साला खरोखर आपल्या DNA मध्येच लोच्या आहे...यार

दशानन's picture
दशानन in काथ्याकूट
11 Oct 2009 - 3:18 pm
गाभा: 

३०० नक्षलवाद्यांचा जमावडा ..
चार बाजूने हल्ला..
मर्यादित शस्त्रसाठा...
४० जणांच दल..
अंधाधुंद गोळीबार...
सगळेच जखमी...
मदतीसाठी हाक...
पाच मिनिटावर असलेले हेलिकॉप्टर..
राजनेत्याच्या दिमाखतीमध्ये..
पाच तासाची तगमग...
दलातले १७ जण ठार....
चार हेलिकॉप्टर..
आहेत म्हणे सेवेसाठी..
सगळेच निकामी..
१७ जीव गेले ...
नेत्याची सभा पुर्ण झाली..

पोरगं पडलं बोरवेल मध्ये ..
मिडिया २४ तास जागी..
मिलेट्री लावली...
हेलिकॉप्टर ने मंत्री पोहचले..
१७ जीव गेले..
मिडिया ला बाईट ..
नाही मिळाली..
चार जाहिराती मध्ये..
थोडी जागा वाचली..

नेत्याची सभा..
राजनीती सर्वत्र...
प्रत्येक स्टार नेत्यासाठी...
हेलिकॉप्टर उभे खास..
तडपडून १७ जीव पडले..
मंत्री साहेब आले...
हेलिकॉप्टरने खास..
सलामी आखरी दिली..

जेव्हा देशाची सुरक्षा करण्या-या ह्या वीरांनाच आपण प्राथमिक सुविधा देऊ शकत नाही तेथे सामान्याची काय गत...

माझा मित्र म्हणतो मला
नेहमीच आपल्या DNA मध्येच लोच्या आहे... यार
साला आपण आपल्या लोकांसाठीच करत नाही..
राष्ट्रभक्ती नावाचा हिस्साच नाही आपल्यामध्ये..
नेत्याचे पाय चाटण्यासाठी लाखो खर्च..
एका १९४० मेड बंदुकीने लढण्या-या शिपाईसाठी..
पैसाच नाही.. बुलेट फ्रुफ सोड..
च्यामायला लाच फ्रुफ एक पण सिस्टम नाही !
कश्याला रहावे ह्या देशात..
जेथे आपल्या सैन्याचीच कदर नाही..
करोडोंचे पुतळे स्वतःचे उभे करतात..
पण पोलिसांसाठी थोडे चांगले...
हत्यार आपण मागवत नाही..
साला खरोखर आपल्या DNA मध्येच लोच्या आहे...यार
माणसाच्या जिवनापेक्षा ..
पशुच्याच जिवनाची काळजी जास्त आहे..
कुत्र्यासाठी उपोषण करणारे खुप आहेत आपल्या येथे
पण गेलेल्या जीवाचा जाब विचारणारी कोणीच नाही..
बेक्रिंग न्युज खुप आहेत...
तो दलिताच्या घरात जेवला
तो खुर्चीवरुन पडला..
ज्याच्या रक्ताचा सडा पडला..
मातीसाठी..
त्या मातीचा लाल रंग ह्या..
कॅमेरावाल्यांना कधी दिसलाच नाही...
साला खरोखर आपल्या DNA मध्येच लोच्या आहे...यार
कधी दिवाळीला फुटतात फटाके..
बझारामध्ये दिल्लीच्या..
तर कधी सिरियल ब्लॉस्ट..
कधी महानगरच वेठीस ठेवतात..
चार कुत्री अधेमध्ये..
लढण्यासाठी.. चार बंदुका..
दोन कवच व बाकी...
निधडी छाती उघडी वीरांची...
लाकडाच्या काठ्या....
मोजलेल्या चार गोळ्या.. ३०३ च्या
करोडोचा निवडूणुक खर्च सगळ्यांचा..
तो देशी तो परदेशी...
ताकत सगळी तिकडे...
सुतळी वरती...
साप सोडला कधीच वा-यावरती...
साला खरोखर आपल्या DNA मध्येच लोच्या आहे...यार
ज्यांना मारायला आला तो भडवा..
त्याचीच राखण करतात हे चोर..
चार गोळ्या त्याच्या कमी पडल्या..
चार मारु दिले असते नेते यार..
मग संपवला असता त्याला तेथेच पार..
मजा आली असती.. चार शहीद पुतळ्यांची भर..
चार माजोरड्या लांडग्यांची गिनती कमी..
फाशी देऊन पण झाली वर्ष अनेक..
चिकन बिर्याणी तोडतो आहे..
त्याचा यार...
साला खरोखर आपल्या DNA मध्येच लोच्या आहे...यार

प्रतिक्रिया

अवलिया's picture

11 Oct 2009 - 3:26 pm | अवलिया

उषःकाल होता होता काळरात्र झाली
अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली... !

--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

दशानन's picture

11 Oct 2009 - 3:32 pm | दशानन

बरोबर आहे हो....

पण सामान्य सैनिकाच्याच आयुष्याच्या मशाली का पेटवाव्यात ?
बेसिक खर्च करुन सेवा देता येऊ शकते ना त्यांना ?
मॅड्ड्मसाठी दोन-चार विमानं आपण उभी करु शकतो तर एक्-दोन असे कधी तरी झाले तर मदतीसाठी नाही ठेऊ शकत ?
अपोलो हॉस्पिटल आपले रुग्णवाहक हेलिकॉप्टर ठेऊ शकते सरकार नाही ठेऊ शकत असले चार-पाच कमीत कमी ???
दहा जणांचा नाही निदान एकाचा जरी जीव वाचला तर त्यांची किंमत भरुन निघेल ना राव...

काळरात्र काल पण होती व उद्या पण राहील...
कारण एकच...

साला खरोखर आपल्या DNA मध्येच लोच्या आहे...

लाच घेतल्या शिवाय काम नाही...
तहान लागल्या शिवाय विहिर नाही !

प्रसन्न केसकर's picture

11 Oct 2009 - 3:43 pm | प्रसन्न केसकर

बेसिक खर्च करुन सेवा देता येऊ शकते ना त्यांना ?

येते ना? अन खर्च केलाच जात नाही का? कोणत्याही वर्षाचे बजेट काढुन बघा बरं जरा होम डिपार्टमेंटला किती अ‍ॅलोकेशन असते ते अन प्रत्यक्षात किती रकमा खर्ची पडतात ते. शिवाय केंद्र अन राज्यांचे पोलिस दलाच्या आधुनिकीकरणाकरता खास अर्थसहाय्य देऊन कार्यक्रम आहेतच की? मग हा पैसा जातो तरी कुठे?

दशानन's picture

11 Oct 2009 - 3:47 pm | दशानन

हाच तर कळीचा मुद्दा आहे, पैसा जातो कुठे...

अहो जेथे वीरांचे पार्थीव शरिर घरातल्यांना मिळण्यासाठी ४० - ४० तास लागतात तेथे.. छे काय बोलावं... शिव्या पण कमी पडतात ह्या भडव्यांसाठी.

हे वाचा आताच वाचले मी

सखाराम_गटणे™'s picture

11 Oct 2009 - 4:21 pm | सखाराम_गटणे™

हे माझे गाव आहे. लोकांच्या भावना तिव्र आहेत.

दशानन's picture

11 Oct 2009 - 4:41 pm | दशानन

हा हा हा !

एकदम हसु आलं !

भावना तीव्र आहेत.... हसतो आहे ह्याचे वाईट नका वाटून घेऊ..

जेव्हा ताजा घाव असतो ना तेव्हा वेदना पण तीव्र असतात...
दिवाळी जवळ आली की जीव घाबरतो..
किती जणांचे संसार रस्तावर येणार...
ह्या भितीने नाही..
किती जीव जाणार..
ह्या काळजीमुळे सुध्दा नाही..

कुठे तरी मार्केटमध्ये...
विस्फोट होईल..
कळत नकळत मी पण तेथे असेन..
कुठे हात.. कुठे पाय..
शरीराचे असंख्य तुकडे..
गोळा होतील का नाही ?
शव नाही राख तरी घरी पोहचेल...
ह्या काळजीने घाबरतो जीव ..

वेदना तीव्र आहेत...
पण त्याचे प्रतिबिंब..
सरकारी...मालमत्तेवर..
कुठे बस... कुठे रेल्वे..

पण जेव्हा मत देता तेव्हा..
कुठे जातात वेदना..
दोन ठेंब दारुचे...
चार नोटा गांधीच्या..
बस.. दावादारु..
दोन्ही हातात..

वीराची वेदना..
त्याच्या चार भींती..
मध्ये अर्धांगणीच्या..
पुसलेल्या कुंकु मध्ये..
पोराच्या डोळ्यातील..
सुकलेल्या आश्रुमध्ये..

खरोखर वेदना तीव्र आहेत..
पाठ फिरवून वेदना
लपवण्याची..
सवय आहे..

चार तुकड्यासाठी..
राबराब राबताना..
कुठली वेदना..
कुठले शल्य..

दिसली शहिद ज्योत..
सलाम मारला..
डोळ्याचे पाणी..
आटलेलेच.. आता
रक्त पण सुकलेलेच..

लवंगी's picture

11 Oct 2009 - 10:48 pm | लवंगी

:(

प्रभो's picture

11 Oct 2009 - 3:58 pm | प्रभो

या सगळ्याच मुळ :<च्यामायला लाच फ्रुफ एक पण सिस्टम नाही !>

काल परवाच एका रिपोर्ट मधे वाचलं की, शांत(????) महाराष्ट्रात ५२ पोलीस नक्षलवाद्यांच्या हल्यात शहीद झालेत आणी हा आकडा जम्मू-काश्मीर पेक्षा जास्त आहे....

--प्रभो

प्रसन्न केसकर's picture

11 Oct 2009 - 3:30 pm | प्रसन्न केसकर

पण लोच्या आपल्या डी एन ए मधे आहे? ही परिस्थिती पाहुन बहुतेक सगळे सामान्य लोक विद्ध होतील. पण ते करु तरी काय शकतात. मला वाटतं लोचा आहे तो सगळ्याच व्यवस्थेत. काही तळागाळातले नोकर जीवानिशी जातात, लोक हळहळतात पण त्याचं कुणाला घेणं देणं असतं. वरिष्ठ नोकरशहा अन राजकारणी दोघंही सारखीच. खरं आहे पोलिस दल अपुर्‍या साधनक्षमतेनं, मनुष्यबळानं लढतंय पण ते लढणारे सगळे कनिष्ठ अधिकारी कर्मचारी आहेत. वरिष्ठ अधिकार्‍यांचं काय? ते का नाही आवाज उठवत. आय पी एस, आय ए एस अधिकार्‍यांच्या संघटना काय करताहेत? त्यांचं अन राजकारण्यांचं साटंलोटं असावं असं वाटण्यासारखी परिस्थिती आहे. अन जर हे सगळे एकत्र येत असतील तर लोक तरी काय करणार?

श्रावण मोडक's picture

11 Oct 2009 - 4:33 pm | श्रावण मोडक

रचना छान, प्रतिसादही पुरेसा बोलका!!!

स्वाती२'s picture

11 Oct 2009 - 5:19 pm | स्वाती२

मला खरे तर ब्रिटिश राज स्टाईल व्यवस्था आपण आजही का वापरतो तेच कळत नाही. राजकारण्याच्या मर्जी नुसार होणार्‍या नेमणूका, बदल्या, प्रमोशन वगैरे गोष्टी पाहाता वारिष्ठ अधिकार्‍यांना साटेलोटे करण्यावाचून दुसरा पर्यायच राहात नाही. जे या सिस्टीमशी तडजोड करायला नकार त्यांचे काय होते ते सर्वांनाच माहित आहे.

प्रसन्न केसकर's picture

11 Oct 2009 - 5:46 pm | प्रसन्न केसकर

व्यवस्था खरंतर वाईट नाही. मला स्वतःला वाटते कदाचित भारतातली व्यवस्था अत्यंत प्रगल्भ आहे पण तिचा दुरुपयोग काही सामर्थ्यवान व्यक्ती एकत्र येऊन करतात अन त्यामुळे ती निष्क्रिय होते. कुठलीही व्यवस्था आणली तरी हा धोका रहाणारच आहे. जे या सिस्टीमशी तडजोड करायला नकार त्यांचे काय होते ते सर्वांनाच माहित आहे असे आपण म्हणतो पण खर्‍या अर्थाने तडजोड करायला नकार देणारे सक्षम असे लोक नोकरशाहीत किती आहेत हो? मुळात ही सिस्टीम एव्हढी सडण्याचं कारणच हे आहे की भ्रष्टाचार वरुन खालपर्यंत झिरपला आहे. खालुन वर जाणारा भ्रष्टाचार (आर्थिक किंवा नैतिक) उच्चपदावरचा एखादा माणुस थांबवु शकतो पण वरुन खाली येणारा भ्रष्टाचार थांबवणे खूपच अवघड असते.

प्रकाश घाटपांडे's picture

12 Oct 2009 - 10:55 am | प्रकाश घाटपांडे

खालुन वर जाणारा भ्रष्टाचार (आर्थिक किंवा नैतिक) उच्चपदावरचा एखादा माणुस थांबवु शकतो पण वरुन खाली येणारा भ्रष्टाचार थांबवणे खूपच अवघड असते.

पुनेरी यांच्याशी सहमत आहे. कार्नेज बाय एन्जल्स (मराठी अनुवाद डी एस विद्यासागर: असत्यमेव जयते) ही स्वेच्छानिवृत्त(?)आयपीएस अधिकारी वाय पी सिंग यांची कादंबरी अंतर्मुख करते.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

मनीषा's picture

11 Oct 2009 - 4:20 pm | मनीषा

भयाकारी वास्तवाचे नेमके चित्रण ...
सुंदर !

यशोधरा's picture

11 Oct 2009 - 4:28 pm | यशोधरा

:( ...

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

11 Oct 2009 - 5:22 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

राजे, आपली तगमग सहीच आहे. नक्षलवाद्यांविरुद्ध लढणार्‍या पोलिसांना मदत मिळाली असती तर पोलिसांचे जीव वाचले असते. पण पाचेक मिनिटात हेलिकॉप्टर पोहचेल, या अपेक्षेने प्राणाची बाजी लावणार्‍या पोलिसांना कितीही सॅल्यूट मारले तरी कमीच.. व्यवस्थेची कातडी अधिक निब्बर आणि आपल्या संवेदना बधीर होत आहेत इतकेच....

-दिलीप बिरुटे

स्वाती२'s picture

11 Oct 2009 - 5:33 pm | स्वाती२

काय बोलू राजे? आता दिवसभर डोक्याला भुंगा. सतत तुलना इथे आणि तिथे. सगळा वांझोटा संताप. :(

संजय अभ्यंकर's picture

12 Oct 2009 - 12:14 am | संजय अभ्यंकर

संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/

संजय अभ्यंकर's picture

12 Oct 2009 - 12:16 am | संजय अभ्यंकर

संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/

सहज's picture

12 Oct 2009 - 5:53 am | सहज

स्वातीतैंशी सहमत. :-(

विनायक प्रभू's picture

11 Oct 2009 - 5:58 pm | विनायक प्रभू

राजे

अविनाशकुलकर्णी's picture

11 Oct 2009 - 6:04 pm | अविनाशकुलकर्णी

अस वाचल्यावर सुन्न होत यार...आणि दु:ख्ख याच तर जादा होते कि हे असे कधिच बदलणार नाहि...असेच चालु रहाणार

प्रशांत उदय मनोहर's picture

11 Oct 2009 - 6:17 pm | प्रशांत उदय मनोहर

कविता मस्त जमली आहे.
प्रतिक्रियेदाखल मला फक्त आणि फक्त मंगेश पाडगांवकरांची 'सलाम' कविता आठवतेय.
आपला,
(अंतर्मुख) प्रशांत
---------
फळाची अपेक्षा ठेवू नये...ते विकत घ्यावे किंवा घरात उगवावे.
:?
माझा ब्लॉग - लेखणीतली शाई

चिरोटा's picture

11 Oct 2009 - 8:04 pm | चिरोटा

मला स्वतःला वाटते कदाचित भारतातली व्यवस्था अत्यंत प्रगल्भ आहे पण तिचा दुरुपयोग काही सामर्थ्यवान व्यक्ती एकत्र येऊन करतात अन त्यामुळे ती निष्क्रिय होते.

सहमत. माझा कायद्याचा/नोकरशाहीचा अभ्यास नाही पण असे म्हणतात की संबंधीत अधिकारी नियमाने वागत असतील तर पंतप्रधानही एक पैसा खावू शकत नाही.कर्नाटक हाय कोर्टात काम करणार्‍या एका वकिलाने मला सांगितले की नविन जज्ज आला की वकिलांचे वेगवेगळे ग्रूप्स त्याला भेटतात आणि हवा तो निकाल द्यायचे रेट्स ठरवतात. भारतातल्या सगळ्या हाय कोर्ट्स मध्ये हे चालते.
तेव्हा ||राजे|| म्हणतात तसे DNA मध्येच लोचा आहे.
भेंडी
क्ष्^न + य्^न = झ्^न

सखाराम_गटणे™'s picture

11 Oct 2009 - 9:47 pm | सखाराम_गटणे™

DNA मध्ये लोचा नसुन लाचारी आणि चाटुगिरी आणि कंपुबाजीची सवय लागली आहे.
सगळे 'कागज के शेर' आहेत.
so disgusting and cheap Indian metality.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

11 Oct 2009 - 9:59 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

सुन्न झाले ही बातमी वाचून ... या नेत्यांविरूद्ध किंवा निर्णय घेणार्‍या नोकरशहाविरुद्ध न्यायालयात खटला उभा करता येईल का?

अदिती

अडाणि's picture

12 Oct 2009 - 1:36 am | अडाणि

सुन्न करणारी अशीच बातमी आहे.
पाच मिनिटावर असलेले हेलिकॉप्टर..
राजनेत्याच्या दिमाखतीमध्ये..

ह्या साठी काही संदर्भ आहे का? वर्तमानपत्रा तील बातमी वरून तरी मला असे कोठे आढळले नाही. ज्वलंत प्रश्नावरून चुकीची माहिती पसरवू नये असे वाटते.

-
अफाट जगातील एक अडाणि.

सुहास's picture

12 Oct 2009 - 8:03 am | सुहास

http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=146...

वर्तमानपत्रातील बातम्या १००% खर्‍या कधीच नसतात, कुठेतरी काहीतरी लपवले जातेच.. पण ही बातमी तुम्हाला सत्याच्या जवळ नेईल असे वाटते म्हणून हा धागा.. गडचिरोलीतील हेलिकॉप्टर नक्षलवाद्यांच्या विरोधात वापरण्यासाठी तेथे आहे.. ते जर तेथे नव्हते तर खोटे का सांगण्यात आले याचा विचार करण्यासारखे आहे..

पाच मिनिटावर असलेले हेलिकॉप्टर..
राजनेत्याच्या दिमाखतीमध्ये..
हे मात्र यातून सिध्द होत नसले तरीही या नेत्यांना कशाला लागतात हो हेलिकॉप्टर..?

--सुहास

प्रसन्न केसकर's picture

12 Oct 2009 - 3:47 pm | प्रसन्न केसकर

चुकीची नसावी. अगदी पाच मिनिटे अंतर नाही पण त्या दिवशी विदर्भात प्रचारसभासाठी बरेच नेते गेले होते हेलीकॉप्टरनं. तरीपण आचारसंहितेच्या काळात राजकीय कारणांसाठी सरकारी यंत्रणा वापरता येत नाही याचा विचार केला तर सरकारी हेलीकॉप्टरं कुठं होती हा प्रश्न रहातोच.

अडाणि's picture

12 Oct 2009 - 9:56 pm | अडाणि

प्रचारासाठी जे हेलीकॉप्टरं वापरली जातायेत ती खाजगी असतात, सरकारी नव्हे.. बातम्या नीट वाचल्या तर दिसून येइल - घटनेच्या २ दिवस आधी अत्राम यांचे हेलीकॉप्टरं ५ मिनीटाच्या जागेवर उतरवले होते - असे सांगीतले आहे. त्या दिवशी ५ मिनीटाच्या अंतरावर होते असे नाही.

ह्या घटनेत (सकॄतदर्शनी) दोष पोलीस अधीकार्‍यांचा दिसतो आहे. जिथे दोष आहे तिथे बोल लावावा, उगाच राजकारण्यांच्या मागे बोंबलण्यात काय अर्थ आहे?

-
अफाट जगातील एक अडाणि.

वैशाली हसमनीस's picture

12 Oct 2009 - 6:47 am | वैशाली हसमनीस

आपले म्हणणे अगदी १०० टक्के सत्य आहे.आपली शासन व्यवस्थाच भयंकर भ्रष्ट आहे.गेल्या नोव्हेंबरमधील स्फोटाचा अजून निकाल लागत नाही.त्या कसाबचे अजून किती लाड करायचे ?आमचे सामान्य नागरिक निष्कारण बळी पडले त्याचे कोणाला काहीच वाटत नाही?शहीद पोलिसांची कोणालाच आठवण येत नाही? आपण सारे षंढ झालो आहोत हेच खरे !

सुहास's picture

12 Oct 2009 - 7:52 am | सुहास

नुकतीच ही एक बातमी ibnlive.com वर वाचली..

http://ibnlive.in.com/news/naxals-great-threat-but-they-arent-terrorists...

मनमोहन सिंग म्हणतात की "नक्षलवादी (देशाला) मोठा धोका असले तरी दहशतवादी नाहीत. आम्ही त्यांच्या विरूध्द सैन्य वापरण्याच्या बाजूने नाही. नक्षलवाद्यांना बाहेरील शक्तींचे पाठबळ आहे असे आम्हाला वाटत नाही."

तर राहुल गांधींनी तर सगळी जबाबदारी राज्य सरकारांवर ढकललीय..

http://www.thaindian.com/newsportal/india-news/governments-not-reaching-...

याचा अर्थ सरकारला नक्षलवाद्यांविरूध्द काही करायची इच्छा नाही असे नाही, पण ममताबाईनी पाठींबा काढून घेतला तर? सत्ता गेली तर काय? चला तर मग, फुटबॉल खेळू.. नॉनइश्यू ला इश्यू करू, म्हणजे मूळ इश्यू विसरला जाईल.. मग पुन्हा कधीतरी हा इश्यू येईलच त्यावेळी जो असेल तो बघेल.. सगळेच दरवडेखोर आहेत स्साले..

राजे, खरंच dna मध्ये लोचा आहे..

--सुहास

सुधीर काळे's picture

12 Oct 2009 - 12:21 pm | सुधीर काळे

मी इतरत्र केलेल्या विपुल लिखाणात मी असे नेहमीच लिहितो कीं भारतीय लोकांत आणि (त्यापेक्षाही जास्त) मराठी लोकात genetic defects आहेत, प्रचंड प्रमाणात आहेत. या विषयावर मी एक सुंदर पुस्तक वाचले आहे आणि माझ्या मते प्रत्येक भारतीयाने ते एकदा पूर्ण वाचले पाहिजे व त्यानंतर कांहीं लोक जसे "गुरुचरित्रा"तील एकादा अध्याय वाचतात तसे वाचले पाहिजे.
त्या पुस्तकाचे लेखक आहेत श्री. पवन कुमार वर्मा (आपले एके काळचे सायप्रस येथील राजदूत) व पुस्तकाचे नाव आहे "Being Indian".
सुधीर
------------------------
देवा, ज्या गोष्टी मी बदलू शकतो त्या बदलायची व ज्या गोष्टी मी बदलू शकत नाही त्या स्वीकारण्याची शक्ती व या दोन्हीतला फरक समजण्याइतकी विवेकबुद्धी मला दे!

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

12 Oct 2009 - 2:50 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

राजेला अपेक्षित असलेला DNA मधला लोचा वेगळा असावा. पण जेनेटीक डिफेक्टसाठी गुगलकडे चौकशी केली तर हे मिळालं.

अदिती

धन्यवाद, अदिती! मला या विषयाचे कांहींच ज्ञान नाहीं (पण कुतुहल मात्र खूप आहे व वाचायला गेल्यास सगळं डोक्यावरून जातं!) त्यामुळे चूक झाली असे वाटते.
पण लांच खाणे, फितुरी करणे, धंद्यात न पडता नोकरी (तीही सनदी) करणे, आपल्या हितांकडे दुर्लक्ष करणे, आपल्या लोकांच्या हिताकडे दुर्लक्ष करून व त्यांच्या हिताविरुद्ध करणी करून परक्याची धन करणे असले जे "गुण" आपल्यात पिढिजात आलेले आहेत त्यांना मी चुकून "genetic defects' म्हणत होतो असे दिसते. ते चूक असेल तर अशा वडिलोपार्जित दोषांना तांत्रिक भाषेत काय म्हणतात?
सुधीर
------------------------
आज एक नवे व्यंगचित्र खरडफळ्यावर चढवले आहे. ज्याना आवड असेल त्यांनी पहावे!
देवा, ज्या गोष्टी मी बदलू शकतो त्या बदलायची व ज्या गोष्टी मी बदलू शकत नाही त्या स्वीकारण्याची शक्ती व या दोन्हीतला फरक समजण्याइतकी विवेकबुद्धी मला दे!

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

13 Oct 2009 - 9:04 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

मला नक्की माहित नाही, पण nature (गुणसूत्र) आणि nurture यांमधे फरक जरूर असावा. बाकी उपरोल्लेखित "गुण" समान परिस्थितीत वाढलेल्या सगळ्याच थोड्याफार फरकाने मलातरी दिसले आहेत.

अदिती

sneharani's picture

12 Oct 2009 - 1:18 pm | sneharani

प्रतिसादही पुरेसा बोलका!!!
खरचं नेत्यामधील साटंलोटं अन् स्वार्थ यासारख्या अनेक गोष्टी सगळी गणितच बिघडवुन टाकतात.

झकासराव's picture

12 Oct 2009 - 3:08 pm | झकासराव

राजे :(
निशब्द....
माझा एक मित्र म्हणायचा आपली पिढी जर इन्ग्रज सरकारच्या काळात असती तर आपण अजुन गुलामीतच राहिलो असतो. आपल्याला सवय लागते सगळ्या गोष्टींची. :(

सूहास's picture

12 Oct 2009 - 7:24 pm | सूहास (not verified)

अवघड आहे...अरे अवघड म्हणालो का..खर तर अवजड म्हणायचे होते ..असो...

राजे..देह गुलाम सवयींचा ...पण बातम्या बाबत..रिड बिटविन द लाईन्स...

मॅटर खतम
१७६० लेख , ६१६२ वाचने , ० प्रतिसाद..

सू हा स...

स्वप्निल..'s picture

13 Oct 2009 - 1:17 am | स्वप्निल..

:(

स्वप्निल

सुधीर काळे's picture

13 Oct 2009 - 8:04 am | सुधीर काळे

सुहाससूहास असे दोन वेगळे-वेगळे सभासद आहेत काय?
------------------------
देवा, ज्या गोष्टी मी बदलू शकतो त्या बदलायची व ज्या गोष्टी मी बदलू शकत नाही त्या स्वीकारण्याची शक्ती व या दोन्हीतला फरक समजण्याइतकी विवेकबुद्धी मला दे!

दशानन's picture

14 Oct 2009 - 7:23 pm | दशानन

सर्व प्रतिसाद देणा-या मित्रांचे / मैत्रीणींचे / शत्रुचें / दुरुन मित्र असलेल्यांचे / दुरुन शत्रु असलेल्यांचे / ज्यांनी वाचले पण प्रतिसाद नाही दिला त्यांचे / ज्यांनी वाचले नाही पण प्रतिसाद दिला त्यांचे / ज्यांनी वाचलेच नाही त्यांचे ही अनेकानेक आभार.

***
"हज़ारों ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले,
बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले । "

राज दरबार.....