जुन्नर भटकंती-१

Bhakti's picture
Bhakti in जनातलं, मनातलं
28 Oct 2022 - 2:30 pm

तसा घरून निघायला‌ उशीरच झाला.राष्ट्रीय महामार्ग ६१ ला‌ पोहचलो.हा रस्ता खुप चांगला असल्याने या‌ मार्गाचे प्रवास आवडतात.पिवळ्या फुलांनी बहरलेल्या मार्गांना‌ मागे टाकत जुन्नरच्या दिशेने निघालो.

जुन्नर सुरू होताच खोडद गावातील रेडिओ दुर्बीण दुरुन नजरेस पडते.१९९० साली पुणे जिल्ह्यातील खोडद(ता.जुन्नर) गावात मीटर तरंगलांबीची महाकाय रेडिओ दुर्बीण उभारण्यात आली.

कित्येक दिवसांपासून नाणेघाट पाहायची इच्छा फलद्रूप होणार होती.सातवाहन‌ काळातील मार्ग जो डोंगर फोडून व्यापारासाठी अंदाजे इसपु.२३०ला बनवला गेला(इतरत्र वाचलेल्या माहितीनुसार)

नाणेघाटाला पोहचल्यावर पहिल्यांदा जो रांजण दिसला‌ ज्याचा वापर त्याकाळी वाटसरुच्या पाण्यासाठी केला‌ जात.या अशा‌ पुरातन‌ वस्तूंना स्पर्श करताच काळाचे कंकण गळून पडतात,काळ हा खरा नसुन जीवन जगणं हे मापक आहे असं काहीतरी वाटतं.

जुन्नर मार्गे आल्याने नाणेघाटाच्या शिखरावर होतो.एक चिंचोळी दरी, खाली उतरण्यास पावसाच्या पाण्याने गुळगुळीत झालेल्या पायर्या . जरा भीतीच वाटत होती.१५ मिनिटांत डावीकडे एक सातवाहन काळातील गुहा खोदलेली आहे.ज्यात ब्राम्ही लिपीतील सातवाहन कुळाचा गौरव असलेले शिलालेख आढळतो.मार्ग जरा कठीणच वाटला .घोडे कसे दरीतून चढत उतरत‌ असतील याच आश्चर्य वाटले.

तसेच पाणतेरडा,कोळसुंद आणखिन‌ एका पर्पल फुलांचे सौंदर्य नव्याने पहिले.

जरा निवांत त्या ऐतिहासिक पायर्यांवर बसून उगाच सार्थक, अभिमान काय काय वाटून गेले.तिथून परत येताना.जीवधन ,चावंड , शिवनेरी किल्ले वाटेत दिसले पुढच्या जुन्नर भेटीत यांचाच मागोवा घेण्याचे ठरवले.

Q

E

S

R

E

T

पुढे गिरिजात्मक गणेशाचे-लेण्याद्री लेणींसमुहाकडे निघालो.

वाटेत चमचमत्या सोनेरी भातशातांनी मन सोनमय झालं.तिथल्या काळ्या आईच्या कुशीत डोलणार्या तांदळाच्या ओंब्यांना डोळेभरून पाहिले,स्पर्श केले, अन्नदाता सुखी भव !

आजुबाजुला असणार्या सह्याद्रीच्या उंचच डोंगराच्या हिरव्या कुशीतून लेण्याद्रीला पोहचलो.माझ्या कन्येचे नाव गिरीजा त्यामुळे जागोजागी होटेल गिरीजा, गिरीजा लिंबु सरबत , गिरिजात्मक चहा अशी नावे पाहून स्वारीच्या आश्चर्यमिश्रीत आनंदाला पारावार उरला नाही.

३०० पायर्या असणार्या लेणी समूह चढयला काहीसा दमछाक करणारा,आईचे गुडघे साथ देईना,पण इच्छा शक्ती दांडगी! एक काठी विकत घेऊन हळू हळू ,थांबत बसत येत होती.तेव्हा वाटलं केदारनाथ वगैरे आताच करून घ्यावं‌ ,पुढचं कोणाला माहिती..
R
मर्कटांची सेनाच सेना सर्वत्र होती.चढणार्यांना मर्कटलिला पाहून अप्रुप वाटत होते.

डोंगरावर लेण्यांचापाशी पोहचलो .उंच कड्यांहून अखंड घरंगळत येणाऱ्या धारांनी गारवा दिला.पहिल्यांदा वरील बाजूस असणाऱ्या गुफेतील गिरीजात्मकाचे दर्शन घेतले.दोन लेण्यांना जोडण्यासाठी याची स्थापना झाली.या लेणीच्या प्रवेशद्वारापुढे उंचच स्तंभ आहेत.स्तंभांच्या वरच्या भागावर गाय,सिंह इत्यादी प्राण्यांचे बैठे स्वरूपातील शिल्प घडविले आहे.पुढे विस्तीर्ण गड रांगा दिमाखात उभ्या दिसतात.

खाली चैत्यगृह लेणी आहे.कार्ला इतर ठिकाणी असलेल्या स्तुपासारखाच येथे पाताळ,वेदिका,त्यावर गोलाकार पृथ्वी,सात हार्मिका स्वर्ग यांची रचना आहे.येथील स्तंभ आणखिन उंच आहेत.त्यावर देखील विविध प्राणी शिल्प दोन दोन जोडीत आहे.एक स्फिंक्स ज्यामध्ये मानवी चेहरा व सिंहाचे धड आहे.ग्रीक संस्कृतीचा त्याकाळचा प्रभाव दिसून येतो.प्रवेशदारातून बाहेर पडतात त्याचा पानाच्या आकाराने लक्ष वेधले.

पुढे आणखिन गुंफा होत्या पण त्याच शिल्पे नसून केवळ मोठ्या आकाराच्या खोल्या होत्या,हे पाहून वेरूळ लेणीची आठवण झाली.आनंदाने पायर्या खाली उतरलो.

पुढे ६-८ किमी.वर असणाऱ्या ओझरकडे निघालो.ओझरचा विघ्नहर , अतिशय स्वच्छ, सुंदर काळ्या दगडांना आधुनिक पोलिश दिलेले मंदिर आहे.गाभारा अतिव प्रसन्न होता . मंदिर परिसरात व बाहेरील उद्यानात अनेक दुर्मिळ वनस्पती /झाडे जपलेली आहेत.नाजूकशा पारिजातकाचा सुगंध मंद दरवळत होता, प्रफुल्लित करत होता.

दर्शन घेऊन‌ बाहेरच्या स्वच्छ निर्मळ तलावाकाठी मावळतीच्या रंगांची उधळण क्षिताजापाशी थंड पाण्यात विसावलेल्या पावलांनी जलधारांच्या आधिन होत अनुभवलेली.
R

ही छोटेखानी भटकंती चंद्राच्या नाजुकशा मनमोहक कोरीच्या साक्षीने घराच्या दिशेने धावू लागली.

A
-भक्ती

मुक्तकप्रवासप्रकटनआस्वाद

प्रतिक्रिया

Bhakti's picture

28 Oct 2022 - 3:07 pm | Bhakti

जुन्नर भटकंती-१
असं शीर्षक पाहिजे ;)

माझं आणि आँनलाईन शुद्धलेखनाचं काय वैर आहे काय माहित?

बनवाबनवीचा डायलॉग आठवला "हा माझा बायको पार्वती" :D

श्वेता व्यास's picture

28 Oct 2022 - 4:54 pm | श्वेता व्यास

छान भटकंती झाली आहे, माझ्या लेण्याद्री भेटीच्या आठवणी जाग्या झाल्या :)

प्रचेतस's picture

29 Oct 2022 - 6:41 am | प्रचेतस

छान लिहिलंय, तीनेक महिन्यांपूर्वी केलेल्या लेण्याद्री, नाणेघाट भटकंतीची आठवण झाली. ह्या दिवसांत नाणेघाटाच्या पठारावर असंख्य रानफुले उमललेली दिसतात. वातावरण एकदम सुरेख असते.

अर्थात तुम्ही लिहिलेल्या त्या भटकंती लेखाचा‌ लेण्याद्री लेणी पाहताना संदर्भ घेतला.त्या स्तुपावर लोकं नाणी फेकण्याचा खेळ खेळत होते , हम्म.

फारएन्ड's picture

29 Oct 2022 - 6:56 am | फारएन्ड

सुरेख फोटो आणि सुंदर वर्णन! ओझर, लेण्याद्रि आणि जुन्नरला अनेकदा गेलेलो आहे. त्यामुळे जास्त आवडले. ओझरच्या तळ्याचे व इतरही काही फोटो खूप सुरेख आहेत. जुन्नर गावात दादोजी कोंडदेवांचा वाडाही आहे. तो जवळून पाहिलेला नाही. त्यामुळे कसा आहे माहीत नाही. शिवनेरीवर एकदाच गेलो आहे. बरीच वर्षे झाली. खूप चढायला लागले नव्हते इतके लक्षात आहे. तो भातशेतीच्या सुंदर फोटो मधे मागे शिवनेरीच आहे का? जुन्नर गावात मिळणारे खत्री यांचे पेढे लोकप्रिय आहेत.

हो , भातशेती शिवनेरी जवळचीच आहे.जुन्नरला भरपूर प्रेक्षणीय ठिकाणे आहेत.

प्रचेतस's picture

29 Oct 2022 - 11:06 am | प्रचेतस

तो भातशेतीच्या मागचा मात्र शिवनेरी नव्हे, तो शंभू डोंगर आहे.

फारएन्ड's picture

29 Oct 2022 - 6:57 am | फारएन्ड

सुरेख फोटो आणि सुंदर वर्णन! ओझर, लेण्याद्रि आणि जुन्नरला अनेकदा गेलेलो आहे. त्यामुळे जास्त आवडले. ओझरच्या तळ्याचे व इतरही काही फोटो खूप सुरेख आहेत. जुन्नर गावात दादोजी कोंडदेवांचा वाडाही आहे. तो जवळून पाहिलेला नाही. त्यामुळे कसा आहे माहीत नाही. शिवनेरीवर एकदाच गेलो आहे. बरीच वर्षे झाली. खूप चढायला लागले नव्हते इतके लक्षात आहे. तो भातशेतीच्या सुंदर फोटो मधे मागे शिवनेरीच आहे का? जुन्नर गावात मिळणारे खत्री यांचे पेढे लोकप्रिय आहेत. तेथेच जवळ एक पंचलिंग महादेवाचे मंदिर आहे. ते ही छान आहे.

चौथा कोनाडा's picture

29 Oct 2022 - 8:00 pm | चौथा कोनाडा

व्वा, छान भटकंती वर्णन आणि सुंदर प्रचि.

तिन्ही ठिकाणी गेलोय... परिसर सुंदर आहे... नाणेघाट पावसाळ्यात तुफान सुंदर आहे.... मला त्याचा अनुभव दोन तीन वेळा घेता आला.... पुष्प सौंदर्य अनुभवायचे योग मात्र आले नाहीत अजून ... लेण्याद्री गिरिजात्मक माझा सर्वात आवडता.. अटष्विनायकांच्या पैकी. त्या खालोखाल सिद्धटेक ... ओझर विघ्नहर आणि जलाशय छानच आहेत.

तेव्हा वाटलं केदारनाथ वगैरे आताच करून घ्यावं‌ ,पुढचं कोणाला माहिती..
खरंय, उर्जा असेल तो पर्यंतच फिरून घ्यावं.
माझं शिवनेरी अजून राहिलेय.... आता जायलाच हवे!

Bhakti's picture

2 Nov 2022 - 10:28 pm | Bhakti

धन्यवाद चौको!
माझा आवडता अष्टविनायक थेऊरचा चिंतामणी!
त्याच्या आसपासही खुप ऐतिहासिक ठिकाणे आहेत.त्यातलं भुलेश्वर आणि उरळीकांचनच महात्मा गांधी निसर्गोपचार केंद्र पाहायचं आहे.BAIF हे एनजीओ पाहिलं आहे तिथलं खुप वैज्ञानिक कार्य ‌, संशोधन होत तिथं.

गोरगावलेकर's picture

4 Nov 2022 - 11:44 am | गोरगावलेकर

नाणेघाट बघायचा राहिलाय त्यामुळे लेख अधिक आवडीने वाचला. फोटो, वर्णन मस्तच.

धन्यवाद!मी परत जाणार,मी परत जाणार ,मी परत जाणार ;)

तर्कवादी's picture

4 Nov 2022 - 12:25 pm | तर्कवादी

मी पण मागच्या आठवड्यात माळशेज घाट, नाणेघाट परिसरात बाईकने भटकंती केली. तुमची व माझी तीन-चार प्रकाशचित्रे तर अगदी जुळतील :)
वर्णन लिहिण्याचा तर उत्साह नाही. पण प्रकाशचित्रे टाकून एखादा धागा काढू शकतो.

Bhakti's picture

4 Nov 2022 - 1:03 pm | Bhakti

@तर्कवादी
येथे फोटोज द्या किंवा वेगळा धागा द्या!वाट पाहते.

तर्कवादी's picture

4 Nov 2022 - 6:20 pm | तर्कवादी

भक्ती,
तुम्ही गुगल ड्राईव्ह वरुन फोटोज शेअर केलेत , ते कसे ? मी प्रयत्न केला तर फसलाय (खाली एक प्रतिसाद आहे )

सौंदाळा's picture

4 Nov 2022 - 12:59 pm | सौंदाळा

मस्त
शिवनेरी, ओझर, लेण्याद्री असे एका दिवसात खूप वेळा बाईकवर केले आहे.

Bhakti's picture

4 Nov 2022 - 1:04 pm | Bhakti

वाह!
बाईकने फिरण्यासाठी मस्तय.

तर्कवादी's picture

4 Nov 2022 - 6:18 pm | तर्कवादी

view 1
view from hotel

Bhakti's picture

5 Nov 2022 - 10:59 am | Bhakti

@तर्कवादी
https://drive.google.com/file/d/1NmgkaWW8VckefOPfFCz5RjP6iznKQI5E/view?u...
ही आहे तुमच्या फोटोंची लिंक आता बदल करता पहा
१.शेवटून /view पर्यंत सर्व डिलिट करणं.
२./file/d/ हे डिलिट करायचं.
३. /file/d/ऐवजीuc?export=download&id= हे लिहायचं
https://drive.google.com/uc? export=download &id=1NmgkaWW8VckefOPfFCz5RjP6iznKQI5E

1
तरी पण नाही दिसत?
तुम्ही एकदा प्रयत्न करा.
आणि हो फोटो छान‌ आहेत.पाहिले!

तर्कवादी's picture

5 Nov 2022 - 11:45 pm | तर्कवादी

@भक्ती,
धन्यवाद.
आता आलं लक्षात sharing करताना ownload ची permission देणं गरजेचं आहे. मी ते करत नव्हतो.

आणि हो फोटो छान‌ आहेत.पाहिले!

माझ्या ड्राईव्ह वरचे बाकीचे फोटो पण दिसू शकलेत का ? कसे काय ?

view from hotel