महाराष्ट्र विधानसभा निवडणुक निकाल २००९

नि३'s picture
नि३ in काथ्याकूट
22 Oct 2009 - 6:19 pm
गाभा: 

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकाचे निकाल आज जाहीर झाले.
आतापर्यंत हाती आलेल्या वृत्त्तानुसार आघाडी सरकार तिसर्यांदा सरकार स्थापीत करणार असे स्पष्ट दिसत आहे.

आघाडी सरकार -- १४७
युती --- ९४
मनसे --- १३
ईतर --- ३४

मनसे ने पुन्हा मुसंडी मारली आहे आणी १३ जागा ह्स्तगत केल्या आहे. मनसेने पुन्हा शिवसेनेला दोनच पण सौलीड मारल्या आहे.
एकुण्च राज ठाकरे निकालाने संतुष्ट आहे आणी त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेचे आभार मानले आहे

महत्‍वपूर्ण निकाल :

१> अशोक चव्‍हाण -- जिंकले
(कांग्रेस) भोकर

२> छगन भुजबल -- जिंकले
(राष्‍ट्रवादी कांग्रेस पार्टी) येवला

३> पूनम महाजन राव - पराभव
(भारतीय जनता पार्टी) घाटकोपर वेस्‍ट

४> राजेंद्र शेखावत - जिंकले
(भारतीय राष्ट्रीय कांग्रेस) अमरावती

५> शिरीश पारकर - पराभव
(महाराष्‍ट्र नवनिर्माण सेना) विले पार्ले

६> रामदास कदम - पराभव
(शिवसेना) गुहागर

७> अमित देशमुख -जिंकले

(कांग्रेस) लातूर सिटी

आघाडी सरकारचे अभिनंदन आणी बाकी सगळ्यांना हार्ड लक

-नि३

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

22 Oct 2009 - 6:26 pm | विसोबा खेचर

मनसे ने पुन्हा मुसंडी मारली आहे आणी १३ जागा ह्स्तगत केल्या आहे.

मनसेचे मन:पूर्वक अभिनंदन..!

बाळासाहेबांच्या पुत्रप्रेमामुळे सेनेचा घात झाला!

आज सेनेचे प्रमूख नेतेपद राज, राणे यांच्यासारख्यांकडे असते तर सेनेला खूप जागा मिळाल्या असत्या. बाळासाहेबांनी स्वत:हून स्वत:च्या मुलाऐवजी राजकडे सेनेचं कर्तेपण द्यायला हवं होतं. त्यामुळे बाळासाहेबही अधिक मोठे ठरले असते!

विधानसभा प्रचारादरम्यानही केवळ राजला दोष देणं एवढा एकच कार्यक्रम सेनेने अधिक करून राबवला तोही महागात पडला!

तात्या.

अवलिया's picture

22 Oct 2009 - 6:33 pm | अवलिया

सहमत आहे.

मनसेचे अभिनंदन.

--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

विष्णुसूत's picture

23 Oct 2009 - 12:47 am | विष्णुसूत

अपेक्षित निकाल लागला.
ह्या निकाला मुळे महाराष्ट्राचे राजकारणात "रिसेट" बटण दाबले जाणार आहे. पुढची निवडणुक २०१४ च्या आधि ( बहुतेक २०१२) मधे होण्याची शक्यता जास्त आहे. तेव्हा नवी समीकरणं नक्की दिसतील.

मला आवडलेला निवडुन आलेला उमेदवार म्हणजे... खडकवासला मतदार संघा चा मनसे चा उमेदवार .. जो २ किलो सोने घालुन प्रचार करायचा !

निखिलराव's picture

23 Oct 2009 - 9:19 am | निखिलराव

खडकवासला मतदार संघा चे मनसे चे उमेदवार मा.वांजळे हे गेल्या ८ ते १० वरशा पासुन २ किलो सोने घालतात.

पिवळा डांबिस's picture

23 Oct 2009 - 9:27 am | पिवळा डांबिस

युतीला ९४ जागा मिळालेल्या असतांना राज ठाकरे १३ जागांवर संतुष्ट आहेत?
दुर्दैव!!!!
अरे सगळ्याच्या सगळ्या जागा हिसकावून घ्यायला हव्या होत्या!!!!!

शिवशाहीचा वारस हा ठराविक अष्टप्रधान मंडळाच्या हातून नव्हे तर (निवडणुकीच्या) रणांगणावर ठरतो हे त्या आबासाहेबांना एकदा समजायलाच हवं होतं!!!!!
मराठी मतदारांसंबंधी आम्ही निराश आहोत........

विष्णुसूत's picture

23 Oct 2009 - 11:31 am | विष्णुसूत

मला हि असेच वाटते.
मनसे ची कामगीरी अजुन चांगली हवी होती. मुंबई च्या ३५, नाशीक,ठाणे आणि पुणे पैकि कमीत कमी २० विधानसभा सीट्स मिळायला हव्या होत्या.

बाकी सर्व आमच्या मनसेच्या उमेदवारांचे हार्दिक अभिनंदन.
उध्दव ठाकरेनी सेनेच्या चांगल्या भविष्या करिता सेना मनसेत विलीन करावी. कारण राज ठाकरेना मुख्यमंत्री पदात रस नाही आहे.

वेताळ

विष्णुसूत's picture

23 Oct 2009 - 11:24 am | विष्णुसूत

मला हा माणुस (वांजळे) आवडला.
जेन्युइन माणुस वाटला !

बाकरवडी's picture

23 Oct 2009 - 11:47 am | बाकरवडी

त्याची पत्नी काँग्रेस मध्ये आहे @)

:B :B :B बाकरवडी :B :B :B
माझा ब्लॉग बघा :- बाकरवडी

चिरोटा's picture

23 Oct 2009 - 4:46 pm | चिरोटा

मला आपल्या राजकारणी लोकांचा हा गुण आवडतो. सगळ्या पक्षांत आपल्या नातेवाईकांची फिल्डिंग लावतात.
आतापर्यंत दोन किलो सोने घालत होते.आता सहा महिन्यांनी बघूया-किती किलो सोने अंगावर चढते ते.
भेंडी
क्ष्^न + य्^न = झ्^न

प्रसन्न केसकर's picture

23 Oct 2009 - 5:02 pm | प्रसन्न केसकर

दोनदा लिहिले गेल्याने संपादित

प्रसन्न केसकर's picture

23 Oct 2009 - 4:57 pm | प्रसन्न केसकर

हा मुळात आघाडीचाच नेता. आधी तो जि.प. सदस्य होता पण गेल्या निवडणुकीत त्याचा गट महिला राखीव झाला. मग त्याची बायको निवडुन आली, प्रचंड बहुमतानं. तसा मास बेस चांगलाच आहे अन शोमन पण आहे.

या निवडणुकीची तयारी तो गेले कित्येक महिने करत होता पण सीट काँग्रेसनं राष्ट्रवादीला दिली. मित्रपक्षात फोडाफोडी नको या विचारानं त्याची तिथली उमेदवारी गेली. तो युतीकडं पण गेला होता पण युतीला तिथं मोहोळची उमेदवारी द्यायची होती म्हणुन चान्स नाही मिळाला म्हणे. शेवटी अपक्ष म्हणुन उभे रहाण्याचा निर्णय घेण्याआधी तो मनसे कडे गेला अन तिथुन उमेदवारी मिळवली.

वांजळेच्या प्रचारात मात्र सर्वपक्षीय कार्यकर्ते अन स्थानिक नेते उतरले. त्यामुळं वैतागुन राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्यांनी त्याचं सोनं घालणं काढलं. त्यामुळे मतदारात संभ्रम होईल असं गणित होतं म्हणे.

विष्णुसूत's picture

23 Oct 2009 - 5:15 pm | विष्णुसूत

मी फक्त त्याची मुलाखत वेब कास्ट वर पाहिली. मजेदार माणुस वाटला.

निखिलराव's picture

24 Oct 2009 - 11:06 am | निखिलराव

टारझन's picture

22 Oct 2009 - 6:32 pm | टारझन

मनसेच्या पहिल्याच निवडणुकीच्या दणक्या मुळे अंमळ हर्षित झालो !!

युती काय न आघाडी काय ... बाकी सगळा आनंदी आनंदच आहे !! :)

२०१४ च्या निवडणुकीत मनसे कॅन्सर सारखा वाढणार असं वाट्टय !!

- टाराज ठाकरे
(अध्यक्ष, मिसळपाव नवनिर्माण सेना)

प्रभो's picture

22 Oct 2009 - 6:37 pm | प्रभो

मनसेच्या पहिल्याच निवडणुकीच्या दणक्या मुळे अंमळ हर्षित झालो !!

युती काय न आघाडी काय ... बाकी सगळा आनंदी आनंदच आहे !! :)

२०१४ च्या निवडणुकीत मनसे कॅन्सर सारखा वाढणार असं वाट्टय !

-प्रभोबाळ नांदगावकर
----------------------------------------------------------------------------------
काय संगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!

नंदू's picture

22 Oct 2009 - 6:36 pm | नंदू

दोघांचं भांड्ण अन तिसर्याचा लाभ. बहुतेक येती काही वर्ष विरोधी पक्षांचं काही खरं दिसत नाही.

नंदू

नि३'s picture

22 Oct 2009 - 7:55 pm | नि३

२०१४ च्या निवडणुकीत मनसे कॅन्सर सारखा वाढणार असं वाट्टय !!

---- सहमत

---नि३.

सुमीत भातखंडे's picture

22 Oct 2009 - 8:17 pm | सुमीत भातखंडे

मनसेचं मनापासून अभिनंदन.
पण दोघांच्या भांडणात उगीचच काँग्रेसचा लाभ झाला हेही खरच.
पुढच्या वेळी मनसे अजून जोरात मुसंडी मारेल अशी अपेक्षा.

गणपा's picture

22 Oct 2009 - 8:27 pm | गणपा

मनसेच अभिनंदन. आज १३ जागा मिळाल्यात पुढच्या विलेक्शनला हा वणवा नक्कीच वाढत जाणार.
बाकी तात्यांशी एकदम सहमत. बाळासाहेबांचा धृतराष्ट्र झालाय.
(दाढीला वस्तरा लायागची लक्षण साफ संपली.)

मेघवेडा's picture

22 Oct 2009 - 9:05 pm | मेघवेडा

थोडं विषयाला सोडून..

सेनेला भाजपापेक्षाही कमी जागा मिळ्तील असे अजिबात वाटले नव्हते. मनसेचे अस्तित्व प्रकर्षाने जाणवणार यात काही शंकाच नव्हती पण सेनेला मुंबैत मनसेपेक्षा कमी जागा मिळ्णे हे अनपेक्षितच! मनसेच्या शिलेदारांनी सेनेच्या बालेकिल्ल्यात घुसून सेनेला घायाळ केले आहे. अर्थात सेनेनेही कधी राजच्या विरोधात बोलण्यापलिकडे काही केले नाही. दहशतवादी हल्ल्याचा अहवाल, वीजपुरवठा, महागाई, शेतकरी समस्या असे कित्येक मुद्दे वापरून सेना (खरंतरं युती) आघाडीविरोधी वातावरण निर्माण करू शकली असती. पण त्यांनी तसे केले नाही. एका प्रादेशिक पक्षाने ज्या मुद्द्यांची कास धरली पाहिजे ते मुद्दे सोडून गेली काही वर्षे सेनेने मराठीचा मुद्दा सोडून हिंदुत्वाच्या मुद्द्यावर राजकारण करण्यात धन्यता मानली. त्याच कारणामुळे आज राजची नवनिर्माण सेना सामान्य जनतेला भावली असे एकूण चित्र दिसते आहे. या सगळ्या उल्हासात पक्षांतर्गत बंडाळी फाल्गुन मास ठरली.

आता सेनेने मुंबईचा आपला बालेकिल्ला गमावलाय असे वाटते.

लहानपणापासून "आम्ही शिवसेनेचेच मतदार" अशी एक भगव्या रंगाची पट्टी मी आमच्या दरवाज्यावर पाहत आलेलो आहे. घराचे रंगकाम करताना त्या दरवाजावर रंगाचे नवे थर बसत गेले, पण ती पट्टी तशीच राहिली. त्या रंगाच्या थरांतूनही ते तीन शब्द उठून दिसायचे. आता ती पट्टी अगदी दिसेनाशी झालिये असं परवा आई सांगत होती.....

अनामिका's picture

22 Oct 2009 - 9:23 pm | अनामिका

अपेक्षेप्रमाणे युतीला यश मिळाले नाहीच उलट मागिल वेळेपेक्षा जागा देखिल कमीच झाल्यात्..........असो! आता तरी आत्मपरिक्षण करुन स्वतःच्या पराभवाची मुळ कारणे शोधुन त्याचा अभ्यास करुन आपल्या विचारात,राजकारणात व आखणी मधे युती बदल करेल अशी अपेक्षा आहेच्.......युतीच्या निवडुन आलेल्या आमदारांचे मनःपुर्वक अभिनंदन्.........ठाण्याचा गड राखण्यात सेनेला काही अंशी यश आले त्याबद्दल आनंद आहेच्......हि आमच्या दिघेंसाहेबांची पुण्याई आहे.......स्वतःला साहेब म्हणवुन घेणारे आताशा ठाण्यात गल्लोगल्ली कुत्र्याच्या छ्त्रीप्रमाणे उगवलेत......ठाण्यात साहेब एकच दिवंगत दिघेसाहेब......
कळवा मुंब्र्याची जागा देखिल मिळाली असती तर अधिक आनंद झाला असता.....हे ही नसे थोडके
आव्हाडांना अखेर मुंब्र्याचा आधार घ्यावा लागला हे उदाहरण बोलकेच ...ठाण्यात आपला पराभव निश्चित हे त्यांना ठाऊक होतेच......
तसेच मनसेला पदार्पणातच चांगले यश मिळाले ........त्याबद्दल मनसेच्या सर्व शिलेदारांचे देखिल मनसे अभिनंदन्..........आता या यशाने हुरळून न जाता जनतेच्या प्रती असलेले आपले उत्तरदायित्व व कर्तव्य सर्व पक्षाच्या आमदारांनी(आघाडीचे जमेस नाही)जनतेचे प्रश्न सोडवून व प्रसंगी सत्तारुढ पक्षाला जेरीस आणुन पार पाडावे .......अंकुश,जरब, वचक हे सगळ आता सत्तारुढ पक्षाला मनसेमार्फत अनुभवायला मिळेल अशी अपेक्षा आहेच्.....गेल्या १० वर्षात जबाबदार विरोधी पक्षाची भुमिका युती प्रभावीपणे निभावु न शकल्याने आघाडीचा सत्तेचा मार्ग सुकर झाला ..... विधानसभेत आता मनसेचे शिलेदार जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम करेल तेंव्हा आपला पक्षांतर्गत् विरोध विसरुन युतीचे आमदार देखिल त्यांच्या आवाजात आवाज मिसळत खर्‍या अर्थाने जनतेची बाजु मांडत जनतेला न्याय मिळवून देतील अशी अपेक्षा आहे...
अधोरेखित-महाराष्ट्रातील जनता कैक हजार शेतकर्‍यांच्या आत्महत्या कर्जापायी घडुनही , भरमसाट वाढलेली महागाई व अन्नधान्यांचे भाव देखिल कडाडलेले असतानाही ,जिवनावश्यक वस्तुं वाढिव दराने खरेदी करण्याइतपत ,१२० रु किलो तुरडाळ,४२रु किलो साखर पचवण्याइतपत्,तसेच १२ ते १८ तासांचे भारनियमन सोसण्याइतपत ,शिवाय विजदरवाढ होऊनदेखिल भरमसाट बिले भरण्याइतपत श्रीमंत आहे हे या निवडणुक निकालांवरुन स्पष्ट झाल
आई जगदंबा महाराष्ट्रातल्या जनतेचे कल्याण करो हिच प्रार्थना.....
जय हिंद!
जय महाराष्ट्र!

"अनामिका"
जो करी कर्म अहेतु,वेद तयास कळो न कळो रे।
ओळख पटली ज्यास स्वतःची,देव तयास मिळो न मिळो रे।

मेघवेडा's picture

22 Oct 2009 - 9:47 pm | मेघवेडा

अधोरेखित-महाराष्ट्रातील जनता कैक हजार शेतकर्‍यांच्या आत्महत्या कर्जापायी घडुनही , भरमसाट वाढलेली महागाई व अन्नधान्यांचे भाव देखिल कडाडलेले असतानाही ,जिवनावश्यक वस्तुं वाढिव दराने खरेदी करण्याइतपत ,१२० रु किलो तुरडाळ,४२रु किलो साखर पचवण्याइतपत्,तसेच १२ ते १८ तासांचे भारनियमन सोसण्याइतपत ,शिवाय विजदरवाढ होऊनदेखिल भरमसाट बिले भरण्याइतपत श्रीमंत आहे हे या निवडणुक निकालांवरुन स्पष्ट झाल

युतीकडे हे प्रश्न सोडवण्याची ताकद होती का अनामिकाताई? युती सत्तेवर आल्यावर हे प्रश्न निश्चित सुटतील अशी हवा युतीचे नेते निर्माण करू शकले असते पण तसे घडले नाही आणि त्यात कार्यप्रमुखांनी "वाटल्यास आघाडीला मते द्या पण सत्तेच्या दलालांना नको" असे आवाहन जनतेला केले!!! माझ्या मते मनसे हा युतीचा खरा शत्रू नसताना त्याच्याविरोधात रणांगणात उभे ठाकल्यासारखा युतीचा पवित्राच युतीला घातक ठरला!

आणि त्यातून "हे असल्या लोकांचे सरकार सत्तेवर येण्यापेक्षा चाललंय ते बरंय!" अशी लोकांची भावना झाली. या सगळ्या परिस्थितीत राष्ट्रीय पातळीवरील काँग्रेसचे सरकारचे यश त्यांना या विधानसभेतही तारून नेण्यास पुरेसे होते.

शाहरुख's picture

22 Oct 2009 - 10:44 pm | शाहरुख

अधोरेखित-महाराष्ट्रातील जनता कैक हजार शेतकर्‍यांच्या आत्महत्या कर्जापायी घडुनही , भरमसाट वाढलेली महागाई व अन्नधान्यांचे भाव देखिल कडाडलेले असतानाही ,जिवनावश्यक वस्तुं वाढिव दराने खरेदी करण्याइतपत ,१२० रु किलो तुरडाळ,४२रु किलो साखर पचवण्याइतपत्,तसेच १२ ते १८ तासांचे भारनियमन सोसण्याइतपत ,शिवाय विजदरवाढ होऊनदेखिल भरमसाट बिले भरण्याइतपत श्रीमंत आहे हे या निवडणुक निकालांवरुन स्पष्ट झाल

मी असो किंवा अंबानी असो, कुणाला तुरडाळ ८०रु च्या ऐवजी १२० ने घ्यायला आवडेल ?? येवढे तोंडवर आपटून देखील लोकांच्याच माथी पराभवाचे खापर फोडलेले बघून अंमळ नव्हे तर फारच मौज वाटली..

युतीने का नाही विरोधी पक्षाची भुमिका नीट बजावली ?? का नाही त्यांनी लोकांना वरील मुद्दे पटवून दिले ?? भगवे कपडे घालून फिरण्यापेक्षा हे ज्यादा योग्य नव्हते काय ??

आघाडी सरकार हे त्याच्या कर्तृत्वापेक्षा युतीने विरोधी पक्षाची भुमिका नीट न बजावल्याने पुन्हा सत्तेत आले आहे असे मला वाटते..

पिवळा डांबिस's picture

23 Oct 2009 - 9:35 am | पिवळा डांबिस

आत्मपरिक्षण करुन स्वतःच्या पराभवाची मुळ कारणे शोधुन त्याचा अभ्यास करुन....
तुमचे विचार छान आहेत अनामिकाजी...
पण शिवसेनेचे कार्याध्यक्ष हा विचार कधीच करणार नाहीत....
कारण असा विचार केला तर त्याचं उत्तर एकच येतं....
आपलं पद खाली करून ते राज ठाकरेंना देणं....
मला नाही वाटत की कार्याध्यक्ष इतके प्रामाणिक असतील....

असो...
विनाशकाले विपरीत बुद्धी...

आमच्या वडिलांसमान बाळासाहेबांनी बांधलेली ही संघटना कोसळतांना पहातांना अतीव दुख्ख होतं...
पण असले आयत्या बिळावरचे नागोबा तिथे विराजमान झालेले बघण्यापेक्षा ती कोसळलेली बरी असंही वाटतं....

कदाचित त्यातूनच राजसारखं नवीन सोनं तावून-सुलाखून निघेल....

शैलेन्द्र's picture

23 Oct 2009 - 3:31 pm | शैलेन्द्र

आज दिघे साहेब असते तर कमित कमी १० जागा वाढ्ल्या असत्या सेनेच्या... गणेश नाईक कधी डोके वर नाही काढु शकले तेंव्हा... पण साहेब असतानाही बाळासाहेबांनी त्यांचे काय चीज केले? चांगल्या लोकांना पध्द्त्शीर्पणे खच्ची केल शिवसेनेने.. भुजबल असो, नाईक असो प्रभु असो की राज असो... शिवसेना ही हुजर्‍यांची संघटणा झालीय आत्ता.

चिरोटा's picture

22 Oct 2009 - 10:04 pm | चिरोटा

गेल्या १० वर्षात जबाबदार विरोधी पक्षाची भुमिका युती प्रभावीपणे निभावु न शकल्याने आघाडीचा सत्तेचा मार्ग सुकर झाला

सहमत.विरोधी पक्षांनी योग्य प्रश्नांनांच महत्त्व दिले असते तर आज ते सत्तेवर दिसले असते.मनसेच्या उदयामुळे सेनेचे टारगेट बदलले.
गेल्या काही महिन्यांतले 'सामना'तले अग्रलेख आश्चर्य वाटावेत असे होते.' शरदबाबू आमचे जुने मित्र आहेत,आमचे शरद बाबु असे,शरद बाबु उत्तम प्रशासक 'वगैरे लेख लिहुन नक्की काय मिळाले? नारायण राणे ह्यांच्यावर टिका करताना सामनाने विलासरावांचे एवढे कौतुक केले की विलासराव देखील संभ्रमात पडले असावेत!!!.पवारांना मराठी पंतप्रधान म्हणून पाठिंबा ही सेनेची घोडचूक होती. म्हणजे त्यांच्या नजरतून 'सर्वात भ्रष्ट राजकारणी' पंतप्रधान म्हणून चालणार होता पण त्याच व्यक्तीला लोकांनी राज्यात मत देवू नये असे सेनेचे मत होते.!!
अत्यंत भिकार कारभार करुनही काँग्रेस्/राष्ट्रवादी परत निवडून आले.मनमोहनसिंग ह्यांची चांगल्या प्रतिमेचा त्यांना नक्कीच उपयोग झाला असावा.आगलावी भाषणे न करता शांतपणे काम करणारा नेता ही त्यांची प्रतिमा अजूनही आहे.
भेंडी
क्ष्^न + य्^न = झ्^न

स्वप्निल..'s picture

23 Oct 2009 - 12:35 am | स्वप्निल..

>>अत्यंत भिकार कारभार करुनही काँग्रेस्/राष्ट्रवादी परत निवडून आले.मनमोहनसिंग ह्यांची चांगल्या प्रतिमेचा त्यांना नक्कीच उपयोग झाला असावा.आगलावी भाषणे न करता शांतपणे काम करणारा नेता ही त्यांची प्रतिमा अजूनही आहे.

नेमका ह्याचाच फायदा झालाय...

बाकी मनसे कडुन अपेक्षा वाढल्याय .. त्यांनी आतातरी बोलले ते करावे हीच इच्छा!!

स्वप्निल

टारझन's picture

22 Oct 2009 - 10:37 pm | टारझन

रिडालोस कुठे गेले ?

-- आठवलिया
=========
बिमर भल्याभल्यांच्या *ट्या कपाळात घालवतो ... म्हणून पक्षपाती पंच त्याला हि&ही ठरवतात.

चिरोटा's picture

22 Oct 2009 - 10:50 pm | चिरोटा

मा.क्.प. चा एक आला. ईतर मध्ये ४९ आहेत्.त्यातले रिडालोसवाले कोण हे कसे ओळखायचे?अपक्षांची आता गरज लागणार नाही.घोडेबाजाराची शक्यता नाही. आता बसा मंत्र्यांचे बँक बॅलन्स बघत आणि उपोषणे करत.
भेंडी
क्ष्^न + य्^न = झ्^न

सुहास's picture

22 Oct 2009 - 10:58 pm | सुहास

मी ही शोधतोय केव्हा पासून..! :)

आठवल्यांनी आघाडीला सक्काळीच पाठींबा जाहीर केलाय..
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/5147756.cms

राजू शेट्टींनी अगदी शेवटी-शेवटी शिवसेनेबरोबर तडजोड केलेली होती .. म्हणजे रिडालोस फुटलीय, ऑफिशियलि जाहीर व्हायचेय..

--सुहास

हुप्प्या's picture

23 Oct 2009 - 4:42 am | हुप्प्या

घराणेशाहीने आपल्या लोकशाहीत भक्कम बस्तान बसवले आहे. कितीही नको वाटले तरी लोकांना घराणीच प्यारी असतात असे दिसते आहे.
पवार, मुंढे, नाईक (नवी मुंबई), शेखावत, राणे, शिंदे, महाजन (यावेळेस हे प्रकरण जरा फसले). अजूनही बरीच घराणी असतील. आणि अर्थात ठाकरे घराणे आहेच.

महागाई, वीज, पाणी असल्या कुठल्याही मूलभूत प्रश्नांनी जनता खवळून उठली नाही. म्हणजे बहुधा जनता जनार्दन हा मठ्ठ बनला आहे. निवडणूकीपुरते उदार बनलेले नेते, त्यांनी वाटलेले पैसे, आश्वासने अन्य खैराती ह्यांना जनता जनार्दन भुलला आहे.
बघू पुढच्या निवडणूकीत तूरडाळ २०० रु किलो होईल आणि मग जनता खवळेल का बघू. तोपर्यंत सत्ताधारी दोन्ही हाताने ओरबडून खातील ह्यात शंका नाही.
जय घराणेशाही!

सुहास's picture

23 Oct 2009 - 6:15 am | सुहास

:S

--सुहास

अडाणि's picture

23 Oct 2009 - 9:33 am | अडाणि

म्हणजे बहुधा जनता जनार्दन हा मठ्ठ बनला आहे. निवडणूकीपुरते उदार बनलेले नेते, त्यांनी वाटलेले पैसे, आश्वासने अन्य खैराती ह्यांना जनता जनार्दन भुलला आहे.

हा साक्षात्कार निकाल लागल्या वरच झाला का तुम्हाला? म्हणजे तुमच्या आवडिचा पक्ष जिंकला नाही कि पैसे वाटले नाहितर जनता सुज्ञ आहे असेच ना?

चालायचच.. पण चिंता नसावी, सत्तेत नसले तरी कुठे काय खायचे हे सर्वांना माहिती आहे... बाकी तुमची बोंबाबोंब चालु द्या....

-
अफाट जगातील एक अडाणि.

हुप्प्या's picture

23 Oct 2009 - 10:08 am | हुप्प्या

>>हा साक्षात्कार निकाल लागल्या वरच झाला का तुम्हाला?
हा गैरसमज का झाला तुमचा? या निमित्ताने हा विषय उपस्थित झाला इतकेच.
भाजपविषयी मला काहीही ममत्व नाही. शिवसेनेविषयी होते ते त्यांच्या बालिश वैयक्तिक चिखलफेकीनंतर नष्ट झाले आहे. नाही म्हणायला राज ठाकरेचे बोलणे आणि वागणे असे आहे की अजून थोडी आशा वाटते आहे. आणि सत्तेत अजून तरी सहभागी नसल्यामुळे काही काम करेल असे वाटते.
तेव्हा "आमच्या आवडिचा पक्ष" असला काही प्रकार नाही. हे दुखणे आता कायमचे आहे. मूर्ख मतदार, ढोंगी आश्वासने, निवडणूकीआधी पैशांची खैरात आणि निवडून आल्यावर लूट. हा प्रकार अटळ आहे.

घराणेशाहीचा रोग सगळीकडे आहे. पण सुरवात काँग्रेसने केली आहे ह्याबद्दल वाद नसावा. जवाहरलाल नेहरु हा मोतीलालच्या वशिल्याने आला. आणि त्या नंतरची पिलावळही तशीच घरचा वशिला वापरुन आली. त्याच्या आधी आधुनिक भारतीय राजकारणात हा प्रकार नव्हता असे मला वाटते. (राजेरजवाडे, नवाब वगैरे सोडा). तसे नसल्यास सिद्ध करा.

चिरोटा's picture

23 Oct 2009 - 10:26 am | चिरोटा

जवाहरलाल नेहरु हा मोतीलालच्या वशिल्याने आला

पण पैसे मिळवण्यासाठी नाही.एकूण राजकिय कारकिर्दीपैकी नेहरु नऊ वर्षे तुरुंगात होते.१९१९ साली वकिलीतून मिळणारा पैसा सोडुन राजकारणात जावे अशी परिस्थिती नव्हती.
भेंडी
क्ष्^न + य्^न = झ्^न

हुप्प्या's picture

23 Oct 2009 - 9:26 pm | हुप्प्या

माझ्या हे लक्षातच आले नाही. नेहरुंनी तुरुंगात अमाप अपेष्टा सोसल्या. मला वाटते अंदमानला होते ना ते? का अजून कुठे पाठवले होते त्त्यांना काळ्या पाण्यावर? म्हणे ते कोलू ओढून तेल काढत असत. शिक्षा म्हणून दिवस दिवस उपाशी, साखळदंडाने बांधून उलटे टांगणे. अर्धे कच्चे अळ्यांनी भरलेले अन्न.
कितीतरी हाल सोसले ह्या थोर थोर नेत्याने नाही का?

आणि असे ऐकले आहे की हा नेता इतका साधा होता की तो आपले कपडे एका साध्याशा विमानाने पॅरिसला पाठवून एका अत्यंत सामान्य लाँड्रीतून धुवून आणत असे. कधी भारतातील सगळे लोक असे साधेपणाने रहायला शिकतील तो सुदिन!

दशानन's picture

24 Oct 2009 - 10:24 am | दशानन

शॉलिड्!

***
"हज़ारों ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले,
बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले । "

राज दरबार.....

अनामिका's picture

24 Oct 2009 - 10:49 am | अनामिका

झक्कास!
"अनामिका"
जो करी कर्म अहेतु,वेद तयास कळो न कळो रे।
ओळख पटली ज्यास स्वतःची,देव तयास मिळो न मिळो रे।

अडाणि's picture

27 Oct 2009 - 2:10 am | अडाणि

भारताच्या माजी पंतप्रधानांबद्दल लिहिताना जरातरी जबाबदारीने लिहावे...

कपडे एका साध्याशा विमानाने पॅरिसला पाठवून

हि आख्खायीका मोतीलाल नेहरूंबद्दल आहे , जवाहरलाल यांच्या बद्दल नाही. आणि ज्या काळात हे घडले आहे असे 'लोक' सांगतात त्या काळी भारत ते पॅरीस (किंवा युरोप) अशी विमान सेवा उपलब्धच नव्हती (नागरी किंवा खाजगी स्वरूपाची कुठलीच)...
आपल्या माहितीसाठी हा दुवा बघावा ...

-
अफाट जगातील एक अडाणि.

चिरोटा's picture

27 Oct 2009 - 10:21 am | चिरोटा

ह्या आख्याईका आहेत. शिवाय मोतीलाल/जवाहरलाल नेहरु श्रीमंत असतील तर त्यांच्याबद्दल द्वेष बाळगायचे काय कारण?
मला वाटते अंदमानला होते ना ते? का अजून कुठे पाठवले होते त्त्यांना काळ्या पाण्यावर?

अंदमानला नसले/काळ्या पाण्यावर नसले तरी ते एकूण नऊ वर्षे तुरुंगात होते ही वस्तुस्थिती का नाकारायची? नेहरुंना मोठेपणा दिला म्हणजे तुमच्या दैवतांना कमीपणा येतो असे आपणास का वाटते?
भेंडी
क्ष्^न + य्^न = झ्^न

सुनील's picture

27 Oct 2009 - 10:46 am | सुनील

सर्वच लोकशाही देशांत राजकीय कैदी आणि इतर कैदी यात फरक केला जातो. गांधी-नेहरू हे राजकीय कैदी होते. यांत टिळकदेखिल आले. म्हणूनच तर, मंडालेच्या तुरुंगातील सहा वर्षांत त्यांना अनेक संदर्भ ग्रंथ मागवता आले, अभ्यासता आले आणि गीतारहस्यसारखा ग्रंथ लिहिता आला.

आणिबाणीत इंदीरा गांधींनी तुरुंगात टाकलेले विविध पक्षांचे/संघटनांचे नेते, हेदेखिल राजकीय कैदीच होते.

तेव्हा असल्या अपुर्‍या माहितीवर आधारीत तुलनांना अर्थ नसतो.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

टारझन's picture

23 Oct 2009 - 5:30 pm | टारझन

हॅहॅहॅ ... जाऊ दे बे हुप्प्या ... आडाण्यांच्या बोंबाबोंबी कडे लक्ष नसतं द्यायचं ~~~

वोटींग मशीन मधे घोटाळा करणे सत्तेत असल्यावर शक्य असतं म्हणे :)
आणि म्हातार्‍या कोतार्‍या लोकांना वोटींग ला ओढून नेतात आणि कॉंग्रेसचं बटन स्वतःच दाबतात :) मदतीच्या नावाखाली ... असं आढळून आलं आहे !!

असो... बाईच्या पायी लोटांगण घेणार्‍यांना सद्बुद्धी लाभो

-आडाणिया
=========
बिमर भल्याभल्यांच्या *ट्या कपाळात घालवतो ... म्हणून पक्षपाती पंच त्याला हि&ही ठरवतात.

अडाणि's picture

23 Oct 2009 - 11:05 pm | अडाणि

सॉरी....

आता गुंड आणि बिल्डरांच्या पायी लोटांगण घालणार... राजसाहेब ..... आलोच.

कालच्या मुलाखतीतूनः
पत्रकारः आता १३ आमदार आलेत, ते अर्थकारणात आणि घोडेबाजारात भाग घेणार काय?
साहेबः कसे काय घेणार. मी बसलोय ना ईथे... (पैसे खायचे काम फक्त मिच करणार... ते पाटील साहेब नव्हते आले का मला भेटायाला...)

-
अफाट जगातील एक अडाणि.

चिरोटा's picture

27 Oct 2009 - 10:19 am | चिरोटा

..
भेंडी
क्ष्^न + य्^न = झ्^न

विजुभाऊ's picture

23 Oct 2009 - 9:36 am | विजुभाऊ

घराणेशाही ही फक्त काँग्रेसची मक्तेदारी आहे.
भाजप च्या लोकानी तसे केले की त्याबद्दल कोणीच बोलायचे नाही.
कारण ती घराणेशाही असते ती तत्वासाठी ( कोणत्या कोणजाणे?)
एन्रॉन समुद्रात बुडवायला निघालेले त्या एन्रॉनला धरूनच वर आले होते हा इतिहास जनतेने विसरावा ही प्रार्थना.
भाजप बद्दल बोलताना त्यांचा रीमोट पिता असणार्‍या संघाबद्दल काहीच बोलायचे नाही. कारण भाजप म्हणजे संघ नव्हे.
एक शंका : संघ भाजपच्या प्रमादावर कोणताच रीमोट कधीच का वापरत नाही?
या निवडणूकीत भाजप ने कोणता कळीचा मुद्दा लावून धरला होता ते कधीच कळाले नाही?
भाजपच्याच एक आमदार शोभाताई फडणवीस यानी तूरडाळीचे काय केले त्याचे पुढे काय झाले हे कधीच उजेडात आले नाही
या व्यतीरीक्त कृष्णा पाणी प्रश्न , लोड शेडिंग शेतकरी आत्महत्या , कसाब आनि दहशतवाद या सारखे अनेक मुद्दे हाती असताना भाजपने कोणताच मुद्दा का उस्थित का केला नाही ?
भाजप हा राष्ट्रीय पातळीवरचा पक्ष आहे म्हणताना तेथेही त्यांचे काही आस्तित्व दिसून येत नाही. ( आता जिन्ना प्रकरणानन्तर बहुतेक आंतर्राष्ट्रीय पातळीवर कार्य स्थिरावले आहे)
भाजप हा त्यांच्या धोरणहीनतेमुळे बुडत्या बोटीसारखा पक्ष बनला आहे.
शिवसेनेने त्यांच्यासोबत जाऊन स्वतःची तशीच अवस्था करून घेतली आहे.

पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

अमोल केळकर's picture

23 Oct 2009 - 9:43 am | अमोल केळकर

महत्वपुर्ण निकालात मनसेच्या केवळ पराभूत उमेदवाराचा उल्लेख केल्यामुळे लेखकाचा/ लेखिकेचा जाहीर निषेध. १३ पैकी एकाही विजयी उमेदवाराचा महत्वाच्या निकालात उल्लेख नसल्याने आश्चर्य वाटले. निदान माहिमच्या विजयाची दखल आवश्य घ्यायला पाहिजे होती. शक्य असल्यास बदल करावा
असो. आता मराठीचा आवा़ज विधानसभेत ( आणि रस्त्यावरही ) दुमदुमणार तर !!

जय महाराष्ट्र

--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

विष्णुसूत's picture

23 Oct 2009 - 11:50 am | विष्णुसूत

महाराष्ट्रात बदला ची हि नांदि आहे.

पुढे खालील मुख्य घटना अपेक्षित आहेतः
१. बाळासाहेबां "नंतर" लवकरच शिवसेने चे "अनौपचारीक" विसर्जन
२. विदर्भ राज्याची निर्मिती.
३. राज ठाकरे विरुध्द "इतर" अशी निवडणुक
४. महाराष्ट्राच्या नव निर्माणा ची सुरवात !

नि३'s picture

23 Oct 2009 - 3:18 pm | नि३

महत्वपुर्ण निकालात मनसेच्या केवळ पराभूत उमेदवाराचा उल्लेख केल्यामुळे लेखकाचा/ लेखिकेचा जाहीर निषेध. १३ पैकी एकाही विजयी उमेदवाराचा महत्वाच्या निकालात उल्लेख नसल्याने आश्चर्य वाटले. निदान माहिमच्या विजयाची दखल आवश्य घ्यायला पाहिजे होती. शक्य असल्यास बदल करावा

लेखकाला जे निकाल महत्वपुर्ण वाटले त्यांनी ते आधीच समाविष्ट केले आहे आणी त्यामागे मनसेच्या केवळ पराभूत उमेदवाराचा उल्लेख करण्याचा कोणताही हेतु नव्हता.

---नि३.