शशक'२०२२ - वियोग

साहित्य संपादक's picture
साहित्य संपादक in स्पर्धा
18 May 2022 - 7:39 am

आज गोकुळात गडबड उडाली होती.. गोपिका कुजबुजत होत्या…जाणार म्हणतात..कृष्ण जाणार?
गोकुळ सोडून? खरेच?
पण मग ? माता यशोदा..आणि त्याचे सवंगडी..आणि गायी...? आणि आणि राधा..? तिचे काय?
सगळे नुसते प्रश्न.... घाबरवणारे, धास्तावणारे...व्याकुळ करणारे.
पण..आपण थांबवू ना त्याला. असा कसा जाऊ शकतो तो...? आपल्या सर्वांना सोडून?
अगं..पण तो...तो तर सूर्याचा कवडसा, तो तर चंद्र्किरण... त्याला कसं थांबविणार आपण..?
आणि राधा................?
ती सुदूर यमुनाकिनारी भान विसरुन एकटीच झाडाखाली बसली होती.
व्याकुळ, क्लांत पण तरीही आश्वस्त! मनोमन त्याचे जाणे समजून घेतलेली.

तिच्यासाठी तो परका नव्हताच ! तिच्या श्वासा-मनाचा भागच नव्हता का तो?
तो कुठे जाणार तिला सोडून...? छे! उगीचच बावरल्या सगळ्या ..ती किंचित हासली.

प्रतिक्रिया

Bhakti's picture

18 May 2022 - 9:54 am | Bhakti

छान.
+१

चौथा कोनाडा's picture

18 May 2022 - 1:23 pm | चौथा कोनाडा

+१

सुरेख !

लोथार मथायस's picture

19 May 2022 - 1:46 am | लोथार मथायस

+१

सिरुसेरि's picture

19 May 2022 - 5:28 pm | सिरुसेरि

+१

निनाद's picture

20 May 2022 - 5:50 am | निनाद

................? हे आणि सर्वत्र ... हे नसते तर नक्की एक दिला असता.
नव लेखकांना/लेखिकांना या टिंबांची इतकी आवड का असते काही कळत नाही.

चेतन सुभाष गुगळे's picture

25 May 2022 - 7:52 pm | चेतन सुभाष गुगळे

गेलाच होता ना आधी मथुरेला आणि मग द्वारकेला. काय आहे ह्या कथेत? ना नावीन्य ना मनोरंजन.

सुखी's picture

26 May 2022 - 8:39 pm | सुखी

+१

सुक्या's picture

27 May 2022 - 12:16 am | सुक्या

नक्की काय आहे या कथेत ?