[शशक' १९] - पैशाचा धूर

साहित्य संपादक's picture
साहित्य संपादक in स्पर्धा
17 Feb 2019 - 4:39 am

पैशाचा धूर निघतो माझ्या बंगल्यातुन. दिसतो सगळ्यांना, पण त्याकडे वाकड्या नजरेने बघायची हिम्मत नाहि कोणाची. सरकारी यंत्रणेत योग्य ठिकाणी तेलपाणी, आमच्या कम्युनिटी लॉबीचा सपोर्ट, आणि रक्तातच असलेला बिझनेस सेन्स... असा मी स्वाभावीक बिझनेस बादशाह.
पौण्ड्स ते दिनार अशा सगळ्या करन्सीची गंगाजळी आहे माझ्या बुडाशी. सोनं-चांदी, हिरे-जडजवाहर, ह्युमन ट्रॅफिकींग, हत्यारं, दारुगोळा, असं सगळं करतो मी. माझ्याच धंद्याचं हीत सांभाळणारी आमची बँक आहे. धंद्यातल्या आत-बाहेरच्या सर्व बातम्या माझ्यापर्यंत पोचवणारे, जणु माझ्या देहाचे अवयव असल्यासारखे एकनिष्ठ
असे मॅनेजर्स आणि एजण्ट्स आहेत.
नुकतच एक मोठ्ठं डील फायनल केलय. मॅनेजरचा निरोप येईलच इतक्यात.
तिकडे आणखी एक दुसराच निरोप गेला... "महाराज, सुरत मारलीयाने अगणीत द्रव्य मिळेल".

प्रतिक्रिया

Ganes Gaitonde's picture

17 Feb 2019 - 6:03 pm | Ganes Gaitonde

-१ काय म्हणायचंय ते काही समजले नाही.

डॉ सुहास म्हात्रे's picture

17 Feb 2019 - 9:18 pm | डॉ सुहास म्हात्रे

???

लोथार मथायस's picture

18 Feb 2019 - 6:37 pm | लोथार मथायस

काहीच कळलं नाही :(

तुषार काळभोर's picture

19 Feb 2019 - 7:48 am | तुषार काळभोर

सतराव्या शतकातील सुरतच्या व्यापाऱ्याचं मनोगत?

प्रमोद देर्देकर's picture

19 Feb 2019 - 9:21 am | प्रमोद देर्देकर

अर्रर्र सगळं कसं स्पष्ट आहेत की वो
ते शिवजी महाराजांना खबर देत आहेत.
की आपण सुरत लुटली तर अगणित द्रव्य मिळेल.

प्रमोद देर्देकर's picture

19 Feb 2019 - 9:22 am | प्रमोद देर्देकर

चुकीने टायपिंग झालं.
छ. शिवाजी महाराज .

विनिता००२'s picture

19 Feb 2019 - 10:17 am | विनिता००२

महाराजांच्या काळातले वर्णन वाटत नाही, बहुतेक मांडणी चुकलीये.

स्वलिखित's picture

19 Feb 2019 - 9:39 pm | स्वलिखित

जव्हेरगंज ???

ज्योति अळवणी's picture

20 Feb 2019 - 9:19 am | ज्योति अळवणी

काहीच कळत नाही

वन's picture

21 Feb 2019 - 10:12 am | वन

-१

दादा कोंडके's picture

21 Feb 2019 - 1:06 pm | दादा कोंडके

छान पोटेंशिअल आहे पण जमली नाही.

चौथा कोनाडा's picture

22 Feb 2019 - 11:06 pm | चौथा कोनाडा

-३५%

हे नक्की काय आहे ?