शशक'२०२२ - खानावळ

साहित्य संपादक's picture
साहित्य संपादक in स्पर्धा
25 May 2022 - 5:52 am

'मॅडम, आपल्या एरियातली ती खानावळवाली बाई मला जरा गडबड वाटतेय. '
'कोण?'
'अहो ती नाय का.... काळीसावळीच पण एकदम देखणी आहे बघा .... कोपऱ्यावर नवी खानावळ सुरु केलीये... '
'हम्म... तिचं काय ?'
'ती आणि तिचा भाऊ... दोघंच काम करतात तिथे.... मदतीला कोण नाही. ना कधी किराणा सामान येतं त्यांच्याकडे ना कधी भाजी येते. मग जेवायला येणाऱ्यांना नक्की वाढतात काय? आणि तो किस्न्या... मानलेला भाऊ आहे म्हणे तिचा... तो तर जाम चॅप्टर आहे. मी काल बोलताबोलता काही माहिती मिळते का बघायला गेलो होतो तर मला गोलगोल गप्पा मारत कधी तिथून बाहेर काढलं मलाच कळलं नाही ... कायतरी ड्रगबिगचा लफडा असायचा ... '
'अच्छा.... नाव काय तिचं?'

'द्रौपदीबाई'

प्रतिक्रिया

श्वेता व्यास's picture

25 May 2022 - 10:34 am | श्वेता व्यास

+१

विजुभाऊ's picture

25 May 2022 - 12:39 pm | विजुभाऊ

-१
यात ड्रगबीग चा काय संबन्ध.
द्रौपदीची थाळी ही येणार्‍या पाहुण्यांसाठी होती.
पैसे देऊन जेवणारांसाठी नव्हती.
का उगाच ऐतिहासीक/ पौराणीक पात्रांना/ कथांना इतक्या खालच्या पातळीवर आणताय

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

28 May 2022 - 1:25 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विजूभौ, तुमच्या अशा कथेच्या विस्कटून सांगण्यामुळे संदर्भ समजले.
चांगला प्रयत्न लिहिण्यासाठी शुभेच्छा.

-दिलीप बिरुटे

प्रसाद गोडबोले's picture

25 May 2022 - 12:43 pm | प्रसाद गोडबोले

-१

आनंद's picture

25 May 2022 - 2:03 pm | आनंद

नाही आवडली!

यश राज's picture

25 May 2022 - 3:03 pm | यश राज

-१

सुक्या's picture

25 May 2022 - 3:23 pm | सुक्या

-१

काहीच अर्थबोध झाला नाही. पुराणातली द्रौपदी असली तरी "एरियातली खानावळवाली बाई?"
कुच जम्या नही ...

वामन देशमुख's picture

25 May 2022 - 5:15 pm | वामन देशमुख

-१

कथा अजिबात स्वीकारार्ह नाही.

सं मं - कृपया धागा अप्रकाशित करावा.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

28 May 2022 - 1:30 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>सं मं - कृपया धागा अप्रकाशित करावा.
का बरं म्हणे ?

-दिलीप बिरुटे

चौथा कोनाडा's picture

25 May 2022 - 5:24 pm | चौथा कोनाडा

-१

शशकचा रोख कळला, पण " ड्रगबिगचा लफडा" साठी विशेष -१

सौंदाळा's picture

25 May 2022 - 6:14 pm | सौंदाळा

वरील सर्वांशी सहमत
द्रौपदी, कृष्ण कथेत असताना बाकी कथा सध्याच्या काळाप्रमाणे उगीच लिहिली.
आहे तीच कथा त्या जंगलातील आदिवासी त्यांच्या राजाला सांगतोय असे दाखवून शेवटी द्रौपदीच्या थाळीची गोष्ट आहे कळाले असते तरी पण छान झाली असती.
असो

कानडाऊ योगेशु's picture

25 May 2022 - 6:29 pm | कानडाऊ योगेशु

प्रयत्न फसलाय पण असे काही लिहायचा प्रयत्न केला ह्याचे कौतुक करायला हवे.
+१

प्रचेतस's picture

25 May 2022 - 6:38 pm | प्रचेतस

+१
कल्पकता आवडली.

चेतन सुभाष गुगळे's picture

25 May 2022 - 7:00 pm | चेतन सुभाष गुगळे

कल्पनादारिद्र्य फक्त.

तुर्रमखान's picture

26 May 2022 - 3:19 pm | तुर्रमखान

मस्तच!

Bhakti's picture

26 May 2022 - 5:40 pm | Bhakti

OMG

सुखी's picture

26 May 2022 - 9:22 pm | सुखी

-१

जेम्स वांड's picture

28 May 2022 - 8:57 am | जेम्स वांड

मला काय विषयच कळलं नाही बुआ, कदाचित आमची झेप नसेल तितकी, पण लोक ट्रिगर झालेत म्हणजे काहीतरी तर आहेच, कोणी मला व्यनि किंवा खव मध्ये नेमका विषय सांगेल का ?

गामा पैलवान's picture

28 May 2022 - 3:51 pm | गामा पैलवान

कथेत द्रौपदी व किसन्या आहेत, मात्र पांडव नसल्याने संगती लागंत नाही.
-१
-गा.पै.

सुरिया's picture

28 May 2022 - 4:00 pm | सुरिया

मला खानावळ आणि काळीसावळी देखणी हे वाचून फक्त काजोल आणि राणि मुखर्जी आठवल्या. कारण तिन्ही खानासोबत काम केलेल्या ह्या वर्णनाच्या दोघिच आहेत.
बाकी कथा भंगार आहे सांगायला नकोच.
स्पर्धेत क्वांटिटी फुल्ल आलीय पण क्वालिटीच्या नावाने बोंबाबोंबच आहे एकूण.
काही कथा तर काहीही प्रतिसाद देण्यासही पात्र नाहीत.

चौथा कोनाडा's picture

3 Jun 2022 - 11:56 am | चौथा कोनाडा

अपले इम्याजिनेशन आवडले.

होउन जाऊ दया एखादी कथा :-)

प्रसाद_१९८२'s picture

28 May 2022 - 8:42 pm | प्रसाद_१९८२

-१

श्वेता व्यास's picture

2 Jun 2022 - 4:11 pm | श्वेता व्यास

मी काढलेला अर्थ -
ऐकीव कथा - महाभारतात दुर्योधनाने ऋषी दुर्वासांना जेवणाची वेळ टळून गेल्यानंतर मुद्दाम द्रौपदीची फजिती करण्यासाठी शिष्यांसमवेत तिच्याकडे भोजनास पाठवले. पण श्रीकृष्णाने तांदुळाचा एक दाणा खाऊन द्रौपदीची फजिती होण्यापासून तिला वाचवले. दुर्योधनादी कौरवांना तिची मजा बघायची होती पण ते शक्य झाले नाही.
या कथेशी संबंध असा वाटला की जे ड्रगबिगचा लफडा आणि इतर संशय एका स्त्रीवर घेत आहेत ते आजचे दुर्योधनच आहेत.
या अर्थाने कथा आवडली.

विजुभाऊ's picture

3 Jun 2022 - 11:29 am | विजुभाऊ

या कथेला वजा एक हे नऊ वेळा आलेत तर
आणि अधीक एक हे तीन वेळाच आलेय.
कथेचा एकुण स्कोर वजा सहा होतोय.

शब्दसखी's picture

3 Jun 2022 - 9:05 pm | शब्दसखी

ज्यांना कथा आवडली आणि +१ दिला त्यांचे आभार. त्यांच्याबरोबरच ज्यांना नाही आवडली आणि तसं मोकळेपणाने सांगितलं त्यांचेही आभार.

आता कथेविषयी थोडेसे :
ही कथा लिहिताना पुराणातल्या व्यक्तिरेखा अचानक आजच्या काळात आल्या तर काय गोंधळ उडू शकेल हा विचार मनात होता. महाभारत काळात काही सामानसुमान नसताना आपोआप तयार जेवण हजर होणे ही कदाचित सामान्य गोष्ट होती असेल पण आजच्या काळाच्या दृष्टीने ती नक्कीच संशयास्पद वाटेल. त्यामुळे गस्तीवरच्या पोलिसाला संशय येणं मला स्वाभाविक वाटलं. रोज ज्याचा संबंध गुन्हेगारीशी येतो अश्या माणसाला ड्रग, अवैध दारू, काळा पैसा, स्मगलिंग यापैकीच काहीतरी असेल असं वाटणं मला लॉजिकल वाटलं. आणि तेच मत त्याने आपल्या वरिष्ठांसमोर व्यक्त केलं. ह्यात द्रौपदी आणि कृष्णाचा दुरान्वयेही ड्रग्सशी संबंध जोडला गेलाय असं काही वाचकांना नक्की का वाटलं माहीत नाही.
शक्य आहे की हा पोलिसांमधला संवाद आहे हे पोहोचवण्यात कथेची मांडणी कमी पडली आहे.
आता पांडव कुठे आहेत, द्रौपदी आणि कृष्णाला मुळात खानावळ चालवायची गरजच काय, त्यांचं कलियुगात काय काम वगैरे प्रश्नांची उत्तरं मांडायची झाली तर कदाचित कादंबरी लिहावी लागेल.

अर्थात, १०० शब्दांच्या कथेवर १००+ शब्दांची टिप्पणी लिहावी लागली ह्यातच कथेचं (अप)यश अधोरेखित झालं आहेच.

जाता जाता, कथा प्रसिद्ध झाल्यावर नाव खानावळ च्या ऐवजी कलियुग द्यायला हवं होतं असं मला वाटलं होतं पण तोपर्यंत वेळ निघून गेली होती. असो.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

4 Jun 2022 - 10:01 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आकृतीबंध, प्रयत्न, शब्दशैली, ऐतिहासिक गोष्टी याचा समन्वय करण्याचा प्रयत्न आवडलाच. कथेला वन प्लस देता देता राहून गेलो.
बाय द वे, 'द्रौपदीला' 'दौपदीबाई' लिहिले म्हणून माझ्या भावना दुखावल्या होत्या. =))

-दिलीप बिरुटे

तर्कवादी's picture

8 Jun 2022 - 11:21 am | तर्कवादी

बाय द वे, 'द्रौपदीला' 'दौपदीबाई' लिहिले म्हणून माझ्या भावना दुखावल्या होत्या. =))

बाई या शब्दाला उगाचच काही नकारात्मक भावना, अर्थ जोडले गेले आहेत.
या शब्दात काहीही वाईट नाही. एखाद्या स्त्रीला आदर देण्यासाठी बाई हा शब्द मराठीत वापरला जातो / जावू शकतो. पण आता इंग्लिशमधला "मॅम" वा" मॅडम हा शब्द जास्त अंगवळणी पडलाय आणि बाई हा शब्द संबोधन म्हणून ("अहो बाई") वा उपाधी म्हणून (जसे द्रौपदीबाई) वापरला तर उगाचच खटकतो.

कर्नलतपस्वी's picture

4 Jun 2022 - 7:06 pm | कर्नलतपस्वी

दुर्दशनवर महाभारतावर एक भन्नाट मालीका आली होती.
प्रसिद्ध हिन्दीभाषी

रंगकर्मी नविन्द्र बहल व इतर कलाकारांनी कमाल केली होती. लेखकाची आफाट कल्पनाशक्ती, व्यास आडनावाचे कुटुंबातील सदस्य काशीला जातात तेव्हा त्यांना तेथील पंड्या कडून कळते की ते वेदव्यास चे वंशज आहेत. ते रामानन्द सागर वर राॅयल्टी चा दावा ठोकतात. महाराष्ट्रात किती बघितली गेली माहीत नाही. बघा मजा येईल.

https://www.google.com/search?gs_ssp=eJzj4tVP1zc0TM5NsjSsTDM2YPTSebBk64O...

श्वेता व्यास's picture

6 Jun 2022 - 11:10 am | श्वेता व्यास

चांगली कल्पना आहे, आवडली :D

तर्कवादी's picture

8 Jun 2022 - 12:09 pm | तर्कवादी

स्पर्धेत कथा उतरवणारे काही स्पर्धकही इतर स्पर्धकांच्या कथांवर मतदान करत नाहीत याचे आश्चर्य वाटते. की स्वतःची सोडून इतर कुठलीच कथा आवडली नाही ?