रगडा पॅटीस by Namrata's CookBook :१०

Primary tabs

Namokar's picture
Namokar in पाककृती
16 Jul 2019 - 1:54 pm


लागणारा वेळ:
१ तास
लागणारे जिन्नस:
पांढरे वटाणे
उकडलेले बटाटे
पोहे
बारीक चिरलेला कांदा
बारीक चिरलेला टोमॅटो/ टोमॅटो प्युरी
आलं+लसून पेस्ट
चिंचेचा कोळ
चाट मसाला
गरम मसाला
हळद
लाल तिखट
कोथिंबीर
तेल
मीठ

क्रमवार पाककृती:
१. पांढरा वटाणा साधारण ८ तास भिजत ठेवा
२. बटाटे उकडून घ्या ( २ शिट्ट्या)
३. आता वटाणे कूकरमध्ये घेउन हळद , चवीनुसार मीठ घालून एकत्र करुन घ्या आणि २ - ३ शिट्ट्या करुन घ्या

४. वटाणे शिजेपर्यंत पॅटीसची तयारी करु,
उकडलेले बटाटे स्मॅश करुन घ्या
५. आता त्यामध्ये थोडी हळद ,काळे मीठ /चाट मसाल , आलं+लसून पेस्ट ,पोहे भिजवून घालून एकत्र करुन घ्या

६. आता पॅटीसला आवडीप्रमाणे आकार द्या

७. एका पॅनमध्ये थोड तेल घेउन पॅटीस शॅलो फ्राय करुन घ्या

८. एका बाजूने लालसर रंग आलाकी दुसर्या बाजूनेसुध्दा लालसर रंग येईपर्यंत शॅलो फ्राय करुन घ्या

९. वटाणे शिजलेकी रगड्याची तयारी करु ,
एका कढई मध्ये तेल घ्या ,तेल गरम झालेकी त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा छान रंग बदलेपर्यंत परतून घ्या
१०. आता त्यामध्ये टोमॅटो प्युरी घालून शिजवून घ्या

११. आता त्यामध्ये शिजलेले वटाणे थोडे स्मॅश करुन घाला
१२. आता त्यामध्ये गरम मसाला , लाल तिखट , थोडी हळद (नाही घातली तरी चालेल) , मीठ घालून एकत्र करा

१३. त्यामध्ये पाणी घालून एक उकळी काढू

रगडा आणि पॅटीस दोन्ही तयार आहेत
सर्व्ह करतान त्यावर चिंचेच पाणी,कथिंबीर , कांदा घालून सर्व्ह करा

अधिक टिपा:
**जर तयार रगडा पॅटीस लगेच खाणार असालतर कमी पाणी घातले तरी चालेल
थोड्यावेळानी खाणार असाल तर जस्त पाणी घालावे ,कारण जस जसा वेळ जाईल तसा रगडा घट्ट होईल
पाककृतीचा पूर्ण व्हिडिओ :
https://youtu.be/tCmddbGmlZo

प्रतिक्रिया

प्रलयनाथ गेंडास्वामीं's picture

16 Jul 2019 - 2:37 pm | प्रलयनाथ गेंडास...

वॉव ..
यम्मी ..

वरतून शेव भुरभरावी (आपापल्या आवडी प्रमाणे )

उगा काहितरीच's picture

16 Jul 2019 - 3:34 pm | उगा काहितरीच

शेवटचा फोटो मस्त आहे. पाकृही छान दिसत आहे.

रच्याकने शेवटचा फोटो पाहून एक विचार डोक्यात आला, पावासोबतही छान लागेल की हे !

जालिम लोशन's picture

16 Jul 2019 - 5:32 pm | जालिम लोशन

चविष्ट

जॉनविक्क's picture

16 Jul 2019 - 10:43 pm | जॉनविक्क

दर पावसाळ्यात एकदा संपूर्ण गॉडफादर वाचत खाणे नित्यनेम आहे.

मस्तच.

जेम्स वांड's picture

19 Jul 2019 - 9:55 am | जेम्स वांड

हितं पांढरा वाटाणा नीट आहे तरी मध्ये आलं लसुण पेस्टचं धस्कट आहेच मदी. अहो रगडा पॅटिस/चाट मध्ये कधीच आलंलसूण नसतं, किंबहुना मांसाहारी मुघलाई मधले मसाले वापरून कांदे-लसूण-मांस वजा करून यमुनेचे जड पाणी काउंटरबॅलन्स करायला दिल्लीकर वैष्णव लोकांनी काढलेले खाणे म्हणजे चाट होय

(संदर्भ :- एपिक चॅनल, राजा रसोई और अन्य कहानीयां)

(रसिक खवय्या) वांडो.

टीप :- सुगरण/सुगऱ्या खरी/खरा तोच जो उठसुठ वाटेल त्या भाजीत आले लसूण पेस्ट न टाकता अंगभूत चवीवर नीट रेशीप्या बनवते/बनवतो. असो!

प्रतिसादाबद्दल धन्यवाद प्रलयनाथ गेंडास..., उगा काहितरीच ,मदनबाण ,जालिम लोशन , जॉनविक्क ,जेम्स वांड

अनन्त अवधुत's picture

23 Jul 2019 - 6:30 am | अनन्त अवधुत

बनवायला सोपी आणि सुटसुटीत आहे.
चवदार झाली होती.
या आधी पण २-३ वेळेस रगडा बनवायचा प्रयत्न केला होता पण चव काही जमून आली नाही. फोटो नाही, सॉरी.

Namokar's picture

24 Jul 2019 - 5:40 pm | Namokar

धन्यवाद .
चवदार झाली होती.>>ऐकून छान वाटले :)

Namokar's picture

24 Jul 2019 - 5:41 pm | Namokar

धन्यवाद .
चवदार झाली होती.>>ऐकून छान वाटले :) :)