जोत्यिरादित्य सिंधिया आणि सचिन पायलट : CM इन वेटिंग

महासंग्राम's picture
महासंग्राम in राजकारण
15 Dec 2018 - 12:37 pm

अपेक्षेप्रमाणे मध्यप्रदेश आणि राजस्थान मध्ये अनुक्रमे कमलनाथ आणि गेहलोत यांची निवड झाली, काँग्रेस कितीही नवीन रक्ताला वाव देणार असं म्हणत असली तरीही या वेळेस सुद्धा रागांनी सेफ गेम खेळत जेष्ठ नेत्यांना संधी दिली किंवा या नेत्यांनी राहुल गांधींना तसं करण्यास भाग पाडलं. आज पायलट(४२) आणि सिंधिया(४७) यांचं जे वय आहे, साधारणपणे त्याच वयाच्या नेत्यांना भाजपाने मुख्यमंत्री केले होते( देवेंन्द्र फडणवीस आणि अजयसिंह बिश्त उर्फ योगी आदित्यनाथ). जोत्यिरादित्य सिंधिया आणि सचिन पायलट या नेत्यांना जर मुख्यमंत्री केले असते तर जनतेत एक आश्वासक संदेश नक्कीच गेला असता, कीं काँग्रेस राखायचे
या पायलट आणि सिंधिया यांचं नेमकं कुठे चुकलं ? त्यांचं वय कमी म्हणून कि भविष्यात ते काँग्रेस नेतृत्वाला आव्हान ठरू शकतात म्हणून त्यांचा पत्ता कट केला ते कळत नाही. काँग्रेसचा पूर्वेतिहास पाहता दुसरं कारण मला जास्त योग्य वाटतं.

प्रतिक्रिया

विशुमित's picture

15 Dec 2018 - 4:06 pm | विशुमित

यदाकदचीत 2019 ला केंद्रात कांग्रेसची सत्ता आली तर हे दोन्ही सुशिक्षित सुसंस्कृत तरुण मंत्री म्हणून कामी येतील, असा पक्ष श्रेष्ठीचा विचार असावा.
...
माझ्या मते ह्या दोघाना देखील राज्याच्या कच्कचीच्या राजकारणापेक्षा दिल्लीतील descent parliamentary procedural राजकारण पसंद केले असावे.
त्याच बरोबर कॉंग्रेसच्या जुन्या स्व मतलबी राजकारण्यापेक्षा कुरबुर न कर्ता पक्ष बळकटीसाठी त्यानी समंजसपणाची भुमिका घेतली हे उत्तम केले.
....
मोदी पेक्षा गडकरी मऊ, याला काऊण्टर यट्यक म्हणून सचिन- ज्योती वर्सेस रागा असे काही पेरले तर जात नाही ना.! उगाच शंका.
...
बाकी कोणाला मुख्यमंत्री बनवायचे हे त्यांच्या पार्टी आमदार, पक्ष श्रेष्ठी, पदाधिकारी, कार्यकर्ते (?) अणि जनतेचा जनाधार हे सर्व पडताळूनच निर्णय घेतला असणार. उगाच 3 दिवस नाही घालवले त्यानी.
असो...!!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

15 Dec 2018 - 7:31 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>> कांग्रेसची सत्ता आली तर हे दोन्ही सुशिक्षित सुसंस्कृत तरुण मंत्री म्हणून कामी येतील, असा पक्ष श्रेष्ठीचा विचार असावा.

मलाही असंच वाटतं, सत्ता येईल न येईल पण सध्याचं सरकारने यांची कोंडी करुन यांना राजकीय दृष्ट्या संपवले असते.
भविष्यातील राजकीय प्रवासासाठी सांभाळले आहे हीच गोष्ट खरी वाटते, अर्थात भविष्यात हे सर्व पाहता येईलच.

-दिलीप बिरुटे

असा विचार असेल तर स्तुत्य आहे. पण सध्याचे काँग्रेस नेतृत्व एवढा प्रगल्भ विचार करेल असं वाटत नाही.

ह्याचे कारण आमच्या मते खालीलप्रमाणे,
१. २०१९ ला सत्ता आल्यावर ह्या दोन तरुण नेत्यांना मंत्रिमंडळात घेता येईल असे करण्यासाठी आधी २०१९ ला सत्ता येण्यासाठी पावले उचलावी लागतील.
२. आत्ता ह्या दोघांना त्यांच्या अनुक्रमे राज्यात मुख्यमंत्री बनवून काँग्रेस ने तरुण रक्ताला वाव दिला असे चित्र तयार करून तरुण मतदारवर्ग आकर्षित करता आला असता. शिवाय या दोन्ही तरुण नेत्यांनी लोकसभेच्या निवडणुकीत झोकून काम केले असते. आता तसे होईल असे वाटत नाही.
३. २०१९ ला सत्ता आल्यास या दोघानांही केंद्रात चांगला पोर्टफोलिओ देऊन राज्यात कमलनाथ आणि गेहलोत यांना मुख्यमंत्री बनवता आले असते. ह्याने तबला आणि डग्गा दोन्ही हातात आले असते.

सद्यस्थितीत तरी काँग्रेस नेतृत्वाने आपल्या समोरील संभाव्य अडथळा दूर केला असेच चित्र निर्माण झाले आहे.

विशुमित's picture

18 Dec 2018 - 4:25 pm | विशुमित

पटतय.
काटावरचे बहुमत असल्यामुळे कोणती ही रिस्क न घेण्याच्या स्थितीत असल्यामुळे, मुरलेल्या नेत्यांकडे राज्याची धुरा दिली असावी.
...
पाप्याची पितर पहिली संतुष्ट केली पहिजेत.
....
बाकी यज फ्यक्टर मला नाही वाटत मैटर करतो. जुनी खोडं खुप हुशार असतात, असे माझे मत आहे.

काटावरचे बहुमत असल्यामुळे कोणती ही रिस्क न घेण्याच्या स्थितीत असल्यामुळे, मुरलेल्या नेत्यांकडे राज्याची धुरा दिली असावी.

लोकसभा निवडणूक तोंडावर आहे. अश्यावेळी म.प्र. आणि राजस्थान मध्ये फोडाफोडीचे राजकारण करून भाजप नेतृत्व स्वत:ची बदनामी करणार नाही असे वाटते. राजकारणात टायमिंगला महत्त्व असते म्हणतात. बिहारमध्ये केलेली फोडाफोडी एव्हाना लोकं विसरली असतील. पण परत तेच करून जनतेच्या नजरेत व्हिलन बनण्याचा मूर्खपणा भाजप नेतृत्व करणार नाही. त्यामुळे काँग्रेस नेतृत्व बिनधास्त रिस्क घेऊ शकलं असतं.
अर्थात इतक्या निवडणूक हरल्यावर मिळालेला विजय सुखावणारा असतो. त्यामुळे रिस्क घेण्याची मनस्थिती नसते.

पण माझ्या मते, सिंधिया आणि पायलट यांना मुख्यमंत्रीपद नाकारून काँग्रेस नेतृत्वाने पक्षाच्या दृष्टीने जास्त मोठी रिस्क घेतली आहे. नाराजांना जाळ्यात ओढण्याचा डाव सद्य भाजप नेतृत्व नक्कीच खेळू शकते.

वसुंधरा राजे महंजेच राजस्थान-भाजप

राजस्थान-भाजप महंजेच वसुंधरा राजे.....

अश्या परिस्थितित पक्षबदल करुन bjp मधे निश्चित असनारी दुय्यम भूमिका कोण घेइल ???

त्याऐवजी
राज्यात सध्या दुय्यम पद घेवुन, स्ट्रॉंग पॉर्ट्फ़ोलीओ खाती घ्यावी,
उदया लोकसभेत आघाड़ी सरकार आल तर, एकतर मुख्यमंत्री केंद्रात जातिल व आपण मुख्यमंत्री होवु, किंवा आपण तरी केंद्रात मंत्री होवु असा विचार असेल....

त्यामूले पक्षफूटी शक्यता नाही वाटत....

सुबोध खरे's picture

21 Dec 2018 - 10:51 am | सुबोध खरे

म्हणजे काका साहेब?

फसव्नीस अणि योगी यांचे उदाहरण देवून करमणूक झाली.
जय हो!!

महासंग्राम's picture

25 Dec 2018 - 9:19 am | महासंग्राम

मी वयाच्या दृष्टीने म्हणालो कर्तृत्वाच्या बाबतीत फडणवीस करंटे निघाले असच म्हणावं लागेल. कर्जमाफीचा निर्णय सोडला तर अजयसिंह बिश्त यांच्या बद्दल न बोललेलंच बरं

जालिम लोशन's picture

1 Jan 2019 - 2:22 pm | जालिम लोशन

ह्यांची मराठी वाचुन करमणुक झाली.

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

15 Dec 2018 - 7:26 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

"असा पक्ष श्रेष्ठीचा विचार असावा."
हे वाचून हसू आले. निवड करताना आमदार कोणाला प्राधान्य देतात ते पाहिले जातेच पण आर्थिक हितसंबंध जपणारा, व्यापारी वर्गाला अनुकुल असे निर्णय घेणारा, पण त्याचवेळी गरीब वर्गाचा कळवळा आहे असे दाखवून देणारा, पक्षाला गरज लागताच नैतिक्/अनैतिक धंदे करण्यार्या लोकांकडून पैसे वसूल करू शकणारा.. असे सर्व गुण असणारा निवडला जातो. मग कॉंग्रेस असो वा भाजपा वा आणखी कुणी... निवड करताना वेळ लागतो तो ह्याचमुळे म्हणून मग 'पक्षश्रेष्ठी जो निर्णय देतील तो मान्य करू' असे एका सूरात म्हंटले जाते. हाताशी काहीच न लागलेले मग 'पक्षकार्यास वाहून घेऊ' असे घोषीत करतात व कारभार सुरळीत चालू होतो.

डॉ सुहास म्हात्रे's picture

15 Dec 2018 - 8:42 pm | डॉ सुहास म्हात्रे

राजकारण करण्याच्या पद्धतीवर कोणता नेता पुढे येईल आणि कोणाला डच्चू मिळेल हे ठरते.

"जोत्यिरादित्य सिंधिया आणि सचिन पायलट यांच्यासारखे सुशिक्षित, हुशार आणि उजळ प्रतिमेचे नेते पुढे आले तर रागांचे काय होईल?" अशी सार्थ भिती असू शकते.

'एकछत्री साम्राज्य' या तत्वावर बांधलेल्या संस्थांत, सिंधिया-पायलट यांच्या सारख्या लोकांचे पंख छाटले जातात व ते जमणे कठीण वाटले तर त्यांना इतर मार्गांनी दूर केले जाते, असे इतिहास सांगतो. दूरान्वयानेही प्रतिस्पर्धी होऊ शकेल असा संशय असलेला माणूस सद्य सर्वोच्च नेतृत्वाला घातक समजला जातो... किंबहुना, सर्वोच्च नेतृत्व स्वबळावर खंबीरपणे पाय रोवून उभे नसले तर असा धोका फारच वास्तविक असतो. त्यामुळे, "दुसर्‍या-तिसर्‍या फळीचे नेते बनू न देता आणि पहिल्यानंतर एकदम चौथी-पाचवी फळी ठेवणे", ही हिट् 'रिस्क मॅनेजमेंट स्ट्रॅटेजी' समजली जाणे अनिवार्य असते. किंबहुना, ही रणनिती अंमलात आणणे हीच, स्वबळावर फारसे आस्तित्व नसलेल्या व सर्वोच्च नेत्याच्या जीवावर महत्व प्राप्त झालेल्या चौथी-पाचव्या फळीतल्या दरबारी (कोटरी) लोकांची, मुख्य चिंता आणि काम असते. सर्वोच्च नेतृत्वाची हुजरेगिरी करण्याचा खात्रीचा इतिहास आणि सारा जमा करण्याची क्षमता, हे दोन गुण एकछत्री साम्राज्यांत अनिवार्यरित्या सर्वोच्च असतात, हे सांगायला नकोच ! :)

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

15 Dec 2018 - 9:11 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

'एकछत्री साम्राज्य' या तत्वावर बांधलेल्या संस्थांत, सिंधिया-पायलट यांच्या सारख्या लोकांचे पंख छाटले जातात

खुद्द सिंधिया-पायलटही असेच मोठे झाले आहेत. ह्या दोघांचेही पिताश्री राजीव गांधींचे जवळचे सहकारी. सिंधिया-पायलट गडगंज श्रीमंत असल्याने काँग्रेसने त्यांना जवळ केले. तिकडे भाजपाने राजमाता विजयाराजेना पहिल्या फळीत बसवले.

चौकटराजा's picture

29 Dec 2018 - 7:39 pm | चौकटराजा

काँग्रेसची परंपरा पंख छाटण्याचीच आहे . फक्त गांधी नेहरू हवे ! मला तरी जोतिरादित्य रागा पेक्षा उजवा वाटतो . रा गा लाही तसेच वाटत असेल तर..... ?

मला तरी जोतिरादित्य रागा पेक्षा उजवा वाटतो . रा गा लाही तसेच वाटत असेल तर..... ?

म्हणजे तुमची व रागा ची, वैचारिक वेव्हलेंग्थ जुळती म्हणा की :) ;)

डॉ सुहास म्हात्रे's picture

29 Dec 2018 - 10:12 pm | डॉ सुहास म्हात्रे

अरे वा ! म्हणजे आपल्यापेक्षा उजवे असलेल्याला बांधावर बसवायची काँग्रेसची पुराण्कालापासूनची क्लूप्ती तुम्हाला माहीत आहे तर! मग हे सारखं तळ्यात-मळ्यात कशाला चालले आहे ? इतके फ्लिटिंग विचार लई धोक्याचे असतात असे म्हणतात. =))

चौकटराजा's picture

30 Dec 2018 - 7:05 pm | चौकटराजा

तुम्ही व मी एकच ब्रॅण्डची बिडी फुंकली तर तुमची व माझी वैचारिक वेव्ह लेंथ जुळली असे म्हणायचे का ? कारण बिड्या फुकायचे धोरण देखील विचारातून ऊगम पावते नाहीतर प्रेते देखील बिड्या फुकताना दिसली असती !

डॉ सुहास म्हात्रे's picture

30 Dec 2018 - 10:17 pm | डॉ सुहास म्हात्रे

=)) =)) =))

सुबोध खरे's picture

31 Dec 2018 - 7:24 pm | सुबोध खरे

वा:
चौ रा साहेब
सौ सुनार कि एक लुहार कि

mrcoolguynice's picture

15 Dec 2018 - 9:13 pm | mrcoolguynice

'एकछत्री साम्राज्य' या तत्वावर बांधलेल्या संस्थांत,....
लोकांचे पंख छाटले जातात ......... दूरान्वयानेही प्रतिस्पर्धी होऊ शकेल असा संशय असलेला माणूस सद्य सर्वोच्च नेतृत्वाला घातक समजला जातो... किंबहुना, सर्वोच्च नेतृत्व स्वबळावर खंबीरपणे पाय रोवून उभे नसले तर असा धोका फारच वास्तविक असतो. त्यामुळे, "दुसर्‍या-तिसर्‍या फळीचे नेते बनू न देता आणि पहिल्यानंतर एकदम चौथी-पाचवी फळी ठेवणे", ही हिट् 'रिस्क मॅनेजमेंट स्ट्रॅटेजी' समजली जाणे अनिवार्य असते.

.
सहमत ....

या उलट भाजप मध्ये बघा .... भविष्यात जर
काही कारणाने (उदा वार्धक्य , प्रकृती अस्वास्थ्य इ इ ) पंतप्रधान मोदी जर नेतृत्व देण्यास सक्षम नसतील,
तर उद्या लोकसभेच्या निवडणुकीत भाजपला लीड करायला
तर भाजपकडे स्वबळावर खंबीरपणे पाय रोवून तरुण नेतृत्वाची दुसरी व तिसरी फळी दक्ष स्थितीत आहे.
फक्त मला जरा दुसरी व तिसरी फळी ची नावे काही कारणाने स्मरत नाही.
कोणी माझ्यासारख्याच एखाद्या राष्ट्रपेमी मिपाकराने लिस्ट दिल्यास आनंद होईल ...

आणखी पुढे जाऊन कोणी राष्ट्रद्रोही असे म्हणू शकतो की आरएसएस हे सुद्धा 'एकछत्री साम्राज्य' या तत्वावर बांधलेल्या संस्थांत येते तर
... कोणी एखाद्या राष्ट्रपेमी मिपाकराने त्यास अग्रिम उत्तर देऊन टाकावे...

डॉ सुहास म्हात्रे's picture

16 Dec 2018 - 1:44 am | डॉ सुहास म्हात्रे

वाह वाह !

माझा प्रतिसाद एका विशिष्ट संस्था-राजकारणाबद्दलची टिप्पणी होती. मूळ लेख काँग्रेसच्याबद्दल असल्याने अर्थातच त्या पक्षाचा उल्लेख अपरिहार्य होता. पण, त्या प्रतिसादाचा भाजपशी किंवा आरएसएसशी, तुलनात्मक किंवा इतर कोणताही नसलेला संबंध, तुम्हाला तुमच्या विशिष्ट चष्म्यातून दिसला! हल्ली अश्या गोष्टींचे आश्चर्य वाटणे बंद झाले आहे, म्हणा !

मात्र, तुमच्या उच्च विचारशक्ती (किंवा तिच्या अभावामुळे) वापरून केलेल्या उपहासात्मक टीप्पणीने मलाही जरासे जालोत्खनन करावेसे वाटले. तेव्हा इथे खालील माहिती मिळाली...

१९८० ते आजतागायत वाजपेयी, अडवानी, मुरली मनोहर जोशी, कुशाभाऊ ठाकरे, बंगारू लक्ष्मण, जना कृष्ण्मूर्ती, वंकैय्या नायडू, राजनाथ सिंह, नितीन गडकरी, व अमित शहा या व्यक्ती पक्षाध्यक्ष झालेल्या आहेत. माझ्या माहितीप्रमाणे यांच्यातली एकही व्यक्ती वारसदारी पद्धतीने पक्षाध्यक्ष झालेली नाही, किंबहुना त्यापैकी कोणत्याही दोन व्यक्तींमध्ये जवळचे (कदाचित दूरचेही) रक्ताचे नाते नाही. तुमच्या उच्च विचारशक्तीला त्यांच्यामध्ये काही नातेसंबंध दिसत असले तर माहीत नाही... एखादा चष्मा लावल्यावर तर कदाचित ते दिसतही असतील. तुम्हाला दिसणारे नातेसंबंध, आम्हालाही उलगडून दाखविण्याची कृपा करावी.

आतापर्यंत भाजपने आपले पक्षाध्यक्ष किंवा पंतप्रधान वारसदारीने निवडले नसल्याने, मोदींनंतर कोणी ना कोणी पंतप्रधान निवडला जाईलच. तुमच्या दुर्दैवाने मोदींना मुलगा नाही व त्यांचा एकही नातेवाईक सत्ताकारणाच्या जवळपासही नाही, त्यामुळे वारसदारीने एखादे नाव पुढे येण्याची शक्यता नाही. तसेच, मोदींनंतर सर्व भाजप नेते सन्यास स्विकारून हिमालयात जाण्याची शक्यता दिसत नाही (तुमच्या चष्म्यातून दिसत असेल तर माहित नाही), तेव्हा त्यांच्यातला कोणीतरी एखादा नेता पुढे येईलच. तो कोण असेल यापेक्षा, त्याचे नाव तो पाळण्यात असतानाच निश्चित केलेले नसेल, हा मुद्दा माझ्या प्रसादातील चर्चेसाठी महत्वाचा होता.

आरएसएसबद्दल माझा अभ्यास फार तोकडा आहे. आता तुम्हीच त्याच्यावर टीप्पणी केली आहे तर, त्याच्या मुख्यांच्या घराणेशाहीवरही तुम्ही तुमच्या प्रखर बुद्धीने प्रकाश टाकाल अशी आशा आहे.

तेव्हा, परत उपहासाच्या मागे न लपता आणि गोलपोस्ट न बदलता... आणा ते सगळे नातेसंबंध उजेडात आणि टाका सर्व मिपाकरांच्या ज्ञानात भर! हाकानाका :)

**************

गेल्या कॉग्रेस पक्षाध्यक्ष निवडणूकीत भाग घ्यायचा आहे असे जाहीर केल्यामुळे कॉग्रेसच्या महाराष्ट्रातील एका पदाधिकार्‍याची गच्छंती झाली हे ध्यानात असेलच. शिवाय, त्या पदाधिकार्‍याने त्या प्रकरणासंबंधी त्याचे व दिल्लीतील वरिष्ट काँग्रेस नेत्यांचे झालेले टेलिफोन संभाषण राष्ट्रिय टीव्ही वाहिन्यांवर जाहीर केले होते. त्यामध्ये दिल्लीतील नेत्यांनी "कॉग्रेस एक फॅमिली लिमिटेड कंपनी आहे" अश्या अर्थाचा शेरे मारले होते. त्यावेळेस कॉग्रेसची पक्षाध्यक्ष निवडणूक प्रक्रियाही उघड झाली होती. आता, तुमच्या चष्म्यातून ते सर्व गाळून दिसले असेल आणि एकदम टकाटक लोकशाही चकाकत दिसत असेल (जे कॉग्रेसी नेत्यांनाही दिसत नाही) तर, सरजी तुसी ग्रेट हो, असेच म्हणावे लागेल ! =))

mrcoolguynice's picture

16 Dec 2018 - 6:08 am | mrcoolguynice

नमस्कार.
विस्तृत प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
परंतु खालील प्रश्नांचे उत्तर समजुन घेण्यास आवडले असते.

भविष्यात जर
काही कारणाने (उदा वार्धक्य , प्रकृती अस्वास्थ्य इ इ ) पंतप्रधान मोदी जर नेतृत्व देण्यास सक्षम नसतील,
तर उद्या लोकसभेच्या निवडणुकीत भाजपला लीड करायला (पक्षी : पंतप्रधान उमेदवार याअर्थी) भाजपकडे स्वबळावर खंबीरपणे पाय रोवून तरुण नेतृत्वाची दुसरी व तिसरी फळी दक्ष स्थितीत आहे ?
कोणी लिस्ट दिल्यास आनंद होईल ...

*वैयक्तिक टिका हा संवादातील नकोसा इंग्रेडियंट वाटतो

माफ करा पण आपण हा आयडी घेतल्यानंतर सतत इतरांकडून अमुक मुद्दयासाठी ही डिटेल्स द्या, तमुक मुद्दयासाठी ती डिटेल्स द्या अशा मागण्या, सुरूवातीला वडिलांच्या नावावर व आता स्वत: च्या नावावर करत आला आहात. असो, आता मी आपल्या कडून हे जाणून घेउ ईच्छितो की मोदि जेंव्हा सक्रिय राजकाराणात आले तेंव्हा ते कितव्या फळीतले उमेदवार म्हणुन दक्ष स्थितीत होते? तसेच त्यांच्या पुढच्या फळ्यांमधे इतर कोणते उमेदवार दक्ष स्थितीत होते? ही विस्तृत माहिती जर आपण दिलीत तर तीचा उपयोग मोदिंनंतर कोण? या आपल्या प्रश्नाचे ऊत्तर देण्यासाठी होइल.
**आवांतर सर्व लोकांना काहीकाळ मुर्ख बनवता येते, काही लोकांना सर्वकाळ मुर्ख बनवता येते पण सर्व लोकांना सर्वकाळ मुर्ख बनवता येत नाही..

जोन's picture

21 Dec 2018 - 1:44 am | जोन

पण...काही लोक सर्वकाळ इतर लोकान्ना मुर्ख समजतात....ते असच चालणार.....असो...

डॉ सुहास म्हात्रे's picture

16 Dec 2018 - 12:25 pm | डॉ सुहास म्हात्रे

१. *वैयक्तिक टिका हा संवादातील नकोसा इंग्रेडियंट वाटतो

अरे वा ! याला म्हणतात चलाखी किंवा साध्या सरळ स्पष्ट मराठीत, ढोंग ! कारण, फक्त मला जरा दुसरी व तिसरी फळी ची नावे काही कारणाने स्मरत नाही. असे (उपरोधाने का होईना पण) तुम्हीच लिहिले होते ना ???

मग, तो ढोंगीपणा उघडा करायला तुमच्याच उपरोधाचा धागा पकडून कोणी उपरोधीक लिहिले तर त्याबद्दल गळा काढणे, हा सुद्धा ढोंगाचाच एक प्रकार असेल, नाही का? तेव्हा, उगी, उगी ! =))

२. तुम्ही मोदींच्या नंतरच्या नेत्याबद्दल जो मुद्दा उपस्थित केला होता त्यालाही वर सविस्तर उत्तर दिले असतानाही, ते न समजल्याचे परत ढोंग केले आहे. राजवंशवाद न पाळणार्‍या संस्थांत दुसर्‍या फळीत जवळपास पात्रता असणारे अनेक नेते तयार असतात, त्यांना युवराजपद देण्याची पद्धत नसते. वेळ येते तेव्हा त्यातला सर्वमान्य/बहुमान्य नेता निवडला जातो. संस्था ही कौटुंबिक जहागिर न समजणार्‍या सर्वच (राजकिय, व्यापारी, इ) संस्थांमध्ये हीच वस्तूस्थिती असते. पण, राजवंशवादात पूर्ण बुडून गेलेल्यांना (पक्षी : सिंहासनाचा पुढचा दावेदार युवराज कोण ह्याची माहिती तो पाळण्यात असतानाच हवी असणार्‍यांना) ही वास्तविकता दिसणे/पचवणे कठीण होत असते, तसे काहीसे झाले असावे. कठीण प्रसंगी सोईस्कर अंधत्व ! :)

शिवाय, त्या मुद्द्यावर वर मामाजींनी ते वेगळ्या शब्दांत अधिक समजावून दिले आहेच.

तरीही ते समजले नाही असे म्हणणे असेल तर, झोपेचे सोंग घेतलेल्याला उठवायचा आमचा विचार नाही, असे समजावे. इतर वाचकांना हे प्रकाशाइतके लख्ख सत्य समजले असेलच व त्यांनी तुमचा वरचे प्रतिसाद वाचून तुमच्याबद्दल काय मत बनवायचे ते बनवले असेलच. :)

आनन्दा's picture

1 Jan 2019 - 5:33 pm | आनन्दा

यावरुन आठवलं
इन्फोसिस नारायणमुर्तींनी सोडल्यावर आता या कंपनीचे कसे काय होणार असेच सगळ्यांना वाटत होते, पण कंपनी चालली, इतकेच नव्हे तर धावतेय..
रतन टाटा निवृत्त झाले तेव्हा पन सगळे असेच म्हणाले होते..
या सर्व संस्थांमध्ये सामुहिक लीडरशिप असते, म्हणजे त्यांच्या नेत्याकडे जर ही दुसरी/तिसरी फळी उपलब्ध नसेल तर संस्था उभीच राहू शकत नाही.

इन्फोसिस नारायणमुर्तींनी सोडल्यावर आता या कंपनीचे कसे काय होणार असेच सगळ्यांना वाटत होते, पण कंपनी चालली, इतकेच नव्हे तर धावतेय..
रतन टाटा निवृत्त झाले तेव्हा पन सगळे असेच म्हणाले होते..
या सर्व संस्थांमध्ये सामुहिक लीडरशिप असते, म्हणजे त्यांच्या नेत्याकडे जर ही दुसरी/तिसरी फळी उपलब्ध नसेल तर संस्था उभीच राहू शकत नाही.

म्हणजेच मोदींना सध्या पर्याय दिसला नाही , तरी तुमच्याच म्हणण्याप्रमाणे, भाजपा मधे दुसरी तिसरी फळी , जर नसेल तर् .... तर संस्था (भाजपा ) उभीच राहू शकत नाही.

डॉ सुहास म्हात्रे's picture

1 Jan 2019 - 8:16 pm | डॉ सुहास म्हात्रे

किती तो वंशवादी आंधळे आणि बहिरेपणा (याला साध्या सोप्या मराठीत 'गुलामीची सवय' असे म्हणतात). "नवीन युवराज जन्मल्यापासून त्यांचे पाय धरून बसण्याची सवय असलेले, सुधारणे पलिकडे पोचलेले असतात", हे सिद्ध करण्याची परिसीमा चालली आहे! मस्तं मनोरंजन होत आहे. लगे रहो.
=)) =)) =))

विजुभाऊ's picture

17 Dec 2018 - 10:51 am | विजुभाऊ

साध्वी ऋतंभरा , उमा भारती किंवा गेला बाजार अडवाणे हे कितव्या फळीचे नेते आहेत.?
ते भाजप च्या फळीत तरी आहेत का ?

ट्रम्प's picture

16 Dec 2018 - 8:01 am | ट्रम्प

म्हात्रे काका ,
तुमच्या या अभ्यासपूर्ण उत्तरा ने सुद्धा मोदी विरोधकांच्या शंका दूर होणार नाहीत .
कॉ च्या प्राइवेट ली कं ने गेली कित्तेक वर्ष देशाची अहोरात्र सेवा करून करोडों ची प्रोपर्टी ऊभी केली आणि अजुन सुद्धा डावपेच करून अध्यक्षपद फयामिली बाहेर जावे दिले जात नाही .

मुळात तुम्ही ज्याला पहिली फळी म्हणताय तशी फळी भाजपात अस्तित्वातच नाही. आज सुद्धा सो कॉल्ड पहिल्या फळीत 2 नेते आहेत. एक नेता नाही.
अन्य नेते, जसे गडकरी, राजनाथ, स्वराज(आता बहुधा निवृत्त), आणि विविध राज्यांचे मुख्यमंत्री, जसे की शिवराज, रमणसिंग, एडीयुरप्पा हे सुद्धा ज्येष्ठतेमुळे पहिल्या फळीतच येतात. आत्ता झालेल्या निवडणुकांमध्ये तिकिटे देण्यामध्ये राज्य नेतृत्वाचा वरचष्मा राहिला आहे... राज्यात पहिली फळी नसेल तर असे होऊ शकत नाही.
आणि हे संपले तर पुढची फळी म्हणजे फडणवीस, रूपानी, वगैरे तयार होत आहेतच. तुम्ही बघा हे नेते कधी पक्षश्रेष्ठी ना विचारतो असे धोरणात्मक बाबीत म्हणत नाहीत, त्यांना तितका फ्री हँड आहे, त्यांचे अध्यादेश कोणी अर्ध्यात फाडून टाकत नाही. अशी असते दुसरी फळी.

आता याउलट बघा, काँग्रेसची दुसरी फळी - दिग्विजय, पायलट, शिंदे, नाहीतर सिब्बल, गुलाम नबी, चिदंबरम.. यांच्यापैकी कोणाला व्यापक जनाधार आहे? यांच्यापैकी कोणता माणूस निर्विवादपणे काँग्रेसला नवीन दिशा देऊ शकेल ते सांगा, मग चर्चा करू.

भाजपाचा नेता हा सामान्यपणे अजून तरी most accepted among the equals असतो. त्यामुळे युवराज पद नाही. एखाद्या नेत्याची इमेज larger than life होते, पण ते बहुतांशी तात्कालिक असते. अडवाणी देखील एकेकाळी असेच लोकप्रिय होते, पण बदलत्या काळाशी जुळवून न घेता आल्याने बाहेर फेकले गेलेच ना.

दुसरी गोष्ट संघाची, संघ हा सांगण्यासाठी एकचालकानुवर्ती आहे, पण तुम्हाला संघाची निवडप्रक्रिया काय माहितेय की तुम्ही असे तारे तोडताय? भाजपा आणि संघ या दोन्ही संघटनांमध्ये पायउतार होणार अध्यक्ष आपला उत्तराधिकारी निवडत नाही, तर त्याची निवड उरलेले लोक आपल्यापैकी एका परिणामकारक माणसाला शोधून पूर्ण करतात.

असो, मला एक गोष्ट कळत नाही, तुम्ही अज्ञानाचा बुरखा पांघरून असले कोमनसेन्स नसलेले प्रश्न कडे विचारता? अश्या प्रश्नांनी तुमचा चाहता वर्ग उगीच दुखावेल. काहीतरी चांगले मुद्दे काढा. नाहीतर खरच लुटचुके व्हाल.

डॉ सुहास म्हात्रे's picture

17 Dec 2018 - 4:19 pm | डॉ सुहास म्हात्रे

असो, मला एक गोष्ट कळत नाही, तुम्ही अज्ञानाचा बुरखा पांघरून असले कोमनसेन्स नसलेले प्रश्न कडे विचारता? अश्या प्रश्नांनी तुमचा चाहता वर्ग उगीच दुखावेल. काहीतरी चांगले मुद्दे काढा. नाहीतर खरच लुटचुके व्हाल.

+१

चलाखी करून, स्वतःच्या हुशारीवर स्वतःच खूष असलेले (पक्षी : अंध झालेले) लोक, ही चूक नेहमीच करतात. ही चलाखी बर्‍याचदा बहुसंख्य लोकांच्या धानात येते हे समजण्याची हुशारी त्या अंधत्वाने झाकोळली जाते. बहुतेक वेळेस, बहुतेक लोक, "कशाला पडायचे आपण फुकाच्या वादावादीत" असा विचार करून चलाखी ध्यानात आली तरी तिच्याकडे दुर्लक्ष करतात. मग याचा अर्थ, "वा वा, काय ग्रेट आहोत आपण. काय पण ग्रेट दिशाभूल केली लोकांची." असा लावला जातो. असे होऊ लागले की, आपली चलाखी आपल्यावरच उलटते आहे हे कळणे बंद होते (ब्रेन ब्लॉक)... अगदी, त्यामुळे तोंडावर सणकून आपटेपर्यंत ! इतर काहीही असो, "न बोलता पाहणार्‍या/वाचणार्‍या लोकांमध्ये (जे बहुसंख्य असतात) आपल्या वागण्याने/लिखाणाने आपली किंमत किती कमी होत आहे/होईल हे न कळणे", हे काही फारसे हुशारीचे लक्षण नाही.

डँबिस००७'s picture

18 Dec 2018 - 9:41 am | डँबिस००७

ह्या मोराचा पिसारा गळुन पडुन पार्श्वभाग उघडा पडलेला असतानाही वारंवार पिसारा फुलवायचा मोह काही आवरत नाही !!

लुक हंग्री....लुक फ़ुलिश...

तुटे वाद संवाद तेथें करावा।
विवेके अहंभाव हा पालटावा॥
जनीं बोलण्यासारिखे आचरावें।
क्रियापालटे भक्तिपंथेचि जावे॥११५॥

डॉ सुहास म्हात्रे's picture

16 Dec 2018 - 12:59 pm | डॉ सुहास म्हात्रे

हे सर्वांना माहीत आहेच, पण तसे फक्त बोलणे व व्यवहारात त्याविरुद्ध वागणे, भोंदूपणाचे/ढोंगीपणाचे अचूक लक्षण समजले जाते, हे सुद्धा सर्वांना माहिती आहेच!

टीप : हा प्रतिसाद वैयक्तिक नसून, ते एक सार्वजनिक व सार्वकालीक सत्य आहे ! :)

सुबोध खरे's picture

17 Dec 2018 - 12:11 pm | सुबोध खरे

डॉक्टर साहेब
कुठे पुरोगाम्यांच्या नादाला लागतांय? कालापव्यय नुसता.
वडिलांच्या नावाने भगवा पिसारा लावून नाचत होते पण पार्श्वभाग उघडा पडला होता ते समजले नाही.
असो

विजुभाऊ's picture

17 Dec 2018 - 10:49 am | विजुभाऊ

फक्त बोलणे व व्यवहारात त्याविरुद्ध वागणे, भोंदूपणाचे/ढोंगीपणाचे अचूक लक्षण समजले जाते, हे सुद्धा सर्वांना माहिती आहेच!

याचे " साधनशुचिता. आणि बेल्लारीचे रेड्डी बंधू...... " हे एक उदाहरण देता येईल
किंवा अमूक एक विचार हा भाजपचा आहे. त्याचा संघाशी काही संबंध नाही.
किंवा बाबरी मशीद कार सेवकानी पाडली. त्यात त्यात जे होते किमान त्या वेळेस पुरता तरी त्यांचा संघ भाजप किम्वा विश्वहिंदु परीषद बजरंग दल यांच्याशी काहीच संबंध नव्हता
हे दुसरे उदाहरण

डॉ सुहास म्हात्रे's picture

18 Dec 2018 - 8:40 pm | डॉ सुहास म्हात्रे

फक्त बोलणे व व्यवहारात त्याविरुद्ध वागणे, भोंदूपणाचे/ढोंगीपणाचे अचूक लक्षण समजले जाते

हे ज्या ज्या बाबतीत खरे असेल तर त्या सर्वच बाबतीत भोंदूपणाचे/ढोंगीपणाचे असते.

मी कोणताच झेंडा खांद्यावर घेतलेला नाही. त्यामुळे, अर्थातच, त्याबाबतीत "व्हॉटाबाऊटरी" करायचीही मला अजिबात गरज वाटत नाही.

कारण, एका चुकीचा दाखला देऊन दुसरी चूक झाकली जात नाही, तसे करणे चूक असते. प्रामाणिक माणसे दोन्ही गोष्टींना चूकच म्हणतात. :)

दिनांक 16/12/18 रोजी चेन्नई येथे स्व. एम करुणानिधि यांच्या पूतळ्याचे अनावरण करण्यासाठी भारतातील सर्वात महान पुरोगामी नेते रागा , मैड़म , चंद्राबाबू नायडू ,केरळ आणि पुड्डुचेरी चे मुख्यमंत्री हे एकत्र आले व त्यांनी पुरोगामी एकते चे शक्ति प्रदर्शन घडवले .
स्टॅलिन यांनी यावेळी पंतप्रधान चे उमेदवार म्हणून रागा ची घोषणा केली , पण या घोषणे ची कुनकुन अगोदरच लागल्या मुळे कदाचित ब्यानर्जी व हत्तीवाल्या मैड़म हे मोठे पुरोगामी नेते गैहजर होते .
2019 च्या निवडणुका जशा जवळ येतील तसे तर या महान राजकारणी नेत्यांच्या पुरोगामीत्वाचे विविध रंग मतदारना लवकरच दिसतील .

डॉ सुहास म्हात्रे's picture

31 Dec 2018 - 10:02 pm | डॉ सुहास म्हात्रे

Mayawati says she may have to 'reconsider' support to MP, Rajasthan govts

२ एप्रिलला केलेल्या भारत बंद मध्ये भाग घेतलेल्या "निष्पाप" लोकांवरचे खटले ताबडतोप काढून घेतले नाही तर या दोन राज्य सरकारांना बाहेरून दिलेला पाठींबा काढून घेण्याचा इशारा सुश्री मायावतींनी दिला आहे.

ॲट्रॉसिटी ॲक्ट वरची सुप्रीम कोर्टाने केलेला बदल भाजपाने उलटवला त्या निर्णयाचे काही प्रमाणात दुष्परिणाम तीन राज्यात दिसून आला असे वाटते. आता मायावती अशा प्रकारच्या मागण्या करून काँग्रेसलासुद्धा सवर्ण विरोधात करून ठेवणार आणि याबाबतचा परिणाम लोकसभा निवडणुकीत भाजपाला लाभाच्या रूपात होऊ शकतो.