दिवाळी अंक २०२१ अलक - संस्कार

Primary tabs

मालविका's picture
मालविका in दिवाळी अंक
1 Nov 2021 - 9:00 pm

दिवाळीच्या मुहूर्तावर नवीन गाडी घ्यायची असं मे महिन्यातच नक्की केलं त्यांनी. त्यानुसार पैशांची जमवाजमवदेखील करायला सुरुवात केली. मूलं तर खूप उत्साहात होती. कोणताही हट्ट न करता गाडीसाठी पैसे साठवण्यात आई-बाबांना मदत करत होती. पण अचानक महापूर आला. यांचं जरी काही नुकसान झालं नसलं, तरी इतरांकडे बघताना वाईट वाटत होतं. घरातली चौघेही जण वेगवेगळ्या ठिकाणी मदतीला जात होते. रात्री परतत होते, तेव्हा आपले अनुभव सांगत असताना त्यांना आवाज दाटून येई.
आणि दिवाळीच्या आधी गाडी बुकिंग करायला जाताना मुलांनी एक निर्णय घेतला. "आई, बाबा, गाडी पुढच्या वर्षी घेऊ. या वर्षी आपण या पैशांनी पूरग्रस्तांना मदत करू या. त्यांचीही दिवाळी आनंदाची झाली पाहिजे." मुलांच्या या निर्णयामुळे आईवडिलांना अर्थातच आनंद झाला. मुलांना प्रत्यक्ष पुरानंतर काम करण्याचा अनुभव मिळाला आणि त्यांची बदललेली दृष्टी याचा त्यांना अभिमान वाटला.

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

3 Nov 2021 - 1:08 pm | मुक्त विहारि

गेली कित्येक वर्षे मी फटाके खरेदी न करता, पुस्तके विकत घेतो...

स्वार्थ आणि परमार्थ दोन्ही साधल्या जाते

गुल्लू दादा's picture

16 Nov 2021 - 11:11 pm | गुल्लू दादा

ठीक वाटली. धन्यवाद.