ज्योतिषाच्या मर्यादा नेमक्या कॊणत्या?

युयुत्सु's picture
युयुत्सु in काथ्याकूट
18 Sep 2009 - 12:57 pm
गाभा: 

ज्योतिषाच्या मर्यादा नेमक्या कॊणत्या हा घाटपांड्यानी विचारलेला प्रश्न माज्याकडून अनुत्तरीत राहीला होता. त्याचे उत्तर द्यायचा प्रयत्न करतो. खाली दिलेली यादी सर्वसमावेशक/पूर्ण नाही याची मला जाणीव आहे. हा प्रश्न घाटपांड्यानी जेथे विचारला होता तेथे प्रतिसादांची संख्या मोठी झाल्याने हे स्वतंत्र चर्चासूत्र निर्माण केले आहे.

१. केवळ एका पत्रिकेवरून सर्व प्रश्नांची उत्तरे देता येत नाहीत. आणि तशी अपेक्षा पण ठेवू नये.

उदाहरण म्हणून "क्ष" व्यक्तीच्या साडेसातीचे घेऊ. ही व्यक्ती भारतीय ज्योतिषाकडॆ गेली तर तो ठामपणे सांगतो की तुम्हाला साडेसातीचा त्रास अजिबात नाही उलट तुमची भरभराट होईल. ही व्यक्ती हे विधान तपासायला माझ्याकडे आली तर मी असे सरसकट भाकीत न करता त्या व्यक्तीच्या सान्निध्यातील (मुख्यत: पति अथवा पत्नीची पत्रिका) व्यक्तीची मागेन. दुसर्‍या पत्रिकेतील outer planets "क्ष"च्या पत्रिकेतील चंद्राशी कोणते योग करत आहेत किंवा नाहीत हे तपासेन आणि मगच साडेसातीच्या स्वरूपाविषयी विधान करीन. हीच कारणे प्रमोशनच्या प्रश्नाची उत्तरे देताना विचारात घ्यावी लागतात. बॉसच्या पत्रिकेची अनुपलब्धतता ही बढतीविषयक प्रश्नाच्या उत्तराला मर्यादा ठरते.

दूसरे उदाहरण - बर्‍याच जणांचा असा गैरसमज असतो की पत्रिका जुळली म्हणजे लग्न ठरणारच. तर ते असं नसतं. पत्रिका जुळली (म्हणजे आधुनिक तंत्राने) याचा अर्थ एवढाच की त्या दोन व्यक्ती एकत्र रहायची किंवा त्यांचे पटायची शक्यता जास्त. तसेच अमुक एका कालावधीत लग्न ठरणारच हे भाकीत सुद्धा वेडेपणाचे निदर्शक आहे. लग्नाचे प्रस्ताव त्या कालावधीत जास्त येऊ शकतात, एवढाच त्यातला तथ्यांश असतो. या कालावधीत लग्नाचा योग असलेली व्यक्ती प्रस्ताव घेऊन आली तर लग्नाची शक्यता वाढते. लग्नाचा निर्णय दोन व्यक्ती किंवा दोन पक्ष घेतात. हा निर्णय ग्रहगोल घेत नाहीत.

२. ज्योतिषातील एखादे तंत्र सर्व व्यक्तींच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देउ शकत नाही ही दूसरी मर्यादा

सर्वच लोकांचे आयुष्य त्यांच्या पत्रिकेमध्ये प्रतिबिंबीत झालेले असेल असे नाही. ज्यांचे आयुष्य प्रतिबिंबीत झालेले झाले असेल, किंवा जे प्रवाही जीवन जगत आहेत, त्यांनी पत्रिका बघायची का नाही हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न ठरतो. योग्य feedback पत्रिकेतील working/non-working factors ठरवायला उपयोगी पडतो. त्याने फलिताची अचूकता वाढायला मदत होते. "माझ्या हातातला पक्षी जिवंत आहे का मृत हे ओळखा" अशा प्रश्नांची उत्तरे पत्रिकेतून मिळत नाहीत.

असा अनावश्यक कचरा काढून टाकल्यावर जे ज्योतिष उरते ते निश्चित विचार करायला लावते असा माझा अनुभव आहे.

प्रतिक्रिया

Dhananjay Borgaonkar's picture

18 Sep 2009 - 1:03 pm | Dhananjay Borgaonkar

परत ज्योतिष विषयक धागा...हुश्श..दमलो....

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

18 Sep 2009 - 1:12 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

पत्रिका पाहून सदर 'य' व्यक्ती जिवंत आहे का, मानसिक रुग्ण आहे का, लग्नं झालेलं आहे का या गोष्टी सांगता येतील का?

अदिती

योगी९००'s picture

18 Sep 2009 - 2:57 pm | योगी९००

पत्रिका पाहून सदर 'य' व्यक्ती जिवंत आहे का, मानसिक रुग्ण आहे का, लग्नं झालेलं आहे का या गोष्टी सांगता येतील का?
हॅ हॅ हॅ

(पण मि.पा. चे आय.डी. पाहून मात्र ते नक्कीच समजेल की 'य' व्यक्ती मानसिक रुग्ण आहे का ते...)

खादाडमाऊ

१. या प्रश्नाचे ज्योतिषाच्या मदतीने उत्तर देता येत नाही.
२. "मानसिक रुग्ण" याची व्याख्या केल्यावरच या प्रश्नाचे उत्तर देता येईल. मानसिक आजाराची तीव्रता पत्रिकेतून कळत नही फक्त potential कळते
३. या प्रश्नाचे ज्योतिषाच्या मदतीने उत्तर देता येत नाही.

परिकथेतील राजकुमार's picture

18 Sep 2009 - 4:22 pm | परिकथेतील राजकुमार

लेखाला एखादी हिन व हिणकस प्रतिक्रीया येईल का ? चपला घालायला लागण्याचा योग निकट आला आहे का ? आयुष्यात केंव्हा व किती प्रमाणात 'बरसात चांदण्यांची' आहे ? स्वयंघोषीत सफाई संपादकांचा बडगा अचानक केंव्हा उगारला जाईल ? रोशनीचा पुढचा भाग कधी येणार ? मातीची माती झाली का ? असल्या प्रश्नांची उत्तरे पत्रीका पाहुन सांगता येतील का ?

मिपावरील आयडीची पहिली लॉग - इन वेळ हि जन्मवेळ मानुन त्या आयडीची पत्रीका बनवता येईल का ? शक्य नसल्यास मग कुठल्या प्रकारे बनवता येईल ? त्या पत्रीकेवरुन आयडीचे आंतरजालीय भविष्य सांगता येईल काय ?

आमच्या हिन व हिणकसपणाला मर्यादा नाहीत.
©º°¨¨°º© प्राध्यापक हेलीकॉप्टर ©º°¨¨°º©
आमचे राज्य

शैलेन्द्र's picture

18 Sep 2009 - 5:36 pm | शैलेन्द्र

"रोशनीचा पुढचा भाग कधी येणार ? "

सध्या (फोटो)शूटींग चालु आहे, थोडे थांबा.

The great pleasure in life is doing what people say you cannot do

नितिन थत्ते's picture

18 Sep 2009 - 8:45 pm | नितिन थत्ते

लोकांना जे जाणून घेण्यात इंटरेस्ट असतो (किंवा ज्योतिष जे सांगू शकते असे लोकांना वाटते) त्याला तुम्ही "जमायचं नाय" म्हणताय. आणि तरी ज्योतिषशास्त्र उपयुक्त आहे असा तुमचा दावा आहे.

नितिन थत्ते

युयुत्सु's picture

18 Sep 2009 - 9:32 pm | युयुत्सु

असा माझा दावा आहे कारण वर म्हटल्या प्रमाणे -
अनावश्यक कचरा काढून टाकल्यावर जे ज्योतिष उरते ते निश्चित विचार करायला लावते असा माझा अनुभव आहे.

----------------------------------------------------------
यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् |
यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति ||

अर्थ - कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.
------

Nile's picture

20 Sep 2009 - 3:54 am | Nile

कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.

एकाच राशी/कुंडली इ. असण्यार्‍या हजारोंपैकी कुणाला तरी अंधारात फेकलेला दगड लागेलच की. अन मग काहीतरी होईलच.

गुंडोपंत's picture

20 Sep 2009 - 7:16 am | गुंडोपंत

सर्व मुद्यांशी सहमत आहे.

यामुळेच महेशयोगींच्या आश्रमात एका व्यक्तीची पत्रिका पाहिली जात नाही सर्व कुटुंबाची किंवा किमान जोडीदाराची तरी पत्रिका एकत्रित पाहिली जाते.

आपला
गुंडोपंत

प्रकाश घाटपांडे's picture

20 Sep 2009 - 10:00 am | प्रकाश घाटपांडे

यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् |
यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति ||

अर्थ - कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.

आमचे फलज्योतिष चिकित्सक रिसबुड हेच म्हणायचे. त्याची आठवण आली.
------
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

गुंडोपंत's picture

22 Sep 2009 - 3:47 pm | गुंडोपंत

बरोब्बर!

थोडक्या आणि नेमक्या शब्दात अनिस च्या कार्यपद्धती ची माहिती दिल्याबद्दल अभिनंदन!

आपला
गुंडोपंत

प्रशांत उदय मनोहर's picture

22 Sep 2009 - 9:42 pm | प्रशांत उदय मनोहर

:D
आपला,
(मिपाकर) प्रशांत
---------
फळाची अपेक्षा ठेवू नये...ते विकत घ्यावे किंवा घरात उगवावे.
:?
माझा ब्लॉग - लेखणीतली शाई

हैयो हैयैयो's picture

19 Sep 2009 - 10:47 pm | हैयो हैयैयो

+१

अनावश्यक कचरा काढून टाकल्यावर जे ज्योतिष उरते ते निश्चित विचार करायला लावते असा माझा अनुभव आहे

ज्योतिष कळण्याची, आणि आपण म्हणतां तसा विचार करण्याची पात्रतादेखील बहुधा नसूनसुद्धा अनुभवांती मीही असेच म्हणतो.

-
हैयो हैयैयो!

विनायक प्रभू's picture

20 Sep 2009 - 5:32 pm | विनायक प्रभू

श्री. प्र.घा.
का हो तुम्ही नको ते प्रश्न विचारयचे प्रघात पाडता?

प्रकाश घाटपांडे's picture

22 Sep 2009 - 4:52 pm | प्रकाश घाटपांडे

हॅहॅहॅ ! हा आमचा प्रदोष आहे
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.