नव्या फ्लूची लागण

मोहन's picture
मोहन in काथ्याकूट
24 Sep 2009 - 2:01 pm
गाभा: 

मिपाकरांनो सावधान.
वराह तापापेक्षाही भयंकर अशा नव्या ज्वराचे आगमन मिपावर झाल्याचे दिसून आले आहे. ह्या ज्वराची लागण झालेले रूग्ण भयकथा, भूतकथा प्रसवू लागले आहेत. अत्यंत निरागस मथळ्याच्या लेखात "भयानक" कथा दडलेली आढळते. सामान्य मिपाकर कुतूहलाने अशा मथळ्यांच्या कथांवर लेखकांवरच्या विश्वासाने "क्लिकतात" आणि हां हां म्हणता कथेतली भूते त्यांच्या मनाचा ताबा घेतात व सामान्य वाचक असामान्यत्वाला पोहोचून स्वत:च भयकथा प्रसवू लागतो.

अशा रितीने ही साथ झपाट्याने पसरत आहे. ह्या ज्वरावर अजून पर्यंत तरी लस किंवा औषध निघालेले नाही. मिपा मालकांनाच लागण झाल्याने मिपा प्रशासन सैरभैर झाले आहे. ज. डायर, सरपंच ई. मंडळी मालकांच्याच उपचारात व्यग्र असल्याने ही साथ आटोक्यात कशी येईल याचीच चिंता समस्त मिपाकरांना लागली आहे. :S

भूत ज्वर टाळण्या करता घेतायेण्याजोगी खबरदारी

१. कोणताही नवा लेख वाचतांना शेवटून वाचा. शेवटच्या काही ओळीत संशयीत शब्द/ वाक्य आढळ्ल्यास ताबतोब गमन करा. एक तास जालिंदर चालीसाची पारायणे करा.

२. लेखाचे प्रतीसाद आधी वाचा. " उत्तम भयकथा", " कारे *** चावला का?" इ. प्र्तीसाद आढळल्यास पुढे क्र. १ प्र्माणे.

३. बालक व वृद्धांच्या लेखना बद्दल जास्त सावधानता बाळगा. ( बौद्धीक वय. शारिरीक वयाशी सुतराम संबंध नाही ) . भूत ज्वराची लागण या गटात जास्त झाल्याचे पुरावे आहेत.

४. स्त्री लेखीकांना भुत्/भय/ पिशाच्य वचकून असल्याने ह्या वर्गाला बाधा झाल्याचे अजुन तरी निदर्शनास आले नाही. तरी आपआपल्या जबाबदारी वर ह्या वर्गाचे लेख वाचावेत.

५. आपल्याला लागण झाल्याचा संशय आल्यास ताबडतोब श्री.श्री. जालींदर जलालाबादींना हीमालयात त्यांच्या निवास स्थानी शरण जा. तेच शेवटी या समस्येचे निराकरण करतील.

आपल्याला काही आणखी उपाय सूचल्यास समाज प्रबोधन करावे.

आपला

(बातमीदार ) मोहन

प्रतिक्रिया

अमोल केळकर's picture

24 Sep 2009 - 2:05 pm | अमोल केळकर

मजेशीर लेखन आवडले
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

सुनील's picture

24 Sep 2009 - 3:47 pm | सुनील

ह्या नव्या ज्वराची लागण झालेल्या एका संशयिताने मलादेखिल हा ज्वर देण्याचा आडून्-आडून प्रयत्न केला होता. परंतु आमची कातडी (जन्मजात) गेंड्याची असल्याकारणाने आम्हास त्याची बाधा झाली नाही. परंतु, ती केव्हाही होऊ शकते, हे मात्र खरे! ;)

(संशयित रुग्ण) सुनील

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

सहज's picture

24 Sep 2009 - 5:07 pm | सहज
अवलिया's picture

24 Sep 2009 - 5:09 pm | अवलिया

तो संशयित ब-याच जणांना वेगवेगळ्या रोगांची लागण लावत असतो असा संशय आहे.

--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

अवलिया's picture

24 Sep 2009 - 5:10 pm | अवलिया

तो संशयित ब-याच जणांना वेगवेगळ्या रोगांची लागण लावत असतो असा संशय आहे.

--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

24 Sep 2009 - 5:29 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

=)) =)) =))

>> अत्यंत निरागस मथळ्याच्या लेखात "भयानक" कथा दडलेली आढळते. <<
यातला अवतरणचिह्नातला शब्द हृदयाला भिडला.

तारसप्तकातली अदिती
*** औंध-खडकीमधून अजून एखादी पीएच.डी. विकत घेण्याच्या तयारीत ***