गाभा:
उत्तर प्रदेश मधील पुढील विधानसभा निवडणुक फेब्रुवारी २०२२ मध्ये होईल. एबीपी सी-व्होटरने नुकत्याच केलेल्या मतदार सर्वेक्षणानुसार उत्तर प्रदेशात भाजप पुन्हा एकदा दोन तृतीयांश बहुमत मिळविण्याची शक्यता आहे. परंतु भाजप ३६ जागा गमावून ४०३ पैकी २८९ जागा मिळवू शकतो. सप (४७ वरून ५९) व बसपला (१९ वरून ३८) थोडा फायदा होईल. परंतु कोणताही पक्ष ६० हा आकडा पार करू शकणार नाही. कॉंग्रेस या राज्यातून फार पूर्वीच संपली आहे.
https://news.abplive.com/news/india/abp-news-cvoter-up-survey-election-s...
प्रतिक्रिया
22 Mar 2021 - 7:56 pm | मुक्त विहारि
टार्गेट मोठे आहे, कारण, लोकसंख्या भरपूर आहे...
त्यामुळे, जास्त पैसे खर्च करून का होईना, पण जास्तीत जास्त लोकांच्या टेस्टस करून दाखवायच्या असतील तर ....
22 Mar 2021 - 7:42 pm | बिटाकाका
तिकडे पण आपण मागच्या ऑगस्ट सप्टेंबर पासून एक्स्पोर्ट करतोय.
22 Mar 2021 - 6:34 pm | श्रीगुरुजी
सचिन वाझे १६ फेब्रुवारी ते २० फेब्रुवारी या काळात गावडे नावाचे आधारपत्र वापरून ट्रायडंट हॉटेलमध्ये रहात होता म्हणे. त्याच्याकडे दोन बॅगा होत्या म्हणे. या पोतडीतून अजून काय काय बाहेर येणार आहे देव जाणे.
22 Mar 2021 - 7:17 pm | मुक्त विहारि
परमबीर सिंह यांची सुप्रीम कोर्टात धाव; अनिल देशमुखांविरोधात सीबीआय चौकशीची मागणी .....
https://www.loksatta.com/maharashtra-news/ex-mumbai-top-cop-param-bir-si...
काय बोलावं, ते सुचेना .... आधी तर ऐकले होते की लेटर बनावट आहे, भाजपचे कारस्थान आहे, आणि आता तर खुद्द परमबीर सिंगच कोर्टात पोहोचले.....
22 Mar 2021 - 7:35 pm | मुक्त विहारि
https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/bjp-leader-sudhir-m...
आयला, आमचा दिगू होणार....
22 Mar 2021 - 8:17 pm | मुक्त विहारि
https://www.google.com/amp/s/www.esakal.com/vidarbha/navneet-rana-was-th...
आत्ता छत्रपती शिवाजी महाराज हवेतच....
23 Mar 2021 - 11:35 am | चंद्रसूर्यकुमार
गोव्यात पणजी महापालिका आणि सहा नगरपालिकांच्या निवडणुका झाल्या. पणजी महापालिकेत भाजपने ३० पैकी २५ जागा जिंकल्या. पण बाबूश मोन्सेराट हा घाणेरडा माणूस पक्षात घेतला त्याचा फायदा भाजपला पणजीत झालेला दिसतो. याच माणसाला २०१६ मध्ये एका अल्पवयीन मुलीच्या बलात्काराच्या आरोपावरून अटक झाली होती. इतकेच नाही तर त्याने ती मुलगी तिच्या मावशीकडून ५० लाखाला 'विकत' घेतली होती असेही वाचल्याचे आठवते. मनोहर पर्रीकर गेल्यानंतर २०१९ च्या लोकसभा निवडणुकांबरोबर त्यांच्या पणजी विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुक झाली आणि त्यात हा मनुष्य काँग्रेसचा उमेदवार म्हणून विधानसभेवर निवडून गेला आणि नंतर दोनेक महिन्यातच तो आणि इतर ९ काँग्रेस आमदार भाजपत सामील झाले. असल्या किळसवाण्या माणसाला पक्षात घेतल्याची किंमत भाजपला कधीनाकधी मोजावी लागावी असे फार वाटते.
६ नगरपालिकांपैकी भाजपने ५ तर काँग्रेसने १ नगरपालिका जिंकली आहे. भाजपने जिंकलेल्या नगरपालिकांचे भौगोलिक स्थान महत्वाचे आहे. या जिंकलेल्या नगरपालिकांमध्ये उत्तरेतील पेडणे आणि दक्षिणेतील काणकोण या नगरपालिका आहेत. कोकण रेल्वेमार्गे महाराष्ट्रातून गोव्यात गेल्यास पेडणे हे गोव्यातील पहिले स्टेशन लागते तर काणकोण हे ठिकाण राज्याच्या जवळपास दक्षिण टोकाला कर्नाटक सीमेवर आहे. कारवार तिथून फार लांब नाही. काँग्रेसने जिंकलेली एक नगरपालिका म्हणजे दक्षिण गोव्यातील कुंकळ्ळी.
23 Mar 2021 - 12:08 pm | मुक्त विहारि
तुमच्या मताशी सहमत आहे
24 Mar 2021 - 8:03 am | साहना
बाबूश ह्या व्यक्तीशी माझी चांगलीच ओळख आहे. तुम्ही जो प्रकार लिहिला आहे तो खरे तर त्यांच्या पापात खूप खालच्या नंबर वर आहे. 'माणुसकीला काळिमा" सारखे शब्द सुद्धा ह्या व्यक्तीच्या बाबतीत तोटके पडतात.
24 Mar 2021 - 8:43 am | चंद्रसूर्यकुमार
भयानक. असल्या माणसाला पक्षात घ्यायची काय गरज होती समजत नाही.
23 Mar 2021 - 8:35 pm | Rajesh188
पदासाठी लाखो ची बोली लागते ह्या वरून च समजून आले पाहिजे निवडणूक मध्ये तिकीट कोणाला मिळते.आणि निवडून आल्यावर की करायचे असते.
सर्वांचे प्लॅन असतात.
परमवीर सिंह नी १००, कोटी महिना वसुली हा लहान आकडा सांगितला.
सर्व विभागांचा मिळून हजारो करोड जमा होत असेल.
उगाच नाही फडणवीस तळमळत आहेत satte साठी.
इथे हा पक्ष स्वच्छ आणि आणि हा अस्वच्छ असे काही नाही.
फक्त कमी जास्त पना असू शकतो.
खऱ्या कार्यकर्त्याला कधीच निवडणुकीत तिकीट मिळत नाही.
तिकीट वाटप कसे होते हे पण सर्वांस माहीत असेल.
एकदम खालच्या पातळीवर असलेले तलाठी,कॉन्स्टेबल,क्लार्क ह्या लोकांची संपत्ती किती तरी लाखात असते.
हे कोणाला माहीत नाही का?
सर्वांस माहीत आहे.
पण त्या साठी कठोर कायदे आणावेत असे कोणत्याच सरकार ल वाटत नाही.
शेती विषयक कायदा परित करण्या पेक्षा भ्रष्ट प्रशासीय व्यवस्था ताळ्यावर आणायला अत्यंत कठोर कायदे बनवले असते तर सरकार चे वेगळेपण दिसले असते.
Fraud, लाच हे गुन्हे दरोडा ,चोरी ह्या पेक्षा
पण कठोरर गुन्हे समजले पाहिजे
पण राजकीय पक्ष स्वतच्या पायावर दगड मारून नक्कीच घेणार नाहीत.
23 Mar 2021 - 9:03 pm | स्वलिखित
तुम्ही किती ही कम्पेअर करा , कितीही म्हणजे कितीही ,
भ्रष्टाचार भाजप पेक्षा काँग्रेस आणि तत्सम पक्षांचा जास्त आहे , हाइट म्हणजे करतात ते करतात वर स्वतःहून उघडे पण पडतात , नीट खाता पण येत नाही , पुरे हात कोपरापर्यंत भरलेले असतात ,
आता ह्याला प्रतिसाद देऊन लिपापोती करू नका / अजून पितळ उघडे पाडू नका , पितळ आधीच खूप चमकतय
23 Mar 2021 - 9:15 pm | बापूसाहेब
नाही.. आता ते रिप्लाय देणार नाहीत कारण अश्या वेळी ते काँग्रेस चा सदरा सोडून भारतीय नागरिकाचा सदरा घालतात. आणि सगळे पक्ष कसे एकसारखेच आहेत हे सिद्ध करतात..!!
पण थोडा वेळ गेला कि पुन्हा त्यांची काँग्रेस कशी वरचढ, स्वच्छ, धुतल्या तांदळासारखी, पवित्र आहे हे पटवून देतात.. तसेच bjp भारतासाठी योग्य नाही, मोदी किती वाईट्ट आहेत हे पण पटवून देतात....!!
23 Mar 2021 - 9:36 pm | Rajesh188
मी सत्य तेच सांगत आहे बाकी पेक्षा पेक्षा तुलनेने bjp चांगली असे म्हणू शकता.
पण हा फरक जास्त मोठा नाही.
इन्स्पेक्टर लेव्हल चा अधिकारी विमान प्रवास करतो,२५ ते:३० लाखांच्या गाड्या ह्या लोकांच्या घरासमोर असतात.
आयएएस , आयपीएस उद्योगपती लोकांच्या पार्टी मध्ये सहभागी असतात.
हे उघड आहे सर्वांस माहीत आहे.
मग आता पर्यंत एका पण सरकार नी ह्या वर काही निर्णय घेतले का नाही.
कारण परमवीर बोलले ते.
हिस्से सरकार पर्यंत पोचतात.
हे सत्य च आहे.
24 Mar 2021 - 10:55 am | सुबोध खरे
या हजारो लाखो भ्रष्ट लोकांचे पुरावे कुणी गोळा करायचे? खटले कुणी भरायचे? आणि वर्षानुवर्षे कसे चालवायचे?
याचे काही उत्तर आहे का?
७० वर्षांपासून प्रणाली वरपासून खालपर्यंत किडलेली आहे. एकटे मोदी किती आणि काय करू शकतील?
एखादा माणूस भ्रष्ट आहे म्हणून सामान्य माणूस त्याला आपली मुलगी देत नाही किंवा त्याच्याशी संबंध ठेवत नाही असे होते का?
जोवर असं चालायचंच हे आपण मान्य करतो तोवर काहीही होणार नाही.
माझं काम झालं ना? बस. हि मनोवृत्ती जोवर बदलत नाही तोवर मारा बोंबा.
मी कार्यालयात उशिरा जाणार, लायसन्स साठी चिरीमीरी देणार, वाटेल तिथे कचरा टाकणार, माझी गाडी कुठही पार्क करणार, हेल्मेट घालणार नाही, सिग्नल तोडणार आणि पोलिसाने धरले कि १०० ची नोट सरकवणार आणि
५ वर्षात एकदा मतपेटीत मत टाकल कि सगळ्या राजकारण्यांना आई बहिणीवरून शिव्या द्यायला मोकळा
23 Mar 2021 - 9:23 pm | धर्मराजमुटके
याच संदर्भात हा एक रोचक व्हिडीओ नुकताच पाहण्यात आला.
24 Mar 2021 - 8:49 am | Rajesh188
वरील व्हिडिओ मध्ये जर मत व्यक्त केलेले आहे हेच सत्य आहे.आणि ही सहकारी भ्रष्टाचार समिती देशाच्या स्वतंत्र पासून आज पर्यंत अस्तित्वात आहे.
ब्रिटिश काळात अशी सहकारी समिती स्थापन कारणे म्हणजे तुरुंगात जाणे ही पद्धत होती.
पण हे बदलावे असे कोणत्याच राजकीय पक्षांना वाटत नाही.
त्याचे मूळ कारण कार्यकर्त्यांना पोसायला पैसे लागतात.त्या साठी हे पैसे उपयोगी पडतात.
स्वतः साठी उपयोगी पडतात. निवडणूकीत तिकीट खरेदी करायला उपयोगी पडतात.
म्हणजे लोकशाही च प्राण आहे तो.
24 Mar 2021 - 9:03 am | शाम भागवत
नविन धागा काढा बॉ.