वीज बिल

मिलिंद दि.भिड़े भिलाई's picture
मिलिंद दि.भिड़े भिलाई in तंत्रजगत
18 Jun 2019 - 5:04 pm

मिलिंद भिड़े, भिलाईनगर, छत्तीसगढ़
वीज बिल ज्यास्त आले, ही सर्व सामान्य माणसाची तकरार,भारतात कुठे ही ऐकायाला, हमखास मिळते,। तुम्हाला मिळणाऱ्या बिल वर जवळपास प्रत्येक गोष्टिंचा खुलासा दिलेला असतो, फक्त तुम्ही तो अभ्यासायाचा / वाचायाचा त्रास घेत नाही । हे न केल्या मुळे तुम्हाला असे वाटते कि वीज पुरवठा करणारी एजेंसी तुम्हाला लूटत आहे ।

वीज बिलिंग मुळात तुम्ही विद्युत जोड़नी मागत असताना दिलेल्या खप अहिवाला (demand) वरुन ठरत असते ।त्या मागणी प्रमाणे तुमच्या जोड़नी साठी एनर्जी मीटर लावला जातो ।तुमच्या घरी खप अहिवाला पेक्षा ज्यास्त उपकरणें वापरल्यास तुमचे बिल वाढते ।हे तथ्य ग्राहक सोइस्कर रित्या विसरतो। अशी घरों घरी वाढलेली खप व्यवस्था तुमच्या भागात लावलेल्या ट्रांसफार्मर च्या खप वहन क्षमता सकट इतर वीज पुरवठा व्यवस्थे वर परिणाम करते। मग कंप्लेंट येते कि सायंकाळी वीज वारंवार जाते/ प्रकाश कमी होतो/ मिक्सर, टेलीविजन नीट चालत नाही ।

कुठली ही वीज पुरवठा कंपनी आपल्या ग्राहकाने दिलेल्या माहिती वर प्रथम दृष्टया विश्वास ठेवूनच काम करीत असते । जेव्हा एखादी घटना वारंवार एका विशिष्ट भागात घडायला लागते, तेव्हा च पुरवठा एजेंसी त्या घटनेचे कारण शोधन्यास भाग पड़ते, कारण सापडले कि पर्यायी व्यवस्था केली जाते । हा अतिरिक्त खर्च ग्राहक देत नसतो ।

ह्या पार्श्वभूमि वर आपले वीज बिल तुम्ही स्वतः ही तपासून पाहू शकता । आपले वीज खप जाणायचे गणित अत्यंत सोपे आहे : 100 वाट चा एक बल्ब 10 तासात एक यूनिट वीज खपवतो, किंवा 1000 वाट चे पाणी तापविन्याचे रॉड एक तास वापरले तर एक यूनिट वीज खर्च होते । ह्या प्रमाणे आपल्या घरात असलेले सगळे उपकरणांच्या वाटेज ची बेरीज करून आपल्या घरातील वीज खप स्वतः केलकुलेट करावी ।

आपल्या वीज बिलावर दिलेल्या प्राथमिक मागणी पेक्षा ज्यास्त उपकरण वापरात असले तर वीज मंडल / कंपनी ला रितसर सूचना दया आणि आपले खप वाढवून घ्या । ह्याला load enhancement म्हणतात । ह्या करिता एडिशनल सिक्योरिटी डिपाजिट ही भरावा लागू शकतो । ह्याच प्रमाणे ज्यांचा वीज खप प्राथमिक मागणी पेक्षा कमी झाला आहे त्यांनी ही आपला खप कमी झाल्याची रितसर सूचना पुरवठा एजेंसी ला द्यावी। सूचना दिल्याची दिनांकित पावती घ्यावी ।गरज पडल्यास electricity regulatory forum ज्याचा पत्ता तुमच्या बिलावर ही मिळू शकेल , तकरार नोंदवावी, आणि जवाबदार आणि जागरूक ग्राहक असल्याचा परिचय द्यावा ।

आपण ही पोस्ट वाचायला आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद ।

प्रतिक्रिया

तुषार काळभोर's picture

18 Jun 2019 - 6:35 pm | तुषार काळभोर

एक शंका:
वीज वितरण कंपनीला आपण किती वीज वापरतो, हे कळवल्याने काय फरक पडेल?
माझ्या बिलावर मंजूर भार 3 KW आहे आणि मी जर फक्त 1 Kw वावरत असेल तर तसे कंपनीला कळवून काय फरक पडेल?

मिलिंद दि.भिड़े भिलाई's picture

18 Jun 2019 - 7:24 pm | मिलिंद दि.भिड़े भिलाई

कृपया पोस्ट "पुन्हा वाचावी". मी स्पष्ट पणे लिहिले आहे कि #स्वीकृत भार# पेक्षा "ज्यास्त भार वापरत असल्यास" लोड एनहांसमेंट करिता सूचना द्यावी.

ज्यांचा वीज खप प्राथमिक मागणी पेक्षा कमी झाला आहे त्यांनी ही आपला खप कमी झाल्याची रितसर सूचना पुरवठा एजेंसी ला द्यावी। सूचना दिल्याची दिनांकित पावती घ्यावी ।

हे का करावे ?

तुषार काळभोर's picture

18 Jun 2019 - 8:10 pm | तुषार काळभोर

पोस्ट आणि प्रश्न "पुन्हा वाचावा".
तुम्ही पोस्टमध्ये स्पष्ट लिहिले आहे की, ज्यांचा वीज खप #प्राथमिक मागणी पेक्षा कमी# झाला आहे त्यांनी ही आपला खप कमी झाल्याची रितसर सूचना पुरवठा एजेंसी ला द्यावी.

आणि मी प्रश्नामध्ये स्पष्ट विचारले आज की माझा मंजूर भार ३ KW असेल व वास्तव वापर १ Kw असेल, तर तसे मी वितरण कंपनीला कळवून काय फरक पडेल?

तुम्ही पोस्टमध्ये स्पष्ट लिहिलेले तसेच मी प्रश्नामध्ये स्पष्ट विचारलेले, या दोन वाक्यांचा अर्थ वेगळा असल्यास #कृपया# निदर्शनास आणून द्यावे ही #विनम्र# #विनंती#!

मिलिंद दि.भिड़े भिलाई's picture

19 Jun 2019 - 12:34 am | मिलिंद दि.भिड़े भिलाई

प्रत्येका राज्यात बिलिंग पैटर्न वेगळे असु शकतात । आमच्या कड़े छत्तीसगढ़ मध्ये सर्वात ज्यास्त खप असलेले पैटर्न, एवरेज बिलिंग करिता वापरले जात होते । त्या मुळे कमी वीज वापरणारा ग्राहक ही आपल्या जुन्या पैटर्न प्रमाणे एवरेज बिलिंग वर पैसे देत होता । म्हणून खप कमी झाल्याची लेखी सूचना दिल्यास तुम्ही आपली एवरेज बिलिंग अमाउंट कमी करवून घेऊ शकता । ही स्थिति त्या घरां मध्ये उदभवेल जिथे कुटुंबातील 4 सदस्या पैकी 2 बाहेर गावी नोकरी /उद्योगा च्या निमित्याने स्थायिक झालित आणि वीज वापर कमी झाला आहे तरी पूर्वी प्रमाणे बिलिंग चालू आहे ।

स्वीकृत भारा पेक्षा ज्यास्त भार वापरणे वीज चोरी च्या श्रेणित बसते । त्या वर तुम्हाला विजिलेन्स चेकिंग मध्ये स्पॉट वर भुरदण्ड भरावा लागतो, शिवाय विद्युत न्यायालयात वेगळे खटले चालतात, त्यात होणारी पेनाल्टी वेगळी । म्हणून खप वाढला तरी लेखी सूचना देऊन पावती घ्यायची म्हणजे सूचना दिल्या नंतर झालेल्या चेकिंग मध्ये अतिरिक्त भार सापडला तरी तुम्ही अतिरिक्त भुरदण्ड भरण्या पासून वाचता ।

टीप: दोन्ही स्थिति छत्तीसगढ़ मधील लागू दरां करिता सामयिक आहेत ।

तुषार काळभोर's picture

19 Jun 2019 - 6:13 am | तुषार काळभोर

.

१.५ शहाणा's picture

28 Jun 2019 - 8:44 am | १.५ शहाणा

महावितरण मध्ये . घरघुती व व्यवसाईक (२७ अश्वशक्ती पेक्षा कमी ) याच्या देयकावर वरील दोन्ही भार दर्शविलेले असतात सर्व साधारण पणे १ ते ३ किलो वँ ट असतो पण देयक हे किती एकक (युनिट्स ) वापरले आहेत ते अधिक स्थिर आकार यावर ठरते , या श्रेणीतील ग्राहकांकडून कमाल मागणी वर कोणताही आकार नसतो , जोड भर हा केवळ सुरवातीची सुरक्षा ठेव व रोहित्राची क्षमता ठरवण्या साठी विचारात घेतले जातात . वीज देयक तयार करताना . वापरलेले युनिट +स्थिर आकार+चक्रीय शुल्क तसेच वीज कर, वीज पुन विक्रीकर , इंधन अधिभार ह्यावर गणना केली जाते ,

प्रकाश घाटपांडे's picture

29 Jun 2019 - 8:41 am | प्रकाश घाटपांडे

सोप्या भाषेत एखाद्या नमुना वीज बीलाचे विश्लेषण करता येईल का?

गवि's picture

29 Jun 2019 - 9:36 am | गवि

कॉलिंग स्नेहाताई.

रेमिंग्टन's picture

21 Jul 2019 - 3:18 am | रेमिंग्टन

मी मूलतः आळशी असल्या कारणाने दर ५,६ महिन्यांनी ५०००/- आगाऊ डिपॉझिट भरून टाकतो. बिल वेळेत न भरल्याने एक दोनदा वीजप्रवाह खंडित झाल्याचा भयाण अनुभव गाठीशी आहे.

जॉनविक्क's picture

22 Jul 2019 - 6:36 am | जॉनविक्क

लेखी नोटिशी शिवाय खंडित केलेला वीज पुरवठा बेकायदेशीर ठरतो मग भलेही तो बिल न भरल्याच्या कारणाने तोडला असेल

रेमिंग्टन's picture

22 Jul 2019 - 11:11 am | रेमिंग्टन

माहितीबद्दल धन्यवाद.. बऱ्याच आधी 2, 3 महिन्यांचं बिल थकलं की वीजप्रवाह खंडित करायचे. पण काही वर्षांपासून एखाद्या महिन्याचं जरी थकलं तरी लगेच कारवाई होते.

जॉनविक्क's picture

22 Jul 2019 - 7:36 pm | जॉनविक्क

पण कायद्याला ते धरून नाही तिथे जाऊन प्रथम लेखी नोटिस दाखवा म्हणायचे. मग त्यांचे चेहरे आणि आवेश बघा कसे बघण्यासारखे होतील

रेमिंग्टन's picture

25 Jul 2019 - 1:14 am | रेमिंग्टन
रेमिंग्टन's picture

25 Jul 2019 - 1:14 am | रेमिंग्टन
रेमिंग्टन's picture

25 Jul 2019 - 1:14 am | रेमिंग्टन
रेमिंग्टन's picture

25 Jul 2019 - 1:15 am | रेमिंग्टन
रेमिंग्टन's picture

25 Jul 2019 - 1:15 am | रेमिंग्टन
रेमिंग्टन's picture

25 Jul 2019 - 1:15 am | रेमिंग्टन
रेमिंग्टन's picture

25 Jul 2019 - 1:17 am | रेमिंग्टन
रेमिंग्टन's picture

25 Jul 2019 - 1:32 am | रेमिंग्टन