[शशक' २०२०] - दुवा मे याद रखना, बस!

बोलघेवडा's picture
बोलघेवडा in स्पर्धा
24 Apr 2020 - 3:49 pm

दुवा मे याद रखना, बस!

"बघा ना काही होतंय का ते..."
"काय बघणार साहेब?...तुम्हाला माहितचे"

"नाही... पssण.."

"कसंय साहेब, आमच्या हातात काही नसतं.
रेकॉर्डनुसार जायला लागतं. प्रोशिजर असते साहेब."

"पण एवढा मोठा माणूस, बायका पोरं, घरदार..सामाजिक कार्य..."

"आम्ही चेक करूनच हात लावतो साहेब.
ह्याच रेकॉर्ड दाखवू?
४ बायका, ८ पोरं, गडगंज श्रीमंतय
वडील गेलेत,
आय जिंदा आहे.

१० दिसांपासून आजारी आहे...
पन आमच्या वहीत अजूनपर्यंत येक्काची बी नोंद नाय जो हा जगावा म्हणून दुवा मागतोय.

अगदी ह्याच्या आयची पण नाही!!"

"ठीके..." सायबांनी सुस्कारा सोडला.

नेहमीप्रमाणे त्यानं आपल्या दप्तरातून फास काढला आणि पेशंटच्या गळ्याला लावला.

दहा मिनिटात टीव्ही वर बातमी
अमुक देशाच्या ढमुक हुकुमशाहाचे निधन.

body {
background: url(https://i.postimg.cc/NM70Z4Dn/147450-abstract-purple-and-white-blur-ligh...);

background-size: 1900px;
}

प्रतिक्रिया

चांगली आहे कथा, अजुन ही जास्त छान बनवता आली असती, जर हुकुमशहा आजारी पडण्या अगोदरचे त्याचे काही प्रसंग दाखवता आले असते तर

+१

ज्योति अळवणी's picture

24 Apr 2020 - 11:23 pm | ज्योति अळवणी

आवडली

बोलघेवडा's picture

25 Apr 2020 - 12:56 pm | बोलघेवडा

+ 1

निओ's picture

25 Apr 2020 - 1:21 pm | निओ

+१

संजय क्षीरसागर's picture

25 Apr 2020 - 1:38 pm | संजय क्षीरसागर

पेशंटला डायरेक्ट फाशी का दिली ब्रे ?

रीडर's picture

26 Apr 2020 - 2:58 pm | रीडर

+1

तेजस आठवले's picture

26 Apr 2020 - 7:00 pm | तेजस आठवले

हुकूमशहा सामाजिक कार्य करतात ? आणि तरीपण ते जगावे असं कोणालाही वाटत नाही ? काहीतरी गंडलंय

टर्मीनेटर's picture

28 Apr 2020 - 9:59 am | टर्मीनेटर

+१
आवडली