हुशार कावळा (नवीन)

सुनिल पाटकर's picture
सुनिल पाटकर in कलादालन
15 Sep 2009 - 6:06 pm

आता कावळा हुशार झालाय .पाणी पिण्यासाठी तो मडक्यात दगड टाकण्यात आपला वेळ वाया घालवत नाही .तो असे पर्याय शोधतो.गोव्यातिल करमाळी रेल्वे स्थानकावरील हा फोटो.

छायाचित्रण

प्रतिक्रिया

अनामिक's picture

15 Sep 2009 - 6:08 pm | अनामिक

कावळा पाणी पिऊन, पाण्याचं भांडं घेऊन उडालेला दिसतोय....
(फोटू दिसत नाही राव!)

-अनामिक

सुनिल पाटकर's picture

15 Sep 2009 - 6:22 pm | सुनिल पाटकर

आता दिसेल

अभिजा's picture

15 Sep 2009 - 6:59 pm | अभिजा

छान कॅप्चर केलय! फोटो अजून थोडा मोठा पाहायला मिळेल तर मजा येईल!

परिकथेतील राजकुमार's picture

15 Sep 2009 - 7:11 pm | परिकथेतील राजकुमार

काय हो 'परा'चा कावळा आहे का हो तो ?

बाकी छायाचित्र मस्तच.

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य

लवंगी's picture

15 Sep 2009 - 8:12 pm | लवंगी

:)

सूहास's picture

15 Sep 2009 - 7:33 pm | सूहास (not verified)

हुशार आहेस

सू हा स...

मदनबाण's picture

15 Sep 2009 - 7:38 pm | मदनबाण

छान फोटो... :)

मदनबाण.....

पाकडे + चीनी = भाई-भाई.
http://videos.oneindia.in/watch/12877/now-china-incursion-uttarakha

शब्देय's picture

15 Sep 2009 - 8:08 pm | शब्देय

सुनिल, छान फोटो...

असे फोटो क्लिकायला नजर कावळयाची लागते, जी तुमची आहे :)

सोनम's picture

15 Sep 2009 - 8:15 pm | सोनम

फोटो छान आहे. :)
"आयुष्यात हारजीतला काही मोल नसते! मोल असते ते झगडण्याला! निकराने,प्राणबाजीने शर्थीने झुंजण्याला!"

धनंजय's picture

15 Sep 2009 - 10:11 pm | धनंजय

करमळीच्या स्टेशनाच्या एका बाजूला एक उथळ तलाव आहे. त्यात हजारोंच्या संख्येने पक्षी-पाणकोंबड्या दिसतात. नाना प्रकारची बदके, बगळे, करकोचे.

(पणजीला, मंगेशीला जाण्यासाठी करमळी हेच स्टेशन सर्वात जवळ पडते, म्हणून त्या स्टेशनावरून प्रवास सुरू करायचा प्रसंग अनेकांना येऊ शकेल.) करमळी स्टेशनावर कधी गाडी लेट झाल्याचा, ताटकळत बसण्याचा वाईट प्रसंग आला, तर हा एक फायदा करून घेण्यालायक आहे.

वरील फोटोवरून दिसते की स्टेशनापलीकडेही जायची गरज नाही - फलाटावरच पक्ष्यांचा पाणवठा आहे!

टारझन's picture

15 Sep 2009 - 11:28 pm | टारझन

कशावरून "तो कावळा"च आहे ? "ती कावळी" नसेल कशावरून ?
बाकी नविन नविन चर्चेत रहाण्यासाठी धाग्याच्या टायटल मधेच (नविन) टाकण्याची कल्पना स्तुत्य !!

(शंकाप्रेमी) टार्‍या

लवंगी's picture

15 Sep 2009 - 11:31 pm | लवंगी

हुशार आहे ना ती, म्हणजे कावळीच असणार .. ;)