मुक्काम पोस्ट स्लोव्हाकिया

Mrunalini's picture
Mrunalini in विशेष
8 Mar 2015 - 1:56 am
महिला दिन

परदेशात जायचं म्हणजे अमेरिका! इंग्लंड! किमान ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड तरी..? आपल्यापैकी बहुतेकांसाठी परदेश हा साधारण एवढ्याच देशांपुरता असतो. पण यातली कोणतीही नावं न घेता आम्ही पोचलो ते स्लोव्हाकिया या युरोपियन देशात. आता सांगायला हरकत नाही.. पण माझे लग्न ठरेपर्यंत मलाही स्लोव्हाकिया या नावाचा एखादा देश आहे हे माहीतच नव्हते. :P इतकंच नाही, तर आमच्या लग्नानंतर व्हिसासाठी प्रोसेस सुरू केली होती; व्हिसासाठी काही पेपर आणायला जेव्हा कुठल्याही सरकारी ऑफिसमध्ये जायचो, तेव्हा तिथले लोकही असा कुठला देश आहे?? असे त्यांच्या नजरेनेच आम्हाला विचारायचे. ;) मग समजावून सांगायचो, तेव्हा कुठे ते पेपर हातात मिळायचे.

गेली काही वर्षं आम्ही इथे राहतोय, इथलं जीवन जवळून पाहतोय. इथे येताना या देशाबद्दल मला तर काहीच माहिती नव्हती, त्यामुळे सगळाच अनुभव नवा होता. संस्कृती अनोळखी होती. कसा आहे हा देश? कशी आहेत इथली माणसं?

मध्य युरोपातल्या अनेक लहान देशांमधलाच एक देश स्लोव्हाकिया. ३१ डिसेंबर १९९२मध्ये चेकोस्लोव्हाकिया ह्या देशाची २ भागात विभागणी झाली आणि चेक रिपब्लिक व रिपब्लिक ऑफ स्लोव्हाकिया असे २ नवीन देश जगाच्या नकाशावर उमटले.

या छोट्या नवीन देशाची राजधानी बनले, दानुब नदी किनार्या वरील शहर - ब्रातिस्लावा. महाराष्ट्रापेक्षा आकाराने किंचित लहान असणार्याी ह्या देशाच्या पश्चिमेला चेक रिपब्लिक, ऑस्ट्रिया. उत्तरेला पोलंड, पूर्वेला युक्रेन आणि हंगेरी हे देश आहेत.

१९१८ साली चेकोस्लोव्हाकिया हा देश अस्तित्वात येण्याआधी, सन १८६७ ते १९१८ ह्या काळात येथे "Astro-Hungarian empire“ ज्याला“Dual Monarchy” असेही म्हटले जाते, यांचे राज्य होते. त्यामुळे इथे बर्यारच देशांच्या संस्कृतींचा प्रभाव आहे. त्यापूर्वी ५ व्या शतकात उत्तरेकडून स्लावीक लोकांचे इथे आगमन झाले. "Slavic” वरून “Czechslovakia“ आणि त्यानंतर “Slovakia” असे हे नाव उदयास आले.

दुसर्याv महायुद्धानंतर चेकोस्लोव्हाकियावर कम्युनिस्ट राजवटीचे सरकार आले आणि या देशाला इतर देशांपासून वेगळे ठेवण्यात आले. १९६१साली बर्लिनची भिंत पाडल्यावर युरोपची पूर्व युरोप आणि पश्चिम युरोप भागात विभागणी झाली. परंतु चेकोस्लोव्हाकिया हा मध्य युरोपातील देश असल्यामुळे इथल्या लोकांसाठी १९६१-१९८९ हा काळ खूपच खडतर ठरला.

१९८९ साली बर्लिनची भिंत पाडण्यात आली, तेव्हा जर्मनीसोबतच युरोपातील अनेक देश कम्युनिस्ट राजवटीतून मुक्त झाले. १९८९-१९९५ या काळात युरोपचा भौगोलिक नकाशा बदलत गेला. अनेक देश एकमेकांपासून वेगळे झाले. १९९१मध्ये चेक आणि स्लोव्हाकियामध्येही फाळणी झाली. ह्या फाळणीला “Velvet Revolution” देखील म्हटले जाते. याचे कारण असे की, ही फाळणी अतिशय शांत पद्धतीने हाताळण्यात आली. कुठेही कुठलीही हानी किंवा विरोध झाला नाही.

१९९२-२००४ या काळात स्लोव्हाकियाची झपाट्याने प्रगती होत गेली. २००४ साली स्लोव्हाकियाचा “European Uninon Member state“ मध्ये समावेश करण्यात आला. स्लोव्हाकियाने कात टाकायला खर्या अर्थाने इथून सुरवात झाली. ह्यांचे लोकल चलन "स्लोवाक करुना" जाऊन त्याची जागा "युरो"ने घेतली आणि जागतिक नकाशावर या देशाचे नाव दिसू लागले.

अनेक परदेशी कंपन्यांनी इथे आगमन केले. भारतासारखेच इथेदेखील "outsourcing" चे प्रस्थ वाढू लागले. अमेरिकन कंपन्यांनी इथे आपले बस्तान बसवण्यास सुरवात केली. रोजगाराचे नवीन मार्ग निर्माण झाले. इथे काम करण्यासाठी बरेच परदेशी लोक इथे येऊ लागले. एक multicultural वातावरण आता ह्या देशाला मिळाले आहे. स्लोव्हाकियाची मातृभाषा स्लोवाक असली तरी इथे चेक, हंगेरियन, जर्मन आणि नजिकच्या काळात इंग्लिशदेखील वापरली जाऊ लागली आहे.

इथले लोक स्वभावाने मनमिळाऊ आहेत. दिसायला अतिशय देखणे आणि उंच. इथली साधारण मुलगीदेखील आपल्या कुठल्याही बॉलीवूड हिरॉईनपेक्षा सरस दिसते.

a1

लांब न संपणारी थंडी आणि छोटासा उन्हाळा. नोव्हेंबर ते मे हा अतिशय कडक थंडीचा काळ. या काळात इथे भरपूर थंडी आणि बर्फवृष्टी होते.एप्रिल अखेरपासून वसंत (spring season) सुरू होतो. जून ते ऑक्टोबर इथे उन्हाळा असतो. ऑक्टोबरपासून शरद (fall season) सुरवात होते.नोव्हेंबरमध्ये मग सुरू होते थंडी., कडक दातखिळी बसवणारी थंडी... जानेवारीत इथे साधारण तापमान -१५ ते -२० पर्यंत पोचलेले असते. छोटासा दिवस आणि खूप मोठी रात्र अशी ही थंडी.

माझा नवरा पहिल्यांदा चेक रिपब्लिकमध्ये आला ते २००७ साली. तेव्हा इथल्या लोकांना भारताची काहीच माहीत नव्हती. ज्या प्रमाणे आपल्याला चेक रिपब्लिक, स्लोव्हाकियाबद्दल फारसे काही माहीत नसते तसेच त्यांनाही भारताची अगदीच जुजबी आणि जुनी माहिती होती. पण उत्सुकताही तेवढीच होती. त्यामुळे तुम्ही भारतीय असाल तर इथे तुम्हाला हे लोक "exotic" म्हणून वागवतात. तुम्हाला जेवणाचे आमंत्रण, पार्टीसाठी निमंत्रण देतात. बॉलीवूडबद्दल तर घसा सुकेपर्यंत उत्तरे द्यावी लागतात. तसेच हिंदी भाषा शिकायची उत्सुकतादेखील काही लोकांमध्ये दिसते. इथल्या युनिव्हर्सिटीमध्ये भारतीय नृत्य, संगीत आणि हिंदी भाषा ह्या विषयावर doctorate करणारे अनेक स्लोवाक तसेच परदेशी विद्यार्थी आहेत.

इथे कम्युनिस्ट राजवटीमध्ये लोकांना कुठलाही धर्म पाळायची बंदी असे. ह्याचा परिणाम असा झाला की इथले ७०% लोक हे Atheist आहेत व उरलेले ख्रिश्चन आणि इतर. त्यामुळे इथे धर्मावर प्रतिबंध नाही. तुम्ही आपला धर्म पाळा, तुमचे सण साजरे करा, कोणी तुम्हाला काही बोलणार नाही. आम्हीदेखील दिवाळी घरच्या घरी साजरी करतो आणि ऑफिस मधल्या लोकांसाठी दिवाळीचा फराळही नेतो... ज्याचा आवडीने फडशा पाडला जातो. :P

फराळावरून आठवले! इथे भारतीय जेवण म्हणजे फक्त तिखट असा फार मोठा गैरसमज आहे. तरी ब्रातिस्लावामध्ये ५ भारतीय रेस्टॉरंट आहेत,जिथे भारतीय म्हणजे फक्त टिपीकल पंजाबी पदार्थ मिळतात. त्यामुळे तुम्ही मिठाई जरी कुणा नवख्यासमोर ठेवली तरी त्यांचा पहिला प्रश्न असतो की, किती तिखट आहे आणि घाबरत, घाबरत पहिला घास खाल्ला जातो.

अनेक वर्ष कम्युनिस्ट राजवटीत काढल्यामुळे इथली मागची पिढी जरा बुजरी आहे, त्या उलट नवीन पिढी बिंधास्त, अमेरिकन संस्कृतीकडे झुकत चाललेली. इथला समाज अजूनही बर्यातच प्रमाणात एकत्र कुटुंबपद्धतीप्रमाणे राहतो. आई, वडील, मुलं. मुलंदेखील लग्न होईपर्यंत आई-वडिलांचे घर सोडत नाहीत. तसेच देशाची किंवा शहरातील लोकसंख्या कमी असल्यामुळे सगळे एकमेकांना ओळखून असतात. ज्यामुळे इथे गुन्हेगारीचे प्रमाणदेखील कमी आहे. आम्ही परदेशी असूनही, रात्री २-३ वाजता रस्त्याने चालत येऊ शकतो. कोणीही तुमच्याकडे ढुंकूनही बघणार नाही.अर्थात ह्यावेळी रस्त्यावर कोणी असल्यास. ;)

इथली शिक्षण पद्धतदेखील नव्या काळाप्रमाणे बदलत गेली आहे. सुरुवात Kindergarden पासून, त्यानंतर Gymnasium - इथे Gymnasium चाअर्थ शाळा जी १०-१२वी पर्यंत चालते. त्यानंतर University जिथे specialization करता येते.

इथे मला सर्वात जास्त गंमत वाटते ते दारुड्यांची! शुक्रवार - शनिवारची संध्याकाळ म्हणजे ह्यांची ऐष असते. ढोस ढोस ढोसणार, पण गंमत म्हणजे कोण कोणाला शिव्या देणार नाही की मारणार नाही की हातही लावणार नाही. तुम्ही बस किंवा ट्रॅममध्ये एकटे असाल आणि दारुडा असेलतर फक्त एकच त्रास - दारूचा वास! बाकी तो त्याची मर्यादा कधीच ओलांडणार नाही. उलट कितीही दारू प्यायलेला असेल तरी बस किंवा ट्रॅममध्ये शिस्तीत लाइनमध्ये उभे राहून चढणार, आपले तिकिट पंच करणार आणि मग आपला स्टॉप आला की बरोबर न आवाज करता उतरणार. इथे सार्वजनिक वाहनात (रेल्वे वगळता) खायला किंवा प्यायला बंदी आहे. त्यामुळे दारूची बाटली हातात असली तरी बस/ट्रॅममधून बाहेर पडेपर्यंत एक घोटपण घेणार नाही. ह्यातही जर कोणी कधी काही गोंधळ वगैरे केलाच, तर ड्रायव्हर बस/ट्रॅम बंद करून पहिले त्या माणसास खाली उतरवतो आणि मगच पुढे जातो. ही गंमत आम्ही नेहमी पाहत असतो.

ब्रातिस्लावामध्ये फिरताना दुसरी एक गोष्ट लक्ष वेधून घेते ते म्हणजे इथले गमतीशीर पुतळे. कम्युनिस्ट राजवटीनंतर शहराचे सुशोभीकरण करताना मांडण्यात आलेले हे पुतळे आज पर्यटकांचं आकर्षण झाले आहेत.

a2

a3

a4

a5

a6

खाद्यसंस्कृतीबद्दल बोलायचे तर ह्यावरदेखील चेक, हंगेरियन आणि काही प्रमाणात पॉलिश खाद्यपद्धतीचा प्रभाव दिसतो. अतिशय कडक थंडीमुळेच इथे अल्कोहोलचे मोठ्या प्रमाणात सेवन केले जाते. बियर, वोडका, स्नॅप्स,

बेखेरोव्च्का.. काय म्हणाल ते.. एक माणूस एका विकांतात१०-२० लीटर बियर सहज गटवून जातो. जेवणात मुख्य आहार पोर्क, बटाटा, कोबी. त्या बरोबर गार्लिक सूपही इथे प्रसिद्ध आहे. वेगवेगळ्या प्रकाराचे सॉसेजेस, सॅलॅड्स, चीज आणि इतर मांसाहारी पदार्थ. इथे sheep cheese पासून तयार केलेले पदार्थदेखील प्रसिद्ध आहेत. परंतु जेवणामध्ये तिखट काहीच नसते... गार्लिक सूप सोडून. :) इथले काही खास पदार्थ आहेत -

Bryndzové halušky (sheep cheese gnocchi), Gulash soup, Garlic Soup in bread bowl, Trdelník आणि शेकडो प्रकारचे chavishta cakes.

१. Bryndzové halušky (sheep cheese gnocchi)

a7

२. गुलाश सूप

a8

३. Garlic Soup in bread bowl

a9

४. Trdelník

a10

ब्रातिस्लावामधून बाहेर पडले तर बाकीची शहरे लहान आहेत. लोकवस्ती तुरळक पण निसर्गाची भरभराट. मध्य स्लोव्हाकियामधील दोन मोठ्या पर्वतरांगा - High Tatra आणि Lower Tatra. High Tatra या नावाप्रमाणे जास्त उंच पर्वत रांगा आहेत आणि त्या खालोखाल Lower Tatra. येथे पर्यटनाची उत्तम सोय आहे. उन्हाळ्यात हायकिंग, ट्रेकिंग आणि हिवाळ्यात स्किईंगसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होते. इथे रोपवेच्या साहाय्याने पर्वताच्या टोकावर जायची सोय आहे.

High Tatra उन्हाळ्यात

a11

a12

a13

a14

High Tatra हिवाळ्यात:

a15

a16

a17

ब्रातिस्लावा पाठोपाठ दुसर्या= क्रमांकाचे मोठे शहर - कोशित्से (Kosice). ब्रातिस्लावा मध्य युरोपमध्ये येते तर कोशित्से पूर्व युरोपमध्ये. येथील St. Elisabeth Cathedral हे स्लोव्हाकियातील सर्वात मोठे चर्च आहे. तसेच जगातील सर्वात जुन्या पॅरिसमधील Notre-Dame de Paris ह्या चर्चनंतर हे दुसऱ्या क्रमांकाचे सगळ्यात जुने चर्च आहे. उन्हाळ्यात येथेदेखील बरेच पर्यटक हे चर्च बघायला येतात.

St. Elisabeth Cathedral

a18

मध्य स्लोव्हाकियातील Bojnice हे गाव Bojnice च्या "Fairytale castle"साठी प्रसिद्ध आहे. १२व्या शतकातील हा राजवाडा, एखाद्या परिकथेतील वाटावा असाच आहे. स्थानिक दंतकथेनुसार ११ व्या शतकात एका दुष्ट चेटकिणीची ह्यावर वक्र दृष्टी पडली आणि तिने ह्या राजवाड्यातील राजघराण्याचा सर्वनाश केला. ह्याच दंतकथेच्या पार्श्वभूमीवर इथे दर उन्हाळ्यात “Ghost Festival" साजरा केला जातो. हा फेस्टिवल अतिशय मनोरंजक तसेच अंगावर काटा उभा करणारा असतो. बरेच लोक हा फेस्टिवल बघण्यासाठी येथे येतात.

Bojnice Fairytale castle

a19

a20

a21

असा हा युरोपातील छोटासा पण समृद्ध देश हळूहळू जागतिक नकाशावर आपले नाव कोरू पाहत आहे. २०१४ साली जगातील पहिली जमिनीवर तसेच हवेत चालणारी गाडी - ‘AeroMobil’ इथे बनवण्यात आली आणि स्लोव्हाकियाने खर्‍या अर्थाने जगाचे लक्ष आकर्षीत केले. येणार्या् काहीवर्षात हा देश आता कशी प्रगती करतो हे बघण्यासारखे ठरेल.

प्रतिक्रिया

पिशी अबोली's picture

8 Mar 2015 - 8:38 pm | पिशी अबोली

छान लेख! घरबसल्या स्लोवाकियादर्शन! छान चित्रमय लेख झालाय..

मितान's picture

8 Mar 2015 - 9:37 pm | मितान

अतिशय सुंदर लेख !!!!

फोटोंनी तर बहार आली. विशेषतः बर्फातले फोटो !

बाकी गार्लिक सूप वगेरे मी बघितलेच नाहीत ;)

मधुरा देशपांडे's picture

8 Mar 2015 - 10:50 pm | मधुरा देशपांडे

सुरेख छायाचित्रे आणि माहिती. Trdelník अत्यंत आवडता प्रकार. जर्मनी आणि स्लोव्हाकियातील लोकांमधील साम्य देखील लेखातुन जाणवली. भटकंतीच्या यादीत ही ठिकाणे अ‍ॅड केली आहेत. :)

डॉ सुहास म्हात्रे's picture

9 Mar 2015 - 12:08 am | डॉ सुहास म्हात्रे

सुंदर वर्णन आणि छायाचित्रे... अगदी देशाला भेट द्यावी असे मनात आले !

एक छोटीशी दुरुस्ती. स्लोव्हाकिया (४९,०३५ चौ किमी) महाराष्ट्रापेक्षा (३०७,७१३ चौ किमी) आकाराने किंचित लहान नसून बराच (जवळ जवळ १/६) लहान आहे.

सुंदर गाव, सुंदर फोटो,सुंदर वर्णन.मृ कडे कट्टा करणे आले!!

पूर्वाविवेक's picture

9 Mar 2015 - 12:18 pm | पूर्वाविवेक

खूप मस्त वर्णन, छायाचित्रे अप्रतिम

सविता००१'s picture

9 Mar 2015 - 12:54 pm | सविता००१

खूप सुरेख माहिती आणि फोटो.
अगदी वाचल्या वाचल्या भेट द्यावी असं वाटलं गं..

Mrunalini's picture

9 Mar 2015 - 1:42 pm | Mrunalini

थँक्स गं मुलींनो :*
बोला कधी येताय कट्टा करायला? मी कधीपण तयार आहे. :)

मनिमौ's picture

9 Mar 2015 - 2:56 pm | मनिमौ

मला सारखा तो ब्रेड बाउल खुणावतोय

पेट थेरपी's picture

9 Mar 2015 - 4:10 pm | पेट थेरपी

छान लेख. ते पुतळे मस्त आहेत.

फटु देखील खूप आवडले.

प्रीत-मोहर's picture

9 Mar 2015 - 10:37 pm | प्रीत-मोहर

कसले सही फोटोज. मृ कधी खाउ घालतेय्स?

श्रीरंग_जोशी's picture

10 Mar 2015 - 6:59 am | श्रीरंग_जोशी

स्लोव्हाकियाबद्द्ल प्रथमच वाचण्यास मिळाले.
या देशाची थोडक्यात पण बहुआयामी ओळख आवडली.

फोटोंनी तर चार चंद्र लावले आहेत :-) .

स्वाती दिनेश's picture

10 Mar 2015 - 3:09 pm | स्वाती दिनेश

वर्णन आवडले.प्राहाची फार प्रकर्षाने आठवण झाली आणि त्याचबरोबर भ्रमणमंडळाच्या प्रागसहलीचीही आणि ट्रेडलनिक तर आत्ता खावेसे वाटत आहेत..
स्वाती

दिपक.कुवेत's picture

10 Mar 2015 - 3:29 pm | दिपक.कुवेत

ते High Tatra चे दोन्हि ॠतुंमधील फोटो तर फारच आवडले आहेत. अगदि वॉलपेपर ठेवावे असे.

आरोही's picture

10 Mar 2015 - 4:16 pm | आरोही

छान ओळख करून दिलीस मृ !! फोटो सुंदर ...

सस्नेह's picture

10 Mar 2015 - 5:12 pm | सस्नेह

आणि सुरेख ओळख स्लोवाकची.
ते पुतळे कशापासून बनलेले आहेत बरं ?

विशाखा पाटील's picture

10 Mar 2015 - 11:39 pm | विशाखा पाटील

सुरेख ओळख. अजूनही बहुसंख्य जनता नास्तिक आहे, हे विशेष वाटले.
खड्ड्यातून बाहेर बघणाऱ्या माणसाचा पुतळा खासच.

प्राची अश्विनी's picture

11 Mar 2015 - 11:08 am | प्राची अश्विनी

व्वा! आणि किती सुन्दर फोटो आहेत!

इशा१२३'s picture

11 Mar 2015 - 1:32 pm | इशा१२३

अप्रतिम सुंदर फोटो(तो एक भुताचा सोडुन...घाबरले ना)आणि छान ओळख य देशाची.

स्वप्नांची राणी's picture

11 Mar 2015 - 4:31 pm | स्वप्नांची राणी

आह..मी नक्की नक्की येणार तिकडे!! खूप मस्स्त्त लिहीलय्स ग. कसला सुंदर आहे ना हा देश!

सानिकास्वप्निल's picture

11 Mar 2015 - 4:48 pm | सानिकास्वप्निल

स्लोव्हाकियाबद्द्ल छान माहिती दिलीस मृ आता यावेसे वाटत आहे ;)
सुंदर फोटोंनी नटलेला, उत्तम माहितीपूर्ण असा लेख आहे.

सुंदर वर्णन आणि छायाचित्रे.

स्पंदना's picture

12 Mar 2015 - 4:50 am | स्पंदना

निसर्ग सौंदर्याने समृद्ध अश्या देशाची ही चित्रमय ओळख अतिशय आवड्ली मृणालिनी.
पुतळे तर खासच!!

पद्मश्री चित्रे's picture

14 Mar 2015 - 11:53 am | पद्मश्री चित्रे

आणि त्याची छान माहिती. पुतळे भारी च एकदम. फोटो मस्त!!

मनुराणी's picture

16 Mar 2015 - 8:47 am | मनुराणी

छान माहिती दिलीस.

रुपी's picture

17 Mar 2015 - 5:09 am | रुपी

मस्त माहिती आणि फोटो तर फारच सुंदर.

सगळ्यांचे धन्यवाद आणि सर्व अनाहितांना जाहिर निमंत्रण. :P कधी येताय बोला पटपट. मी तयार आहे. :)

गार्लिक सुपची पाकॄ इथे आहे.

http://www.misalpav.com/node/24406

कविता१९७८'s picture

19 Mar 2015 - 2:04 pm | कविता१९७८

अतिशय सुंदर लेख !!!! मस्त वर्णन , अप्रतिम फोटो

पिलीयन रायडर's picture

19 Mar 2015 - 5:36 pm | पिलीयन रायडर

किती सुंदर!!! फार फार आवडला लेख..!!
तुम्ही लोक जळवा आम्हाला.. कधी माझ्या नशिबात असल्या अप्रतिम जागी जाणं लिहीलय देव जाणे!!!

अतीसुंदर. स्लोव्हाकियाला एकदा जाऊन आलेच पाहिजे. होपफुली स्वस्तही असेल तुलनेने इतर वेस्टर्न युरोपियन देशांपेक्षा. लैच भारी.

थँक्यु. हो. वेस्टर्न युरोपियन देशांपेक्षा नक्कीच स्वस्त आहे.

पैसा's picture

22 Mar 2015 - 9:28 pm | पैसा

खूपच छान लिहिलंय आणि फोटोही अप्रतिम!

हॅट्ट! हे स्लोव्हाकियावाले खडूस दिसताहेत. फक्त अनहितांना बोलावतात. आपण तर ह्या देशाला अजिबात जाणार नाही.

फोटू आणि वर्णनही अफाट! अगदी ब्रातिस्लाव्हामध्येच चक्कर मारल्यासारखे वाटले. क्या बात है!

कैलासवासी सोन्याबापु's picture

15 Sep 2015 - 2:06 pm | कैलासवासी सोन्याबापु

वाह!!! ताई खुप सुंदर देश आहे हा! छोटा शिस्तबद्ध अन प्रेमळ! तुम्ही पोलिश खाद्यसंस्कृती चा उल्लेख केला त्यावरून आठवले तिकडे पिरोगी वगैरे मिळत असतील न वेगवेगळ्या प्रकारचे, मला बटाटा लैंब मीट कांदा मिरपुड़ वगैरे घातलेले हे मोमो सारखे बॉयल्ड प्रकार खुप आवडले होते (दिल्लीच्या एका एक सुप्रसिद्ध तारांकित हॉटेल ला ईस्ट यूरोपियन फ़ूड फेस्टिवल मधे चाखले होते मी पिरोगी)

बाकी
दारुड़यांबद्दल वाचुन मजा वाटली उगीच एखादा टाक जास्त झाला की "बबल्या चावी दे स्कार्पियो ची आज गाड़ी तुझा भाव चालवणार" करून गोंधळ करणारी मित्रमंडळी आठवली.

प्रभाकर पेठकर's picture

15 Sep 2015 - 2:08 pm | प्रभाकर पेठकर

सुंदर, माहितीपूर्ण आणि छायाचित्रांनी सुशोभित लेख मस्त आहे.

राजाभाउ's picture

15 Sep 2015 - 2:09 pm | राजाभाउ

खुप छान लेख आणि फोटोही मस्त आहेत. ते “Ghost Festival बद्दल पण लिहा कधीतरी

पद्मावति's picture

15 Sep 2015 - 2:11 pm | पद्मावति

मस्तं, मस्तं!
एका अगदी वेगळ्याच देशाची ओळख. खूप छान.

मीता's picture

15 Sep 2015 - 2:41 pm | मीता

मस्त लेख

अनिरुद्ध.वैद्य's picture

15 Sep 2015 - 3:19 pm | अनिरुद्ध.वैद्य

मस्त वाटला लेख!

सुरेख देश आणि मस्त वर्णन केलेय आपण! नवी माहिती वाचून छान वाटलं! (आधी स्लोवाकियाच नाव फक्त युद्धांच्या संदर्भातच वाचल जायचं आणि आता आउटसोर्सिंगसाठी :) )

खूप सुंदर! फोटोदेखील अप्रतिम!

वेल्लाभट's picture

15 Sep 2015 - 5:03 pm | वेल्लाभट

खत्तरनाकली ब्यूटिफुल !

पुन्हा पुन्हा वाचणारंय. नवीन देश, नवीन संस्कृती वाचण्याचा आनंद औरच असतो. त्यात असे फोटो टाकलेले असले की बासच.

सगळ्यांचे खुप धन्यवाद. फोटोंचे सगळे श्रेय नवर्‍याला जाते.

मी-सौरभ's picture

16 Sep 2015 - 2:09 pm | मी-सौरभ

वाचनखूण सा. आ.

गामा पैलवान's picture

16 Sep 2015 - 5:43 pm | गामा पैलवान

Mrunalini,

लेखाबद्दल धन्यवाद! :-) प्रत्ययी वर्णन आहे.

अवांतर : हा भाग रोचक वाटला :

>> इथला समाज अजूनही बर्यातच प्रमाणात एकत्र कुटुंबपद्धतीप्रमाणे राहतो. आई, वडील, मुलं. मुलंदेखील लग्न होईपर्यंत
>> आई-वडिलांचे घर सोडत नाहीत. तसेच देशाची किंवा शहरातील लोकसंख्या कमी असल्यामुळे सगळे एकमेकांना
>> ओळखून असतात. ज्यामुळे इथे गुन्हेगारीचे प्रमाणदेखील कमी आहे. आम्ही परदेशी असूनही, रात्री २-३ वाजता
>> रस्त्याने चालत येऊ शकतो. कोणीही तुमच्याकडे ढुंकूनही बघणार नाही.

८० वर्षांपूर्वीही स्लोव्हाक लोकं अशीच शांत स्वभावाची होती. बाहेरच्यांनी त्यांच्यात घुसून दंगली माजवण्यात आल्या. कोणी ते मी लिहित नाही. हाच प्रकार सुडेटन, बोहेमिया, मोराव्हिया (= आजचा चेक रिपब्लिक) इत्यादी प्रांतातही झाला. त्यावर उपाय म्हणून हिटलरने तिथे जर्मन सैन्य तैनात केलं. आणि कारपेथिया, जुना पानोनिया हे प्रांत (= आजचा स्लोव्हाकिया) जर्मनांकडून संरक्षित म्हणून घोषित केले. तेव्हा दंगली चुटकीसरशी थांबल्या. वयोवृद्ध लोकांना आठवत असेल हे कदाचित.

आ.न.,
-गा.पै.

मारवा's picture

17 Sep 2015 - 3:44 pm | मारवा

मुळचा चेक रीपब्लीक चा लेखक मिलन कुंदेरा च्या लिखाणातुन कम्युनिस्ट दडपशाहीची भेदक उपहासात्मक वर्णने वाचलेली आहेत. त्याची सांगड या लेखातील माहीतीशी जोडता आली म्हणुन मजा आली.

मदनबाण's picture

18 Sep 2015 - 2:58 pm | मदनबाण

लेखन आणि फोटो आवडले...

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Gajanana... :- Bajirao Mastani

नक्शत्त्रा's picture

22 Feb 2016 - 1:56 pm | नक्शत्त्रा

अप्रतिम फोटो आणि लेखन!!!

विजुभाऊ's picture

23 Feb 2016 - 11:23 am | विजुभाऊ

काय सुंदर देश आहे हो.
अगदी हॅन्स अँडरसन्स च्या परीकथेतील देशा सारखा दिसतोय

स्वप्निल रेडकर's picture

23 Feb 2016 - 1:40 pm | स्वप्निल रेडकर

खूप सही प्रवास वर्णन ! फोटो पण झकास !

बाकी ते आमंत्रण अनाहितांनाच दिलं असलं तरी इतकं सुंदर वर्णन वाचून अनाहुतही येणारच ;-)

Aero-mobile इथलं हे माहीत नव्हतं. हे वाहन भारतात यायला पाहिजे!

सगळ्यांचे खुप धन्यवाद. आमंत्रण फक्त अनाहितांनाच आहे, असे काहि नाही. तुम्हीसुद्धा नक्कीच येऊ शकता.

सुजल's picture

23 Jul 2018 - 10:26 pm | सुजल

खूप सही प्रवास वर्णन

श्वेता२४'s picture

24 Jul 2018 - 10:51 am | श्वेता२४

फारच ओघवतं वर्णन आहे. त्यामुळे फारसा माहित नसलेल्या देशाची संपूर्ण सफर तुम्ही बसल्याबसल्या घडवून आणलीत. फोटो तर निव्वळ अप्रतीम

अनिंद्य's picture

25 Jul 2018 - 3:55 pm | अनिंद्य

@ मृणालिनी,

पिटुकल्या स्लोवाकियाचा सर्वस्पर्शी परिचय फार आवडला. तुम्ही एकसे एक फोटो टाकले आहेत, फस्ट क्लास ! पुतळ्याचे फोटो विशेष आवडले. भूतपूर्व युगोस्लाव्हियाच्या सर्वच शकल-देशात 'स्ट्रीट आर्ट' उच्च दर्जाचे असावे असे दिसते.

धागा वर आणण्यासाठी सुजल आणि श्वेता२४ यांचेही आभार

अनिंद्य

पुंबा's picture

25 Jul 2018 - 5:53 pm | पुंबा

वा! वा! सुरेख वर्णन.

इथली साधारण मुलगीदेखील आपल्या कुठल्याही बॉलीवूड हिरॉईनपेक्षा सरस दिसते.

असहमत ! फोटो नाही ती पाककृती मिपावर ग्राह्य धरली जात नाही :)

अगदी हल्लीच ब्रातिसलावाला फेरी घडली. त्या ड्रेनेजमधून बाहेर डोकावणाऱ्या कामगाराच्या पुतळ्याच्या डोक्यावर हात ठेवल्यास कायसेसे होते असं ऐकलं. काय ते विसरलो.

त्या मोठ्या चौकात एका भिंतीवर धातूच्या तीन वेगळाल्या आकाराच्या पट्ट्या ठोकलेल्या दिसल्या. त्या शेकडो वर्षांपासून तिथे असून बाजारात विकत घेतलेल्या कापडाची लांबी रुंदी मोजून खात्री करण्यासाठी स्टँडर्ड मोजमाप म्हणून ठेवल्या होत्या असं कोणीतरी सांगितलं. नंतर बुडापेस्टला जायची घाई असल्याने ब्रातिसलावा आटोपते घेल्या गेले. बुडापेस्टमध्येही लोक दातांनाच पेस्ट लावताना दिसले हेही जाता जाता नोंदवण्यास हरकत नसावी.

धर्मराजमुटके's picture

25 Jul 2018 - 10:21 pm | धर्मराजमुटके

बुडापेस्टमध्येही लोक दातांनाच पेस्ट लावताना दिसले

जास्त अपेक्षा बाळगल्या की नशिबी अपेक्षाभंगाचं ओझं येतं ! कदाचित त्यांचे दाखवायचे दात वेगळे असतील.
:) :)

खुपचं छान लिहला आहे लेख , ते फोटो ही सुंदर आणि तो देश ही सुंदर .

धन्यवाद. :) लेख आवडल्याबद्दल आभार. :)

बरखा's picture

3 Aug 2018 - 8:07 pm | बरखा

माहितीपुर्ण लेख. सगळेच फोटो खुप छान आहेत.