निरुपम यांची मागणी : ऊत्तर भारतीयांना मुंबई-ठाण्यात आरक्षण

प्रभो's picture
प्रभो in काथ्याकूट
15 Sep 2009 - 10:19 pm
गाभा: 

थोड्याच वेळापूर्वी कानावर आलं की, कॉंग्रेस चे खासदार श्री. संजय निरुपम यांनी त्यांच्या पक्षाकडे मुंबई-ठाण्यात विधानसभेच्या ६० पैकी ३५ जागांची मागणी केलीय. त्यांचे म्हणणे आहे की, त्या विभागांमधे ऊत्तर भारतीय मतदार मोठ्या प्रमाणावर आहेत जे स्थलांतरीत होऊन मुंबई-ठाण्यात आले आहेत.

त्यानी मात्र शेवटचा निर्णय पक्षावर सोडला आहे.

मिपाकरांचं ह्या विषयावर मत काय आहे???

प्रतिक्रिया

या खासदाराचे म्हणणे आरक्षणाबद्दल नाही तर तिकीटवाटपाबद्दल आहे.

(भारतात पैतृक प्रांतासाठी आरक्षण करणे शक्य नाही, घटनाबाह्य आहे. पण तिकीटवाटप करण्यासाठी कुठलाही पक्ष काही वातेल ते निकष ठरवू शकतो. साधारणपणे "पक्षश्रेष्ठींची खुशामद" हा निकष असतो.)

पण तिकीटवाटपाबद्दलही ही मागणी अगदीच कैच्या कै आहे. कुठल्याही पक्षाने यशस्वी होण्याची सर्वाधिक शक्यता असलेल्या उमेदवाराला तिकीट द्यावे, यातच शहाणपणा आहे.

या ठिकाणी आरक्षणापेक्षा बजाराची तत्त्वे, राजकारणाचे डावपेच, अशा मुद्द्यांचेच काय ते काम आहे. (हे कुठल्याही पक्षासाठी खरे आहे.)

शाहरुख's picture

16 Sep 2009 - 2:58 am | शाहरुख

काँग्रेसची अंतर्गत बाब..कसेही का "आरक्षण" करेनात !!

पैतृक म्हणजे ??

हरकाम्या's picture

16 Sep 2009 - 1:17 am | हरकाम्या

निरुपमांना आरक्षण हवे कशाला त्यांना म्हणावे मुंबइ व ठाणे सगळेच घेउन टाका नाहितरी आता दोन " सेनांच्या " भांडणात सत्ता कॉंग्रेसच्या हातात जाणार आहे. त्यामुळे उगीच आरक्षणाच्या भानगडीत आता कशाला पडता. उद्या काँग्रेस सत्तेवर आली की " शरदराव " सोनियांना खुश करण्यासाठी स्वःताच विधानसभेत तसा "ठराव " मांडायाचे ठरवतील. त्यामुळे त्यांना म्हणावे आता नाही तरी पुढच्यावेळी नक्कीच आरक्षण मिळेल.

निमीत्त मात्र's picture

16 Sep 2009 - 1:25 am | निमीत्त मात्र

हे संजय निरुपम म्हणजे तेच ना ज्यांना शिवसेने खासदार बनवले आणि दोपहरका सामना चे संपादक?

पाषाणभेद's picture

16 Sep 2009 - 3:22 am | पाषाणभेद

काय सांगावे, संजय हा फक्त या लोकांची कार्यपद्धती कशी आहे ते पहाण्यासाठी म्हणूनही शिवसेनेत आला असेल?

'महाराष्ट्र नवनिर्माण शिवसेनेने' (हो! दोन्ही सेनेचे विचार आचार एकमेकांशी पुरक आहे त्यामुळे मी त्यांचे एकत्र नामकरण केले आहे.) यापुढे परप्रांतियांना 'नोकर्‍या' देतांना विचार केला पाहिजे. नाहितर कुर्‍हाडीचा दांडा गोतास काळ.

-----------------------------------
काय! तुमच्या घरी 'गोदरेज' च्या कपाटांवर सुटकेस, अडगळ सामान इ. ठेवत नाही? नक्कीच! तुम्ही अतीउच्च वर्गीय आहात.

- पाषाणभेद उर्फ दगडफोडीची सजा मिळालेला दगडफोड्या

निखिलराव's picture

16 Sep 2009 - 10:32 am | निखिलराव

संजय निरुपम यांनी हे statment फक्त आगीत तेल ओतण्यासाठी केलयं असे वाट्ते. जेणेकरुन मराठी माणुस confuse होउन मनसे कडे वळेन आणि शिव सेनेला तोटा होइल आणि कॉंग्रेसचा फायदा.

जय महाराष्ट्र !
निखिल

चिरोटा's picture

16 Sep 2009 - 12:52 pm | चिरोटा

आहें. निवडणूका जवळ आल्या तरी अजुन राजकारणी म्हणावे तसे फालतु मुद्दे बाजारात आणताना दिसत नाही आहेत. पुढच्या काही दिवसात खालील मुद्दे बाजारात येण्याची शक्यता.
१)मुंबईचे सिंगापुर्/सिडनी/पॅरिस करण्याची मनमोहन सिंग ह्यांची घोषणा.
२)चि़खलदर्‍याला आंतराष्ट्रीय विमानतळ उभारण्याची मुख्यमंन्त्र्यांची घोषणा.
३)बेळगावात राष्ट्रवादी/शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना आंदोलनात अटक.
४)मुंबईतल्या कन्नडिगांना झोडपून काढण्याचा उद्धव ठाकरे ह्यांचा ईशारा.
५)"सर्व शेतकर्‍यांना कर्जे माफी/वीज माफी देवू" शरद पवार ह्यांची घोषणा.
६)प्रत्येक जिल्ह्यात 'आय्.टी पार्क्/बायोटेक पार्क उभारणार' विलासरावांची घोषणा.
७)आर्मी,नौदलात मराठी तरुणांना जाणीवपुर्वक डावलले जात असल्याची राज ठाकरे ह्यांची तक्रार.
भेंडी
क्ष्^न + य्^न = झ्^न

युयुत्सु साहेबानी दिलेल्या कोष्टकात येत असावी.
वेताळ

अमोल केळकर's picture

16 Sep 2009 - 1:00 pm | अमोल केळकर

आपले नालायक नेते ही मागणी देखील मान्य करायला मागे पुढे पाहणार नाहीत.
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

मदनबाण's picture

16 Sep 2009 - 2:41 pm | मदनबाण

विभागांमधे ऊत्तर भारतीय मतदार मोठ्या प्रमाणावर आहेत जे स्थलांतरीत होऊन मुंबई-ठाण्यात आले आहेत.

इ बम्बबई हमार है | कौनो प्रॉब्लेमवा हुई गवा का ?| अरे हमारं गाव की सब गाडीया थाना रुकती है,तो लोग यहां उतरेंगे नही तो और कहां जायेंगे?जहा भी हमारे राज्य से गाडी जायेगी वहा वहा हम जा पोहचेंगे |

(आर ठाकरेंचे इंजिन मराठी लोकांसाठी महाराष्ट्रात धावणार का? :?)
मदन बिहारी.....

पाकडे + चीनी = भाई-भाई.

http://www.timesnow.tv/videoshow/4327416.cms

सूहास's picture

16 Sep 2009 - 3:18 pm | सूहास (not verified)

१)मिळणार नाहीत..

२) मिळाल्या तर राज्यात काँग्रेसचा पाडाव होईल..तसा तो होणारच आहे..

(मराठीप्रेमी..)
सू हा स...

मी-सौरभ's picture

18 Sep 2009 - 12:01 am | मी-सौरभ

सौरभ

आशिष सुर्वे's picture

18 Sep 2009 - 12:46 pm | आशिष सुर्वे

अले ले ले.. उलु लु लू..

त्याचे काय आहे, माझा २ वर्षाचा पुतण्या सुद्धा चंद्र-तार्‍यांकडे बोट दाखवून 'द्या द्या' असे बोलत असतो.. तेव्हा मी त्याची अशीच समजूत काढतो..

अजून एकदा हा..
अले ले ले.. उलु लु लू..

ते असो, हे निरुपम म्हणजे 'निरूपमा रॉय'चे कोणी नातेवाईक वगैरे..
नाही, सहज एक शंका आली ब्वा!!

-
कोकणी फणस