पेन्सिल शेडींग चित्र

बबन ताम्बे's picture
बबन ताम्बे in मिपा कलादालन
20 Jun 2021 - 4:34 pm

खरे म्हणजे मिपावरील प्रसिद्ध चित्रकार श्री. चित्रगुप्त साहेब यांनी मला सुचना केली होती की चित्रकार व्हायचे असेल तर कॉपी न करता स्वतःचे काही तरी रेखाटावे. तसा प्रयत्न चालू आहे पण साधना ही आवडती अभिनेत्री गेल्यानंतर तिचे चित्र काढायचा मोह आवरला नाही.

sadhana

प्रतिक्रिया

चौथा कोनाडा's picture

20 Jun 2021 - 5:10 pm | चौथा कोनाडा

व्वा, क्या खुब ! खुप छान बबन ताम्बे सर ! शेडींग खुप सुंदर जमले आहे !
🎨
झकास कलाकारी !

प्रचेतस's picture

20 Jun 2021 - 5:47 pm | प्रचेतस

खूपच सुंदर.

गुल्लू दादा's picture

20 Jun 2021 - 9:51 pm | गुल्लू दादा

खूप सुंदर.

तुषार काळभोर's picture

20 Jun 2021 - 9:53 pm | तुषार काळभोर

राजकुमार मध्ये आजा... आयी बहार.. म्हणणारी साधना अतिशय दिलखेचक सुरेख दिसली आहे.

रेखाटन आवडलं.

गॉडजिला's picture

20 Jun 2021 - 10:11 pm | गॉडजिला

हे चित्र आपण गुरुदक्षिणेचे प्रतिक म्हणुन चित्रगुप्त साहेबांना भेट देउन आपण चित्रकार बनण्याचा प्रवास सुगम करावा असे मनापासुन वाटते. आपली नैसर्गीक गुणवत्ता आणि साधनेतील सातत्य आपले स्वप्न साकार करोत या शुभेच्छा.

मला ओठ सोडले तर चित्रात रेखाटलेले बाकी सर्वकाही खुप आवडले विशेषतः डोळे आणि भुवया अत्यंत मस्त.

धर्मराजमुटके's picture

20 Jun 2021 - 10:19 pm | धर्मराजमुटके

खुप सुंदर, अजून काही चित्रे लवकर येऊद्या.

ज्ञानोबाचे पैजार's picture

21 Jun 2021 - 9:43 am | ज्ञानोबाचे पैजार

चित्रकलेची "साधना" आवडली,

पैजारबुवा,

बबन ताम्बे's picture

21 Jun 2021 - 11:55 am | बबन ताम्बे

खूप खूप धन्यवाद चौ. को, प्रचेतस, तुषार, गुल्लूदादा, गॉडझिला, धर्मराज मुटके, ज्ञानोबाचे पैजार !!

उत्खनक's picture

21 Jun 2021 - 12:39 pm | उत्खनक

साधना यांचा हा फोटो खूप प्रसिद्ध आहे. त्यावरून लगेच समजते की हे चित्र साधना यांचे आहे.
पण मूळ फोटो आणि हे चित्र यात चेहरा बराच बदललाय. प्रपोर्शन नीट यावे लागेल असे वाटते. कृपया राग मानू नये. पुरेशु.

बहुतेक चित्राची हाईट आणि विडथ चुकली आहे प्रकाशित करताना. त्यामुळे प्रपोर्शन चुकले असावे.
हुबेहुब मात्र जमायला खूप मेहनत घ्यावी लागेल. मी बराच प्रयत्न करून मुळ फोटोच्या जवळपास जाण्याचा प्रयत्न केलाय.

बहुतेक चित्राची हाईट आणि विडथ चुकली आहे प्रकाशित करताना. त्यामुळे प्रपोर्शन चुकले असावे.
हरकत नाही, चित्रावर राईट क्लिक करून मूळ चित्र बघता येतेच...

व्यक्तीचे चित्र काढताना त्याच्या व्हिज्युअल प्रॉपर्टीजचे आदर्शीकरण मूळ प्रॉपर्टीजना धक्का न लावता अवश्य केले जाते... ज्यात त्याचे सर्व अवयव चित्रात जास्त आकर्षक दिसू लागतात

शाम भागवत's picture

28 Jun 2021 - 3:31 pm | शाम भागवत

राईट क्लिक करून नविन टॅबमधे चित्र उघडल्यास चित्र जास्त चांगले दिसतंय.

श्रीरंग_जोशी's picture

29 Jun 2021 - 12:26 am | श्रीरंग_जोशी

चित्र सुरेख आहे.

मूळ चित्राची रुंदी वि. लांबी 561 x 870 एवढी आहे. मिपावर चित्र प्रकाशित करताना रुंदी व लांबी देणे ऐच्छिक आहे. दोन पैकी एक दिल्यास दुसर्‍याची किंमत आपोआप मोजली जाऊन मुळ चित्राच्या रुंदी व लांबीचे गुणोत्तर जपले जाते. स्वतःहून दोन्ही द्यायच्या असल्यास मात्र असे गुणोत्तर जपणे आपली जबाबदारी असते. रुंदी वि. लांबी 450 x 700 देण्याऐवजी तुम्ही एकतर रुंदी 450 किंवा लांबी 700 एवढेच द्यायला हवे होते.

साहित्य संपादक देखील ही दुरुस्ती करू शकतात.

बबनराव, चित्र आवडले.
चित्रकला शिकताना आर्टस्कुलात फोटोवरून रेखाटन करण्याऐवजी प्रत्यक्ष वस्तु, व्यक्ती दृष्ये वगैरेवरून करणे शिकवले जाते. याचे पहिले कारण म्हणजे प्रत्यक्ष त्रिमित वस्तुवरून द्विमितीतले चित्र काढताना बर्‍याच गोष्टींचे भान ठेवावे लागते, उदाहरणार्थ पर्स्पेक्टिव्ह. हे मुद्दाम वेगळ्याने शिकावे लागते आणि ते शिकल्याखेरीज समोरील दृष्याचे यथार्थ आकलन होत नाही. अगदी एकादी लहानशी काडी पडलेली असेल, तिचे रेखाटन करतानादेखील पर्स्पेक्टिव्हची गरज असते.
दुसरे म्हणजे प्रत्यक्ष वस्तूत असंख्य बारकावे असतात, ते बघता येणे (त्यांचे आकलन होणे) हे दीर्घ प्रयत्नानंतर जमू लागते. उदाहरणार्थ एकादा काचेचा ग्लास वा स्टीलचे भांडे समोर असले तर त्यात आजूबाजूच्या अनेक वस्तूंचे सूक्ष्म प्रतिबिंब, वस्तुच्या 'मूळ' रंगात आकाशाच्या वा शेजारी असलेल्या वस्तूंच्या रंगांमुळे घडून येणारा बदल, ,भांड्याच्या गोलाईमुळे प्रतिबिंबित आकारांना येणारी वक्रता, स्टील-लाकूड-लोकर-रेशीम वगैरेंच्या पोतातील फरक, अश्या बर्‍याच गोष्टीचे सूक्ष्म निरिक्षण करण्यातून आकलन होऊ लागते. चित्रकला शिकणाराला 'बघणे' आधी शिकावे लागते, ते या सरावातून साध्य होते. असे सगळे तपशील आधुनिक काळातील प्रगत फोटोग्राफीमुळे चंगल्या दर्जाच्या फोटोत असू शकतात, मात्र पूर्वीच्या छापील फोटोत ते आढळत नाहीत.
उदाहरणार्थ तुम्ही केलेल्या या चित्राच्या मूळ फोटोत ते नाहीत, परंतु जर आपल्याला प्रत्यक्ष व्यक्तिचित्रणाचा सराव असेल तर फोटोत नसलेल्या छाया-प्रकाशाच्या सूक्ष्म छटा सुद्धा आपण चित्रित करू शकतो.
तसे बघितले तर फोटोवरून चित्र करण्यात काहीच गैर नाही, उलट आपण फोटोवरून चित्रे काढायचीच नाहीत हा दंडक जन्मभर पाळला तर अनेक गोष्टींपासून आपण वंचित रहातो. माझे असेच झाले. हा दंडक पाळण्याच्या नादात मी दिवंगत आई-वडील, गुरू आणि आदरणीय - प्रिय व्यक्तींची व्यक्तिचित्रे रंगवली नाहीत. तसेच निसर्गरम्य वा आपल्याला चित्रासाठी प्रेरणादायक वाटतील अश्या जागी नेहमी जाणे शक्य होत नसल्याने तेही राहून गेले. एका प्रकारे या दंडकामुळे स्वतःची एकमेवाद्वितीय अशी चित्रशैली विकसित करणे जमले, पण त्याबरोबरच यथार्थदर्शी चित्रणाच्या अभ्यासाला फार मर्यादा पडल्या.
आता वयाच्या सत्तरीत प्रवेश करताना या गोष्टीची प्रकर्षाने जाणीव झाल्याने मी ही 'राहून गेलेली' चित्रकला परत सुरू केली आहे, त्यावर लेख लिहीण्याचे मनात आहे.
तेंव्हा आपण प्रत्यक्ष वस्तूवरून तसेच फोटोंवरून चित्रे काढण्याचा उपक्रम चालू ठेवावा, तसेच महान चित्रकारांची चित्रे सुद्धा अभ्यासावीत, त्यावरून रेखाटन करावे, असे सुचवतो.
पुढील सर्व अभ्यासासाठी शुभेच्छा.

बबन ताम्बे's picture

22 Jun 2021 - 1:49 pm | बबन ताम्बे

खूप खूप धन्यवाद चित्रगुप्तजी !!
आपण केलेल्या मौल्यवान मार्गदर्शनाबद्द्ल मनपूर्वक आभार.
पर्स्पेक्टीव्ह , छाया प्रकाश, बारकावे याबाबतीत आपण फार सुंदर विवेचन केले आहे. त्याप्रमाणे रेखाटन आनि इतर बाबी विकसित करायचा मी निश्चित प्रयत्न करेन.
आपण नव्याने काढलेली व्यक्तीचित्रे, निसर्गचित्रे पाहण्यास उत्सुक आहे.

किसन शिंदे's picture

28 Jun 2021 - 3:42 pm | किसन शिंदे

खूप सुंदर स्केच.

नूतन's picture

7 Jul 2021 - 8:38 am | नूतन

आवडलं.
चित्रगुप्त यांचं मार्गदर्शन फार मोलाचं आहे.

टर्मीनेटर's picture

7 Jul 2021 - 12:24 pm | टर्मीनेटर

तुमचं स्केच आणि चित्रगुप्त काकांचा मार्गदर्शक प्रतिसाद दोन्ही खूप आवडले 👍