का करावा जिवाचा आटापिटा? -- सामना २४ ऑक्टोबर २००९

सुहास's picture
सुहास in काथ्याकूट
24 Oct 2009 - 12:46 pm
गाभा: 

नमस्कार मंडळी,

कालच्या सामना च्या अग्रलेखाविषयी एक नवा धागा सुरू केलेला पाहिला आणि सामना संकेतस्थळावर फेरफटका मारायचे ठरविले.. पाहतो तर आजचा अग्रलेख ज्यात काल तरूणाईच्या नावाने "गजर" होता, तर आज चक्क निरवानिरवीची भाषा आहे.. एखाद्या माणसाचा लढाईत पराभव झाला आहे आणि तो हताश होऊन "याच साठी केला होता का अट्टाहास?" असे विचारतो अशा ए़कंदर आविर्भावाचा हा अग्रलेख आहे.. मला वाटतं या वर चर्चा व्हावी कारण "मराठी माणसाने पाठीत खंजीर खुपसला" असे हा अग्रलेख म्हणतो.. याचबरोबर अग्रलेख लिहिणार्‍याने काही प्रश्नही विचारलेत, त्यातला मुख्य भाव "जर शिवसेना नसती तर मराठी माणसाचे हाल वाईट झाले असते!" हा आहे, काही अंशी हे खरे ही आहे. सामनाच्या पहिल्या पानावर कानेटकरांचे "इथे गवताला भाले फुटतात, पण दुहीची बीजे खडकावरही उगवतात.." हे वाक्य औरंगजेबाच्या फोटोसह प्रसिध्द केले आहे... आता मलाही काही प्रश्न पडतात.

१. महाराष्ट्रासाठी आत्तापर्यंत ज्या-ज्या गोष्टी शिवसेनेने केल्या असे ते म्हणतात, त्या फक्त आणि फक्त शिवसेनेने केल्या आहेत काय? त्यामध्ये इतर लोकांचा सहभाग नव्हताच काय? मराठी माणूस खरेच एवढा लीन-दीन आहे का की त्याला फक्त आणि फक्त शिवसेनाच तारणहार आहे?
२. मराठी माणसाला एवढा ही अधिकार या लोकशाहीने दिला नाही का की ते एका "त्यांच्यासाठी लढणार्‍या" पक्षाला "तू चुकतोयस/चुकलायस" हे सनदशीर मार्गाने सांगू शकेल?
३. युतीचा पराभव हा निवडणुकी पूर्वीच्या त्यांच्या चुकांचा परिणाम आहे -- यात तिकीट देण्यापासून कार्यक्षमतेपर्यंतच्या सर्व गोष्टी आल्या --हे या लोकांना कळत नाही काय? मग त्यासाठी तरूणाई आणि मराठी माणूसच दोषी कसा..?

असो.. मला स्वतःला शिवसेना एक पक्ष म्हणून त्यांच्या तथाकथित पराभवाबद्द्ल काहीही वाटत नाही, कारण सत्तेवर नसले तरी ते विरोधी पक्ष आहेतच आणि त्यातूनही ते काही चांगले घडवू शकतीलही, पण असे असताना "मराठी माणसाने पाठीत खंजीर खुपसला" हे वाचून थोडे वाईट वाटले म्हणून हा काथ्याकूट... :)

सामनाचा अग्रलेख इथे वाचता येईल
http://www.saamna.com/

प्रतिक्रिया

अमोल खरे's picture

24 Oct 2009 - 12:57 pm | अमोल खरे

हा लेख फ्रस्टेशन मधुन लिहिला आहे. मराठी लोकांनी मनसेला का मत दिले ह्याचा नीट विचार केला तर त्यांचा त्रागा कमी होईल.

अमोल केळकर's picture

24 Oct 2009 - 2:44 pm | अमोल केळकर

एकदम खरं ! :)
अमोल
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

विजुभाऊ's picture

26 Oct 2009 - 2:26 pm | विजुभाऊ

मराठी माणसाने पाठीत खंजीर खुपसला असा त्रागा करताना अग्रलेखचा लेखक राज ठाकरे जेंव्हा मराठी माणसाची बाजू मांडत एकाकी लढत देत होते तेंव्हा शिवसेना मूक राहिली होती हे सोयीस्कर पणाने विसरतो
मराठी माणसाची इतकीच जर काळजी असती तर शिवसेना त्य आअंदोलनाच्या वेळेस राज ठाकरेंच्या पाठीशी ठामपणे उभी राहिली असती.
आताचा त्रागा हे शिवसेनेचे हे नक्राशृ आहेत.
पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

नि३'s picture

24 Oct 2009 - 1:07 pm | नि३

हम्म ...ह्यात काही नविन नाही. हे त्यांचे नेहमीचेच आहे. निवडणुकाच्या आधी मार लेख लिहायचे ....
जोर भगव्याचाच, विधानसभेवर भगवा फडकणार्,शिवसेनेचा दणदणीत विजय होईल आणी निकालानंतर आपल्या पराभवाचे खापर मराठी माणसावर फोडायचे....

महाराष्ट्राच्या सर्व जनतेला आणी शिवसेनेला सुद्धा त्यांच्या पराभवाचे कारण माहीत आहे पण ते उघडपणे मान्य न करता दुसर्यावर दोष देणे सोपे असते.

जेव्हा जनता तुम्हाला वोट देते तेव्हा ती चांगली आणी वोट नाही दीले तर पाठीत खंजीर खुपसला काय??? हे म्हणजे जनतेला निव्वळ चुत्याच समजणे होय...

मि तरी आता सामना फक्त मनोरंजनाकरीताच वाचतो त्यात सिरीयसली घेण्यासारखे काहीच नसते..

(पाठीत खंजीर खुपसणारा) ---नि३.

झकासराव's picture

24 Oct 2009 - 2:38 pm | झकासराव

खरतर ही निवडणूक म्हणजे लुज बॉल होती. त्यावर कसलेल्या फलंदाजासारखा षटकार बसायला हवा होता. तर सेना भाजप बसले वयक्तीक हल्ले आणि घराणेशाही करत.
पुनम महाजन पडल्या तिकड रामदास कदम पडले.
तेलही गेल तुपहि गेल हाती आल धुपाटण.
खरतर वैयक्तीक पातळीवर जोवर उद्धव ठाकरे उतरले नव्हते तेव्हा त्यानी पक्षात चैतन्य आणलय अस नक्की वाटत होत.
आयत्या वेळी बर्‍याच गोष्टी नडल्या.
नाही म्हणायला सांगली, कोल्हापुर ह्या कॉन्ग्रेस , राष्ट्रावादी पट्ट्यात सेना भाजपचे कोम्ब उगवलेत. पुढच्या पाच वर्षात पक्ष बान्धणीसाठी एक प्लॅन करुन नीट काम केल तर तरेल पक्ष अन्यथा कठीण आहे.
पुढच्या वेळी नायतर राहुल लाटेत बरेच मोठी आणि वयस्कर झाड वाहुन जातील. त्याने आतापासुन फिल्डिन्ग लावली आहे. चालला तरी त्याची बातमी होते.

अनामिका's picture

24 Oct 2009 - 8:06 pm | अनामिका

चालला तरी त्याची बातमी होते.
नुसता चाललाच नाही त्याने सायकल चालवली ,झोपला,उठला ,खाल्ल तरि त्याची चर्चाच नाही त्यावर वृत्तवाहिन्यांवर १ तासाचा खास कार्यक्रम होतो
"अनामिका"
जो करी कर्म अहेतु,वेद तयास कळो न कळो रे।
ओळख पटली ज्यास स्वतःची,देव तयास मिळो न मिळो रे।

अनामिका's picture

24 Oct 2009 - 8:04 pm | अनामिका

वैयक्तीक पातळीवर हिन शब्दात चिखलफेकीला सुरुवात कुणी केली हे देखिल तितकेच महत्वाचे.........माणुस शांत आहे म्हणुन त्याला गृहीत धरुन चालत नाही........
वैयक्तिक दोषारोपांची प्रचारात सुरुवात होण्यापुर्वी महाराष्ट्रातल्या जनतेपुढे असलेल्या प्रश्नांवरच सभेमधे भाषणे होत होती........कुठलाही मवाळ व्यक्ती देखिल प्रसंगी कुणी नरड्याला हात घातला तर स्वतःचा बचाव करतोच की?
असो आता त्या सगळ्या गोष्टिंचा विचार करुन काही उपयोग नाही..
सेना पुन्हा उभी राहिलच याबद्दल विश्वास आहे.
जय हिंद!
जय महाराष्ट्र!
"अनामिका"
जो करी कर्म अहेतु,वेद तयास कळो न कळो रे।
ओळख पटली ज्यास स्वतःची,देव तयास मिळो न मिळो रे।

देवदत्त's picture

24 Oct 2009 - 9:17 pm | देवदत्त

मी काल सकाळीच मित्राला म्हणालो होतो की ,"शिवसेनेची परिस्थिती आता हिंदीतील 'खिसियानी बिल्ली खंभा नोचे' ह्या म्हणीप्रमाणे होणार असे वाटते. "
त्यानंतर काल आणि आज सामनामधील अग्रलेख वाचले तर त्याचाच प्रत्यय आला.

शिवसेना ही बाळासाहेबांमुळे उभी राहिली, पुढे आली. आता जर त्यांच्या प्रमुखानेच अशी भाषा वापरली तर काय होणार. वास्तविक आपले काय चुकले हे न शोधता लगेच दुसर्‍यांवर खापर फोडणे हे तर चुकीचेच आहे. आणि बाळासाहेबांनी असे म्हणणे जरा खटकले. बाकीचे म्हणत असतील तर जाऊ द्यात.

थोड्याच वर्षांपूर्वी, मराठी चित्रपटसृष्टीचे लोक जेव्हा म्हणत होते की 'मराठी माणसेच मराठी सिनेमा पाहत नाही तर आम्ही का मराठी चित्रपट बनवू?' त्यांना आमचे म्हणणे होते की 'तुम्ही चांगले चित्रपट बनवणे बंद केले आहे ते बनवा आम्ही पाहू. आणि आज तसे घडत असल्याचे दिसत आहे. '
त्याच धर्तीवर सांगावेसे वाटते की 'अजुनही वेळ गेली नाही. तुम्ही मराठी माणसांकरीता जे चांगले करत होते ते (बंद झाले म्हणण्यापेक्षा) कमी झाले आहे. ते करणे सुरू करा लोक पुन्हा तुमच्याकडे येतील. '

दिलीप वसंत सामंत's picture

25 Oct 2009 - 12:55 am | दिलीप वसंत सामंत

त्यात विशेष काय ? अचानक तसेच अनपेक्षित व भरवशाच्या मतदारांनी
असे केल्यास काय करणार ? ही पहिली प्रतिक्रिया त्यात नंतर बदल होणारच. मराठी माणसासाठी फक्त शिवसेनाच लढते व लढेल.
महाराष्ट्रच्या स्थापनेसच विरोध करणारी काँग्रेस मराठी माणसासाठी
काहीही करणार नाही.

मला एक लळत नाही मराठी लोकांनी फक्त शिवसेनेला मतदान करावे ह्याचा अट्टाहास का हे सेना नेते करतात? बाकी राकॉ व शकॉ मध्ये काय सगळे उपी बिहारीच आहेत का? आज आघाडी सत्तेवर आली त्याना काय भैय्या लोकानी मतदान करुन निवडुन दिले का?आज मुख्यमंत्री व जवळपास ९९% मंत्री मराठीच असणार आहेत.मग शिवसेनेने रडयचे कारण काय?जर लोकाना तुमचे मुद्दे पटले नसतील तर तुम्ही आत्मपरिक्षण करा ना. ज्या चुका केलेत त्या सुधारा कशाला उगाच मराठी लोकाना नावे ठेवता. उद्या हेच मराठी लोक चिढले तर आजच्या ४४ चे ४ करतील.
शिवसेनेला चांगल्या नेत्रुत्वाबरोबर चांगल्या माणसोपचार डॉक्टरची आवशक्ता आहे.तसेच उध्दव व राज एकत्र येण्यात मराठी माणसाचे हित आहे असा टाहो फोडण्याची काहीएक गरज नाही.दोघाचे मार्ग वेगळे आहेत.एकतर उध्दव ठाकरेनी सेना एक हाती राज ठाकरेना सोपवणे हाच एक पर्याय राहतो. अन ते घडणे अशक्य आहे.वाटल्यास हे मिलिंद नार्वे कराना व संजय राउताना विचारा.

वेताळ

शक्तिमान's picture

25 Oct 2009 - 1:06 pm | शक्तिमान

उगीच टाहो फोडत बसतात.. आणि इथेही त्यांचे अंधसमर्थक आहेत...

पिवळा डांबिस's picture

26 Oct 2009 - 2:49 am | पिवळा डांबिस

उध्दव ठाकरेनी सेना एक हाती राज ठाकरेना सोपवणे हाच एक पर्याय राहतो.
++++++१

शिवस्मारक बनविणे म्हणजे मुर्खपणा आहे अश्या स्वरूपाचा जो लेख सामनाच्या माध्यमातुन प्रसिद्ध केला गेला तिथेच शिवसेनेच्या पेकाटात मराठी मतदारांनी लाथ घालायचा निर्णय घेतला. शिवरायांचे नाव घेवुन पुन्हा सत्ता मिळवायचा प्रयत्न करायचा अन त्याच वेळी शिवस्मारकाला मुर्खपणा म्हणायचे अश्या दुटप्पी वागण्याने शिवसेनेला मतदारांनी नाकारले आहे.

राज ठाकरेंचे निर्णय योग्य ठरले त्याला हे पण एक मोठे अजोड 'राज' कारण आहे.

बाकी आज शिवसेना भवनातल्या एम.एन.एस. (मिलिंद नार्वेकर सेने) वर या पराभवाचे खापर फोडणे सुरु आहे.

जय महाराष्ट्र.......

शाहरुख's picture

26 Oct 2009 - 11:29 am | शाहरुख

इथे बरखा दत्तने घेतलेल्या मुलाखतीतील उद्धवजींचे शिवस्मारकाच्या मुद्दयावरील "मत" ऐकता येईल.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

26 Oct 2009 - 12:01 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

अच्छा, मला वाटलं मराठी माणूस वीज, पाणी, अन्न, शिक्षण, शेतकर्‍यांच्या आत्महत्या, महागाई, बेरोजगारी या प्रश्नांचा विचार करून मत देतो.

अवांतरः एका ब्रिटीश मित्राला प्रश्न पडला होता, आजही तुम्ही लोकं १७व्या शतकातल्या राजाच्या नावाने पुतळे उभारण्यापेक्षा रस्त्यावरचे खड्डे बुजवण्यासाठी पैसे का नाही खर्च करत! माझ्याकडे उत्तर नव्हतंच.

अदिती

अच्छा, मला वाटलं मराठी माणूस वीज, पाणी, अन्न, शिक्षण, शेतकर्‍यांच्या आत्महत्या, महागाई, बेरोजगारी या प्रश्नांचा विचार करून मत देतो.
किती जण सेनेला मतदान करतांना या गोष्टींचा विचार करतात....?

उत्तर येईल..... ०.

बाईसाहेब, मुळात सेनेची उभारणीच भावनिक मुद्द्यांवर आहे. आपण वर व्यक्त केलेल्या मुद्द्यांवर त्यांचे विरोधक निवडणुका लढवतात..

अवांतरः एका ब्रिटीश मित्राला प्रश्न पडला होता, आजही तुम्ही लोकं १७व्या शतकातल्या राजाच्या नावाने पुतळे उभारण्यापेक्षा रस्त्यावरचे खड्डे बुजवण्यासाठी पैसे का नाही खर्च करत! माझ्याकडे उत्तर नव्हतंच.

मार्सेलिस बंदरात सावर्करांचा पराक्रम उभारावा म्हणुन केलेल्या मागणीला सुध्दा असाच विरोध करा.
भारतातील विविध मंदिरांच्या देखभालीसाठी/देखरेखीसाठी खर्च होणारा पैसाही खड्ड्यांसाठी वापरा असे सुचवा ना..... मंदीरामुळे होणारा खर्च देशासाठी वापरा अन देशाचा विकास करा...

कोण हे विरोधक म्हणे?

मला वाटत होतं सगळेच दारु पैसे वाटतात अन सगळ्यांच्याच लेखी मुद्दे फक्त तोंडी लावायला असतात. वीज, पाणी, अन्न, शिक्षण, शेतकर्‍यांच्या आत्महत्या, महागाई, बेरोजगारी.... जन्माला आल्यापासुन याबाबतची आश्वासनंच तर ऐकतोय. पुढं काय? उगीच भ्रष्ट आचार अन विचारांना तात्विक मुलामा सगळा!

llपुण्याचे पेशवेll's picture

26 Oct 2009 - 2:47 pm | llपुण्याचे पेशवेll

मला वाटत होतं सगळेच दारु पैसे वाटतात अन सगळ्यांच्याच लेखी मुद्दे फक्त तोंडी लावायला असतात
+१ सगळे सारखेच. सोवळा कोणी नाही. :)

पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Since 1984

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

26 Oct 2009 - 2:16 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

मला आजही अयोध्येच्या मंदीरापेक्षा दहशतवादाचा आणि कुपोषणाचा प्रश्न महत्त्वाचा वाटतो. मार्सेल बंदरावर सावरकरांचा पुतळा उभारून किंवा स्मारक बांधण्यापेक्षा त्याच सावरकरांनी जातपात मनातून हद्दपार करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे वारस व्हावं असं वाटतं. राजांचं स्मारक उभारण्याऐवजी राजांनी निर्माण करण्यास सुरूवात केलेलं, त्यांच्या स्वप्नातलं आदर्श राज्य यावं यासाठी आधी प्रयत्न करण्याची गरज आहे असं म्हणावसं वाटतं. त्या आदर्श राज्यात एक भव्य दिव्य पण तरीही पर्यावरणाला हानी न पोहोचवणारं स्मारक बांधता येईल.

प्रश्न मला काय वाटतं याचा नसून, समस्त(?) मराठी लोकांनी कोणत्या मुद्द्यावर मतदान केलं याचा आहे.

पुणेरी यांचा मुद्दा मात्र (दुदैवाने) खरा वाटतो, दिसतो म्हणून पटतो!

अदिती

(अवांतरः एक काका अमेरिकेला जाऊन आले. त्यांना विचारलं तर म्हणतात, "हॅ:, त्या स्वातंत्र्यदेवतेच्या पुतळ्यात एवढं काय आहे, शिवाजी पार्कातला शिवाजीचा पुतळा आपणही प्रत्येक प्रवाशाला दाखवला तर तोही तेवढाच प्रसिद्ध पावेल.)

प्रसन्न केसकर's picture

26 Oct 2009 - 2:27 pm | प्रसन्न केसकर

तर ते उभारण्यामागचे हेतु, उद्देश अन भावना महत्वाच्या असतात. दुर्दैवानं या पुतळ्यामागचे हेतु अन उद्देशही हिणकस वाटताहेत मला. अश्या हेतु अन उद्देशांनी पुतळे उभारण्यापेक्षा न उभारलेलेच बरे. किमान त्या राष्ट्रपुरुषांचा अपमान तरी होणार नाही.

मदनबाण's picture

26 Oct 2009 - 2:31 pm | मदनबाण

अगदी सहमत...
मदनबाण.....

अत्तर सुगंधी व्हायला फ़ुले सुगंधी असावी लागतात.

प्रभो's picture

26 Oct 2009 - 3:00 pm | प्रभो

सहमत आहे. पुतळे उभारून लोकांचा विश्वास मिळवता येतो हे जरी सत्य असले तरी त्यावर होणारे राजकारण हिडीस आणी देशहिताला मारक आहे. जर लोकभावना जागृत न करता फक्त मते मिळवण्यासाठी कोणी पुतळ्यांचे राजकारण करत असेल तर ते वाईटच असे माझे मत आहे.

मोठ्या मोठ्या एतिहासिक इमारती (नव्या बांधल्याच नाहीत तर त्या काळपरत्वे जुन्या/एतिहासिक होणार नाहीत) या त्या त्या राज्य्/देशाचे status symbol असतात असं मला तरी वाटते. स्वातंत्रदेवतेचा पुतळा अमेरिकेस फ्रेंचांनी भेट दिला होता. शिवरायांच्या स्मारकास ४०० करोड जरी खर्च होणार असले तरी ५२०० करोड चे बजेट असलेल्या मुंबई महापालिकेस वा दोन लाख कोटींचे कर्ज असलेल्या महाराष्ट्र सरकारला ते काहिच नाही.

आपणच लोक जेंव्हा परदेशी प्रवास करतो त्यांच्या नयनरम्य एतिहासिक व नव्या इमारती पाहतो, तेंव्हा म्हणतो की आपल्याकडे हे का शक्य नाही??? शक्य सगळे आहे हो.पण त्यात जेंव्हा राजकारण घुसते तेंव्हा त्याचा चुथडा होतो. आणी राजकारण न करता ते ४०० कोटी जर रस्त्यावरचे खड्डे भरायला (खिसे भरायला न वापरता) वापरले तर दुधात साखरच.....

--प्रभो
----------------------------------------------------------------------------------
(पहिल्यांदाच गहन प्रश्नावर प्रतिसाद देतोय.काही चुकल्यास ह घेणे)

प्रसन्न केसकर's picture

26 Oct 2009 - 3:05 pm | प्रसन्न केसकर

मग खर्च झालेल्या पैशावर बोलु. पुतळा केला तर त्यातुन जातीयतावादाला खतपाणी कसं घालता येईल? कोणत्याही सरकार, पालिकेचं अंदाजपत्रक पहा त्यात दरवर्षी असे ढिगांनी प्रोजेक्ट सापडतील. त्यातले थोडे प्रत्यक्षात अस्तित्वात येतात इतर प्रोजेक्टकरताचे फंड नंतर रिअ‍ॅलोकेट होतात.

jaypal's picture

26 Oct 2009 - 12:37 pm | jaypal

१. "याच साठी केला होता का अट्टाहास?"
२. "महाराष्ट्राचे मन मेले आहे काय?"
३. ""मराठी माणसाने पाठीत खंजीर खुपसला"
ही काही वैफल्यग्रस्त वाकये वाचुन मला ही त्रास झाला.
सुहास म्हणतात "युतीचा पराभव हा निवडणुकी पूर्वीच्या त्यांच्या चुकांचा परिणाम आहे -- यात तिकीट देण्यापासून कार्यक्षमतेपर्यंतच्या सर्व गोष्टी आल्या --हे या लोकांना कळत नाही काय? मग त्यासाठी तरूणाई आणि मराठी माणूसच दोषी कसा..?" हे एकदम पटल.
निवडणुकां आधि जाहीर सभेतुन, स्टेज वरुन "जनता जनार्दनाला" सास्टांग नमन करणारे बाळासाहेब मी पाहीले आहेत आणि आता मराठी माणसाच्या नावाने आगपाखड करणारे बाळासाहेब पहात आहे. सत्तेचा मोहच हे सर्व बोलतो आहे.घराणेशाही म्हणुन इतर पक्षांना हिणवणारया बाळासाहेबांनी काय केले याचा देखिल विचार व्हावा. केवळ आणि केवळ सत्त लोलुपताच दिसते आहे.

मदनबाण's picture

26 Oct 2009 - 1:41 pm | मदनबाण

"मराठी माणसाने पाठीत खंजीर खुपसला" असे हा अग्रलेख म्हणतो..
मराठी माणसांसाठी जर एव्हढी भरीव कामगिरी यांनी केली असती तर असले विधाने करायची वेळही आली नसती.
"जर शिवसेना नसती तर मराठी माणसाचे हाल वाईट झाले असते!" म्हणजे आता मराठी माणसाचे हाल चांगले आहेत का ?असेल तर तसे सिद्ध करुन दाखवता येईल काय? आणि जर मराठी माणुस पुढे गेला असता... तर मराठीच्या मुद्यावर आर ठाकरेंना मते मागता आली असती काय?
कॉंग्रेसच्या उमेदवारांना मते द्या; पण मनसेला मते देऊ नका, हा कॉग्रेस चा प्रचार शिवसेनेला का करावा लागला? म्हणजे आपल्या पक्षाची लायकी नाही हे तेव्हाच त्यांना समजले होते काय ?
शिवसेनेची आज पत्रकार परिषद आहे बहुतेक,,, बघुया काय मुक्ताफळे उधळली जाणार आहेत ते...
तसेही मिडीयाच्य नावाने बोंब मारुन झाल्यावर आज काय आणि कसे प्रश्न विचारले जातील याचीही फार उत्सुकता आहे.

मदनबाण.....

अत्तर सुगंधी व्हायला फ़ुले सुगंधी असावी लागतात.

लबाड लांडगा's picture

26 Oct 2009 - 2:44 pm | लबाड लांडगा

मुंबई महापालिकेची निवडणूक ह्यांना जिंकू देत परत शिवाजी पार्कवर साष्टांग नमस्कार घालतील आणि जनतेला लाख लाख प्रणाम आणि कोटी कोटी सलाम मारतील.
लबाड लांडगा

इथे वाचता येईल :---
http://www.starmajha.com/TopStoryLanding.aspx?NewsID=7863

मदनबाण.....

अत्तर सुगंधी व्हायला फ़ुले सुगंधी असावी लागतात.

हे पण महत्वाचं आहे की. अन `सामनाच्या अग्रलेखात मराठी माणसांना देण्यात आलेली दूषणं ही तळमळीतून आलेली आहेत, त्यामुळे खरा मराठी माणूस दुरावणार नाही, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.' हा डॅमेज कंट्रोल पण आहे ना. पहिल्या धक्क्यातुन सावरताहेतसं दिसतय. अजुन जरा वेळ गेल्यावर पाहु.

नक्कीच...
सावरले तर उत्तमच !!!
शिवसेना-भाजपा आणि मनसे काय काय करतील विरोधी पक्षात बसुन ते लवकरच कळेल... ;)

( येणार्‍या काळात मराठी मुलांना मोठा प्रमाणात नोकर्‍या मिळतील काय?) :?
मदनबाण.....

अत्तर सुगंधी व्हायला फ़ुले सुगंधी असावी लागतात.