मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

शशक'२०२२- पूर्णब्रह्म

साहित्य संपादक · · स्पर्धा
जेवायला वाढताना तिने नेहेमीप्रमाणे फ्रिज उघडला. सगळ्यांना ताजे अन्न वाढल्यावर सवयीप्रमाणे फ्रिझमधली कालची उरलेली खिचडी गरम करुन तिने फक्त स्वतःसाठी घेतली. तो नेहेमीप्रमाणे तिच्यावर चिडला. ताजे अन्न असताना मुद्दामुन शिळे अन्न संपवायची काय गरज? त्याच्याकडे दुर्लक्ष करुन अन्न वाया गेलेले पाहवत नाही असे म्हणत तिने खिचडीचा घास तोंडात टाकला. ती मीटींग निमित्त दुपारीच परगावी गेली होती.दोन दिवसांसाठी. रात्रीचा स्वयंपाक त्याने स्वयंपाकीण बाईकडुन बनवुन घेतला. नेहेमीप्रमाणे त्याचा अंदाज चुकला.बटाट्याची भाजी प्रमाणापेक्षा जरा जास्तच झाली. तिने बजावुन ठेवल्याप्रमाणे त्याने उरलेले अन्न फ्रिजमध्ये ठेवले. दुसर्या दिवशी जेवताना वाढताना त्यानेही सवयीने फ्रिज उघडला. रात्री फ्रिजमध्ये ठेवलेली बटाट्याची भाजी दिसली. यांत्रिकपणे त्याने ती गरम करुन वाढली. खरेय अन्न वाया गेलेले पाहवत नाही. त्याला तिची फार आठवण आली.

वाचने 6925 वाचनखूण प्रतिक्रिया 12

In reply to by Bhakti

Bhakti Fri, 05/13/2022 - 20:45
खरेय अन्न वाया गेलेले पाहवत नाही. त्याला तिची फार आठवण आली.
काय प्रेम वाया चाललंय ... असा प्रतिसाद पाहिजे ;) वाया-ऊतू

चौथा कोनाडा Fri, 05/13/2022 - 17:28
दुसर्या दिवशी जेवताना वाढताना त्यानेही सवयीने फ्रिज उघडला. रात्री फ्रिजमध्ये ठेवलेली बटाट्याची भाजी दिसली. यांत्रिकपणे त्याने ती गरम करुन (तिला) वाढली. खरेय अन्न वाया गेलेले पाहवत नाही. त्याला तिची (आता ही कोण ती ?) फार आठवण आली.
ही वाक्ये गंडलीत का ?

ब़जरबट्टू Sat, 05/14/2022 - 01:06
छान आहे. बाकी ते शब्द ११० च्या पण पुढे गेलेत. बाकी जेवण बघुन बायकोची आठवण यायचा धक्का आवडला :)