[कविता' २०२०] - आई

साहित्य संपादक's picture
साहित्य संपादक in स्पर्धा
8 May 2020 - 2:34 pm

आई

तो हलक्या हाते, जळात काही सोडे
निःशब्द नदीवर आले तरंग थोडे
हा कोण भाबडा जीव उदासून आला
ती हळू म्हणाली मनी घेउनी कोडे

त्या डोळ्यांमध्ये कल्लोळाच्या लाटा
शेकडो प्रश्न अन् उत्तर नाही आता
ती नदी बिचारी पुन्हा पुन्हा त्या पाही
डोळ्यांत आसवे थिजून होती आता

ती शांत नदी मग थोडी कातर झाली
हि कुठून आली, नयनामध्ये खोली
मग हळूच गेली एक नदीची धार
पायाशी त्याच्या जरा सरकती झाली

त्या स्पर्शाने तो जणू भानावर आला
अस्वस्थ हसून तो पुन्हा स्तब्धसा झाला
नदी काहीशी प्रश्न विचारून गेली
"लेकरा, असा तू उदासीन का झाला?"

लेकरा, शब्द ऐकून तरळले पाणी
मन थरथर झाले आणि कंपली वाणी
ती आई होती, आई....गेली आता
अन् फक्त राहिली आठवणी अन् गाणी

तू आज 'लेकरा' म्हटले अज्ञानात
मज आई दिसली, हाक तिची कानात
हि तीच ओढ अन् आपुलकी मायेची
हा ओलावा गे कसा तुझ्या पाण्यांत?

मजपाशी आता तिची सावली नाही
लेकरुच कसला जयां माउली नाही
मज आता नाही जगावयाची ओढ
मज कुशीत घेशील का गे माझे आई?

हे ऐकताच त्या नदीस पाझर फुटले
जणू हृदय मायेने पाणीपाणी झाले
ती क्षणांत गेली वहात त्याच्यापाशी
अन् आई गेली तिथे लेकरा नेले

body {
background: url(https://i.postimg.cc/3JFS7g8f/IMG-20200503-162101.jpg);

background-size: 4500px;
}

प्रतिक्रिया

कानडाऊ योगेशु's picture

8 May 2020 - 3:21 pm | कानडाऊ योगेशु

कविता सुंदर झालीये.

मन्या ऽ's picture

8 May 2020 - 4:16 pm | मन्या ऽ

.

प्राची अश्विनी's picture

8 May 2020 - 6:26 pm | प्राची अश्विनी

+1

नूतन's picture

8 May 2020 - 7:40 pm | नूतन

लेकरुच कसला जयां माउली नाही....ओळ आवडली

सही रे सई's picture

8 May 2020 - 9:14 pm | सही रे सई

+१

गणेशा's picture

9 May 2020 - 12:38 am | गणेशा

+1

मोगरा's picture

9 May 2020 - 8:29 am | मोगरा

सुंदर

+1

~~~
प्रिती

चांदणे संदीप's picture

9 May 2020 - 9:35 am | चांदणे संदीप

वात्सल्य आणि करूणा ओसंडून वाहिली.
ही आणखी एक उत्तम रचना आज वाचलेली.
अशी कविता वाचायला दिल्याबद्दल कविचे मनापासून आभार. स्पर्धेपलीकडची कविता आहे ही.

फक्त स्पर्धेत आहे म्हणूनच, कवितेला + १

सं - दी - प

गोंधळी's picture

9 May 2020 - 11:16 am | गोंधळी

+१

सचिन's picture

9 May 2020 - 11:38 am | सचिन

अतिशय आवडली.

सचिन's picture

9 May 2020 - 11:38 am | सचिन

अतिशय आवडली.

कौस्तुभ भोसले's picture

9 May 2020 - 4:04 pm | कौस्तुभ भोसले

आर्त

अद्द्या's picture

10 May 2020 - 8:23 am | अद्द्या

Depressing ..

पण मस्त :)

+1

तुषार काळभोर's picture

10 May 2020 - 9:35 am | तुषार काळभोर

+१
अतिशय सुंदर कविता.

बबु's picture

10 May 2020 - 12:08 pm | बबु

"मातीत ते पसरले अतिरम्य पन्ख " या टिळकान्च्या कवितेची आठवण झाली.

सौ मृदुला धनंजय शिंदे's picture

12 May 2020 - 12:17 am | सौ मृदुला धनंजय...

+1 मस्त!!

राघव's picture

14 May 2020 - 10:37 am | राघव

शेवटची २ कडवी खास. आवडली रचना.

बिपीन सुरेश सांगळे's picture

25 May 2020 - 12:55 pm | बिपीन सुरेश सांगळे

खूपच संवेदनशील कविता
ग्रेट दुखी शब्दचित्र !