सर्व मिपाकरांना विनंती, वारंवार सूचना देऊनही 'चालू घडामोडी' आणि इतरही काही धाग्यांत व्यक्तिगत पातळीवर केली जाणारी टीका दिसून येते. पक्षांचे प्रमुख, पक्ष यांच्यावर केल्या जाणा-या टिकाही संयमित असाव्यात अशी अपेक्षा आहे, नव्या कायद्यांमुळे संकेतस्थळावरील सर्वांचा वावर कायद्यातील नियमाबरोबर, सार्वजनिक संस्थळावरील सभ्यतेचे किमान निकष पाळणारा असावे असे मिपा व्यवस्थापनाचे मत आहे, यापुढे असे आढळून येत राहिल्यास कोणतेही स्पष्टीकरण न देता असे प्रतिसाद, धागे सरसकट अप्रकाशित केल्या जातील किंवा खाते निष्कासित करण्यासारखी कठोर कारवाई केली जाईल याची सर्वांनी नोंद घ्यावी व सहकार्य करावे.

- मिपा व्यवस्थापन


ग म भ न श्रेणी नैवेद्य!

Primary tabs

स्वाती दिनेश's picture
स्वाती दिनेश in लेखमाला
3 Sep 2019 - 6:03 am


ग म भ न श्रेणी नैवेद्य!" गणपती घरी येणार, म्हणजे घरी-दारी उत्साही धांदल असते! कितीतरी कामं हातावेगळी करायची असतात. अगदी कोणती मूर्ती आणायची ह्यापासून नैवेद्याचं काय करायचं, आरास काय करायची, पूजेचं सामान, फुलं, पत्री, दूर्वा... कितीतरी बारीक बारीक कामं असतात! त्यात घरसफाईही असतेच. पण आजकालच्या वेगवान जीवनशैलीशी जुळवून घेताना, नोकरी-व्यवसायाची गणितं सांभाळताना कधीकधी बाप्पाची साग्रसंगीत सेवा, गोडाधोडाचा नैवेद्य जमेल की नाही, ह्याची धाकधूक वाटत राहते."

परदेशात राहत असताना आठवड्याच्या मधल्या वारी गणपतीचं आगमन होणार असलं, तर सगळा बैजवार स्वयंपाक करायला वेळ नसतो, तरीही मोठया अपूर्वाईने, प्रेमाने घरी आणलेल्या गणरायाचं जमेल तितकं कोडकौतुक करावंसं वाटतंच. तेव्हा, अशा वेळी फार मोठा घाट न घालताही झटपट नैवेद्यासाठी करू शकू, अशा ह्या दोन सोप्या गोडाच्या पाककृती.

तर नैवेद्याची पहिली पाककृती आहे स्ट्रॉबेरीखंड.


साहित्य -

५०० ग्रॅम चक्का

५०० ग्रॅम साखर

फ्रेश स्ट्रॉबेरीज दीड वाटी

भारताबाहेर असाल, चक्का उपलब्ध नसेल, तर छोटासा बदल.

चक्क्याऐवजी -

५०० ग्रॅम स्पाइझ क्वार्क किंवा घट्ट दही

२०० ग्रॅम सावर क्रीम किवा ष्मांडकृती -

प्रथम, तयारी म्हणून एक वाटी स्ट्रॉबेरी चिरून आणि अर्धी वाटी स्ट्रॉबेरी जरा मिक्सरमघ्ये फिरवून क्रश करून घ्या.

१. आता नेहमीचा चक्का असेल, तर श्रीखंडासाठी जसं चक्का आणि साखर पुरणयंत्रातून काढतो तसं काढून घ्या आणि त्यात स्ट्रॉबेरी क्रश आणि तुकडे मिसळा.

२. भारताबाहेर बर्‍याच ठिकाणी चक्का उपलब्ध नसतो, तेव्हा ५०० ग्रॅम स्पाइझ क्वार्क किवा घट्ट दही आणि २०० ग्रॅम सावर क्रीम किंवा ष्मांड एकत्र करून एका फडक्यात घालून ५-६ तास टांगून ठेवलं की छान चक्का तयार होतो. क्वार्क आणि पुळण साखर असेल, तर पुरणयंत्रातून काढावं लागत नाही.

ह्या तयार चक्क्यात साखर मिसळा, स्ट्रॉबेरी क्रश घालून ढवळा व नंतर स्ट्रॉबेरीचे तुकडे घाला. एकत्र करून साखर एकजीव होईपर्यंत थोडा वेळ ठेवा.स्ट्रॉबेरीखंड तयार आहे.
आपली दुसरी नैवेद्याची पाककृती आहे  बदाम खोबऱ्याच्या वड्या.

बाप्पाचं आगमन झालेलं आहे आणि रोज वेगळा प्रसाद हवाच, नाही का? तर ही आणखी एक, झटपट नैवेद्याची, बदाम खोबर्‍याच्या वड्यांची पाककृती. डाएट थोडं बाजूला ठेवून प्रसादाची एखाददुसरी वडी खायला हरकत नाही, बरं का... 🙂साहित्य -

२०० ग्रॅम बदाम पावडर (साधारण २ वाट्या)

७५ ग्रॅम डेसिकेटेड कोकोनट (साधारण वाटीभर)

१५० मि.ली. फ्रेश क्रीम (साधारण कपभर)

१५० ते २०० ग्रॅम साखर (साधारण २ वाट्या)

केशर, वेलची स्वादासाठी


कृती -

वरील सर्व पदार्थ एकत्र करून दोन ते अडीच तास एका कढईत वा कढईवजा भांड्यात ठेवून द्या.

वड्या तयार करण्यासाठीचं मिश्रण गॅसवर ठेवण्याआधी, ज्या ट्रेमध्ये किवा थाळ्यामध्ये वड्या पाडणार, त्याला तूप लावून घ्या.

आता हे मिश्रण गॅसवर मध्यम आचेवर ठेवून मध्ये मध्ये ढवळत राहा, म्हणजे गुठळ्या होणार नाहीत.

मिश्रणाचा गोळा होत आला की तूप लावलेल्या ट्रेवर वा थाळ्यावर तो गोळा पसरून लगेचच वड्या पाडून त्या एका बटर पेपरवर काढून ठेवा आणि पूर्ण गार झाल्यावर डब्यात भरा.बदाम खोबऱ्याच्या वड्या.बाप्पाला नैवेद्य दाखवा आणि पानं वाढायला घ्या... 🙂


श्रीगणेश लेखमाला २०१९

प्रतिक्रिया

यशोधरा's picture

3 Sep 2019 - 8:19 am | यशोधरा

साध्या, सोप्या, सहजसाध्य पाककृती.
धन्यवाद, स्वातीताई!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

3 Sep 2019 - 9:25 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बदाम खोब-याच्या वड्या नंबर एक. स्ट्रॉबेरीखंड पण भारी.

स्वाती यांची पाककृती असू दे, नाहीतर लेखन. अतिशय निगुतीने आलेलं असतं. हल्ली कुठे व्यस्त आहेत काय माहिती. पण येत जा हो अधुन मधुन. :)

-दिलीप बिरुटे

शैलेन्द्र's picture

3 Sep 2019 - 9:40 am | शैलेन्द्र
शैलेन्द्र's picture

3 Sep 2019 - 9:49 am | शैलेन्द्र
शैलेन्द्र's picture

3 Sep 2019 - 9:49 am | शैलेन्द्र
शैलेन्द्र's picture

3 Sep 2019 - 9:50 am | शैलेन्द्र
कुमार जावडेकर's picture

3 Sep 2019 - 10:08 am | कुमार जावडेकर

मस्त, दोन्ही पदार्थ आवडले (वाचायला). खायलाही आवडतीलच... खोबर्‍याच्या वड्या/लाडू खाल्ले आहेत, स्ट्रॉबेरीखंड ही कल्पना छानच आहे.

खोबऱ्याच्या वड्या खाल्यात. मस्तच लागतात.

पद्मावति's picture

3 Sep 2019 - 12:54 pm | पद्मावति

मस्तं रेसीपीज.

प्रशांत's picture

4 Sep 2019 - 1:56 pm | प्रशांत

+१

जालिम लोशन's picture

3 Sep 2019 - 1:48 pm | जालिम लोशन

मस्त

टर्मीनेटर's picture

3 Sep 2019 - 2:09 pm | टर्मीनेटर

दोन्ही रेसिपीज छान आहेत! 👍
स्ट्रॉबेरीखंड भारीच 👌 त्याचा फोटो बघून जीभ चाळवली.
रच्याक- माझी मामी अशाच प्रकारे पायनॅपल खंड करते, ते पण चवीला खूप मस्त लागते.

पियुशा's picture

3 Sep 2019 - 2:19 pm | पियुशा

वाह वाह !!

तुषार काळभोर's picture

3 Sep 2019 - 4:01 pm | तुषार काळभोर

नावाला जागणारे गमभन श्रेणी नैवेद्य!!

रेसेप्या सोप्या आणि शीर्षक तर फारच छान, ग म भ न श्रेणी नैवेद्य :-)

खोबरे आणि स्ट्रॉबेरी दोन्ही आवडत नसल्याने अन्य पर्याय वापरून बघीन.

किसन शिंदे's picture

3 Sep 2019 - 6:54 pm | किसन शिंदे

व्वा !! स्ट्राॅबेरी नाय आवडत, पण प्रसादासाठी बदाम खोबऱ्याच्या वड्या करून बघण्यात येतील नक्कीच.

स्वयंपाकात सतत ग म भ न श्रेणी गिरवत असणाऱ्या माझ्या सारखीसाठी ह्या रेसिपी म्हणजे वरदान म्हणायला हव्यात! :))

स्वाती ताई, तुमचे आभार!

ज्योति अळवणी's picture

4 Sep 2019 - 9:18 pm | ज्योति अळवणी

स्ट्रॉबेरीखंड मस्तच

Try केलं पाहिजे असं

ताई तोंडाला पाणी सुटल्यावर काय करायचं असतं , त्याचीही रेशिपी टाकली असती तर ..

मस्तच लिवलंय , ह्ये सांगायचं राहून गेलो .. असं म्हणा ना कि मी त्या वड्यांत हरवून गेलो ..

नूतन सावंत's picture

5 Sep 2019 - 8:06 pm | नूतन सावंत

स्वाती,झकास आहेत,दोन्ही पाककृती. स्ट्रॉबेरी खंड नं 1.

मदनबाण's picture

6 Sep 2019 - 7:46 pm | मदनबाण

स्ट्रॉबेरी खंड लयं भारी !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- माझा बाप्पा नाचु लागला... :- (Sanket wadekar)

जुइ's picture

23 Sep 2019 - 7:12 am | जुइ

स्वातीताई तुमच्या पाकृ नेहमीच अनोख्या आणि करायला सोप्या असतात. पुढील गणेश उत्सवात नक्की करून पाहीन.