बांदेकर

धन्यवाद,
त्या जोडीने सोडवलेल्या केसेस् आहेत.
नंतर पोस्ट करेन.

उत्कंठावर्धक मालिकेचं पोटेन्शियल आहे यात..

कर्नलतपस्वी's picture

10 Nov 2022 - 6:05 pm | कर्नलतपस्वी

बाकीच्या डकवा. वाचायला नक्कीच आवडेल.

Jayant Naik's picture

11 Nov 2022 - 5:33 am | Jayant Naik

गुप्त हेराच्या जीवनातील रहस्य. कथा उत्तम झाली आहे.

विजुभाऊ's picture

11 Nov 2022 - 7:03 am | विजुभाऊ

मस्त आहे कथा.

सौंदाळा's picture

11 Nov 2022 - 10:47 am | सौंदाळा

कथा आवडली.

श्वेता२४'s picture

11 Nov 2022 - 11:27 am | श्वेता२४

त्यांनी सोडविलेल्या केसेस ची मालीका वाचायला नक्की आवडेल.

पॉइंट ब्लँक's picture

11 Nov 2022 - 6:13 pm | पॉइंट ब्लँक

छान जमली आहे कथा. जगाची कोडी सोडावनाऱ्या व्यक्तीच्या आयष्यात कोडं निर्माण झाले, ही कल्पना आवडली.

पॉइंट ब्लँक's picture

11 Nov 2022 - 6:14 pm | पॉइंट ब्लँक

छान जमली आहे कथा. जगाची कोडी सोडावनाऱ्या व्यक्तीच्या आयष्यात कोडं निर्माण झाले, ही कल्पना आवडली.

पॉइंट ब्लँक's picture

11 Nov 2022 - 6:14 pm | पॉइंट ब्लँक

छान जमली आहे कथा. जगाची कोडी सोडावनाऱ्या व्यक्तीच्या आयष्यात कोडं निर्माण झाले, ही कल्पना आवडली.

सरिता बांदेकर's picture

12 Nov 2022 - 10:03 am | सरिता बांदेकर

धन्यवाद,
तुषार काळभोरजी,कर्नल तपस्वीजी,जयंत नाईकजी,विजूभाऊजी,सौंदाळाजी,श्वेताजी,पॅाईंट ब्लॅंकजी तुम्हा सर्वांचे धन्यवाद.
लोकांचे दिवाळी अंक वाचून होऊ देत मग टाकते हळू हळू.

योगी९००'s picture

12 Nov 2022 - 11:56 pm | योगी९००

फार छान.. आवडली कथा..!!

मुख्य नायिका व तिच्या फॅमिलीची नावे व सेक्रेटरीचे नाव ख्रिश्चन घ्यायचे प्रयोजन काय? त्यामुळे मला सुरूवातीला भाषांतर असावे असे वाटत होते. अर्थात तसे ठेवायला माझी हरकत नाही. शेवटी उगाच भुषणला तिच्या प्रेमात वगैरे किंवा त्यांचे जमले आहे असे काही न दाखवता दोघे बिझनेस पार्टनर म्हणून रहातात असे लिहील्याने चांगले वाटले.

सरिता बांदेकर's picture

13 Nov 2022 - 9:12 pm | सरिता बांदेकर

प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
तुमचा ख्रिश्चन नांवाबद्दलचा प्रश्नाचं ऊत्तर
मला एक तर कथा सुचते पण नायक, नायिकांना नांव काय द्यायचे हेच कळत नाही मग त्यातच बरेच दिवस जातात.
मी १९८० साली एका प्रसिद्ध डिटेक्टीव्ह एजंन्सी मध्ये इंटरव्ह्यू दिला होता.तेव्हा त्या मेन डिट्क्टीव्हने मला रिजेक्ट करायच्या आधी त्याच्या स्टाफची ओळख करून दिली. त्या सगळ्या मुली ख्रिश्चन होत्या.आणि मला रिजेक्ट करायचं कारण होतं, त्याला तशा मॅाडर्न मुली पाहिजे होत्या.
म्हणून मी ख्रिश्चन नांव घेतले.

आणि मी फक्त एकच धर्म मानते तो म्हणजे मनुष्यधर्म

कृपया या साध्या साध्या गोष्टीमध्ये धर्म आणू नये.

शेक्सपिअरनी सुद्धा सांगितलं आहे नांवात काय आहे.

स्मिताके's picture

17 Nov 2022 - 5:39 pm | स्मिताके

त्या ठिकाणी नोकरी मिळाली नाही, पण मग दुसरीकडे त्या स्वरूपाचं काम केलं होतं का?
म्हणजे या कथा स्वानुभवावर आधारित आहेत का? सहज कुतुहल म्हणून विचारते.

सरिता बांदेकर's picture

13 Nov 2022 - 9:12 pm | सरिता बांदेकर

प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
तुमचा ख्रिश्चन नांवाबद्दलचा प्रश्नाचं ऊत्तर
मला एक तर कथा सुचते पण नायक, नायिकांना नांव काय द्यायचे हेच कळत नाही मग त्यातच बरेच दिवस जातात.
मी १९८० साली एका प्रसिद्ध डिटेक्टीव्ह एजंन्सी मध्ये इंटरव्ह्यू दिला होता.तेव्हा त्या मेन डिट्क्टीव्हने मला रिजेक्ट करायच्या आधी त्याच्या स्टाफची ओळख करून दिली. त्या सगळ्या मुली ख्रिश्चन होत्या.आणि मला रिजेक्ट करायचं कारण होतं, त्याला तशा मॅाडर्न मुली पाहिजे होत्या.
म्हणून मी ख्रिश्चन नांव घेतले.

आणि मी फक्त एकच धर्म मानते तो म्हणजे मनुष्यधर्म

कृपया या साध्या साध्या गोष्टीमध्ये धर्म आणू नये.

शेक्सपिअरनी सुद्धा सांगितलं आहे नांवात काय आहे.

स्मिताके's picture

14 Nov 2022 - 10:33 pm | स्मिताके

मस्त आहे तुमची एजन्सी. आणखी भाग येणार हे वाचून आनंद झाला.

अजून गोष्टी वाचायला आवडतील

श्वेता व्यास's picture

16 Nov 2022 - 11:20 am | श्वेता व्यास

मस्त जमली आहे कथा.
आधी वाटलं मॉमडॅड नी स्टेफीच्या लग्नासाठी कोणाला आणलं असेल.
करण डिटेक्टिव्ह एजन्सीच्या रहस्यकथा वाचायला नक्कीच आवडेल.

सरिता बांदेकर's picture

17 Nov 2022 - 2:35 pm | सरिता बांदेकर

धन्यवाद,
स्मिताके,सुखी, श्वेता व्यास प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
साधारण जाने.पासून टाकते एक एक.
तोपर्यंत लोकांचे दिवाळी अंक वाचून होतील.

आलो आलो's picture

17 Nov 2022 - 3:07 pm | आलो आलो

छानच लिहिलिये .... पु भा शु

अथांग आकाश's picture

19 Nov 2022 - 11:25 am | अथांग आकाश

मस्त कथा!

त्या जोडीने सोडवलेल्या केसेस् आहेत.

अन्य केसेस् वाचायला आवडेल!!
.

सरिता बांदेकर's picture

19 Nov 2022 - 11:30 am | सरिता बांदेकर

धन्यवाद,
आलो,आलो.अथांग आकाश
प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

शेर भाई's picture

19 Nov 2022 - 6:34 pm | शेर भाई

उत्कंठावर्धक आहे, शैली ओघवती आहे.
पण मला बाबा थोडी लवकर आटपल्या सारखी वाटली.

सरिता बांदेकर's picture

20 Nov 2022 - 9:08 pm | सरिता बांदेकर

धन्यवाद,शेरभाई.
जास्त लांबवली तर रटाळ झाली असती.
पुढे येतायत त्यांनी सोडवलेल्या केसेस्.

गोरगावलेकर's picture

21 Nov 2022 - 12:30 pm | गोरगावलेकर

रहस्य कथा वाचायला आवडतात. येऊद्या अजून

क्या बात! शेवटपर्यंत अनेक वळणे घेत गुंतवून ठेवलं रहस्य कथेने.स्टेफी आवडली.

पर्णिका's picture

22 Nov 2022 - 4:04 am | पर्णिका

छान आहे कथा !
करण डिटेक्टिव्ह एजन्सीची एखादी 'स्पेशल केस' ही येऊ दे.

सरिता बांदेकर's picture

22 Nov 2022 - 9:00 pm | सरिता बांदेकर

धन्यवाद,
गेरगावलेकर,भक्ती,पर्णिका तुम्हा सर्वांचे प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

सरिता बांदेकर's picture

22 Nov 2022 - 9:00 pm | सरिता बांदेकर

धन्यवाद,
गेरगावलेकर,भक्ती,पर्णिका तुम्हा सर्वांचे प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

सरिता बांदेकर's picture

22 Nov 2022 - 9:00 pm | सरिता बांदेकर

धन्यवाद,
गेरगावलेकर,भक्ती,पर्णिका तुम्हा सर्वांचे प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

नूतन सावंत's picture

4 Dec 2022 - 1:57 pm | नूतन सावंत

छान आहे कथा,आवडली.प्रसिद्ध गुप्तहेर रजनी पंडित या स्त्री गुप्तहेर असून अतिशय गुंतागुंत असलेल्या केसेस त्यांनी सोडवल्या आहेत.त्याबद्दल त्यांनी लिहिलेसुद्धा आहे.त्यांना प्रत्यक्ष पाहिलं असल्याने कथेचा पाया कमकुवत वाटला,की फक्त स्री गुप्तहेर असला तर केसेस मिळत नाही.बाकी सर्व ठीक आहे.पुढच्या कथा वाचायला आवडतील.

सरिता बांदेकर's picture

8 Dec 2022 - 4:20 pm | सरिता बांदेकर

धन्यवाद नूतन सावंत.

Nitin Palkar's picture

11 Dec 2022 - 8:15 pm | Nitin Palkar

कथा उत्कंठावर्धक आहे. शेवट घाईत केल्यासारखा वाटला. पुढील कथांची वाट पाहतो.

सरिता बांदेकर's picture

15 Dec 2022 - 5:13 pm | सरिता बांदेकर

धन्यवाद,नितीन पालकर.