मदत

पुष्कर's picture
पुष्कर in काथ्याकूट
5 Sep 2009 - 1:06 pm
गाभा: 

माझ्या निरीक्षणाप्रमाणे, मिसळपावावर प्रसिद्ध झालेल्या लिखाणांपैकी काही ढकलपत्रांमधे प्रसिद्ध होत आहेत.... त्यातून लेखकांचे नाव अत्यंत खुबीने वगळले जात आहे. हे होऊ नये म्हणून काय खबरदारी घ्यावी? नियम काय आहेत? इंटरनेट वरच्या कॉपीराईट संबंधी काही मार्गदर्शन मिळू शकेल का?

प्रतिक्रिया

पाषाणभेद's picture

5 Sep 2009 - 1:51 pm | पाषाणभेद

लेखनाच्या मधे मधे आपले नाव टाकत चला. दोन ओळींत आपले नाव आलेच पाहिजे असे करा.

लेखनामध्ये पाणीचिन्ह टाका.
वरील विनोद सोडुन बोलायचे झाल्यास :
आपले लेखन खरच आपल्याला महत्वाचे वाटत असेल तर लेखात (c) कॉपीराटई तुमचाच आहे असे म्हणा. ज्या ज्या ठिकाणी ईंटरनेटवर तुमचे लेख सापडतील त्यांना त्यांना तसे सांगा व तुमचे नाव टाकून घ्या किंवा ते लेख काढून टाकायला सांगू शकतात.

-----------------------------------
"ऑफिसातल्या कंटाळ्याला उध्वस्त करी मिपा... मिपा मिपा खेळत बसा."

- पाषाणभेद उर्फ दगडफोड्या

पुष्कर's picture

14 Sep 2009 - 11:13 pm | पुष्कर

पण प्रॉब्लेम असा अहे, की इंटरनेटवर संकेतस्थळांवर माझ्या लेखात माझे नाव आहेच, परंतू ज्या कोणी ढकलपत्र बनवले, त्याने त्या लेखातून माझे नाव वगळून ते ढ्कलले. ते प्रचंड प्रमाणात सर्क्युलेट झाले आहे.

पाषाणभेद's picture

15 Sep 2009 - 7:25 am | पाषाणभेद

म्हणजे तुम्ही इंटरनेटवर संकेतस्थळांवर तुमच्या लेखात खालीलप्रमाणे एखादा मजकुर लिहीला होता असे मानू.

"आज शिवाजी पार्क वर श्री. पुष्कर मिपाकर यांचे मराठी भाषिकांसाठी जोरदार भाषण झाले. त्यात त्यांनी पुर्ण आयुष्य वेचण्याची प्रतिज्ञा केली.
त्यानंतर श्री. पुष्कर मिपाकर यांनी श्री. पाषाणभेद यांना रु. ५ कोटीचा निधी चेकद्वारे दिला. श्री. पाषाणभेद यांनी श्री. पुष्कर मिपाकर यांचे आभार मानले. श्री. पुष्कर मिपाकर यांनी यापुढे भरीव आर्थीक मदत देण्याचे वचन दिले. "

वरील परिच्छेद कोणीतरी संपादित करून
१) "श्री. पुष्कर मिपाकर" यांच्या जागी "श्री. कुस्कर टिकाकर" असे नाव टाकले असे आपल्याला म्हणायचे आहे काय?
किंवा
२) "श्री. पुष्कर मिपाकर " हे नाव वगळून लेख लिहीला का?
(असे असेल तर आपण मला दिलेला तो चेक बाऊंस होईल.)
किंवा
३) मुळ परिच्छेदात काहीतरी बदल केला व आपले नावही वगळले असे काही घडले का?
-----------------------------------
काय! तुमच्या घरी 'गोदरेज' कपाटांवर सुटकेस, अडगळ सामान इ. ठेवत नाही? नक्कीच! तुम्ही अतीउच्च वर्गीय आहात.

- पाषाणभेद उर्फ दगडफोडीची सजा मिळालेला दगडफोड्या

विकास's picture

5 Sep 2009 - 7:11 pm | विकास

असे जर इथले लेखन ढकलपत्रात अथवा इतरत्र आढळले तर येथे त्याची अवश्य नोंद करा. तेच इतर संकेतस्थळावर (जिथे तुमचा विहार असेल तेथे :) ) करू शकता. (ही सगळ्यांनाच विनंती आहे, केवळ आपल्याला नाही!).

सहज's picture

15 Sep 2009 - 6:08 am | सहज

मधे मला मिपावरच्या मित्रांकडून "केशव, काका, काकू"वाले ढकलपत्र मिळाले तेव्हा मी त्या मित्राला म्हणालो होतो की हा लेख मिपावर एकाने आधीच लिहलेला वाचला होता.

निदान मिपाकरांना तर कळु दे पुष्करने हा लेख मिपावर "कोल्हे-कुई" नावाने २ एप्रिल २००९ ला प्रसिद्ध केला होता. तसेच प पासुन "पंतांच्या पगडीचे प्रवासवर्णन" जुलै २००८ मधे

त्या आधी कोणी पाहीला असेल तर त्या व्यक्तीने तीही माहीती द्यावी. तोवर निदान माझ्यामते हे लेख पुष्करचेच आहेत.

पुष्कर's picture

19 Sep 2009 - 1:32 am | पुष्कर

धन्यवाद सहजराव.
पंतांच्या पगडीचे प्रवासवर्णन याआधी पुण्यातील ज्ञानप्रबोधिनीच्या त्यावेळच्या "Young Expressions" या अर्धवार्षिकामध्ये 'पहा पहा पगडीचा प्रवास' यानावाने पहिला भाग मी स्वतःच लिहून 1997 मध्ये प्रसिद्ध केला होता. शंका असल्यास खात्री करून घ्या. माझ्याकडे तो अंक अजून आहे.