व्हाईट चिकन चिली

Primary tabs

स्वाती२'s picture
स्वाती२ in पाककृती
8 Oct 2009 - 6:53 pm

इथे फॉल सुरू झालाय. तेव्हा थंड पावसाळी हवेत गरम गरम खाण्यासाठी-
व्हाईट चिकन चिली आणि कॉर्न ब्रेड

कॉर्न ब्रेड
साहित्य
१ कप मैदा
१ कप कॉर्नमिल
३ टे स्पून साखर
१ १/२ टी स्पून बेकिंग पावडर
१/२ टी स्पून मीठ
१ कप दूध
१/४ कप तेल
१ अंडे, फेटून
१/२ ढब्बू मिरची बारीक चिरून आवडत असल्यास (मी लाल ढब्बू मिरची वापरते)

कृती

ओवन ४००F तापत ठेवावा. ९इंच वाल्या चौकोनी बेकिंग पॅनला आतून तेलाचा हात लावून घ्यावा. एका मोठ्या वाडग्यात मैदा, कॉर्नमिल, बेकिंग पावडर,साखर, मीठ एकत्र करावे. एका लहान वाडग्यात दूध, तेल, अंडे जरा फेटुन एकत्र करून घ्यावे आणि पिठाच्या मिश्रणात ओतावे. ढब्बू मिरचीचे तुकडे घालावेत. काट्याने नीट ढवळून एकत्र करावे. जास्त ढवळायचे नाही. तेल लावलेल्या पॅनमधे मिश्रण नीट पसरवून २०-२५ मिनिटे बेक करावे. बाहेर काढून चौकोनी तुकडे करावे.
ब्रेड तयार होईपर्यंत एकीकडे चिली तयार करावी.

चिली
साहित्य
२ बोनलेस चिकन ब्रेस्ट
१/४ टी स्पून मीठ
१/२ टी स्पून मिरपूड
२ टे. स्पून मैदा
१ टी. स्पून तेल

२ कॅन व्हाईट बिन्स (great northen/ cannellini)
१ टे. स्पून जिरा पावडर
१ /२ टी स्पून मिरपूड
१/२ टी स्पून ओरॅगॅनो
२ टे.स्पून लसूण पेस्ट
१ कांदा बारिक चिरून
२-३ सेलरीचे दांडे बारिक चिरून
हालपिनो पेपरच्या चकत्या आवडत असल्यास
२ (१४.५ औस) कॅन लो सोडियम चिकन ब्रॉथ
1 टे. स्पून तेल
चवी प्रमाणे मीठ
हॉट सॉस(मी फ्रँक चे वापरते), किसलेले चिज, सॉवर क्रिम

कृती:
चिकनला मीठ आणि मिरेपूड लावावी. एका फ्राईंग पॅन मधे मध्यम आचेवर १ टी स्पून तेल गरम करावे. चिकन मैद्यात घोळून तेलात शॅलोफ्राय करावे. शिजले की बाजूला काढून ठेवावे.
आता मोठ्या भांड्यात मध्यम आचेवर १ टे. स्पून तेल तापत ठेवावे. तेल तापले की त्यात चिरलेला कांदा घालून परतावे. कांदा मऊ झाला की सेलरी, लसूण पेस्ट, जिरा पावडर, मिरेपूड, ओरॅगॅनो, आवडत असल्यास हलपिनो पेपर घालून १-२ मिनिटे परतावे. चिकन ब्रॉथ आणि बिन्स घालावे. नीट ढवळून उकळत ठेवावे. शिजलेल्या चिकनचे छोटे तुकडे करावे आणि बिन्सच्या मिश्रणात घालावे. चवी प्रमाणे मीठ घालवे.फार दाट वाटल्यास थोडे पाणी किंवा चिकन स्टॉक घालावा. एक उकळी आली की आचेवरून उतरवावे. खायला देताना वरून आवडी प्रमाणे हॉट सॉस, चिज, सॉवर क्रिम घालावे.व्हाईट चिकन चिली बरोबर कॉर्न ब्रेड पोटभरीचे जेवण होते. कॉर्न ब्रेड ऐवजी टॉर्टिया चिप्स पण छान लागतात. बिन्स आणि चिकनचे प्रमाण आवडीप्रमाणे कमी जास्त करावे.

कॉर्न ब्रेड : फूडनेटवर्क वरून
चिली : इंटरनेट आणि पुस्तक

प्रतिक्रिया

गणपा's picture

8 Oct 2009 - 7:50 pm | गणपा

स्वाती तै, ब्रेड चा फटु कुठे :? ब्रेड आज पर्यंत विकतचाच खल्लाय. करुन पहायला हवा.
चिली प्रकरण सुप चा प्रकार आहे का?

प्रभो's picture

8 Oct 2009 - 7:54 pm | प्रभो

मस्त आहे..

मलापण समजलं नाय...की ग्रेव्ही/सुप सारखं का दिसतय ते....साधारण चिली प्रकार म्हणजे ड्राय असतात असा आमचा समज.....स्वाती तै, खुलासा करा..वेळ मिळेल तेंव्हा

--प्रभो

स्वाती२'s picture

8 Oct 2009 - 8:18 pm | स्वाती२

ब्रेडचा चट्टामट्टा झाला. एक बोलभर चिली उरली त्याचा फोटू. हा ब्रेड नेहमीच्या ब्रेडपेक्षा डेन्स आणि ड्राय होतो. अस्सल कॉर्न ब्रेड खावा तर आफ्रिकन अमेरिकन आजीच्या हातचा, कास्ट आर्यन स्किलेट मधला. माझा बापडा लो फॅट. आणि हो चिली हा सूप सारखाच पण जरा दाट प्रकार असतो. बिन्स आणि बीफ घालून करतात. रेड मीट न खाणार्‍यांसाठी टर्की, चिकन वगैरे पर्याय.

अवलिया's picture

8 Oct 2009 - 11:11 pm | अवलिया

मस्त :)

--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

लवंगी's picture

9 Oct 2009 - 3:34 am | लवंगी

खरच मस्त.. कुडकुडणार्‍या थंडीत गरमा-गरम मस्त लागेल

सहज's picture

9 Oct 2009 - 7:22 am | सहज

छान आहे. असे सुप/स्टु व (असे वेगवेगळे) ब्रेड एक आवडता जेवणप्रकार आहे.

विंजिनेर's picture

9 Oct 2009 - 7:33 am | विंजिनेर

व्वा..
चिली-ब्रेड एकदम पोटभर होतो....

ह्याच्यात चिमुटभर थाईम(हिंदी: वन-अजवाईन) घातले तर अजून बहार येईल...