तांदुळाच्या पीठाची थालिपीठे

शाल्मली's picture
शाल्मली in पाककृती
26 Aug 2009 - 2:31 pm

परवा गणपतीसाठी मोदक केल्यानंतर थोडी पीठी उरली होती. त्याचे काय करावे असा विचार केल्यानंतर सुचले की याची थालिपीठे करुन पहावीत. तशीही इथे आल्यापासून थालिपीठे खाल्लीच नव्हती आणि अशी कशी आपण थालिपीठ भाजणी आणायची विसरलो हा विचार करणंही एव्हाना सोडून दिलेलं होतं. त्यामुळे आता या उरलेल्या पीठाची थालिपीठे करण्याचं पक्कं केलं. हा पदार्थ खूपच छान चविष्ट लागला. म्हणून खास मिपाकर खवय्यांसाठी इथे देत आहे-

तांदुळाच्या पीठाची थालिपीठे

साहित्यः-
१ वाटी तांदुळाचे पीठ
१ गाजर किसून
थोडी कांद्याची पात (ऐच्छिक)
२ चमचे मुगाची डाळ
२ हिरव्या मिरच्या
पुदीन्याची ४-५ पाने बारीक चिरुन (ऐच्छिक)
बारीक चिरलेली कोथिंबीर
१ इंच आलं किसून
४-५ लसूण पाकळ्या बारीक चिरुन
हळद
चवीनुसार मीठ
तेल

कृती:-
मुगाची डाळ अर्धा तास भिजवून ठेवावी.
एका परातीत तांदुळाची पीठी घ्यावी. त्यात भिजवून ठेवलेली मुगाची डाळ, किसलेले गाजर, बारीक चिरलेली कांद्याची पात, पुदीना, हिरवी मिरची, कोथिंबीर, आलं, लसूण, थोडी हळद आणि चवीनुसार मीठ घालावे. थोडे पाणी घालून थालिपीठांसाठी पीठ मळून घ्यावे.
गॅसवर तवा गरम करायला ठेवावा.
तयार पीठाचा एक गोळा घेऊन बटर पेपरवर किंवा प्लॅस्टिकच्या पिशवीवर तेलाचा हात लावून थालिपीठ थापावे. गरम तव्यावर तेल घालून दोन्ही बाजूंनी थालिपीठ खरपूस भाजावे. सॉस, चटणी किंवा लिंबाच्या लोणच्याबरोबर गरमागरम चापावे. :)

टीपः- मी यात गाजर आणि कांद्याची पात घातली होती. परंतु इतर कोणत्याही भाज्या घालून ही थालिपीठे करुन वैविध्य आणता येईल.
थालिपीठ भाजणी घरात नसताना दुधाची तहान ताकावर आणि तेही हिंग, जिरेपूड घातलेल्या आंबट गोड ताकावर भागवता येईल. ;)

--शाल्मली.

प्रतिक्रिया

पर्नल नेने मराठे's picture

26 Aug 2009 - 2:59 pm | पर्नल नेने मराठे

वॉव ...भुक लाग्लि ;)
चुचु

ब्रिटिश टिंग्या's picture

26 Aug 2009 - 3:35 pm | ब्रिटिश टिंग्या

आज सकाळीच न्याहारी या थालपीठांवर झाली :)

स्वाती दिनेश's picture

26 Aug 2009 - 5:04 pm | स्वाती दिनेश

छान दिसत आहेत थालिपिठे, मी बरेचदा तांदुळाच्या पिठीची थालिपिठे करते पण गाजर, मूगाची डाळ इ. घालून कधी केली नाहीत, आता करुन पाहिन,
स्वाती

स्मिता श्रीपाद's picture

26 Aug 2009 - 5:27 pm | स्मिता श्रीपाद

कसली सही दिसतायत गं...
मी नक्कीच करुन पाहीन..

मी अजुन एक प्रकार ऐकला होता तांदळाच्या पीठाचा...
त्यात म्हणे नेहेमीसारखी उकड करुन घ्यायची...आणि त्यात जिरे,धणेपूड,तिखट,मीठ,कोथिंबीर असं सगळं घालुन चांगलं मळायचं..
आणि त्याची ओल्या कापडावर धपाटी थापायची म्हणे..आणि तेलावर खरपूस भाजुन घ्यायची...
हा पदार्थ कोल्हापुर साइडला करतात म्हणे...आणि साईचं दही आणि भाजलेल्या शेंगदाण्यांसोबत खातात म्हणे...
म्हणे ..म्हणे खुपच जास्त झालं :P

असो...
पण वरचा पदार्थ लय आवडला म्हणे.. :D

शाल्मली ताई
मनापासून धन्यवाद..... माझ्या रविवारच्या स्पेशल मेनूची सोय केल्याबद्दल..

बायकोला सांगण्यासाठी खूप दिवसांत मिसळपाव वरुन एक मस्त पाक कृती मिळाली... तिला पण खूप आवडते मिसळपाव वरुन नवीन नवीन पाककृती करुन पहायला... :)

(खादाडमाऊ) सागर

प्राजु's picture

26 Aug 2009 - 5:43 pm | प्राजु

अ फ ला तू न!!!
सोल्लिड फोटो!!
नुसत्या तांदूळ पिठीची केली होती थालीपिठे.. अशी होतीलच लवकर. कळवेन तुला. :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

लवंगी's picture

26 Aug 2009 - 5:50 pm | लवंगी

तांदळाच्या पिठाची डाळ घालून कल्पना नविन आहे. करून सांगीन कशी झाली ते.

स्वाती२'s picture

26 Aug 2009 - 6:38 pm | स्वाती२

फोटो पाहूनच भूक लागली.

सहज's picture

26 Aug 2009 - 6:46 pm | सहज

वाचनखूण साठवली आहे. लवकरच करुन पाहीन..

विसोबा खेचर's picture

26 Aug 2009 - 6:49 pm | विसोबा खेचर

लाजवाब पाकृ...!

तात्या.

रेवती's picture

26 Aug 2009 - 6:59 pm | रेवती

आहाहा! काय फोटू आलाय!
आत्ता सकाळी भाजणीची थालीपिठे केली होती त्याच वेळी मनात आले की भाजणी लवकरच संपणार ......मग काय करायचे? पाकृ पाहून बरे वाटले कारण चविष्ट अल्टर्नेटीव मिळाले. सध्या मोदकांच्या सिझनमुळे ;) पिठी आहेच. धन्यवाद!
उरलेल्या उकडीच्या निवगर्‍यांची आठवण आली पण यावेळी उकड उरली नाही.;)

रेवती

चकली's picture

26 Aug 2009 - 7:20 pm | चकली

शाल्मली ताई,
झक्कास दिसतायत थालिपीठं!!

चकली
http://chakali.blogspot.com

मदनबाण's picture

27 Aug 2009 - 5:04 pm | मदनबाण

हेच म्हणतो... :)

मदनबाण.....

Stride 2009 :---
http://www.southasiaanalysis.org/%5Cpapers34%5Cpaper3354.html

चतुरंग's picture

26 Aug 2009 - 10:27 pm | चतुरंग

किलवरच्या आकारात रचलेली थालीपिठे आणी वरची लालभडक टोमॅटो केचपची वाटी बघून तोंडाला अंमळ पाणी सुटले! =P~
जियो शाल्मली तै!!

(किलवर राजा)चतुरंग

नंदन's picture

2 Sep 2009 - 1:31 pm | नंदन

किलवरच्या आकारात रचलेली थालीपिठे आणी वरची लालभडक टोमॅटो केचपची वाटी बघून तोंडाला अंमळ पाणी सुटले!

- असेच म्हणतो. मस्तच दिसतेय पाकृ.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

दिपाली पाटिल's picture

27 Aug 2009 - 1:40 am | दिपाली पाटिल

मस्त दिसतायत थालीपिठं... भारतीय दुकानातुन एकदा भाजणी आणुन केली होती पण भाजणीला जुनाट वास येत होता, ही जास्त छान होतीलसे दिसतय..

दिपाली :)

शाहरुख's picture

27 Aug 2009 - 1:56 am | शाहरुख

सिरिअसली, या विकांतालाच* ही पाककृती होणार !!

इज द पिठी ऑफ द तांदूळ सपोज्ड टु गेट एक्सपायर्ड ??
मागच्या वर्षी गणपतीत उकडीच्या मोदकाच्या भीमपराक्रमासाठी आणलेली पिठी (शिजवलेली नव्हे :-D) फडताळात अंमळ मागे गेल्याने अंमळ दुर्लक्षित झाली होती:-) . परवाच दिसलीय.

* 'विकांत' हा शब्द माझ्या फारच डोक्यात जातो..पण इथे "गरज" असल्याने नाइलाज म्हणून वापरलाय :-D

शाल्मली's picture

27 Aug 2009 - 2:31 pm | शाल्मली

इज द पिठी ऑफ द तांदूळ सपोज्ड टु गेट एक्सपायर्ड ??

काही कल्पना नाही :(
पण एक वर्ष म्हणजे जरा अतीच जुनी आहे हो..
एव्हाना त्यात भरपूर पोरकिडेही झाले असतील.. बघा एकदा.

--शाल्मली.

ब्रिटिश टिंग्या's picture

28 Aug 2009 - 11:09 am | ब्रिटिश टिंग्या

>>एव्हाना त्यात भरपूर पोरकिडेही झाले असतील..

म्हणजे त्यातल्या किड्यांना पोरं झाली इतकी जुनी पिठी आहे! :)

स्वाती दिनेश's picture

27 Aug 2009 - 3:08 pm | स्वाती दिनेश

जुनी झाली की पिठीची विरी जाते, मग मोदक, थालिपिठे असे काही करायला घेतले की चिरा पडून पदार्थ फाटतो. जुन्या पिठीची उकड करता येईल, किवा निवगर्‍या..
किवा त्या पिठीत थोडा मैदा बाईंडिंग साठी घालता येईल आणि थालिपिठे करता येतील.
स्वाती

युयुत्सु's picture

27 Aug 2009 - 6:47 pm | युयुत्सु

तांदळाच्या पीठात दही घातले तर धीरडे फाटत नाही आणी तव्यावरून लवकर न सुटते.

प्रभाकर पेठकर's picture

1 Sep 2009 - 3:24 pm | प्रभाकर पेठकर

इज द पिठी ऑफ द तांदूळ सपोज्ड टु गेट एक्सपायर्ड ??

नो, इन फॅक्ट, इट गिव्हज् बर्थ टू 'न्यू लाईफ', कॉल्ड पोर किडाज् अँड अळीज्.

शाहरुख's picture

2 Sep 2009 - 12:14 am | शाहरुख

अ‍ॅज अ मॅटर ऑफ फॅक्ट, देअर वेअर नायदर पोरकिडाज् नॉर अळीज् इन इयर-ओल्ड पिठी ऑफ द तांदूळ !! अ‍ॅज सेड बाय द एक्सपर्टस्, द पिठी हॅड लॉस्ट ऑल द विरी इट हॅज इन इटस् प्राईम..अ‍ॅडींग दही इन द पिठी डिडंट हेल्प मी मच..आय डिडंट हॅव मैदा टु अ‍ॅड टु पिठी टु गेट द रिक्वायर्ड बायंडींग.

बट आय हॅड प्रॉमिस्ड फॉर ट्राईंग द पाककृती फॉर द विकांत...

सो आय एंडेड अप थापींग स्मॉल स्मॉल थालीपीठाज् डायरेक्टली ऑन द तवा..अ‍ॅज द तवा वॉज गरम, आय हॅड टु टेक केअर दॅट माय फिंगर्स डोंट टच द तवा.सो आय कुडन्ट थाप वेल..बट आय डिडंट बॉदर मायसेल्फ वुईथ दॅट..दिज बिईंग द तांदूळ वन्स, दे वेअर सपोज्ड बी नरम इंस्टेड ऑफ कुरकरीत.

इन ऑल, इट वॉज फन !!

अशा प्रकारच्या लेखनातच 'विकांत' (तसेच 'धन्स', 'धन्यु') सारखे शब्द शोभून दिसतात.

विकि's picture

27 Aug 2009 - 11:44 am | विकि

फोटो पाहूनच तोंडाला पाणि सुटले .मजा आया देखके तो खाके कितना आयेगा.
प्रश्न - आपण नेहमी करतो ते थालीपीठ कडक असते, ही तांदळाची थालीपीठ नरम होत असतील ना?

शाल्मली's picture

27 Aug 2009 - 2:29 pm | शाल्मली

प्रश्न - आपण नेहमी करतो ते थालीपीठ कडक असते, ही तांदळाची थालीपीठ नरम होत असतील ना?

हो तर!
ही थालिपीठे नरम होतात. झाकण ठेऊन शिजवायचे.

--शाल्मली.

किट्टु's picture

28 Aug 2009 - 2:56 am | किट्टु

हाय शाल्मली,

मस्त रेसिपी आहे... आजच करुन पाहीली......फोटो टाकते आहे, मी फक्त त्यात 'मटार'चे दाणे पण घातले.... अश्याच नविन रेसिपी शेयर करत जा प्लीज.....

Free Image Hosting at www.ImageShack.usQuickPost

शाल्मली's picture

28 Aug 2009 - 2:22 pm | शाल्मली

किट्टू,
धन्यवाद!
मटाराचे दाणेही त्यात छान वाटले असतील..
मी कृतीत म्हणल्याप्रमाणे त्यात आवडीनुसार कोणत्याही भाज्या घालता येतील.

--शाल्मली.

सायली पानसे's picture

1 Sep 2009 - 1:38 pm | सायली पानसे

छान दिसते आहेत फोटो शाल्मली उद्या करुन बघते नक्की.
अजुन देत जा अश्या छान रेसिपी.

सहज's picture

2 Sep 2009 - 11:24 am | सहज

विकांताला केले होते. मस्तच झाले होते. निम्मे खाल्यावर आठवले की फोटो घ्यायला पाहीजे होता.. असो..

तैसाहेब धन्यु

स्वाती राजेश's picture

2 Sep 2009 - 10:27 pm | स्वाती राजेश

काल मि.पा.वर फोटो पाहून ही पाककृती करावीशी वाटली....
आज ती केली, फारच छान झाली चवीला, थालीपीठापेक्षा जरा वेगळी चव, त्यामुळे आवडलीत....
मस्त फोटो आणि रेसिपी सुद्धा!!!! :)

शाल्मली's picture

3 Sep 2009 - 2:00 pm | शाल्मली

धन्यवाद!
पाकृ. आवडली सांगणार्‍या सर्वांचे तसेच थालिपीठे आवर्जून करुन बघितलेल्या खवय्यांचे आभार! :)

--शाल्मली.