माणिक प्रभू

हुप्प्या's picture
हुप्प्या in काथ्याकूट
17 Sep 2009 - 12:17 am
गाभा: 

नुकतेच हे गाणे ऐकायला मिळाले.
http://www.aathavanitli-gani.com/Song%20Html/1425.htm

श्रीनिवास खळे सोडल्यास ह्या गाण्याचे गीतकार, गायक मला माहित नव्हते.
ह्याचे गीतलेखक माणिक प्रभू म्हणजे उत्तर कर्नाटकात बीदर येथे १९ व्या शतकात एक माणिक प्रभू नामक संत होऊन गेले तेच का? ते मराठी भाषिक होते का?
रतिलाल भावसारांविषयी कुणाला काही माहित आहे का? त्यांची अन्य कुठली गाणी प्रसिद्ध आहेत का?

प्रतिक्रिया

रामदास's picture

17 Sep 2009 - 9:18 pm | रामदास

यमुना तिरी जो वाजवी वेणू
संगे गोपाळांचा हार
अशा काही ओळी ऐकलेल्या आठवतात.
माझ्याकडे एका जुन्या पुस्तकात माणिकप्रभूंची माहीती आहे.
नंतर सविस्तर लिहीतो.

प्रमोद देव's picture

17 Sep 2009 - 10:04 pm | प्रमोद देव

रतिलाल भावसार हे कुमार गंधर्वांचे गुरुबंधू होत. ते प्रो.देवधरांकडे गाणं शिकलेत.
त्यांचा आवाज बायकांसारखा खूपच पातळ असल्यामुळे म्हणावे तितके व्यावसायिक यश त्यांना आले नाही.
त्यांनी बरेचसे माणिक प्रभूंचे अभंग गायलेले आहेत....त्यात एक चांगला आठवतोय तो म्हणजे.....
दावा नयनी यशोदेचा सुकुमार.....हा अभंग त्यांनी खूपच छान म्हटलाय.
तसंच त्यांनी गायलेली एकदोन नाट्यगीतांच्या ध्वनिमुद्रिका ऐकल्याचं स्मरतंय.
मी शाळकरी वयाचा असताना माझ्या लहान भावाला नगरपालिकेच्या प्राथमिक शाळेत ते गायन मास्तर होते आणि त्यांच्यासमोर मी एक गीतही गायल्याचं आठवतंय.

अजून एक पुसटशी आठवण स्मरतेय तीही माझ्या बालपणातील आहे...
त्यांची एक मैफल मालाडच्या ब्राह्मणसभेत झाली होती तेव्हा मी माझ्या वडिलांच्या बरोबर तिथे हजर होतो. रतिलालजींचा आवाज अतिशय कोमल आणि त्यातून ते आवाज तारसप्तकापर्यंत क्वचितच न्यायचे...अशाच एका गाण्याच्या वेळी एका टारगट श्रोत्याने त्यांनी आवाज अजून वर चढवावा ह्या उद्देशाने म्हटलेले शब्द होते... अरे वरड,वरड! वरडकी अजून जोरात.
क्षणभर गोंधळ माजला पण मग नंतर लोकांनी त्या श्रोत्याला बाहेरचा रस्ता दाखवला आणि कार्यक्रम पुन्हा पूर्वीसारखाच व्यवस्थित सुरु राहिला.

विरोधकांनो सावधान. ’चाल’ अस्त्र फेकून मारलं जाईल. ;)

हुप्प्या's picture

18 Sep 2009 - 9:49 pm | हुप्प्या

अशी दुर्मिळ माहिती मिसळपाववरच मिळणार ह्याची खात्री होती.
देवसाहेब, तुमचे आभार.
रतिलाल भावसार म्हणजे गुजराथी भाषिक का?
कुठल्या शहरात / गावात रहायचे ते?
मला त्यांचा दावा नयनी हा अभंग खूप आवडला. आणि हल्लीच खूप दिवसांनंतर ऐकायला मिळाला.
रामदास साहेब, तुमच्या माहितीची वाट पहातो.

प्रमोद देव's picture

19 Sep 2009 - 4:52 pm | प्रमोद देव

पंडीत रतिलालजी मूळ गुजराथी भाषिकच आहेत; मात्र तरीही ते १००%मराठी आहेत.
ते स्वतः महानगरपालिकेच्या मराठी माध्यमात गायन-शिक्षकाची नोकरी करत होते(हे आधीच सांगितलंय) आणि त्यांचा मुलगा रघुवीर माझ्या धाकट्या भावाच्या वर्गात होता...म्हणजेच पूर्णपणे मराठी माध्यमात शिकलेला आहे.
आकाशवाणीच्या मुंबई ब केंद्रावरून (आताची ’अस्मिता’ वाहिनी) अजूनही ते नियमितपणे सुगम तसेच शास्त्रीय गायन सादर करत असतात.
रतिलालजींच्या अजून काही ध्वनिमुद्रिका आहेत...
१)ऐसा महिमा प्रेमाचा...
२)रमवी नयना ही प्रभूलीला
३)लागती गे काळजाला तीर.....

लागती गे काळजाला तीर हे तेढे तुझे
आवळाया कंठ माझा नागिणी वेढे तुझे

बाई गं पुसता पुसेना झाक ही गालावरी
काय ही किमया कळेना वाढते लाली तरी
सोडविता ही सुटेना लाजरे कोडे तुझे ॥१॥

भाव मनीचे कोवळे की पारिजाताची फुले
नाचता झेलावया ते मखमली ही पाऊले
चालवी हृदयावरी गे कथ्थकी तोडे तुझे ॥२॥

गायक रतिलाल भावसार
संगीत श्रीनिवास खळे
कवीः राजा बढे
संग्रह तो राजहंस एक (श्रीनिवास खळे)
(गीताचे शब्द मायबोलीवरून साभार)

विरोधकांनो सावधान. ’चाल’ अस्त्र फेकून मारलं जाईल. ;)