काही बातम्या कशा तयार होतात?

विकास's picture
विकास in काथ्याकूट
27 Aug 2009 - 12:25 am
गाभा: 

जसवंतसिंगांमुळे तयार झालेल्या विविध बातम्या वाचताना एक प्रश्न डोक्यात आला: काही बातम्या कशा आणि का तयार होतात? हाच ह्या चर्चेचा विषय आहे. निव्वळ जसवंतसिंग आणि जीनांसाठी इतरत्र चालू असलेल्या धाग्याचा अधिक उपयोग होऊ शकेल पण येथे केवळ त्यावर चर्चा होऊ नये असे वाटते.

जेंव्हा २६ जानेवारी/जुलै/नोव्हेंबर/डिसेंबर सारख्या घटना (भूकंप, पाऊस, दहशतवाद, त्सुनामी) घडतात, निवडणूकांच्या आधीचे अथवा निकालाचे दिवस असतात, कोणा मोठ्या व्यक्तीचे निधन होते तेंव्हा आणि तत्सम इतर अनेक सरळ घडणार्‍या गोष्टींच्या जेंव्हा बातम्या दुसर्‍या दिवशीच्या वर्तमानपत्रात अथवा या काळात त्याच दिवशी केबल चॅनेल्सवर दिसतात, जालावर तात्काळ अवतरतात तेंव्हा त्यात आश्चर्य काहीच नसते. मात्र काही बातम्या अशा असतात की ज्याला, "जंगल मे मोर नाचा किसीने ना देखा, हम हिलके थोडे झुमे तो सबने देखा" ह्या प्रकारात मोडतात. त्यात जास्त वेळ जात असतो जितका इतर अनेक गंभीर विषयांवर जात नाही. एकदा सर्वत्र तीच बातमी दिसली की त्याचा परीणाम घरदार, लोकल, महाविद्यालये, आणि जालावर चर्चा करण्यात होतोच होतो. सोप्या भाषेत कायम सांगितले जाते की माणूस कुत्र्यास चावल्यास बातमी होते, उलट झाले तर नवल ते काय!

दोन आठवड्यांपुर्वी स्वाईन फ्लू मुळे काही प्रमाणात योग्य बातम्या आल्या तर काही बाबतीत लोकशिक्षणाच्या ऐवजी एक प्रकारची भिती तयार करण्यात आली. ती मुद्दामून केली असे म्हणायचे नाही पण बातमी म्हणले की "एक्सायटींग" पाहीजेच असे कुठेतरी वाटत असावे. तरी देखील आता जालामुळे आणि एकंदरीत वर्तमानपत्रांमधे थोडीफार अधिक माहीती असते. जनतेला "informed decision" घेता येईल अशा प्रकारचे लेख येत असतात.

मात्र जेंव्हा याच बातम्या या राजकीय विश्लेषण म्हणून येतात तेंव्हा सगळे काही बदलते. अडवाणींचे पुर्वीचे जीना वक्तव्य, आत्ताचे जसवंतसिंग यांचे पुस्तक हा यातीलच एक भाग आहे. त्यावर बातम्या आल्या, लिहीले गेले यात आश्चर्य असे काहीच नाही मात्र जेंव्हा त्या बातमीचा चावून चावून चोथा होतो, चघळून सांगितले जाते आणि तोच प्रकार बातमी दिली तरी इतर वेळेस हलकेच केला जातो. तेंव्हा ज्याला लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणले जाते तो खरेच आपले काम बजावतो का असा प्रश्न पडतो...

या चर्चेदरम्यान काही उदाहरणे देऊ इच्छितो. पहीले महाराष्ट्रातील - "नथूरामने गांधीजींना मारली ती चूकच झाली, त्यामुळे ते महात्मा झाले... वास्तवीक गांधीजींचे पुतळे काढून नथूरामचे पुतळे उभे केले पाहीजेत..." हे उद्गार जेंव्हा ज्या व्यक्तीने काढले तेंव्हा भरपूर टिका झाली कारण तेंव्हा ती व्यक्ती शिवसेनेत होती. मात्र नंतर जेंव्हा तीच व्यक्ती राष्ट्रवादीत आली, नंतर मंत्री/उपमुख्यमंत्री वगैरे झाली. तेंव्हा मात्र त्यांना म्हणजे भुजबळसाहेबांना घेणार्‍या राष्ट्रवादी काँग्रेस अथवा त्यांना युतीत उपमुख्यमंत्री करणार्‍या काँग्रेसला मात्र अशा व्यक्तीस कसे घेता हा प्रश्न देखील धड विचारला गेला नव्हता...

दुसरे उदाहरण हे त्या व्यक्तीचे वक्तव्य सांगूनच देतो:

"Today, with the balance and perspective offered by the passage of time and the benefit of hindsight, it is possible for an Indian Prime Minister to assert that India’s experience with Britain had its beneficial consequences too. Our notions of the rule of law, of a Constitutional government, of a free press, of a professional civil service, of modern universities and research laboratories have all been fashioned in the crucible where an age old civilization of India met the dominant Empire of the day. These are all elements which we still value and cherish. Our judiciary, our legal system, our bureaucracy and our police are all great institutions, derived from British-Indian administration and they have served our country exceedingly well....

...Our Constitution remains a testimony to the enduring interplay between what is essentially Indian and what is very British in our intellectual heritage....

...Of all the legacies of the Raj, none is more important than the English language and the modern school system. That is, of course, if you leave out cricket!..."

मला सांगा असे जर एखादी इंग्लंड मधे राहणारी भारतीय व्यक्ती भारतात येऊन बोलली तर त्या अनिवासी भारतीयाची मिसळ काय तर्री पण केली जाईल...पण हे तर म्हणले आहे विद्यमान आणि भाषण देताना देखील पंतप्रधान असलेल्या मनमोहनसिंग यांनी! किमान या साहेबाच्या भाषेचे कौतुक करणार्‍या सिंगसाहेबांने Why India's Rise is Business As Usual वाचला असता तर अजिजीने लिहीलेले शब्दप्रयोग तरी टाळता आले असते.

मात्र यावर कधी माध्यमांमधे आजच्या इतकी चर्चा झाल्याचे आठवत नाही की माहीत नाही. असे का व्हावे?

आता त्या बाळासाहेबांना "झक मारली आणि महाराष्ट्रभुषण पुरस्कार दिला" असे म्हणत पुलंना नावे ठेवली, याचे निमित्त करून येथेच्छ झोडपण्यात आले. मात्र एका सरकारने घेतलेला त्याच पुलंचे नाव मुंबई-पुणे महामार्गाला देण्याचे धुडकावून यशवंतरावांचे नाव दिले गेले तेंव्हा मात्र सगळे चिडीचूप. शब्दाला प्रतिशद्ब देताना टिका केली तर त्याचा गाजावाजा, आणि न बोलून देण्याचे ठरवलेले नाव रद्दबातल करून उपेक्षा केली तर मात्र काहीच नाही. असे का व्हावे?

परत मला आधीच्या चर्चेत सांगितलेल्या आंबेडकरांच्या दुव्यातील काही वाक्ये आठवली:

Journalism in India was once a profession. It has now become a trade. It has no more moral function than the manufacture of soap. It does not regard itself as the responsible adviser of the Public. To give the news uncoloured by any motive, to present a certain view of public policy which it believes to be for the good of the community, to correct and chastise without fear all those, no matter how high, who have chosen a wrong or a barren path, is not regarded by journalism in India its first or foremost duty. To accept a hero and worship him has become its principal duty. Under it, news gives place to sensation, reasoned opinion to unreasoning passion, appeal to the minds of responsible people to appeal to the emotions of the irresponsible. Lord Salisbury spoke of the Northcliffe journalism as written by office-boys for office-boys. Indian journalism is all that plus something more. It is written by drum-boys to glorify their heroes. Never has the interest of country been sacrificed so senselessly for the propagation of hero-worship. Never has hero-worship become so blind as we see it in India today. There are, I am glad to say, honourable exceptions. But they are too few, and their voice is never heard.

- Dr. Babasaheb Ambedkar ("RANADE GANDHI & JINNAH" 1943)

हे सर्व येथे लिहीण्याचे कारण कुणाचाही बचाव करणे, बाजूने लिहीणे हे नाही आहे. हा प्रकार भारतातच नाही तर स्थानीक राजकारणासंदर्भात अमेरिकेत देखील आहे. पण नक्की असे वागून माध्यमे काय मिळवतात? कुठेतरी वाटते, लोकप्रतिनिधी झाले, सुप्रिम कोर्टाचे न्यायाधिश झाले, आता माध्यमाच्या संपादक/वार्ताहारांना पण लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून मालमत्ता जाहीर करायला लावायला हवी का?

तुम्हाला काय वाटते? आपण वाचून/ऐकून/लिहून informed decision घेण्यासाठी काय करायला हवे?

प्रतिक्रिया

दादा कोंडके's picture

27 Aug 2009 - 2:06 am | दादा कोंडके

असं म्हणतात की जनतेची स्मरणशक्ती खूप कमी असते. दोन चार दिवस लोक चर्चा करतात आणि विसरून जातात. पण मला वाटतं याला प्रसार माध्यमच जबाबदार आहेत. प्रत्येक बातमी चं ट्रॅकींग करता यायला हवं.

मिसळभोक्ता's picture

27 Aug 2009 - 2:06 am | मिसळभोक्ता

काय म्हटले, यापेक्षा कोणी म्हटले हे अधिक महत्त्वाचे ठरते, आणि त्याच्या बातम्या होतात.

-- मिसळभोक्ता

संदीप चित्रे's picture

27 Aug 2009 - 2:06 am | संदीप चित्रे

त्यातली बातमी आधी शोधावी लागते ... बराचसा तर फोलपटाचा चिवडा असतो !!

नंदन's picture

27 Aug 2009 - 3:20 am | नंदन

लेखाचा विषय आणि मांडणी आवडली. वर मिसळभोक्ता यांनी म्हटल्याप्रमाणे (किंवा पहा असा मी असामी), काय म्हटलंय यापेक्षा कुणी म्हटलंय ह्याला अधिक महत्त्व असणं ह्याबद्दल एरवी आश्चर्य वाटू नये; मात्र माध्यमांनी ती बातमी देताना त्रयस्थ दृष्टिकोनातून द्यावी अशी अपेक्षा असते/होती. ती अपेक्षाच मुळात गैरलागू असल्याचं ठरवून बातम्या देण्याकडे माध्यमांचा आणि त्या तशा स्वीकारण्याकडे वाचक/प्रेक्षकांचा कल सध्या झुकतो आहे हे उघड आहे.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

धनंजय's picture

27 Aug 2009 - 4:34 am | धनंजय

वृत्तपत्रांना सनसनाटीसाठी बातम्या वरखाली कराव्या लागतात, हे चिंताजनक आहे, याबाबत मी सहमत आहे.

वृत्तपत्रांना बातम्या विकण्याचा बिनातोट्याचा व्यापार जमावा लागतो, हे एका तागडीत. (भारतात वृत्तपत्रे सरकारने चालवायला, किंवा सरकारी भिकेवर चालण्याला आपणापैकी कोणीही राजी होणार नाही.) दुसर्‍या तागडीत लोकशाहीच्या स्तंभ म्हणून वृत्तपत्राने फायद्या-तोट्याचा हिशोब न करता लोकशिक्षण करावे ही रास्त अपेक्षा. या हिंदकाळणार्‍या तागडीचा तोल फार एकांगी होतो आहे का? ही चिंता आहे. तो सांभाळण्यासाठी व्यवस्थेच्या अंतर्गत (सिस्टिममध्ये) काय सुरक्षा-उपाय असावेत, हा प्रश्न मनात येतो.

- - -

वरील सगळे हे एक अंग. आणखी एक वेगळी बाब. परंतु एखाद्या बातमीचा बोभाटा अपेक्षेपेक्षा कमी किंवा अधिक होतो आहे, हे समजण्यासाठी अपेक्षा ही व्यक्तिसापेक्ष असते.

भुजबळांबद्दल तुमचे उदाहरण मला पटते आहे. पण इंग्रजी भाषेबाबत पंतप्रधानांचे भाषण कोणी का केले, मला फारसे उल्लेखनीय वाटत नाही. (ते मिसळपावावर आपल्या सदस्यांपैकी कोणी केले, तर मराठी लेखन-वाचनाला वाहिलेल्या संकेतस्थळावर गदारोळ होईल - नि:संशय. पण मिसळपाव समुदाय हा मराठी लेखन-वाचनाला वाहिलेला असल्यामुळे तसा गदारोळ अपेक्षितच आहे.)

नाहीतरी टाईम मासिकाच्या दुव्यावरचा लेख ब्रिटिशांना झोडपण्यापूर्वी असेही म्हणतो :

British brought that other essential staple, tea — as well as the arguably more important innovations including democracy and the rule of law, railways, cricket and the English language. All contributed to India's economic resurrection.

(पुढचे वाक्य ब्रिटिशांनी भरपूर जुलूम केला असे आहे.)
वगैरे.

एक उदाहरण आठवते. सिंगूर येथील जुलुमी पोलीस कारवाईबद्दल वृत्तपत्रे काहीच बोलत नाहीत, अशा तर्‍हेची चर्चा मागे मिसळपावावर झाली. परंतु मी सिंगूरमधील घटनांबद्दल वर्तमानपत्रातून, संकेतस्थळांवरून बातम्या, संपादकीये रोज वाचत होतो. अशा परिस्थितीत मी असे समजलो, की "रोज चर्चा होत असली तरी हवी तेवढी, किंवा हवी तशी चर्चा होत नाही". इथे मला वाटते व्यक्तिगत अपेक्षांचा निकष फार महत्त्वाचा असतो. राजकीय बातम्यांच्या बाबतीत हे फार दिसू शकते.

अमेरिकेत "वृत्तपत्रे लिबरल आहेत - तशा वाकड्या बातम्या देतात" आणि "वृत्तपत्रे नियोलिबरल (=कन्झर्व्हेटिव्हचा एक प्रकार) आहेत - तशा वाकड्या बातम्या देतात" या दोन्ही तक्रारी वेगवेगळ्या लोकांकडून ऐकायला मिळतात.

(सॅरा पेलिन म्हणतात की लिबरल मीडियाने डेमोक्रॅटांची असमतोल प्रशंसा केली. विरोधक म्हणतात की वृत्तपत्रांनी या अननुभवी सॅरा पेलिनला "मॅककेनचा ब्रिलियंट चॉइस" बनवले. वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळ्या अपेक्षांमुळे मिडिया उलटसुलट झुकलेली दिसली.)

- - -

कालिन्दि मुधोळ्कर's picture

27 Aug 2009 - 11:39 am | कालिन्दि मुधोळ्कर

निओलिबरलिसम हां कन्झर्व्हेटिझम प्रकार नसून ती एक आर्थिक विचारप्रणाली आहे ज्यात बाजारपेठेला सर्वाधिक महत्त्व दिले गेले आहे. अमेरिकेतील काही वृत्तपत्रे लिबरल आणि काही कन्झर्व्हेटिव्ह आहेत असे विधान सामान्यपणे त्यांच्या सामजिक विचारांबाबत केले जाते(न्युयोर्क टा. लिबरल तर वॉशिंगटन टाईम्स कन्झर्व्हेटिव्ह इ.)

बातम्यांचे "उत्पादन" कसे केले जाते आणि ते करणारी किती मोठी इंड्स्ट्री आहे याचे उत्तम विवेचन नोम चोम्स्की यांच्या 'Manufacturing Consent' मधे मिळते. इराक़ वरील अमेरिकेचा हल्ला अथवा 'War on Terror' सारख्या प्रक्षोभक बातम्या किती पद्धतशिरपणे वापरून जनमत युद्धासाठि तयार केले गेले ह्या बद्दल चोम्स्की सह अनेकांनी लिहिले आहे. मीडिया हां अत्यंत चलनी बिझनेस असल्याने नफा आणि राजकीय-आर्थिक संबंध यांची बातम्यांवर छाप असते.
यावर उपाय? कोर्पोरेट मीडिया ला सोडून स्वायत्त मिडीयाकडे वळणे. अमेरिकेमधील indymedia, democracynow ही स्वायत्त माध्यमांची उत्तम उदहारणे आहेत. भारतातील (इंग्रजी मधली) म्हणजे Indiatogether, CounterCurrents या सारखे माहितीचे स्त्रोत. विकिपीडिया हे स्वायत्त मिडीयाचे आणि एक उत्कृष्ट उदा. आहे.

विकास's picture

28 Aug 2009 - 7:02 am | विकास

पण इंग्रजी भाषेबाबत पंतप्रधानांचे भाषण कोणी का केले, मला फारसे उल्लेखनीय वाटत नाही.

हे म्हणायचे कारण इतकेच की जसे जीना हे फाळणीस जबाबदार होते तसेच ब्रिटीशही होतेच. जीनांचे कौतुक जेंव्हा अडवाणी पाकीस्तानात जाऊन करतात तेंव्हा माध्यमे ती बातमी चघळतात. ते मनमोहनसिंगांच्या नशिबाला (त्यांच्या नशिबाने येत नाही). याचा अर्थ तिकडे (ब्रिटनमधे) जाऊन वाटेल ते बोलणे असा होत नाही, पण त्यांचे भाषण खचीतच पडते घेणार्‍या व्यक्तीचे वाटले म्हणून ते पंतप्रधानाकडून असल्याने नक्कीच शोभले नाही असे वाटले.

अशा परिस्थितीत मी असे समजलो, की "रोज चर्चा होत असली तरी हवी तेवढी, किंवा हवी तशी चर्चा होत नाही

अगदी बरोबर! हवी तशी होणे याचा अर्थ कुणाचे तरी (एका बाजूचे) चघळत बसले पाहीजे असा होत नाही...तर माध्यमांनी असे काम केले पाहीजे की त्यातून जनतेला योग्य माहीती मिळेल. सिंगूरच्या बाबतीत मला एक आठवत असलेली गोष्ट म्हणजे कम्युनिस्ट सरकारकडून झालेल्या शेतकर्‍यांच्या हाला मधे मुस्लीम शेतकरी होते. जर ते खरे असेल तर विचार करा तेच राज्य जर भाजपाचे असते (आणि ते ही गुजराथमधे मोदींचे) तर काय झाले असते?

अमेरिकेत "वृत्तपत्रे लिबरल आहेत - तशा वाकड्या बातम्या देतात" आणि "वृत्तपत्रे नियोलिबरल (=कन्झर्व्हेटिव्हचा एक प्रकार) आहेत - तशा वाकड्या बातम्या देतात" या दोन्ही तक्रारी वेगवेगळ्या लोकांकडून ऐकायला मिळतात.

वृत्तपत्रेच कशाला? रेडीओ आणि टिव्ही चॅनल्सच्या बाबतीत पण ते पहायला मिळतेच की. रेडीओ, मला वास्तवीक (अमेरिकन लेफ्टीस्ट अर्थात लिबरल)"एनपीआर" (National Public Radio) आवडतो. खूप चांगली माहीती असते आणि विविध पद्धतीने दिलेली असते. त्यांचे काही शोज ऐकण्यासारखे असतात. उ.दा.: morning edition, all things considered, on point, talk of the nation etc. मात्र कधीकधी या चांगले ऐकण्याचा पण कंटाळा येतो ;) आणि मग मी येथील एक स्थानीक रेडिओ लावतो - अर्थातच (अमेरिकन) राईट विंग आणि स्वतःला आणि ऐकणार्‍याला बेस्ट अँड दि ब्राईटेस्ट म्हणवून घेतात. असली करमणूक असते! लोकं कसे ऐकू शकतात आणि विश्वास ठेवू शकतात हे समजत नाही. टिव्हीवर अल्ट्रा लिबरल म्हणता येईल अशी व्यक्ती म्हणजे बिल माहर आहे. पण त्याचे वैशिष्ठ्य असे की त्या वेळेस जे वाटेल ते बोलणार. बुशला अत्यंत नावे ठेवली, ओबामा ओबामा केले, मात्र आता ओबामा जेंव्हा सगळ्यांना सामावून घेण्याच्या प्रयत्नात तडजोडी करू लागले तेंव्हा मात्र हा पठ्ठ्या त्याच्यावर कडवट टिका करत म्हणाला की वास्तवीक ओबामाने थोडेसे बुशला स्वतःमधे सामावून घेतले पाहीजे.

नॉम चॉम्स्की पण आवडता लेखक आहे. त्याची काही पुस्तके माझ्याकडे आहेत. Understanding Power हे पुस्तक मला आवडले होते. अतिशय विद्वान आहे. त्यांना जरी इथले बरेचसे जण कम्युनिस्ट म्हणत असले तरी तसे वाटत नाही. मात्र त्याचा इतका स्पष्टवक्तेपणा आणि अमेरिकेवरील जहरी टिका ही अमेरिकन आणि अमेरिकेत असल्याने चालू शकते असे कुठेतरी वाटते. रशियात अगदी पुतिनच्या रशियात पत्रकारांचे काय झाले आणि काय होत आहे हे आपण वाचत/ऐकत असतोच. तरी देखील आपल्याकडे रशियाचे कौतुक करणारे कम्युनिस्ट आजही आहेतच...

माध्यमांचा उपयोग कसा केला जातो, हे जसे चॉम्स्कीने सांगितले आहे तसेच Wag the dog ह्या रॉबर्ट डिनेरो आणि डस्टीन हॉफमनच्या चित्रपटात चांगले दाखवले आहे. शहारूख खान-जुही चावलाच्या पडलेल्या "फिर भी दिल है हिंदूस्थानी" फार्स मधे पण तेच दाखवायचा प्रयत्न केला गेला होता.

(सॅरा पेलिन म्हणतात की लिबरल मीडियाने डेमोक्रॅटांची असमतोल प्रशंसा केली. विरोधक म्हणतात की वृत्तपत्रांनी या अननुभवी सॅरा पेलिनला "मॅककेनचा ब्रिलियंट चॉइस" बनवले. वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळ्या अपेक्षांमुळे मिडिया उलटसुलट झुकलेली दिसली.)

पिडांनी इतके चांगले उत्तर दिले आहे की त्याच्या पुढे अजून काही लिहीण्याची गरज नाही :-) I rest my case (except I am independent ;) )

पिवळा डांबिस's picture

27 Aug 2009 - 7:21 am | पिवळा डांबिस

(सॅरा पेलिन म्हणतात की लिबरल मीडियाने डेमोक्रॅटांची असमतोल प्रशंसा केली. विरोधक म्हणतात की वृत्तपत्रांनी या अननुभवी सॅरा पेलिनला "मॅककेनचा ब्रिलियंट चॉइस" बनवले. वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळ्या अपेक्षांमुळे मिडिया उलटसुलट झुकलेली दिसली.)

सेरा पॅलिन मूर्ख आहे....
आमचं हे वरील प्रतिपादन पटत नसल्यास तिची वक्तव्ये यू ट्यूबवर पहा....
सेरा पॅलिन हा मॅक्वेनचा चॉईस नव्हती. ती कन्झर्वेटिव्ह लॉबीने त्याच्या माथी मारली.....
यात दोष असलाच तर मॅक्वेनचाच आहे! भितरं तिच्यायला!!!!!
मिडियाने जेव्हढी मिळेल तेव्हढी धमाल केली, मिडियाला दोष कशाला द्यायचा?
भारतात वरूण गांधीवरूनदेखील मिडियाने मज्जा केलीच की!!!
मिडियाला दोष देण्यात काही अर्थ नाही, राजकीय नेत्यांना अक्कल पाहिजे!!!
आपला,
रिपब्लिकन पिडां

सहज's picture

27 Aug 2009 - 7:32 am | सहज

लेख अतिशय आवडला, थोडक्यात मोठे महत्वाचे मुद्दे मांडले आहेत.

माध्यम एक धंदा आहे, स्तंभ वगैरे काही नाही. हे सत्य जितक्या लवकर लोक समजतील तितके चांगले.

आपण एकच करायचे आपल्यापरीने जे योग्य वाटते,अश्या गोष्टींवर चर्चा करायची. आपल्याला उपलब्ध असलेल्या व्यासपीठावर नक्कीच मांडू शकतो. आजकाल वेगवेगळ्या माध्यमांनी लोकांना सहभागी होण्याचा मार्ग दिला आहे त्याचा उपयोग करायचा.( जय सुधीर काळे!)

जय लोकशाही, जय आंतरजाल, जय मिसळपाव!

चिरोटा's picture

27 Aug 2009 - 10:28 am | चिरोटा

आपण वाचून/ऐकून/लिहून informed decision घेण्यासाठी काय करायला हवे

मला भारतिय व्रुत्तपत्रांबरोबर परदेशी व्रुत्तपत्रे वाचणेही ईष्ट वाटते. त्या व्रुत्तपत्रांमध्ये भारताविषयीच्या बातम्या तरी तटस्थ द्रुष्टिकोनातून लिहिलेल्या आढळतात. स्थानिक बातम्यांमागे (पुलाचे नाव्/भुजबळ) बर्‍याचवेळा राजकारण असते असा माझा कयास आहे.वर म्हंटल्याप्रमाणे विधान काय ह्यापेक्षा ते कोणी केले ह्याला जास्त महत्व्.आपल्या समाजात विचारांपेक्षा/क्रुतीपेक्षा व्यक्तीला जास्त महत्व दिले जाते हे त्यामागचे एक कारण असावे.
भेन्डि
क्ष्^न + य्^न = झ्^न

विकि's picture

27 Aug 2009 - 12:17 pm | विकि

तुमचा सगळा रोष माध्यमांवर आहे असे वाटते ते पुर्णपणे चुकीचे आहे असे मला वाटते . सर्वप्रथम वाचक वृत्तपत्रपत्र वाचताना आपापल्या आवडीनुसार वाचतो काही जणांना अग्रलेखात रस असतो काहींना खुन,दरोडा,अपघात काहींना खेळ,बर्‍याचजणांना राजकारणात,इत्यादी त्यामुळे यांनुसार बातमीदार,पत्रकारांना लिहाव लागते.मुळात पत्रकार बातमी लिहीतो तेव्हा तो वेगवेगळ्या कोनातून लिहीतो त्याला माहीत असते बातमीतून नेमके काय घ्यायचे ते . प्रथम पानावर आकर्षक शिर्षक लिहीले तरच ते वृत्तपत्र खपणार नाहीतर कोण घेणार? वृत्तपत्र हे सजग माध्यम आहे त्याचे व्यावसायीकरण होत आहे हे बरोबर असले तरी त्याच अस्तिव तर आपण नाकारू शकत नाही ना आणि दुसरे एक महत्वाच कारण बरीचशी वृत्तपत्र भांडवल दारांच्या हातात असल्यामूळे संपादकालाही आपली मते मांडता येत नाही.आचार्य अत्र्यांसारखी थोर पत्रकारीता हवी पण येथे काय आहे त्यांच स्वत:च्या मालकीचे वृत्तपत्र होते त्यामुळे त्यांना लिहीण्याचे स्वातंत्र्य होते कोणत्याही विषयाबाबत ते परखडपणे मत मांडत.आजकाल जाहीरातीचा जमाना आहे.
आपला
फिल्मवाला
विकि

विकास's picture

28 Aug 2009 - 12:56 am | विकास

तुमचा सगळा रोष माध्यमांवर आहे असे वाटते ते पुर्णपणे चुकीचे आहे असे मला वाटते .
माझी विधाने लेखासंदर्भात घेतली तर मला काय म्हणायचे आहे ते लक्षात येईल. माझे इतरत्र अनेक ठिकाणी प्रतिसाद अथवा लेखन पाहीले तर समजेल की नागरी जबाबदारी न पाळण्यावरून मी अनेकदा लिहीले आहे. ह्या लेखाचा/चर्चेचा विषय हा काही बातम्या कशा तयार होतात हा आहे. तो केवळ वृत्तपत्रासंदर्भात नसून एकूणच प्रसारमाध्यमासंदर्भात आहे.

बातम्या ह्या जेंव्हा मुद्दामून तयार होतात तेंव्हा त्यातून काहीतरी biased opinion shape करणे हा हेतू असतो. तसे बातम्यासंदर्भात करणे हे केवळ माध्यमांनाच जमू शकते.

प्रथम पानावर आकर्षक शिर्षक लिहीले तरच ते वृत्तपत्र खपणार नाहीतर कोण घेणार? वृत्तपत्र हे सजग माध्यम आहे त्याचे व्यावसायीकरण होत आहे हे बरोबर असले तरी त्याच अस्तिव तर आपण नाकारू शकत नाही ना आणि दुसरे एक महत्वाच कारण बरीचशी वृत्तपत्र भांडवल दारांच्या हातात असल्यामूळे संपादकालाही आपली मते मांडता येत नाही.

वरील विधानात आपल्याला अधोरेखीत ठिकाणी, "बरोबर नसले" असे म्हणायचे आहे असे गृहीत धरतो. प्रथम पानावर केवळ जसवंतसिंग/अडवाणी आदींनी काही बोलले तरच बातमी का? जेंव्हा मनमोहनसिंग काही बोलले तर का नाही? वरूण गांधींच्या बोलण्याला भरपूर बदनामी करणारी पब्लीसिटी - बातम्या आणि चर्चा. पण तेच जेंव्हा २६ नोव्हेंबरला जेंव्हा मुंबईत ताज-ओबेराय जळत होते आणि त्याच मध्यरात्री दिल्लीत राहूल गांधी नाचत होते, तेंव्हा मात्र मोघमपणा. यात नक्की व्यावसायिकता कशी येते बरे? का सरकार कडून मिळणार्‍या जाहीराती आणि परीणामी (करदात्यांचे) पैसे मिळणार नाही या भितीने काहीच लिहीले जात नाही?

बरीचशी वृत्तपत्र भांडवल दारांच्या हातात असल्यामूळे संपादकालाही आपली मते मांडता येत नाही.

अहो हा प्रश्न फक्त भांडवलदारी मालक आणि संपादकांचा नाही आहे, जरी तो मुद्दा योग्य असला तरी... विचार करा तेहलका सारखे (कॉमी आणि माझ्या लेखी विद्वेष पसरवणारे) माध्यम: त्यांनी स्टींग ऑपरेशन करून भाजपाचे भांडे फोडले. त्यांच्यातील राजकारणी कसे भ्रष्ट आहेत हे दाखवले. जे होते ते दाखवले. त्यात भाजपाची अथवा बंगारू वगैरेंची बाजू घेण्याचा संबंध नाही. आता मला सांगा त्यांनी असे कधी सांगितले का की ते (केवळ उ.दा. म्हणून हे नाव) सुरेश कलमाडींकडे गेले आणि त्यांचे स्टींग ऑपरेशन फसले म्हणून? अर्थातच नाही. कारण पक्षकचेरीत असोत अथवा संसदेत असोत फक्त एकाच बाजूच्या चोरांकडे जाऊन ते चोरी करताना दाखवायचे. दुसर्‍या बाजूला (काँग्रेस, समाजवादी/राष्ट्रवादी काँग्रेस इत्यादी) काही समान पद्धतीने आणि तितकेच चोरांना चोरी करताना दाखवायचे नाही. म्हणजे data flawed कारण प्रयोग करताना सर्वप्रकारचे datapoints नाही. याला म्हणतात की, there three kinds of lies: lie, damn lie and statistics.

या तेहलकाने जॉर्ज फर्नांडीसच्या नावाने प्रचंड गरळ ओकली. आज काँग्रेसच्याच सरकारने त्यांची आरोपातून निर्दोष मुक्तता केली. मला सांगा आली का ती बातमी तेहलका मधे? अर्थातच नाही कारण जसे काही बाजू या भांडवलशाहीने बरबटलेल्या असतात तशा काही द्वेषाने. यातील दुसर्‍या प्रकारच्या देशासाठी आणि समाजासाठी जास्त घातक असतात. ते राजकारण्यांइतकेच किंबहूना जास्त भ्रष्ट असतात.

कालिन्दि मुधोळ्कर's picture

28 Aug 2009 - 1:11 am | कालिन्दि मुधोळ्कर

>>वरूण गांधींच्या बोलण्याला भरपूर बदनामी करणारी पब्लीसिटी - बातम्या आणि चर्चा. पण तेच जेंव्हा २६ नोव्हेंबरला जेंव्हा मुंबईत ताज-ओबेराय जळत होते आणि त्याच मध्यरात्री दिल्लीत राहूल गांधी नाचत होते,

ही तुलना अत्यंत विचित्र (आणि अप्रस्तुत) आहे. २६ नो. च्या संदर्भात कोंग्रेस च्या विलासराव देशमुखांना माध्यमांनीच धारेवर धरले होते ना?

बाकी राहुल गांधी अथवा त्यांच्या घराण्याबद्द्ल अनेक मुक्ताफळे सामना मधे वगेरे येत असतातच.

आपण तहलका वाचता का? फक्त स्टींग ओपरेशन म्हणजेच तहलका नव्हे. कोंग्रेस-कमयुनिस्टांवर तिथे टीका केली जाते.

विकास's picture

28 Aug 2009 - 2:56 am | विकास

ही तुलना अत्यंत विचित्र (आणि अप्रस्तुत) आहे. २६ नो. च्या संदर्भात कोंग्रेस च्या विलासराव देशमुखांना माध्यमांनीच धारेवर धरले होते ना?

त्यात विचित्र ते काय? मी वरूण गांधींचे वक्तव्य बरोबर होते असे म्हणले का? ह्या धाग्यात सुरवातीस म्हणल्याप्रमाणे केवळ एकाबाजूने ठळक बातम्या होतात तर दुसरीकडे सारं कसं शांत शांत.. हे दाखवायचा प्रयत्न आहे. बरं विलासरावांना धारेवर धरले म्हणून राहूल गांधींना सोडायचे ह्यात काय तर्क? शिवाय ज्यांनी विलासरावांना धारेवर धरले (विशेष करून इंग्रजी माध्यमे) त्यांना मुंबईला सीईओ हवा का ते विचारा म्हणजे त्यांची धार कशाला आहे ते कळेल. त्याही पुढे राज्यातून केंद्रात त्यांना नेणे म्हणजे पदच्युत केले असे होते का? तेंव्हा काय झाले?

बाकी राहुल गांधी अथवा त्यांच्या घराण्याबद्द्ल अनेक मुक्ताफळे सामना मधे वगेरे येत असतातच.

सामना हे शिवसेनेचे मुखपत्र आहे. टाईम्स. एक्सप्रेस, हिंदू, हिंदुस्थान टाईम्स वगैरे काय मुखपत्रे आहेत का कुठल्या विचारांची का लोकशाहीचा पंचमस्तंभ? उद्या तुमच्या काउंटरकरंटस.ऑर्ग मधेपण समतोल लेखन असते असे म्हणाल!

आपण तहलका वाचता का? फक्त स्टींग ओपरेशन म्हणजेच तहलका नव्हे. कोंग्रेस-कमयुनिस्टांवर तिथे टीका केली जाते.

हो वाचतो ना. म्हणूनच म्हणतोय की फक्त "स्टींग ऑपरेशन्स" ती पण अत्यंत दिशाभूल करणारी करायची आणि त्याचा तहलका करायचा... बाकी काय बातम्या असतात - "मी मारल्यासारखे करायचे आणि तू रडल्यासारखे कर" पद्धतीत बसणार्‍या....

विकि's picture

28 Aug 2009 - 6:55 pm | विकि

पण वरुण गांधीला तेवढीच प्रसिध्दी ही मिळाली ना(नकारार्थी असली तरी कींवा यात राजकारण ही असू शकते)? राहुल गांधी दिल्लीत नाचत होते ही बातमी पहिल्यांदाच ऐकली.तुमच्याकडे काही पुरावा आहे का याबाबत.
तहलका ने स्टींग ऑपरेशन केले ती एक चांगली शोधपत्रकारीता होती. प्रसारमाध्यमे कधीही पुराव्याशिवाय बोलत नाही असा त्यांना संकेत असतो.
बा़की तुम्ही छान लिहिले आहे.
आपला(सध्या प्रेमामध्ये पडलेला बस उसकी हा कहनेकी बारी है)
हर किसीको नही मिलता यहा प्यार जिंदगी ............वाला
तद्दन फिल्मी विकि

विकास's picture

28 Aug 2009 - 7:39 pm | विकास

राहुल गांधी दिल्लीत नाचत होते ही बातमी पहिल्यांदाच ऐकली.तुमच्याकडे काही पुरावा आहे का याबाबत.

बघा तुम्हाला बातमीच माहीत नाही. यातच आले की कशी झाकली गेली होती ते... हा घ्या पुरावा :

Rahul in party mood soon after Mumbai crisis

ऋषिकेश's picture

27 Aug 2009 - 1:43 pm | ऋषिकेश

एखादी घटना बातमी केव्हा होते यावर काहि शक्यता:
१. जेव्हा एखाद्या पत्रकाराला त्यात सामाजिक-राजकीय-मनोरंजनात्मक- क्रीडाविषयक वगैरे बाबतीत "सामुदायिक"चिंता/आनंद/दु:ख/महत्त्व/मसाला/अपेक्षित दबदबा दिसतो तेव्हा
२. जेव्हा एखाद्या प्रकाशन कंपनीला त्या घटनेत विक्रीयोग्यता (सेलेबिलिटी) दिसते तेव्हा
३. जेव्हा एखाद्या बड्या व्यावसायिकाला- नेत्याला -सरकारला (पक्षी: जाहिरातदाराला ) ती बातमी छापून येणे फायद्याचे वाटते तेव्हा.
४. इतर वृत्तपत्रे/वाहिन्या/संकेतस्थळे जेव्हा छापतात तेव्हा

वरील चारहि शक्यतांपैकी शक्यता १ ही वार्ताहराच्या व्यक्तीसापेक्षतेवर अवलंबून आहे. तर शक्यता २ व ४ पत्रकारीतेची व्यावसायिक दृष्टीने आर्थिक अपरिहार्यता दर्शवतो तर शक्यता ३ ही पत्रकारीतेची राजकीय-सामाजिक-आर्थिक अश्या साखळीच्या अपरिहार्यतेमुळे येणारा दबाव दर्शवतो.

याशिवाय काहि बातम्या/अग्रलेख/लेख मात्र कोणत्याहि कारणांशिवाय त्या लेखकाला/संपादकाला महत्त्वाचे वाटातात म्हणून येतात.

गंमत अशी की वाचकाला काय वाचायला हवे आहे याचा फक्त तर्क लावला जातो/सांख्यिकी अभ्यास केला जातो. पण हा शेवटी तर्क असल्याने वरील चार शक्यतांत फिट्ट बसूनहि वाचकाला हवी ती बातमी हव्या त्या तीव्रतेने मांडणं कठीण असावे असे वाटते.

ऋषिकेश
------------------
संध्याकाळचे १ वाजून ४३ मिनीटे झालेली आहेत. चला आता करूया एक ऐतिहासिक अग्रलेख वाचन "सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय?..."

धनंजय's picture

29 Aug 2009 - 2:37 am | धनंजय

माझ्या उदाहरणाचा मथितार्थ पोचवू शकलो नाही, याबद्दल दिलगीर आहे.

पिवळा डांबिस यांनी सांगितलेले मत आपल्यापैकी बर्‍याच लोकांचे आहे, ते गृहीत धरले आहे. (म्हणजे राजकारण्यांना अक्कल पाहिजे, मीडिया ढोपराने खणणार, वगैरे.) त्यामुळे ते पिडां यांनी वेगळे सांगितले, म्हणजे स्पष्ट केले, हा त्यांचा मोठेपणा. (तो अर्थ अस्पष्ट होता असे कोणाला वाटले असेल, किंवा सॅरा पेलिन यांच्याबद्दल काही लोकांना ओळख नसेल, तर त्यांच्या प्रतिसादातून कळले आहे.)

अशा स्पष्ट परिस्थितीतही मीडिया उजवीकडेच झुकली आहे, आणि डावीकडेच झुकली आहे, असे दोन्ही टोकांचे मत आपल्याला वाचायला मिळते.

अमेरिकेत (संयुक्त राज्यांत) रिपब्लिकन-डेमोक्रॅट पक्ष जवळपास अर्धे-अर्धे आहेत. मॅककेन-पेलिनना ४५.७% मते मिळाली, म्हणजे अगदीच कुठले १-२% लोक नव्हेत.

येथे माझा मुद्दा होता : ज्या दृष्टिकोनातून लोक त्याच प्रसारमाध्यमांकडे बघतात, प्रसारमाध्यमे आपल्या विरोधी बाजूचे फाजिल समर्थन करताना दिसतात. अगदी सॅरा पेलिन सारख्या स्पष्ट उदाहरणातसुद्धा उजवीकडच्यांना डाव्यांचे समर्थन दिसते, आणि डावीकडच्यांना उजव्यांचे समर्थन दिसते. आणि हे उजवे, आणि डावे दृष्टिकोनवाले खूप मोठ्या प्रमाणात असतात.

या स्पष्ट बाबतीतही दोन तट दिसतात, आणि दोन्हीकडून प्रसारमाध्यमे विरोध्यांना फितूर म्हणून सांगितली जातात. ज्या गोष्टी वादग्रस्त आहेत त्या ठिकाणी हे होणे अपेक्षितच आहे.

लेखात म्हटले आहे :

हे सर्व येथे लिहीण्याचे कारण कुणाचाही बचाव करणे, बाजूने लिहीणे हे नाही आहे. हा प्रकार भारतातच नाही तर स्थानीक राजकारणासंदर्भात अमेरिकेत देखील आहे. पण नक्की असे वागून माध्यमे काय मिळवतात?

(म्हणजे भारतातील आणि अमेरिकेतील सामान्य प्रवृत्तीकडे निर्देश आहे.) राजकीय बाबतीत "प्रसारमाध्यमे काय मिळवतात?" या कोड्याबरोबर "प्रसारमाध्यमांवर एकाच वेळी दोन्हीकडून पक्षपाताचा उलटसुलट आरोप होत असतो, अगदी मनापासून! त्याचे काय करावे?" हे कोडेही सोडवण्यालायक आहे.

या पक्षपाती कलण्याचा आभास का होतो त्याचे मनोवैज्ञानिक गणित माझ्या मते येणेप्रमाणे असावे :
'अ' तट आणि 'ब' तट असे झुमरीतलैया गावातले दोन पक्ष/विचारसरणी आहेत.
"झुमरीतलैय्या टाइम्स" मध्ये चार दिवशी वेगवेगळ्या बातम्या येतात.

१. 'अ' पक्षाचे उत्तम कार्य.
२, ३, ४. 'अ' पक्षातली हास्यास्पद लाथाळी
५. 'ब' पक्षाचे उत्तम कार्य.
६, ७, ८. 'ब' पक्षातली हास्यास्पद लाथाळी

(लाथाळीच्या बातम्यांनी अधिक वर्तमानपत्रे विकतात.)
'अ' पक्षातला वाचक बातम्यांच्या पक्षपाताचा हिशोब असा लावतो.
१. 'अ' पक्षाचे उत्तम कार्य. हे तर सत्य आहे. हे न छापून कसे चालणार आहे? वर्तमानपत्राला काही क्रेडिड द्यायची गरज नाही.
२, ३, ४. 'अ' पक्षातली हास्यास्पद लाथाळी. फारतर एकदा बातमी दिली असती तरी चालली असती. बाकी दोन बातम्या म्हणजे पक्षपात आहे.
५. 'ब' पक्षाचे उत्तम कार्य. हे वर्तमानपत्र लाळघोटेपणा करते आहे. ही बातमी म्हणजे पक्षपात आहे.
६, ७, ८. 'ब' पक्षातली हास्यास्पद लाथाळी एक बातमी ठीक असली तर असेल. बाकी म्हणजे "मी मारल्यासारखे करतो, तू रडल्यासारखे कर" प्रकार आहे. हा सगळाच पक्षपात आहे.

'ब' पक्षाचा वाचक नेमके उलट हिशोब करतो.

अशा प्रकारे दोन्ही बाजूच्या विचक्षण हिशोबात (मागचे "मी मारल्यासारखा तू रड" हे तीक्ष्ण विश्लेषण लावून) वर्तमानपत्र उलटीकडे पक्षपाती वाटते.

आता वरील हिशोबात "झुमरीतलैय्या टाइम्स" हे "अ‍ॅव्हरेज काढलेले" वर्तमानपत्र आहे. म्हणजे मटा, सामना, लोकसत्ता, सर्वांचा अ‍ॅव्हरेज.

नाहीतर लगेच कोणी म्हणेल - "अहो हिशोबवाले! सामनाकार शिवसेनेला पाठिंबा देतात, आणि केतकर इंदिरा काँग्रेसला पाठिंबा देतात हे न कळणारे दूधखुळे आहात!" पण बहुतेकांना हे स्पष्टीकरण लागणार नाही, त्यांना स्पष्टीकरणाबद्दल माफी मागतो.

नितिन थत्ते's picture

29 Aug 2009 - 8:34 pm | नितिन थत्ते

मीडियाच्या मालकांच्या इंटरेस्टवर बातमीचे महत्त्व ठरते हे जगजाहीरच आहे.

तत्कालीन राजकीय फायद्यासाठी बातमी वाढवण्याचे किंवा दाबली जाण्याचे प्रकार नेहमीच घडत असतात. जसे भुजबळांच्या बाबतीत घडले असे वाटत नाही . 'नथुराम वक्तव्या'च्यावेळी ती महत्त्वाची बातमी होतीच पण १९९३-९४ मध्ये भुजबळ १२ समर्थकांसह शिवसेनेतून फुटले. तेव्हा शिवसेनेतून कोणी फुटू शकतो/शकण्याचे धाडस करू शकतो ही इतकी महत्त्वाची गोष्ट होती की इतर बाबींकडे दुर्लक्ष झाले.

विरोधी पक्षांनी देखील अशा अनेक काँग्रेसींना आपल्या पक्षांत थारा दिला त्याहीवेळी मीडियाने असे प्रश्न विचारले नाहीत/लावून धरले नाहीत. आज भाजप मेनका आणि वरूण यांची तळी उचलून धरत असली तरी आणिबाणी मधील नंबरी खलनायकांमध्ये संजय गांधी आणि मेनका यांचा समावेश जनसंघ/भाजप करीत असे. त्यांनाही कोणी असा प्रश्न (१९८२-८३त) विचारला नाही.

मनमोहनसिंगांच्या भाषणाविषयी थोडे.. ब्रिटिशांच्या राज्यामुळे आधुनिक वारे भारतात आले हे खरेच आहे. ते राज्य आले नसते तरी आधुनिकता आलीच असती असे मानणे वस्तुस्थितीला धरून नाही कारण ब्रिटिश भारतात सतराव्या शतकाच्या मध्यापासून होतेच. तसेच फ्रेंच आणि डचही होते. (पोर्तुगीजांना धरत नाही कारण ती सत्ता आधुनिक म्हणता येईल अशी नसावी). पण ब्रिटिश सत्ता पक्की झाल्यावरच आधुनिकतेच्या दिशेने प्रवास सुरू होण्यास अनुकूल वातावरण आले. या वस्तुस्थितीचा स्वीकार करणे म्हणजे अजीजी हे काहीतरीच वाटते. (जुन्या काळातल्या अनेक वयोवृद्धांना वाटे त्याप्रमाणे ) भारतात ब्रिटिशांनी च राज्य करावे असे काही मनमोहनसिंग म्हणत नाहियेत. त्यामुळे हे वेगळे आणि जीना राष्ट्रीय सेक्यूलर नेते होते हे म्हणणे वेगळेच. मीडियाने ते वेगळे ट्रीट केले हे योग्यच वाटते.

नितिन थत्ते
(पूर्वीचा खराटा)