"हरिश्चंद्राची फॅक्टरी"

मुक्तसुनीत's picture
मुक्तसुनीत in काथ्याकूट
20 Sep 2009 - 9:22 pm
गाभा: 

आताच वाचलेल्या बातमीनुसार , यंदाच्या ऑस्कर पारितोषिकांकरता , भारतातर्फे पाठवायचा चित्रपट म्हणून "हरिश्चंद्राची फॅक्टरी" या मराठी चित्रपटाची निवड करण्यात आलेली आहे. या चित्रपटाचे लेखक-दिग्दर्शक श्री. परेश मोकाशी यांचे आणि या चित्रपटाशी संबंधित सर्वांचे अभिनंदन आणि हार्दिक शुभेच्छा !

बातमीचा दुवा : http://timesofindia.indiatimes.com/news/india/Harishchandrachi-Factory-I...

प्रतिक्रिया

निमीत्त मात्र's picture

20 Sep 2009 - 9:42 pm | निमीत्त मात्र

हरिशचंद्राच्या फ्याक्टरीला शुभेच्छा! बातमी वाचताना हा उल्लेख वाचला.. आणि ह्या सिनेमाला किती कठीण स्पर्धेला सामोरे जावे लागले असेल ह्याची कल्पना आली. :)

"Harischandrachi Factory" beat off competition from 15 films including Bollywood movies like "New York" and "Delhi 6" to get selected for the honour.

सुनील's picture

21 Sep 2009 - 6:04 am | सुनील

चित्रपट अद्याप पाहिलेला नाही. पहावा असे म्हणतो. बाकी चित्रपटाला शुभेच्छा!

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

चित्रा's picture

21 Sep 2009 - 7:11 am | चित्रा

चित्रपट बघितला पाहिजे.
ऑस्करसाठी शुभेच्छा.

मदनबाण's picture

21 Sep 2009 - 7:20 am | मदनबाण

ऑस्करसाठी शुभेच्छा... :)

मदनबाण.....

तुम्ही किती जगलात ह्यापेक्षा कसं जगलात याला जास्त महत्त्व आहे.

काय होणार ?
http://www.timesnow.tv/videoshow/4327745.cms

Nile's picture

21 Sep 2009 - 7:53 am | Nile

माझ्याही शुभेच्छा! यानिमित्ताने मुक्तसुनितरावांनी चित्रपटाची समिक्षा लिहावी हि विनंती. :)

विशाल कुलकर्णी's picture

21 Sep 2009 - 9:33 am | विशाल कुलकर्णी

माझ्याही शुभेच्छा !
कै. दादासाहेब फाळकेंनी काढलेल्या "राजा हरिश्चंद्र" या चित्रपटाच्या निर्मीतीची कथा यात मांडली आहे असे ऐकतो. हा चित्रपट पाहायलाच हवा.

सस्नेह
विशाल
*************************************************************

आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"

हा चित्रपट प्रदर्शीत झाला नाहिये आजून....नोव्हेंबर-डिसेंबर मधे होणार आहे...

माझ्यातर्फेही चित्रपटाला शुभेच्छा !!

माझ्याही मनापासुन शुभेच्छा !

मॅन्ड्रेक's picture

21 Sep 2009 - 6:18 pm | मॅन्ड्रेक

at and post : janadu.

हर्षद's picture

21 Sep 2009 - 6:27 pm | हर्षद

माझ्याही मनापासून शुभेछा !!!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

21 Sep 2009 - 6:36 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

चित्रपटाचे लेखक-दिग्दर्शक श्री. परेश मोकाशी यांचे आणि या चित्रपटाशी संबंधित सर्वांचे अभिनंदन आणि हार्दिक शुभेच्छा !
'जोगवा’ या मराठी चित्रपटाला न पाहताच ऑस्कर शर्यतीतून वगळले अशीही बातमी यानिमित्ताने वाचनात आली.

-दिलीप बिरुटे